गोवा : भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्यातील संकेतस्थळ ‘हॅक’ करण्यात आले आहे. हॅक करणाऱ्यांनी पाकीस्तान जिंदाबाद या आशयाचा मजकूर वेबसाईटवर लिहीला आहे. सोमवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्याचे अधिकृत संकेतस्थळ http://www.goabjp.org हे आहे. हॅक करणाऱ्यांनी पाकिस्तान जिंदाबाद या संदेशासह catch.if.you.can@Hotmail.com हा मेल आयडी दिला आहे. हॅक करणाऱ्याने मोहम्मद बिलाल आणि टीम पीसीई, असे नावही त्यात लिहिले होते. दरम्यान गोवा भाजप वेबसाईट पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले असून वेबसाईट अंडरमेंटेनन्स असा संदेश सध्या झळकत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/