नवापूरला मराठी हायस्कूलमध्ये गोवर, रुबेला लसीकरण

    15-Dec-2018
Total Views |


 
 
नवापूर : 
 
श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने गोवरचे दुरीकरण करण्याचा आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
9 महिने तर 15 वर्षे वयोगटातील सर्व मुले, मुली यांना गोवर व रुबेला आजाराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही लस देण्यात आली. अर्धा तास विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर लसीकरण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.
 
 
गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग नवापूर येथील आरोग्य सेविका व मदतनीस, शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक डी.बी. बेंद्रे, शाळेतील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.