आजचा हा लघुपट थोडासा मोठा आहे, पण नक्कीच बघण्यासारखा आहे. त्यामुळे आपल्या दिवसभरातीतल दगदगीच्या आयुष्यातून आर्धाच तास काढा आणि हा लघुपट नक्कीच बघा...
ही कथा आहे एका खूप मोठ्या उद्योजकाची. आपल्या मेहनतीने हा मनुष्य उद्योग उभा करतो. देशातील नावाजेला श्रीमंत असा उद्योजक बनतो. मात्र या सगळ्या मोह मायेत त्याला कॅन्सर सारखा आजार होतो. आणि त्याला त्याचा मृत्यु समोर दिसायला लागतो. या मृत्युपासून लांब पळण्यासाठी, दूर जाण्यासाठी त्याला एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे वाराणसीला जाण्याचा. मृत्युला जवळून बघून कदाचित त्याला मृत्यु त्याच्यापासून लांब जाईल, या विचाराने तो उद्योजक वाराणसी (काशी) गाठतो. आणि तिथे त्याला जवळून बघायला मिळतं मृत्युने वेढलेलं खरं आयुष्य. काशीच्या घाटावर मृत्युसोबत सुरु असलेला भ्रष्टाचार, गरीब जनता, मृत्यु, आत्मा आणि शरीराचा संबंध. या सगळ्याविषयी जाणून घेत त्याला जगण्याची नवी दृष्टी मिळते, आणि अक्षरश: एका वर्षाच्या आत त्याचा आजार बरा होतो. या सगळ्यात त्याची सगळ्यात जास्त मदत करतो एक रिक्शावाला 'रफीक'... संपूर्ण बरे झाल्यानंतर हा उद्योजक परत मुंबईला जायचा विचार करतो.. रफीक त्याला म्हणतो देखील 'क्या साहब जब मौत का डर था तो यहाँ आ गये और अब जब सब सही हो गया ते फिर उसी मोह माया में जा रहे हो.." तो परत जातो मात्र......
कथानकाचा शेवट काय?.. ते मी सांगणार नाही.. ते तुम्ही नक्कीच बघा... या कथेत सगळ्यात महत्वाचा आहे तो कथानकाचा शेवट. प्रसिद्ध अभिनेता दर्शन जरीवाला या लघुपटात मुख्यभूमिकेत आहेत. तसेच आरती छाबरिया यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला यूट्यूबवर १६ लाख ५८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.