नुकत्याचा पार पडलेल्या तेलंगण विधानसभा निवडणुकीत टीआरसने मोठा विजय मिळविला आहे. २०१४ मध्ये वेगळे राज्य बनल्यानंतर तेलंगणमध्ये पहिली विधानसभा निवडणूक लोकसभेसोबतच झाली होती. येथे २०१९च्या लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा होणार होती. परंतु, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी निश्चित वेळेपेक्षा नऊ महिन्यांपूर्वीच विधानसभा भंग केली. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत राव यांचा पक्ष तेलंगण राष्ट्र निर्माण पार्टी (टीआरएस) याला बहुमत मिळाले होते. पक्ष ६३ जागांसोबत पहिल्या क्रमांकावर होता. दुसरीकडे, काँग्रेसला २१ आणि टीडीपीला १५ जागा मिळाल्या होत्या. तेलंगण विधानसभा दि. ६ सप्टेंबर रोजी बरखास्त करून टीआरएसने मोठी खेळी खेळली होती. तसे पाहता दक्षिण भारतातील राजकारण हे प्रादेशिक मुद्द्यांभोवती फिरते. परंतु, जर तेलंगण विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत झाली असती, तर लोकसभेतील राष्ट्रीय मुद्द्यांपुढे टीआरएसचे प्रादेशिक कुचकामी ठरले असते. मोदींपुढे आपला निभाव लागणार नाही, या भीतीने टीआरएसने तेलंगण विधानसभा बरखास्त केली. टीआरएसच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच घरोघरी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. त्यामुळेच विरोधकांनी आश्चर्यकारकरीत्या एकजूट बांधून केलेल्या आघाडीचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही.
वीज, पाणी आणि तांदूळ ठरले प्रचाराचे मुद्दे
घराणेशाही, जातीयवाद, वीज, शेतकर्यांना पाणी, गरिबांना स्वस्त तांदूळ यांसारखे मुद्दे प्रभावी ठरले. दलित मुख्यमंत्री न करणे, सिंचन योजनांच्या नावावर घोटाळा, अल्पसंख्याकांना आणि वनवासींना १२ टक्के आरक्षण न देणे यासारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते; तर कोणत्या सरकारने आजपर्यंत २४ तास वीज दिली आहे, असा प्रश्न चंद्रशेखर राव प्रचार सभांत केला होता.
शिवसेना उमेदवाराला केवळ ११२ मते
तेलंगण विधानसभा निवडणुकीत चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून एमआयएमच्या अकबरुद्दीन ओवेसी यांनी विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे ओवेसी यांच्याविरोधात लढणार्या शिवसेना उमेदवार सुदर्शन मलकान यांना केवळ ११२ मते मिळाली आहेत. त्यामुळे ओवेसींविरुद्ध लढणार्या सर्वच १४ विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
पितापुत्रांचा विजय
एमआयएमने टीआरएससोबत जाणार
तेलंगण विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येथील एमआयएमचे प्रमुख असुद्दुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली असून टीआरएसला समर्थन देण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. निकालापूर्वीच एमआयएमने टीआरएससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेलंगण सरकारमध्ये एमआयएम पक्षाला संधी मिळणार असल्याचे दिसून येते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/