विश्वविक्रमवीर झाजरिया

Total Views | 3
 

 
 
क्यूँ तेरा सपना पूरा नहीं होता? हिम्मत रखनेवालों का इरादा अधुरा नहीं होता| 
 
अशीच स्वप्ने उराशी बाळगून तो भालाफेक या खेळाकडे वळला. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भालाफेक या खेळात सुवर्णाक्षरांनी भारताचे नाव कोरणारा हा जिद्दी खेळाडू म्हणजे देवेंद्र झाजरिया. १० जून १९८१ रोजी राजस्थानमधील जाट परिवारात देवेंद्रचा जन्मझाला. खेळाची आवड असलेल्या देवेंद्रवर वयाच्या आठव्या वर्षीच काळाने घाला घातला. देवेंद्र झाडावर चढला असताना अचानक त्याचा स्पर्श एका विद्युत वाहिनीला झाला आणि तो दूर फेकला गेला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा डावा हात कापावा लागला. या अपघातानंतरही देवेंद्रने हिम्मत सोडली नाही, तर त्याने भालाफेक या खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला. एका शालेय कार्यक्रमादरम्यान त्याच्यातील गुण हेरून प्रशिक्षक आर. डी. सिंग यांनी त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर देवेंद्रने पुन्हा मागे वळून न पाहता यशाचे अत्युच्च शिखर गाठण्यास सुरुवात केली. पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करणारा तो पहिला भारतीय पॅरालिम्पियन ठरला आहे. २००२ साली दक्षिण कोरियामध्ये झालेल्या खेळांमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवत त्याने पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवला. २००४ साली अथेन्समध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देवेंद्रने पहिले सुवर्ण आपल्या नावे केले. त्यानंतर २०१६ साली झालेल्या स्पर्धेत त्याने दुसर्‍या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. देवेंद्रने केवळ सुवर्णच नाही, तर पॅरालिम्पिक स्पर्धेतील भालाफेक या खेळात विश्वविक्रमकरत भारताचे नाव उंचावले. देवेंद्रने पॅरालिम्पिक स्पर्धेत ६२.१५ मी. भाला फेकून ५९.७७ मीटरचा विश्वविक्रममोडत नवा विश्वविक्रमप्रस्थापित केला. त्यानंतर पुन्हा २०१६ साली रिओ-डि-जनेरिओ येथे झालेल्या स्पर्धेत त्याने ६३.९७ मी. भाला फेकत स्वत:चाच विश्वविक्रममोडत पुन्हा नवा विश्वविक्रमआपल्या नावे केला. याव्यतिरिक्त २०१३ साली फ्रान्समध्ये खेळविण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले होते.
 
२०१४ साली दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई पॅरालिम्पिक खेळातही त्याने रौप्यपदक पटकावले. त्याचे खेळातील भरीव योगदान पाहता त्याला २००४ मध्ये ’अर्जुन’ पुरस्काराने, तर २०१२ मध्ये ’पद्मश्री’ आणि २०१४ साली ’एफआयसीसीआय स्पोर्टस्‌मन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळवणारा तो पहिलाच पॅरालिम्पियन आहे. सध्या देवेंद्र भारतीय क्रीडा प्राधिकरणाबरोबर कार्यरत असून यावर्षी त्याची ’खेलरत्न’ पुरस्कारासाठीदेखील निवड करण्यात आली आहे. 
 
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121