ऑनलाइन औषध विक्रीवर दिल्ली न्यायालयाची बंदी

    13-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : औषधाची ऑनलाइन विक्री न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच यावर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी असेही सांगितले आहे. याआधी मद्रास न्यायालयानेही औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर तमिळनाडूमध्ये बंदी घातली होती. दिल्ली हायकोर्टाने औषधे ऑनलाईन विक्री न करण्याचे आदेश संपूर्ण देशभरात लागू केले आहेत.

 

दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्या. वी के रॉय यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दिल्लीतील त्वचारोगतज्ज्ञ जहीर अहमद यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर या संदर्भात सुनावणी सुरू होती. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऑनलाईन औषधांची विक्री होत असल्यामुळे यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर डॉक्टरांच्या कामावरही याचा परिणाम होईल. त्यामुळे यावर तातडीने बंदी घालण्यात यावी.

 

औषधांच्या ऑनलाईन विक्रीमुळे 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक अॅक्ट १९४०' आणि 'फार्मसी अॅक्ट १९४८' या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे जहीर अहमद यांचे वकील नकुल मोहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कोर्टाने या स्वरुपाच्या विक्रीवर बंदी घातली. यावर्षी सप्टेंबरमध्ये आरोग्य मंत्रालयाने औषधांच्या ऑनलाईन विक्रीसंदर्भात एक मसुदा तयार केला होता. त्यानुसार औषधांच्या ऑनलाईन विक्रीसाठी ई फार्मसीला केंद्रीय संस्थेकडे नोंदणी करावी लागेल. मादक औषधांच्या विक्रीच परवानगी त्यांना मिळणार नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर खापरखेडा येथे तिरंगा सन्मान यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर खापरखेडा येथे तिरंगा सन्मान यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा-चिचोली ग्रामपंचायत क्षेत्रात आज सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे आणि सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121