“आबा, आपण पाच हजार वर्षांपूर्वीची सूर्य मंदिरे, शिलालेख, स्तंभ पहिले. पण भारतातली सूर्योपासनेच्या इतक्या जुन्या खुणा पहिल्या नाहीत.”, सुमित म्हणाला.
“तुझे निरीक्षण अगदी योग्य आहे सुमित! चल, आज तुला भारतातील सूर्योपासनेच्या प्राचीन खुणा दाखवतो!
“आपण पाहणार आहोत तो काळ आहे ईस. पूर्व ५,००० ते ईस. पूर्व २,०००. आणि प्रदेश आहे गांधार, सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरातचा.
“प्राचीन काळात सूर्याच्या चिन्हांची पूजा करत असत. सूर्याची चिन्हे म्हणजे – गोल चकती, आरे असलेले चाक (spoked wheel), स्वस्तिक इत्यादी. या पैकी आरे असलेले चाक अर्थात सुदर्शन चक्र आणि स्वस्तिक हे पुढे विष्णूचेही चिन्ह म्हणून ओळखले गेले. स्वस्तिकाचे चार भूज – ब्रह्माची चार मुख, चार वेद, चार पुरुषार्थ, चार वर्ण व चार आश्रम दर्शवतात. उजवीकडे फिरणारे स्वस्तिक – सूर्याचा पूर्वेला उदय, दक्षिण आकाशात उंच चढणे आणि पश्चिमेला सूर्याचा अस्त असे ४ दिशा देखील दाखवते.
“स्वस्तिकचे चिन्ह जगभरातील संस्कृतींनी प्राचीन काळापासून वापरले आहे. इतर संस्कृती आता ते विसरल्या असल्या तरी, भारतात हे शुभ चिन्ह अजूनही वापरले जाते. रांगोळी मध्ये, पुस्तकांमध्ये, पूजेत स्वस्तिक चिन्ह आजही पाहायला मिळते.
“सरस्वती – सिंधू खोऱ्यातील उत्खननात सापडलेली, काही सूर्य चिन्हे पहा. चार दिशा दर्शवणारी एक फुली, किंवा स्वस्तिक आणि मधले ४ ठिपके, असे मिळून आठ किरणे / दिशा होतात.
“आपल्याला एकीकडे सरस्वती – सिंधू खोऱ्यात सूर्य पूजेची चिन्हे दिसतात तर दुसरीकडे वेदांमध्ये गायत्री मंत्रा सारखे सूर्योपासनेचे मंत्र ऐकायला मिळतात. सरस्वती - सिंधूच्या नगरात ठिकठिकाणी यज्ञ वेदी दिसतात, आणि यज्ञाचे मंत्र वेदात!”, आबा म्हणाले.
“आबा, सरस्वती – सिंधू खोऱ्याचा visual track आणि वेदांचा audio track – हे दोन्ही एकाच सिनेमाचे हे tracks असू शकतात का?”, सुमितने विचारले.
“ही शक्यता नाकारता येत नाही. वेद ज्या सरस्वती नदीचे गोडवे गातात त्याच नदीच्या काठावर सरस्वती – सिंधू खोऱ्यातील गावे वसली होती. दोन्ही संस्कृतींचा काळही सारखा होता. कसे आहे बघ, ज्या संस्कृतीने नगरे बांधली, ३-३ मजल्यांची घरे बांधली, सांड पाण्याचे व्यवस्थापन केले, पाण्याचे साठे बांधले, उद्योग उभे केले, जहाजे बांधली, व्यापार केला – त्या संस्कृतीने या ज्ञानाचे encyclopedia मागे ठेवायचे सोडून फक्त रुपया एवढे seals मागे ठेवले. आणि वेदिक संस्कृतीने ज्ञानाचे प्रचंड कोश, मौखिक स्वरूपात दिले, पण त्या ज्ञानाच्या उपयोगाचे काहीच पुरावे मागे ठेवले नाहीत!
“या थक्क करणाऱ्या बाबी लक्षात घेऊन पुरातत्व तज्ञ दोन्ही संस्कृतींचा अभ्यास करत आहेत.
“बरे तर, आणखीन एक गोष्ट म्हणजे - सूर्याच्या स्थानाप्रमाणे दिवसाची वेळ ठरते. एक दिवस ८ प्रहरांमध्ये विभागाला होता - दिवसाचे ४ प्रहर आणि रात्रीचे ४ प्रहर. आपण जे ‘दुपार‘ म्हणतो, त्याचा अर्थ ‘दिवसाचा दुसरा प्रहर, द्वी-प्रहर’ असा आहे.
“दिवसाचे ८ प्रहर, म्हणजे सूर्याची आठ किरणे, किंवा सतत पाळणाऱ्या कालचक्राचे आठ आरे! १५ व्या शतकातील हे सूर्य चिन्ह, कोणार्कमध्ये अतिशय सुंदर रूपात दिसते. कोणार्कला सूर्य रथ मंदिराच्या चाकाचे ८ major आणि ८ minor असे १६ आरे पहा! कालचक्र म्हण, Sun-Dial म्हण!
“थोडं भारता बाहेर असुरस्थान मधले एक सूर्य चिन्ह पाहू. ईस. पूर्व ८०० च्या दरम्यानचे, बेबिलोनच्या राजाचे हे शिल्प. सिंहासनावर बसलेला सूर्यदेव, आणि त्याच्या समोर सूर्याचे, अर्थात शमशचे चिन्ह. ८ आरे अथवा किरणे असलेले बिंब.
“असेच ८ आरे असलेले चक्र वाटिकन येथील St Peter Square मध्ये दिसते.
“Vatican च्या चर्चच्या डोम मध्ये ८ आणि ८ अशा १६ आऱ्या आहेत. या डोमच्या मध्यभागी, छताला लहानशी गोल खिडकी आहे. या खिडकीतून थेट सूर्यप्रकाशाच आत येतो. चर्च मधून पाहतांना डोम मध्ये सूर्य व त्याच्या किरणांचेच दर्शन आपण घेत आहोत असे वाटते!
“अशीच सूर्याची ८ किरणे इंग्रजांच्या ध्वजावर पण दिसतात!”
“सुर्योपासानेचा जगभरातील अविष्कार! आबा, तुम्हाला गम्मत सांगू! Weather Forecast मध्ये जो सूर्य दाखवतात त्याला देखील ८ च किरणे दाखवतात!”, सुमित म्हणाला.
“खरेच की सुमित! किती जुना icon आहे बघ!”, आबा म्हणाले.
References
- दिपाली पाटवदकर