मेरी कोमची ऐतिहासिक कामगिरी!

    24-Nov-2018
Total Views |


 
 

नवी दिल्ली : येथे सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिने युक्रेनच्या हन्ना ओखोटाचा ५-० ने पराभव करत या स्पर्धेत सहाव्यांदा सुवर्णपदक जिंकलं आहे. कोरियाच्या किम ह्यांग मी वर विजय मिळवत मेरी कोम अंतिम फेरीत पोहचली होती. 

 

तब्बल ८ वर्षानंतर मैदानात उतरलेल्या मेरी कोमने मोठ्या जिद्दीने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात युक्रेनच्या हन्ना ओखोटावर एकतर्फी विजय मिळवला. तत्पूर्वी पहिल्या सत्रात मेरी कोमने संपूर्णपणे वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात ओखोटाने मेरी कोमला चांगलेच झुंजवले मात्र कोमने सामान्यांवरील आपली पकड ढिल्ली होऊन दिली नाही.
 

३५ वर्षीय बॉक्सर मेरी कोम जगातील सर्वात यशस्वी बॉक्सर मनाली जाते. जागतिक अजिंक्य स्पर्धेतील सहाव्या सुवर्णपदकासह सार्वधिक पदके मिळवण्याचा मान देखील तिच्या नावावर झाला. मेरी कोमने आयर्लंडच्या कैटी टेलरला मागे टाकले. तिच्या नावावर पाच सुवर्ण तर एक कांस्य पदक होते. आता मेरी कॉमच्या नावावर सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक झाले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/