नवी दिल्ली : भारताची स्टार बॉक्सर मेरी कॉम जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. कोरियाच्या किम ह्यांग मी वर विजय मिळवत मेरी कोम अंतिम फेरीत दाखल झाली. ४८ किलो वजन गटात तिने किम ह्यांग मी वर ५-० ने एकतर्फी विजय मिळवला. आता शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात युक्रेनच्या हन्ना ओखोटा व मेरी कोम यांच्यात सामना रंगणार आहे.
What an exceptional 5-0 win by @MangteC in the semifinals of the #Boxing #WWCHs2018 as she outclasses her North Korean opponent and enters the grand finale of world boxing championship.
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) November 22, 2018
Gold is just a step away #Mary!🥇
👏👏 #GoForGlory #PunchMeinHainDum 🥊🇮🇳#AIBA pic.twitter.com/tcPOyvtJrS
मेरी कोमने यापूर्वी पाच वेळा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदकमध्ये सुवर्णपदक पटकावले तर एकदा रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आता मेरी कोम सहाव्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घालायला तयार झाली आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज हा सामना खेळवला गेला होता.
३५ वर्षीय बॉक्सर मेरी कोम जगातील सर्वात यशस्वी बॉक्सर मनाली जाते. उपांत्य फेरीत पोहचल्यानंतर जागतिक अजिंक्य स्पर्धेत सार्वधिक पदके मिळवण्याचा मान देखील तिच्या नावावर झाला होता. मेरी कोमने आयर्लंडच्या कैटी टेलरला मागे टाकले. तिच्या नावावर पाच सुवर्ण तर एक कांस्य पदक होते. आता मेरी कॉमच्या नावावर पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक असून या स्पर्धेत तीच आणखी लेख पदक निश्चित आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा दरेकरांनी पदभार स्वीकारला..