#ओवी Live- फ्रेंडशिप डे...

    31-Jul-2016   
Total Views |

"आबा, असं काय आहे जे - शस्त्राने, वाऱ्याने, पाण्याने किंवा अग्नीने नाश पावत नाही?"

राजकन्येचा प्रश्न ऐकून, चकित झालेले आजोबा म्हणाले, "तू? आणि असा गीतेतील प्रश्न विचारात आहेस? सोप्पय उत्तर … आत्मा!"

"चूक! The correct answer is Plastic!"

"हं! ते ही बरोबरच आहे! पण हा प्रश्न का बरे पडला?"

"आबा, आज आम्ही ‘Decomposition of waste’ discuss करत होतो. You know, प्लास्टिक break-down व्हायला five hundred years लागतात."

"खरंय बाई तुझं! पण त्याने काय नुकसान होते?"

डोळे मोठे करत निलू म्हणाली, "आबा, don't you know? प्लास्टिक खाऊन thousands of प्राणी, पक्षी मारतात. जमीन, पाणी, हवा प्रदूषित होते. जमीनीत पाणी मुरत नाही. आणखीन कितीतरी भयंकर परिणाम होतात." 

"हं! मग तुम्ही त्यावर काही उपाय काढला का?"

"सरकारने, समाजाने काय काय केले पाहिजे यावर आमच्याकडे खूप सूचना आहेत. पण ज्याने काही फरक पडेल असे आम्ही काय करू शकतो? तुम्हीच सांगा काही तरी ना!”

"निलू, प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घेतली की आपोआपच पूर्ण समाज बदलतो. आता तुमचा friendship day आलाय. मग सगळ्या मित्र - मैत्रिणींना friendship band की काय तो बांधणार. Plastic, rubber किंवा nylon चे friendship bands तुम्ही लोक हौसेने घेता. एक दिवस मिरवता. अन मग केरात टाकून देता! असे 'अविनाशी' friendship bands केरात टाकले तर निसर्गाशी कशी काय मैत्री होईल?"

“So true! पण  friendship bands बांधायचे नाहीत असं तर नाहीना करू शकत आबा!" थोडं थांबून निलू परत म्हणाली - "पण आम्ही eco-friendly bands बांधू शकतो! किंवा स्वतः करू शकतो! ते तर अजून grand वाटेल. Solid idea आहे!"

त्या idea चा प्रसार करायला नीलूने smart फोन काढला. स्मार्ट फोन हातात आला की त्या व्यक्ती पुरतं का असेना stage वर शांतता पसरते, काळोख होतो, आजूबाजूची माणसं दिसेनाशी होतात, आणि अंक संपतो

 


ज्ञानेश्वर ईश्वराकडे वरदान मागतात – प्रत्येकाच्या मनात विश्वातील सर्व जीवां बद्दल मित्र भाव निर्माण होऊ दे. सर्वजण एकमेकांचे जिवलग मित्र होऊ देत! जीवाला जीव देणारे! एकमेकाला दुखलं खुपलं तर काळजी घेणारे.

जेंव्हा प्रत्येक व्यक्ती, आपल्या कृतीमुळे कुणाला / कशाला (पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, अवकाशाला सुद्धा) हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेईल, तोच खरा Friendship Day!

“I used to think that top environmental problems were biodiversity loss, ecosystem collapse and climate change. I thought that thirty years of good science could address these problems. I was wrong. The top environmental problems are selfishness, greed and apathy, and to deal with these we need a cultural and spiritual transformation.” - Gus Speth, US advisor on climate change.

-दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.