यथार्थ

सुमितला राग येऊच नये का?

असाच आणखी एक किस्सा त्याने सांगितला- ‘‘नाशिकमध्येच ‘एक शून्य तीन’ नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि एका प्रेक्षकाचा फोन वाजला. तो फोनवर बोलू लागला. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तीकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशार्याने, ‘तुमचं चालू द्या,’ असं केलं आणि मी स्तब्ध झालो.’’..

माणसांचे पर्यावरण आणि पर्यावरणातला माणूस!

आता पर्यावरण म्हटलं की, लोकांना केवळ झाडं, वेली, पाणी, नद्या, नाले, जमीन, माती असेच काही वाटते. कुणाला आभाळ म्हणजे पर्यावरण वाटते. पर्यावरणात माणूस माणसालाच काऊंट नाही करत. तो स्वत:ला पर्यावरणापासून वेगळे करतो अन् गंमत म्हणजे तरीही तो पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे, असे मानतो...

शहरांना असतात का ऋतु?

या शहराला त्याचे पाळण्यातले नाव नसते आणि ज्या शहराला पाळण्यातले नाव नसते, तिथे ऋतू येत नाहीत. ऋतूंना तिथे जाताच येत नाही. मग हे विनाऋतूंचे शहर ऋतूवेगळे होते. या ऋतूवेगळ्या शहरात उन्हाळा येत नाही, ऊन येते. हिवाळा येत नाही, थंडी येते. पावसाळा येत नाही, पाऊस मात्र येतो. हा पाऊस आभाळातून आला की, कुणाच्या डोळ्यांतून कोसळला हे कळत नाही...

इंग्लंडमधील हवामान आणिबाणी आणि भरतवनचा लढा...

ऋतूंचे चक्र बदलते आहे. इकडे प्रचंड उष्णता आहे, तर आसामात पूरस्थिती आहे. वादळाचा तडाखा बसला आहे. हे असेच सुरू राहिले तर सारेच जलार्पण होईल. शेती पिकणारच नाही. जगबुडी नावाचा प्रकार जो आपण ऐकत आलो आहोत तो प्रत्यक्षात आपल्यालाच बघावा लागणार आहे...

दुष्काळ आवडे सर्वांना...

चारा छावण्यांचीही एक कथा असते. चारा छावण्या लावण्याचे कंत्राट राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच दिले जाते. पाहणीच्या वेळी या छावणीतली गुरे दुसर्या छावणीत वेगाने हलविली जातात. पटसंख्या दाखविण्यासाठी मुले जशी हलविली जातात तशीच... बरे, हा पवित्र घोटाळा असतो. त्याचा हिशेब मागणेही पाप असते...

सहज विस्मरण झालेल्या कस्तुरबांची आठवण...

महान पुरुषांची पत्नी ही हिमालयाची सावली, वटवृक्षाची छाया वगैरे म्हणून दांभिक आदर दाखविला जातो. ती सावलीच का? तिला स्वत:चे असे अस्तित्व असतेच. ती कर्ती आणि करवितीही असते... तरीही बा या बिच्चार्या अजीबातच नव्हत्या. तसे त्यांना अनेकवार म्हणण्यात आले. एका महान पुरुषाचा तो छळ होता, असेही मत आहे...

बेईमान ऋतूंचे शहर...

खरेतर जमीन आणि आकाश जिथे एकत्र येतात, त्या क्षितिजाच्या कनातीखालून ऋतू गावात येतात. ऋतूंच्या स्वागतासाठी गाव सज्ज असते. कधी गावाच्या वाटेवर गुलमोहर आपली फुले पसरवून ठेवतो, तर अमलताशचे सोनेरी झुपके ऋतूंची वाट बघतात. ऋतू यायचेत म्हटले की गावाच्या आभाळाला डोळे फुटतात...

आपलं ठेवा सध्या झाकून!

कुही ते टाकळी हा केवळ सहा किलोमीटरचा पॅच... टाकळीत नव्वद मते. मग कोण काळजी करणार त्याची? नितीन गडकरींच्या कानावर ही गोष्ट सहज टाकली. खरेतर तो त्यांचा मतदारसंघ नाही, त्यामुळे पटकन् काम करता येण्यासारखे नव्हते. बघतो म्हणाले अन् सहा महिन्यांत त्या गावात रस्ता झाला...!..

पाखरं ठेवत नाहीत आपल्या मरणाचे पुरावे...

पक्ष्यांची हाडे पोकळ असतात. वजनाला ते हलके असतात. त्यामुळे ते मेले की इतर सजीवांच्या तुलनेत त्यांचे विटघन व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे नैसर्गिक मरण आलेल्या पक्ष्यांची कलेवरे दिसत नाहीत.....

कोण म्येलं आपलं?

पुण्याच्या यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात नाटकाचा सेट लावत असताना लोखंडी विंग अंगावर पडून विजय महाडिक नावाच्या एका रंगकर्मीचा (कर्मचारीही होते ते) बळी गेला. त्याची फारशी दखल कुणी घेतली नाही. मराठी वर्तमानपत्रांत एका रकान्याची बातमी आली...

पुलंचे सादर होणे...

पुलंचे यश हे की, ते त्यांच्या पुस्तकांच्या, लेखनाच्याही आधी त्यांच्या रसिकांपर्यंत पोहोचत असत. कारण ते परफॉर्मर होते. त्यांना हे त्यांचे सादर असणे सहर्ष मान्य होते. कुठल्याही सृजनाची आपली एक कलात्मक भाषा असते...

वसंताच्या वळणावर थबकलेली पाऊले

वसंत म्हणजे रंग, गंध आणि स्वरांचे संधिपर्व. वार्षिक कालचक्राची ही सुरम्य संध्याकाळ. ही विग्रहाआधीची संधी असते. वेड्या फुलांच्या आवेगी फुलव्यावर रूढीवादी, उग्र म्हातार्यासारखा सूर्य कोपत जातो आणि स्वप्नांची निर्माल्य होतात...

डेबुजी ते गाडगेबाबा...

हा माणूस बाह्य वेशाने बावळा वाटत असला तरीही अंतरी नाना कळा असलेला आहे, हे आचार्य अत्रेंसारख्यांना सांगण्याची गरज नव्हती. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबांच्या कार्याची दखल घेतली. त्यावर लेखन केले आणि मग तिकडचा शिक्का लागल्यावर आम्हीही त्यांना ‘आमचा’ म्हणू लागलो...

यवतमाळच्या स्वामिनींचा दारूबंदीचा लढा...

गाडगेबाबा समूहाशी संवादी होतात. ‘‘आया-बहिनीय होऽऽ पती हा देवच असते, असते का नाही?’’ बायका एका सुरात ‘‘होऽऽ’’ असे म्हणतात. मग गाडगेबाबा विचारतात, ‘‘त्याची आपन पूजा केली पाह्यजे... पन जसा देव तसी पूजा. तो दारू पेत असीन त त्याची खेटरानं पूजा करा...’’ समोर बसलेल्या खेडोपाडीच्या, दारूने गांजलेल्या असंख्य महिलांनी एकच हुंकार भरत त्याला दिलेला प्रतिसाद त्या ध्वनिफितीत अधिक स्पष्टपणे जाणवत राहिला होता.....

त्यांच्या जगण्यातले काही प्रश्न...

एकवीस-बाविसाव्या वर्षी एकट्या पडल्या असताना त्यांच्या पदरी एक किंवा दोन लेकरं आहेत. या भगिनींच्या भावना याच की, आम्ही कास्तकारांची पुढची पिढी वाढवीत आहोत. आजा कर्जात गेला, बाप व्याजात मेला अन्‌ ही कोवळी पिढीही अशीच करपली तर शेतीत राबणारे अन्‌ मातीशी नाते सांगणारे कुणीच उरणार नाही. त्यामुळे त्या शेतीच करत आहेत...

राईट टू डिस्कनेक्ट...

अगदी उत्तररात्री दोन- अडीच वाजताही कुणी तुम्हाला मेसेज किंवा फोन करून, मेल पाठवून काही सूचित करू शकतो, काम सांगू शकतो किंवा तसली आठवण करून देऊ शकतो. संवाद आणि माहितीच्या महाजालाच्या साधनांच्या गतिमानतेमुळे कौटुंबिक आयुष्य आणि कामकाजाचे ठिकाण- कार्यालय यांच्यातली सीमारेषा पार पुसून टाकण्यात आली आहे. ती पुन्हा कायद्याने मजबूत करणे म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट.....

‘‘दिल की तसल्ली के लिए गुड की जलेबी...’’

मराठी लेखकांना प्रसिद्धीचे तेजोवलय बहुदा नसतेच. आता पुल, वपु, गदिमा, शांताबाई, भट, अत्रे, पाडगावकर यांना हे वलय होते. म्हणजे त्यांची ओळख ‘हे सुप्रसिद्ध लेखक बरं का...’ अशी करून दिली तर समोरचा पहिल्यांदाच ऐकतो आहे, असा चेहरा त्या काळात करत नव्हता...

गावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं...

दरीत सागाची झाडं ताठ उभी आहेत. हळवी आहेत. ऋतुभान त्यांना आहे. हेमंत गारठून गेला की, ते शिशिराचंही स्वागत करतात. शहाण्यासारखी पानं गाळून बसतात. पानगळीनं एक होतं- झाडे ओकीबोकी होतात अन् घरटी उघडी पडतात. पौष आणि माघातल्या बोचर्या वार्यांचे मग फावते. झाडं थंडीने काकडत असताना वारे घरट्यातल्या पिलांना छळतात. घरट्यातली ऊब संपली की, मग पाखरांची पिलं पंखांत बळ शोधू लागतात...

शेती, माती, गावगाडा बदलताना...

‘‘शेतकर्यांनी नवे स्वीकारावे ना,’’ असे एकदा नितीन गडकरी बोलताना म्हणाले होते. गाव, शेती यांच्या जुन्या संस्कृतीशी घट्ट नाते सांगणार्या मनाला ते तेव्हा कसंसंच वाटलं होतं; पण आताचे अॅग्रो व्हिजन पाहताना हे जाणवलं की ती संस्कृती होती, पण आताचीही एक संस्कृतीच आहे ना!..

एक आशा मावळताना...

एक ‘आशा’ संपली. शेतकर्यांच्या मुलींनी आत्महत्या केल्याची काही उदाहरणे आहेत. महिला मात्र आत्महत्या करत नाहीत, असाच अनुभव होता. ही सुरुवात म्हणायची का? पतीने आत्महत्या केल्यावर शेतकर्यांच्या या विधवा कशा जगतात, याकडे कुणाचेही लक्ष नसते. काही समाजसेवी संस्था त्यांच्यासाठी काम करतात, मात्र माध्यमांसाठी या विधवांचा संघर्ष ही बातमी नसते...

स्टॅन ली नामक 95 वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू!

स्टॅन ली काल गेला. नेमका भारतात बालकदिन साजरा होत असताना त्याचे जाणे हा दुर्दैवी योगायोग. त्याच्या देशात या बालकदिनाचा तसा काही संबंध नाही, मात्र समस्त जगातल्या बालकांशी या बालकाचा कायमचा संबंध आहे आणि आता पार्थिव दृष्टीने जाण्याने तो अधिकच दृढ झाला आहे. या बाळाची अनेक सुपर बाळे आहेत, ती या जगातील मुलांची सोबत कायमच करत राहणार आहेत. ..

पुन्हा एकदा नटसम्राट!

मराठी नाट्यसृष्टीचा मानदंड असलेले नाटक ‘नटसम्राट’ आता पुन्हा रंगमंचावर येते आहे. यावेळी आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते मोहन जोशी साकारताहेत. कावेरीची भूमिका रोहिणी हट्टंगडी करताहेत. हे नाटक 23 डिसेंबर 1970 रोजी पहिल्यांदा सादर करण्यात आले. पहिले नटसम्राट गणपतराव ऊर्फ आप्पासाहेब बेलवलकर डॉ. श्रीराम लागू होते. त्यानंतर ही भूमिका करणे ही नटाच्या आयुष्यातली परमावधी मानली जाऊ लागली...

साय पांघरून दूध जाई झोपी...

जगून झालेला भूतकाळ रस्त्यांवरच्या हमखास खड्यांसारखा कधीकधी वाटेत आडवा येतो आणि मग आम्हाला दचके बसतात. भुलाबाईच्या गाण्यात किती वाङ्मयीन श्रीमंती होती, त्यातले अव्यक्ताच्या अवकाशात व्यक्त झालेले खूपकाही आम्हाला कसे कळले, याचे दाखले समीक्षकी थाटात आम्ही देत असतो. अशी आवर्तने येत राहतात आमच्या गप्पांमध्ये आणि या प्रत्येकच आवर्तनाच्या अखेरीस हे आम्ही गमावल्याचा नालायकपणा केलाय्, ही खंत सोनेरी किनारीसारखी असते...

कहाण्या सार्याच तिच्या दिवसांच्या...

हे दिवसच तिचे असतात. तिला तुम्ही जे जे द्याल ते ते ती सव्याज परत करते. आपल्या लेकरांवर ती संपन्नतेचा हिरवा पदर धरते. कुठल्याही पाखराची चोच रिकामी राहू नये, ही तिची तळमळ असते. या दिवसात मग बुजगावणही हळवं होतं. आपल्या मडक्याच्या डोक्यावर पाखरांना बिनदिक्कत घरटं बांधू देतं. चोचीत चोच घालून पक्ष्यांनी रान उष्टावल्याशिवाय ते निसवतच नाही...

स्वत:लाच विचारा, ‘‘श्रीमान तुम्हीसुद्धा...?’’

ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल हेनेन यांनी या मोहिमेची संभावना ‘वीच हंट’- महिलांकडून फसविले जाणे, अशी केली आहे. ही भावना केवळ पुरुषांचीच आहे, असे नाही. फ्रेंच अभिनेत्री कॅथरीन डेनेवो, जर्मन अभिनेत्री इनग्रीड कॅचेन यांनीही या मोहिमेवर टीका केली आहे. फ्रान्सचे आघाडीचे दैनिक ला मॉन्डेने यावर संपादकीयच लिहिले होते आणि त्याच्या समर्थनार्थ मोहिमेत या जगातल्या अनेक अभिनेत्रींनी सह्या केल्या होत्या. पुरुषांचा तिरस्कार करणार्यांचा हा नवनैतिकतावाद आहे...

उत्तरप्रदेशातले ‘राशोमान’

राशोमानची कथा थोडक्यात अशी- जंगलातून एक सैनिक त्याच्या बायकोसोबत जात असतो. आता सैनिक आहे म्हणजे तो तरुण आहे, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही अन् त्याची बायकोही तरुणच असणार! त्यांना वाटेत एक दरोडेखोर अडवितो. तो सैनिकाला गोळी घालून ठार करतो आणि त्याच्या बायकोवर अत्याचार करतो. ही घटना एक लाकूडतोड्या पाहतो. आता हा खटला न्यालालयात उभा राहतो...

‘स्पॉटलाईट’ केरळच्या जोगिणींच्या शोषणावरही!

एकतर ही स्टोरी काही माध्यमांनी बाहेर काढली नाही. त्या जोगिणीने तक्रार केल्यावर त्याची दखल माध्यमांनीही तत्काळ घेतली नाही. समाजमाध्यमांवर हे प्रकरण सर्वदूर पसरले आणि आटोक्याच्या बाहेर गेल्यावर माध्यमांनी त्याची दखल घेतली. तीही केवळ या एकाच प्रकरणाच्या बाबत. हे हिमनगाचे टोक असू शकते, त्याचा तळ शोधण्याचे माध्यमांचे काम माध्यमांनी अद्याप तरी केलेले नाही...

राजकारणाची नजर आणि नजरेतलं राजकारण

आयुष्यातल्या अपयशाचे कारण आपल्याला चलाखी हे कौशल्य आत्मसातच करता आले नाही, असेच चिंतन असते. वि. स. खांडेकर म्हणाले होते, राजकारणात कपटालाच कौशल्य म्हणतात. आता त्यांचा काळ हा नेहरू- इंदिरा गांधी यांचा होता म्हणून त्यांनी ते राजकारण पाहूनच हे विधान केले, असाच राजकीय विचार आम्ही करू शकतो...

पोळा अन् जीव झाला गोळा...

खूप काळ गेला असेही नाही, पण अगदी 30-40 वर्षांत हे चित्र पालटले आहे. पाठीवर नुसता हात ठेवला तरीही थरथरणारी संवेदनशीलता असलेले बैल आता राहिले नाहीत. त्यामुळे आता पोळ्यात बैलांच्या रांगा दिसत नाहीत. तान्हा पोळा मात्र जोरात असतो. त्यासाठी लाकडाचे बैल लागतात अन् ते शहरातही भेटतात...

गुरू, गुरुजी, शिक्षक, मास्तर...

एक मात्र नक्की की, शिक्षकांचा गुरू होण्याचा प्रवास अगदी सहज सुरू होऊ शकतो. ते त्या वाटेवर असतात तसं गुरू आणि आई या व्यक्ती नाहीतच. त्या समष्टी आहेत. त्या कुठेही आणि कशाही, कुणाच्याही रूपात प्रकट होऊ शकतात. गोठ्यातच बाळंत झाल्यावर पान्हाही फुटत नसताना गोठ्यातल्या गायीला त्या नवजात अर्भकाच्या भुकेल्या टाहोने पान्हा फुटल्याच्या उदाहरणांचे आपण चष्मदीद की काय म्हणतात तसे गवाह आहोत...

पाऊस आणि रंगसोहळा...

रंगार्तता लपविता येत नाही, हे जमिनीला माहीत नसतं. माहीत असण्यासाठी रंगांची सवय असावी लागते. रंगांचं वेड असणं वेगळं आणि थेंबांच्या कुंचल्यावर अलगद रंग तोलून ते नेमकेपणाने पसरविणं वेगळं. एखादीही छटा चुकली तर बेरंग व्हायचा. म्हणून मग जमीन अशी रंगबावरी झाली की, आकाशालाच तिची काळजी घ्यावी लागते...

स्पर्धेसाठी नाटक; पण प्रयोगांचे काय?

विदर्भात यवतमाळसारख्या ठिकाणी रंगमंदिर नाही. वर्धेला नाही. झाडीपट्टी नाट्य महोत्सव तर जागतिक रंगभूमीने दखल घ्यावी असा असतो; मात्र भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत थिएटर्स नाहीत. राज्य नाट्यच्या निमित्ताने यावरही मंथन व्हायला हवे. नाट्य परिषदेने याची दखल घ्यायला हवी...

याद अगर वो आए, बजने लगे तनहाई...

त्या काळात देव आनंद यांचा ‘प्रेमपुजारी’ या चित्रपटाचे काम सुरू होते. सचिनदांना त्याच्यासाठी काही अनवट अशी गाणी हवी होती. रंगिला या शब्दापासून सुरू होणारे गाणे हवे होते. नीरज यांनी तिथेच त्यांच्या कार्यालयात बसूनच हे गाणे लिहून दिले- ‘रंगिला रे... तेरे रंग में...’ अर्धशतकानंतरही ते तसेच ताजे आहे- 50 वर्षांनंतरही तसेच ताजे टवटवीत वाटते...

नव्या श्रावणबाळांची गोष्ट...

भारतासारख्या कुटुंबवत्सल देशात कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून प्रयत्न करावे लागत आहेत. त्यासाठी सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशानाची मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. घरच्यांशी संवाद साधा, हेही सांगण्याची वेळ यावी इतका संवाद संपत यावा का? श्रावणबाळाच्या देशांत, वडिलांचे वचन पाळण्यासाठी वनवासांत जाणार्‍या मर्यादापुरुषोत्तमाच्या देशांत आता आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांना सांभाळा, असे सांगण्याचे काम शासनाचे अन्‌ न्यायव्यवस्थेचे असावे का?..

मानवी नैसर्गिक प्रेरणा आणि नैतिकता!

हे खरेच आहे की, एखादी गोष्ट करायची नाही म्हटल्यावर हमखास ती करण्याची इच्छा निर्माण होते. त्यातही ‘आम्ही विशेष’ प्रवृत्तीमुळे सामान्यांसाठी जे कायदे असतात ते आपल्याला लागू होत नाहीत, असे मानून चालणारा एक वर्ग समाजात असतोच. आजकाल तर या ‘आम्ही खास’ गटात आपण असावे, ही प्रवृत्ती सार्वत्रिक झालेली आहे. त्या अर्थाने कुणीच सामान्य राहिलेले नाही. कायद्यातून सूट मिळण्याचा विशेषाधिकार असणारी सेलिब्रेटी मंडळी वाढत चालली आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आणि कायदे क्षीण होत आहेत...

संमेलनाध्यक्षांची निवड, नियुक्ती आणि सुयश...

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद जोशी... माफ करा, श्रीपाद भालचंद्र जोशी हे, त्यांच्या हातात या पदाची सूत्रे आल्यापासूनच काहीतरी दणकेबाज परिवर्तन करण्याच्या भावावस्थेत होते. एकतर सुरुवातीलाच त्यांनी संमेलन अगदी साधेपणाने व्हावे, यासाठी आग्रह धरला होता...

वापरा आणि फेका : एक कचकड्याची संस्कृती

प्लॅस्टिक हा ज्यांच्या धंद्याचा, कमाईचा विषय आहे, अशांची आर्थिक गणिते पुन्हा एकदा नव्याने मांडण्यासाठी ते तोंड उघडतील आणि मग प्लॅस्टिकबंदी उठेल असे नाही मात्र, तिच्या अंमलबजावणीकडे कानाडोळा केला जाईल, अशी स्पष्ट धारणा सामान्यांची आहे. अर्थात आजवरच्या अनुभवातूनच ती आलेली आहे. ही बंदी उपकारक आहे, हे कळते; पण तरीही ते स्वीकारता येत नाही, अशी एकुणात अवस्था आहे...

आम्ही कोण म्हणोनी काय पुसता...

परवा अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा भारतीय सहकारी यांच्या डायर्‍या साडपल्याची बातमी होती. त्यात त्यांनी भारतीय लोकांबद्दल फार चांगले शेरे मारलेले नाहीत. त्यांनी भारतीय लोकांना चक्क मूर्खच म्हटले. अर्थात गुरू रवींद्रनाथ टागोर यांचा अपवाद केला. त्यांना त्याने गुरुस्थानी ठेवले..

अंदाज पावसाचा वाटे खरा असावा...

आताचा पाऊस हा सामान्य नाही. त्यावर अनेक गोष्टींचा अधिभार आहे. त्यात माणसाच्या अनैसर्गिक जीवनशैलीचा प्रभाव तर खूप मोठा आहे. आपण निसर्गाच्या अगदी विरुद्ध वागायचे ठरवूनच टाकले आहे. आपले निसर्गाशी युद्धच आहे, असे समजून सतत त्यात विजयी होण्यासाठी आपण आक्रमक वागत असतो...

अच्छे दिन, बुरे दिन

गेल्या काही वर्षांत मी दर एक-दोन महिन्यांनी सातारा जिल्ह्यातील एका दुर्गम दुष्काळी खेड्यात विश्रांतीसाठी जात असतो. हे माझ्या मित्राचे गाव आहे. सतत त्याच्यासोबत फिरायला जात असताना गावकर्‍यांशी गट्टी जमली आणि आता मी एकटाच ये-जा करीत असतो. सातारा- पंढरपूर रस्त्यावर हे महिमानगड नावाचे गाव आहे..

राजकारणात प्राण ओतला...

राजकारण म्हटले की पांढरपेशी माणसं नाक मुरडतात. आपल्या आयुष्यात ते शिंतोडे नकोतच, असे म्हणतात. राजकारण्यांपेक्षाही जास्त राजकारण जे स्वत:ला सामान्य (लघु अर्थाने नव्हे, नॉर्मल या अर्थाने) म्हणवून घेतात, तेच करतात. कुटुंबापासून संस्थांपर्यंत राजकारण असतेच...

ही हिंस्रता येतेय्‌ कुठून?

कधी बायकोने, ऑफिसमधून आल्यावर गरम पोळ्या करून वाढल्या नाही म्हणून तिचे केसच कापून टाकले नवर्‍याने, हे वाचण्यात येते. जन्मदाता बापच आपल्या तान्ह्या लेकराला अमानुष मारहाण करतो आहे, असे व्हिडीओदेखील व्हॉटस्‌अॅपवर आपल्याला नको असताना येतात अन्‌ आपल्याला ते बघावे लागतात. परवा एका कंपनीत एका महिला कर्मचार्‍याने पगार मागितला म्हणून तिला केवळ ठारच केले नाही, तर तिची खांडोळी केल्याची बातमी वाचनांत आली...

काऊिंचग : नैसर्गिक मोहाची विकृती

मोह हादेखील नैसर्गिकच भाव आहे. खूप साहजिक आहे. सार्‍यांनाच मोह होत असतो. त्यातूनच भ्रष्टाचार आणि अनाचार जन्माला येतो. लाच म्हणून पैसा देण्याची कुणाचीच इच्छा नसते पण तरीही तो अगदी सहज आनंदाने देतो आहे, असेच दर्शवित असतो. कारण त्याला कापले कार्य साध्य करून घ्यायचे असते. नियमात बसवायचे असते...

अक्षरस्नेह जपणारी सोयरी पुस्तके...

वाचनसंस्कृती लोप पावली म्हणून सुतक पाळणार्‍यांनी त्यांच्या आयुष्यात क्रमिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती पुस्तके वाचलेली असतात? काही काळ आधी किमान दिवाणखाना सजविण्यासाठी आणि आपली अभिजात आवड दाखविण्यासाठी पुस्तकांच्या रॅक्स असायच्या घरात. आता नव्या गृहसजावटीच्या नियमात पुस्तके सजावटीसाठीही बसत नाहीत. मुळात आम्हाला आमची भाषाच राहिलेली नाही...

निषेधाच्या मेणबत्त्यांनी काही अंधार दूर होणार नाही...

एक काटेरी अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्या मागे एक असुरक्षिततेची भावनाही आहे. अत्याचार झालेल्या मुलींबद्दलचा कळवळा आहे; पण दुसर्‍याचा उंबरा अपवित्र करणारा हा विकार थांबविण्याचा माझ्याकडे काहीच मार्ग नाही, त्यापासून आपले घर कसे सुरक्षित ठेवायचे, हा काळजीचा भाग जास्त आहे...

चिमणीच्या दाताने वाटून खाल्लेल्या कैर्‍यांची गोष्ट...

कैर्‍यांचे मग आंबे होतात. पाडाला पिकलेले आंबे अन्‌ पोपटाने चोच मारलेले आंबे खूपच गोड असतात, हे ऐकले होते अन्‌ ते खरे असल्याचा अनुभवही घेता आला. एकच कैरी असेल अन्‌ चार मित्र असतील तर चिमणीच्या दाताने, म्हणजे कापडात गुंडाळून मग तिचा दाताने लचका तोडून तिचे वाटप करायचे... त्यात झालेली ही दोस्तीची चव अजूनही गोडच आहे.....

प्रमोद कांबळेच्या स्टुडिओचे काय झाले

अशीच एक जिव्हारी लागलेली आग म्हणजे अहमदनगरचे चित्रकार, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली आग. कलावंतांची निर्मिती त्याची वैयक्तिक असली, तरीही त्यावर सकल समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा उभ्या झालेल्या असतात. संस्कृती ही कलेतूनच निर्माण होत असते. त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या कला स्टुडिओला लागलेली आग सखोल अर्थाने भीषण होती. एका नव्या चित्राची अन्‌ शिल्पाची निर्मिती करणे, ही त्या कलावंताची वर्षानुवर्षांची साधना असते. त्यातून ती निर्मिती झालेली असते...

एकान्त गमावलेली माणसं...

सध्या खासगीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आधी, आधारच्या निमित्ताने वैयक्तिक माहिती गुप्त राहात नाही, ती सार्वजनिकच होत नाही तर तिचा गैरवापरदेखील होण्याची शक्यता आहे, अशी अवस्थता पसरली आहे...

पंछी चुपचाप नही मरा हैं, पत्थर बेदाग नही बचा हैं...

आम्ही या देशाचे नागरिक आहोत म्हणजे नेमके काय आहोत, हा सवाल कधीकधी पडतो ते मग अस्वस्थ होतात आणि त्याचे यथार्थ उत्तर शोधण्याची पहिली पायरी असते. ती पायरी गाठली की, लगेच प्रगती होते आपली नागरिक म्हणून असे नाही. ते उत्तर स्वीकारावे लागते. नुसतेच स्वीकारूनही आयुष्य उजळते असेही नाही. ते कृतीत आणावे लागते. आपल्याला प्रश्न निर्माण करायला आवडते. अगदी विलक्षण असा छंदच आहे आपला तो. त्याची उत्तरे शोधण्याचे काम नेहमीच ‘दुसर्‍यांचे’ असते. हेही एक वळणापर्यंत ठीक आहे. किमान प्रश्न तर निर्माण केले जातात. लोक आजकाल ..

आम्ही कुठल्या भाषेचे?

प्रश्न थोडा वेगळा आहे. अनेक बाबतीत प्रश्न पडतच असतो, आमची यत्ता कोंची? भाषेच्या संदर्भातही तो पडतोच. आमची भाषा नेमकी कुठली? लिपी वेगळ्या आणि भाषा वेगळी. प्रशासकीय आणि शैक्षणिक अवकाशातही अनेक रकाने भरावे लागतात. त्यात मग ‘मी कोण?’ या प्रश्नाची ठेवणीतली परंपरागत उत्तरे लिहावी लागतात. त्यात धर्म, जात, पंथ नमूद करावा लागतो. वय, लिंग, शरीराच्या खुणा... म्हणजे डोळे कसे, चामखीळ आहे का, वगैरे. त्यात भाषाही असते. भाषेच्या रकान्यात आपण मातृभाषाच लिहितो. त्याव्यतिरिक्त ज्ञात असलेल्या भाषांचाही उल्लेख करतो. जितक्या ..

आम्ही सुसंस्कृत असतो म्हणजे काय...?

श्रीदेवीच्या जाण्याने अनेक प्रश्न नव्याने उभे झाले आहेत. माध्यमांनी अन्‌ त्यातही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी जे काय केले, त्याबद्दल खंतही व्यक्त करणे हादेखील भाबडेपणा झाला. प्रगल्भ, समंजसपणे ते कधी वागले आहेत? संसदेवरचा हल्ला असो, की मग मुंबईवरचा दहशतवाद्यांचा हल्ला असो. व्यावसायिक वृत्तवाहिन्या असण्याच्या सीमा त्यांनी नेहमीच ओलांडल्या आहेत. लोकशाहीचा तो चौथा स्तंभ आहे, असे म्हणतात. आता व्यावसायिक न्यायाधीशासम असू शकते का? मग वृत्तसंस्था व्यावसायिकता ओलांडून निव्वळ धंदेवाईक कशा असू शकतात? आम्ही ते स्वीकारून ..

खरेच का आम्ही राहिलो मराठी...?

परवा मराठी भाषा दिन साजरा झाला. आता समाजमाध्यमांवर त्या दिवशी दणक्यात हा दिवस साजरा करण्यात आला. ‘डे असो की मग ‘दिन’असो, त्या त्या दिवशी त्याच्या प्रयोजनाची दिवाळी साजरी केली जाते. मराठी भाषा दिनाला मराठी प्रेम उफाळून आले होते. त्यात काही गैर नाही; किंबहुना त्या दिवसापुरतेतरी मराठी भाषाप्रेम जागे झाले, हेही नसे थोडके! मराठी ही किमान १० कोटी लोक बोलतात, अशी भाषा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १० कोटींच्या वर आहे. महाराष्ट्र हे मराठीभाषक राज्य आहे. देशातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांपैकी हे एक राज्य ..

संपत्ती निर्मितीचे अध्यात्म आणि विज्ञान

सध्याचा काळ कुठला? म्हणजे चार पुरुषार्थ सांगण्यात आले आहेत. एक एक काळ एका पुरुषार्थाचा असतो. त्या काळाच्या उन्नती आणि गतीसाठी त्या पुरुषार्थाची गरज असते. सध्याचा काळ हा अर्थ या पुरुषार्थाचा आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो बलदंड, प्रभावी पुरुष समजला जातो. त्याच्याकडेच सत्ता असते, कारण पैसा नावाची शक्ती त्याच्याकडे असते. त्यासाठी मग अर्थार्जन हे आजच्या काळाचे व्यवच्छेदक लक्षण मानले गेले आहे. कुठल्याही मार्गाने का होईना पण पैसा कमवायचा असतो. पैसा आला की मग शुचिताही आपोआपच गाठीशी बांधली जात असते. अर्थ पुरुषार्थ ..

प्रेम म्हणजे नक्की काय असतं?

आयुष्य इतकं धकाधकीचं आणि त्यामुळे तांत्रिक झालं आहे, की मग प्रेमाचा म्हणून एक दिवस काढावा लागतो. तो दिवस तसा पाळावा लागतो. ..

संधीच्या शोधात असलेल्या पुरुषांचा संधिविग्रह...

एकटी स्त्री म्हणजे पुरुषांना संधीच वाटत असते, हे आता जुने झालेले आहे. कुठलीही स्त्री संधीच वाटते अन् स्त्रीचं संधीत रूपांतर करण्याचा चोरटा प्रयत्न सतत सुरू असतो. असे वाटावे इतके हे वातावरण दुष्टावले आहे. रस्त्यावरून भरधाव जातानाही बाजूने जाताना कुठल्याही वयाची स्त्री दुचाकीवर असेल, तर बोचरे शब्दबाण मारले जातात. सिग्नलवरच्या थांब्याचा त्याच्याचसाठी उपयोग केला जातो. गर्दीत, सार्वजनिक कार्यक्रमांत, थिएटरमध्ये आपल्या बाजूला बसलेली स्त्रीदेखील संधीच वाटते... काही वेळासाठीच हा त्रास होत असल्याने स्त्रिया ..

...सारे जहाँ से अच्छा!

आज २४ जानेवारी आहे, याचा अर्थ परवा २६ जानेवारी आहे. आता २६ जानेवारी म्हणजे नेमके काय आहे, हे विचारले तर अनेकांना ते कळत नाही. कळण्याचे तसे काही कारणही नाही. काही माध्यमे दरवर्षी ही गंमत करत असतात. तरुण पिढीला, आज २६ जानेवारी आहे म्हणजे नेमके काय आहे, असे विचारले जाते. दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि वर्तमानपत्रांत मग तरुणाईने दिलेली धमाल उत्तरे प्रसारित, प्रकाशित केली जातात. प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमके काय, हे बहुतांना माहिती नसते. अगदी भारतीय घटना हा अस्मितेचा विषय करणार्‍यांना आणि ती अस्मिता वारंवार ..

हृदयातील भगवंत राहतो, हृदयातच उपाशी...!

कलावंत हे नक्षत्रांचेच देणे असते. कलावंत हा काळजातला भगवंत आहे. त्यांच्या कलेला दाद मिळाली की त्यांना बिदागी मिळाल्याचे समाधान लाभत असते...

‘रोबोटी’करण आपलेही...!

गेल्या आठवड्यात त्या रोबोबाईबद्दल लिहिताना, यंत्रं कशी माणसाळत आहेत, यावरच बोलता आले. रोबो म्हणजे माणसाळलेली यंत्रेच आहेत. ती माणसांची कामे बिनदिक्कत करतात. माणसांनाही जमणार नाही इतक्या कौशल्याने रोबो आता काही कामे करू लागली आहेत. तिकडे जपानमध्ये एका विद्यापीठात आता समुपदेशनाला (अर्थात माणसांच्या) रोबो असतात. ती माणसांचे म्हणणे नीट ऐकून घेतात अन् त्यांचे विश्लेषण करतात. त्यावर मग भाष्य करतात. अगदी मोजक्या शब्दांत बोलतात. अभ्यासक, शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, माणसांचे समुपदेशन करण्यासाठी रोबोच उत्तम ..

माणसांची यंत्रे आणि यंत्राची माणसे...

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जातीय आणि धार्मिक समीकरणे किती, कुठल्यातरी विजयस्तंभावरून उसळलेल्या जातीय दंगली अन् अन्नसुरक्षेच्या बाबत भारत जगात ११९ व्या स्थानावर, अशा काही बातम्यांच्या गर्दीत सोफियाची बातमी दडून गेलेली...

साहित्यातील सवंगता आणि भावगर्भता, बुद्धीनिष्ठता!

बडोद्याचे अखिल भारतीय साहित्य संमेलन नव्या वर्षांत होऊ घातले आहे. ..

सगळे काय विदर्भालाच द्यायचे का?

गेल्या तीन वर्षांत हा नवाच प्रश्न निर्माण झाला आहे. खरेतर विदर्भाला आधी प्रश्न पडायचा की, ‘सगळे काय पश्चिम महाराष्ट्रालाच द्यायचे का?’ तेव्हा तिकडची मंडळी विदर्भातल्या लोकांना आळशी, इथल्या लोकप्रतिनिधींना स्वार्थी अन् बेजबाबदार ठरवायचे. प्रश्न मात्र आता कायम आहे. ‘सगळे काय विदर्भालाच द्यायचे का?’ खरे आहे असला प्रश्न विचारणार्‍याचे. त्यांनी विदर्भाला अनुशेषाचे आकडे दिलेत...

गाव खातेपिते असावे...

यंदा विदर्भात पाऊस कमी झाला, फवारणीने शेतकरी दगावले, कापसावर बोंडअळीने आक्रमण केले... हे असे दरवर्षीच होत असते. गावांची ही समस्या आहे. त्यावर मात करायची, असा विचार सकारात्मकतेने अन् राजकारण बाजूला ठेवून केला तर ही समस्या सुटू शकते...

तो गेला तेव्हा अनवट पाऊस कोसळत होता...

त्रिशूलमध्ये चट्ट्याबट्ट्याचे शर्ट घालून खळीदार हसणार्‍या शशीला हेमामालिनी, ‘जानेमन तूम कमाल करते हो...’ म्हणते. तो खरेच अशी कमाल त्या काळात करत होता. त्याचा धर्मपुत्र आला तो १९६१ चा काळ...

टीका आणि तारतम्य... मोदी आणि इंदिरा!

नाकर्ती माणसं सतत कर्त्यांच्या चुकाच काढतात, कारण ते काहीच करत नाहीत अन् त्यांना त्यांचा वेळ क्रिएटिव्हली घालवायचा असतो. तुम्ही घटनांची नोंद घेतली अन् त्यावर संयम आणि समंजसपणाचे प्रोसेसिंग झाले नाही, तर थेट प्रतिक्रिया द्याल अन् हा हल्ला असेल. त्याचा पहिला आघात मात्र तुमच्यावरच उमटला असेल. देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदींच्या बाबत नेमके हेच सुरू आहे. खरेतर ते काही या देशाचे पहिले पंतप्रधान नाहीत. मात्र, राष्ट्राच्या भल्याची संपूर्ण जबाबदारी अंगावर घेणारे पहिलेच आहेत, अशी केवळ त्यांच्या समर्थकांचीच ..

पोलिसांनी केले ‘शेण्टीमेंटल!’

२६/११ च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांबद्दलचा आदर कमालीचा दुणावला होता. पोलिस सामान्यांच्या सुरक्षेसाठी सतत जागे असतात, त्यांना सुट्ट्याही नसतात. सामान्यजन सण साजरा करत असताना पोलिस मात्र ड्युटीवर असतात. त्यांच्या संघटना नाहीत. त्यांना त्यांच्यावरच्या अन्यायाविरुद्ध आवाजही करता येत नाही. नेत्या-पुढार्‍यांच्या सुरक्षेत राहावे लागते. साधे शिपाई तर बड्या अधिकार्‍यांच्या बंगल्यावरची कामे करतात... पडेल ती कामे! हे सारेच नेहमी चर्चेत असते. त्यामुळे माध्यमे नेहमीच पोलिसांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचे ..