छत्तीसगढमध्ये आजही दुर्गम क्षेत्रे विकासांपासून वंचित आहेत. कारण, नक्षली इथे कोणत्याही विकासकामाला हिंसात्मक विरोध करतात पण, जनतेसमोर विरोधकांनी नक्षल्यांचे चित्र क्रांतिकारी रंगवले आणि चित्र निर्माण केले की, १५ वर्षांच्या सत्तेत भाजपने काय केले? दुसरीकडे याच कालावधीत छत्तीसगढमध्ये हिंसाचार माजवत नक्षलींनी जनतेला धमकी दिली की, काँग्रेसला मतदान करा. भाजप पक्षापेक्षा प्रशासनाचे अपयश हे भाजपच्या हरण्याचे कारण आहे.
भाजपकडे मुख्यमंत्री म्हणून डॉ. रमणसिंग हा एक चेहरा असताना, काँग्रेसने इथे मात्र संभाव्य उमेदवार म्हणून चरणदास महंत, भूपेश बघेल, टि.एस.सिंग, ताम्रध्वज साहू वगैरे विविध समाजगटांचे प्रतिनिधीत्व करणार्या नेत्यांना मुख्यमंत्रिपदाची आस दिली. १५ वर्षांत भाजपचे सत्तेतले चेहरे मात्र तेच राहिले. कार्यकर्त्यांमध्ये असलेला निरुत्साह हा भाजपच्या अपयशाचा मुख्य मुद्दा आहे. छत्तीसगढच्या या पराभवाची मीमांसा करायची, तर ‘भाकरी का करपली?’ असेच विचारावे लागेल.
इथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींच्या एकूण २४ सभा झाल्या, तर राहुल गांधींचे २० सभादौरे झाले. राहुल गांधींची प्रतिमा भोळाभाबडा, सतत चुकणारा सामान्य तरुणासारखीच अशीच आहे आणि अशी प्रतिमा दुर्गम भागात वंचित समाजासमोर रंगवण्यात काँग्रेस यशस्वी झाले. इथे पंतप्रधान मोदींच्या केवळ चार सभा झाल्या. मोदींच्या जास्त सभा झाल्या असत्या, तर चित्र बदलले असते.
काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते अजित जोगी यांनी काँग्रेसमधून फुटून जनता काँग्रेस छत्तीसगढ पक्षाची स्थापना केली. या पक्षाने बसपा आणि भाकपशी हात मिळवणी केली. हा पक्ष काँग्रेसची मत फोडेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. कारण, अजित जोगींच्या भोवती असलेले भ्रष्टाचाराची आणि घराणेशाहीची वावटळ. या क्षेत्रात बसपाही फार काही करू शकली नाही. २००३ पासून सातत्याने विजयी होणार्या भाजपचा अश्वमेध २०१८ साली काँग्रेसने रोखला आहे. पण यापाठी जनतेच्या मनात असलेली नक्षलींची भीती आणि सत्तेतील चेहरे बदलण्याची इच्छा या अदृश्य शक्तीच काम करत होत्या, असे म्हणावे लागेल.
१२ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर या दोन टप्प्यात एकूण मतदान ७६.३५ टक्के झाले. एकूण जागा ९० होत्या. त्यापैकी ५१ जागा खुल्या प्रवर्गाच्या, १० जागा अनुसूचित जाती, तर २९ जागा अनुसूचित जमातींसाठी होत्या.
मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणारे काँग्रेसचे उमेदवार सक्ती मतदारसंघाचे चरण महंत आणि पाटण विधानसभेमध्ये भूपेश बघेल, अंबिकापूर विधानसभेचे आ. टि.एस. सिंग या विधानसभेत उमेदवार जिंकले आहेत. मरवाही व कोटा विधानसभेमधूून अनुक्रमे जनता काँग्रेस छत्तीसगढ पक्षाचे अध्यक्ष अजित जोगी आणि जोगींच्या पत्नी रेणू जोगी हे जिंकले, तर अकलतारामधून अजित जोगींची सून ऋचा ही बसपाच्या तिकिटांवर जिंकल्या, तर त्या विधानसभेत उमेदवार आहेत. राज्यात अनुसूचित जाती-जमातींचे प्राबल्य २.५५ कोटी मतदारांपैकी १.१ कोटी मतदार अनुसूचित जाती-जमातीचे आहेत, तर ४७ टक्के जनता इतर मागासवर्गीय आहे.
महत्वाच्या विधानसभा
राजनंदन गाव : राजनंदन विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री रमणसिंग यांनी ८,९९० मतांची आघाडी घेत काँग्रेसच्या करुणा शुक्ला काँग्रेसमधून हरवले. ही विधानसभा दोन्ही पक्षांची प्रतिष्ठेची होती. बिल्हा विधानसभा इथून भाजप प्रदेश अध्यक्ष धरमलाल कौशिक विजयी झाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/