ब्राझिल ऑलिम्पिकमध्ये एका भारतीय खेळाडूला शोभा डे यांच्या वक्तव्याबद्दल छेडल्यावर त्याची ही प्रतिक्रीया होती. शोभा डे यांनी ऑलिम्पिक खेळाडूंवर अवमानकारक ट्वीट केल्यावर येथे भारतीय खेळाडूंत त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटलीय. अगदी अभिनव बिंद्रा, ज्वाला गुट्टा, वीरेन रस्कीना यांनी तर बाईंना ट्वीटरवरचं ठोकून काढलंय. शोभा डे यांच्या मते भारतीय खेळाडूंसाठी ऑलिम्पिकम्हणजे, रिओ जाओ, सेल्फी लो और खाली हात वापस आवो… पैंशांचा चुराडा आणि संधी मातीमोल… ऑलिम्पिकपटूंसाठी एवढं मुर्खपणाचं मत शोभा डेनं ट्वीटवर व्यक्त केलं आणि अवघ्या क्रीडा जगतानं तिला शिव्यांची लाखोली वाहीली. शोभा डे जेव्हा खेळाडूंच्या क्षमतेबद्दल तारे तोडत होती तेव्हा भारतीय हॉकीपटू बलाढय अर्जेंटीनावर शानदार विजय मिळवित होते. अंतु दास तिरंदाजीत क्वॉटर फायनलमध्ये धडकत होता. बॉक्सिंगमध्ये विकास विजयी सलामी देत होता.
जगभरात खेळावर खर्च केलेली रक्कम ही खर्च न मानता ती उज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक समजली जाते. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील प्रवचनात जाहीरपणे सांगितलं होतं की गीता-कुराण-बायबलचं पारायण करण्यापेक्षा माझ्या देशाच्या तरुणांनं हाती फुटबॉल घेतला तर ते मला अधिक भावेल. कारण सदृड शरीरात साक्षात ईश्वर नांदतो. इतकचं कशाला ज्या बॅरेन पिअर द कुबर्तिनने आधुनिक ऑलिम्पिक सुरु केलं त्यांनी तर स्पष्ट शब्दात सांगून ठेवलंय, की ऑलिम्पिकमध्ये तुमच्या हार - जीत पेक्षा महत्वाचे असते तुम्ही लढत कशी दिली याला. आता जगातिल क्रीडा तज्ज्ञ, स्वामी विवेकानंद आणि बॅरेन पिअर द कुबर्तिन याच्यापेक्षा या बयेला जास्त कळतं का.
मुळात ऑलिम्पिकला पात्र होणं हाच मोठा सन्मान असतो. यंदाच्या ब्राझिल ऑलिम्पिकसाठी पाकिस्तानचा एकही खेळाडू ऑलिम्पिकला पात्र ठरला नव्हता, अखेर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं 5 पाकिस्तानी खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला. याऊलट भारताचे 119 खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेत. यावेळी जिम्नॅस्टिक, स्विमिंगमध्येही भारतीय संघाच समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये एकुण 28 खेळांचा समावेश आहे, त्यापैकी 15 खेळात भारतीय खेळाडू आपले कौशल्य अजमावत आहेत. तमाम भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. हे आर्टीकल तुम्ही वाचत असेपर्यंत भारतानं आपले पहिले मेडलसुध्दा जिंकलेलं असेल. चार वर्षापुर्वी भारतानं 6 ऑलिम्पिंक मेडल जिंकली होती. यंदा तो विक्रमही मोडीत निघण्याची शक्यता आहे. अशावेळी खेळाडूंचं मनोधैर्य वाढविण्यापेक्षा त्याचं खच्चीकरण करण्यात शोभा डे यांना काय समाधान मिळतं बुवा…
बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा म्हणते तेच खरं, या बाईसारख्या सगळ्यांची मानसिकता जोवर बदलत नाही तोवर आपल्या देशाचं भाग्य बदलणार नाही.
शोभा डे यांनी केलेले ट्वीट :
यावर हिना सिद्धू हिने दिलेले उत्तर: