(अनुजा आणि विशाल जीवाभावाचे मित्र मैत्रीणी, सतत व्हॉट्सअॅप वर चॅट करत असतात. शाहरुख खान हा अनुजाचा लाडका हीरो, एकदा विशाल तिला शाहरुख खान गेल्याचा मॅसेज पाठवतो, आणि मग कळतं की ती बातमी खोटीच आहे. बघूयात पुढे काय होतंय ते.. )
अनुजा : No.. No way... नाही विशाल इट्स नॉट ट्रू राईट.. खरंय का हे?
विशाल : अगं हो.. सगळी कडेच फिरतयं नेट वर.. करण जौहरच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट पडलं होतं अगं..
अनुजा : शिट मॅन... नो यार इट्स नॉट पॉसिबल..
विशाल : अगं.. मला खूप लोकांचे मॅसेजेस आले.. बघ टी.व्ही. वर पण सुरु असेल..
अनुजा : विशाल मी खूप सर्च करतीये टी.व्ही. वर पण कुठेच काही दिसत नाहीये अरे मला..
विशाल : अगं पण फेसबुक वर सगळ्यांनीच शेअर केलं आहे.
अनुजा : विशाल नो उल्लू बनाविंग ओके...
विशाल : जा नसेल तुला खरं वाटत तर मी काय करु पण.
अनुजा : अरे मला आता अखिलेशचा पण मॅसेज आला, शाहरुख इज नो मोअर म्हणून.. काय चाल्लयं काय अरे..
विशाल : बघ सांगतोय मी तुला..
अनुजा : अरे पण मग टी.व्ही. वर का दिसत नाहीये?
विशाल : मला काय माहीत मॅड..
अनुजा : ओके थांब जरा मी सर्च करते..
(दोन तासांनंतर)
अनुजा : घे घे बघ आता डोळे फाडून.. फेक न्यूज होती ती.
विशाल : अरे मला कसं कळणार ते.
अनुजा : अक्कल लावायची ना आपली मग.
विशाल : अगं मला खरच माहीत नव्हतं ते.
अनुजा : करण जौहरचं अकाउंट हॅक झालेलं.. त्य़ामुळे ही न्यूज व्हायरल झाली.. शी आता खरच ना या फेसबुकच्या बातम्यांवर, लिंक शेअर करण्यावर विश्वासच ठेवता येणार नाही.
विशाल : True yar.. we must always check before sharing.. मला पटलंय आता हे.. मी ही माझ्या सगळ्या कॉन्टेक्ट्स ना पाठवली ती लिंक.
अनुजा : Seriously you are pathetic.. विशाल. जाऊ देत I am relaxed now.. की आता तरी आपल्याला शाहरुख खानच्या नवीन नवीन मूव्हीज एन्जॉय करता येतील.. याय....
(खरंय एखादी महत्वाची बातमी खोटीही असू शकते. नेटवर आलेली कुठलीही गोष्ट खरीच असेल असं नाही, त्यामुळे कुठलीही बातमी पसरवण्याच्या आधी ती खरी आहे का हे बघणं खरच गरजेचं आहे. )
-निहारिका पोळ