जीएसटी महसूल १ लाख कोटींवर

    01-Nov-2018
Total Views |


नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कराच्या महसुलाचा टप्पा सलग सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा लाख कोटींवर पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी महसुलाची आकडेवारी गुरुवारी घोषित केली आहे.


ऑक्टोबर २०१८ मध्ये जीएसटी महसुलात केंद्रीय वस्तू सेवा कराचा वाटा १६ हजार ४६४ कोटी रुपये आहे. राज्य वस्तू सेवा कराचा वाटा २२ हजार ८२६ कोटी इतका आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय वस्तू सेवा कराद्वारे मिळालेल्या ५३ हजार ४१९ कोटींचा आणि हजार कोटी रुपयांचा सेस (अधिभाराचा) समावेश आहे. सप्टेंबर महिन्यासाठी ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत ६७.४५ लाख रुपयांचा परतावा दाखल झाला होता.

 

सरकारला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जीएसटी महसुलाचा आकडा लाख कोटींवर पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऑक्टोबरमध्येच हा टप्पा पूर्ण झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, सरकारने करांमध्ये केलेली कपात, एक कर एक देशआणि करप्रणालीत स्थानिक संस्थांचा कमी अंतर्भाव यांमुळे जीएसटी सुलभ बनला असून त्याचे हे यश आहे.” ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारांशी वाटाघाटी करून केंद्राला एकूण ४८ हजार ९५४ कोटी आणि राज्याला ५२ हजार ९३४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत ६७.४५ लाख इतका जीएसटी परतावा भरण्यात आला आहे.

 
 
 

महीना

जीएसटी महसूल

सप्टेंबर

९४,४४२

ऑगस्ट

९३,९६०

जुलै

९६,४८३

जून

९५,६१०

मे

९४,०१६

एप्रिल

,०३,४८५

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/