वेल्थ क्रिएटर्स

उद्योग देशसेवेचा

‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत एका ध्येयाने झपाटलेली व्यक्ती म्हणजे प्रेसिहोल कंपनीचे संस्थापक आणि संचालक अयाझ काझी...

एक सुसाट उद्योगचालक...

सर्वसाधारण कुटुंबांच्या जीवनकथांमध्ये दुर्मीळ ही यशोकथा आहे, ‘त्रिमूर्ती ऑटोडेको कम्पोनंट्स प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना करणारे मकरंद जोशी यांची...

निर्यातक्षम उद्योजक

भारतासारख्या विकसनशील देशाला प्रगतीची शिखरे गाठावयाची असल्यास नागरीकानी निरोगी जीवनमान व्यतीत करणे आवश्यक आहे...

कट्याल स्पोर्ट्स केमिकल्सची अल्पावधीत गरुडभरारी

साधारण ४० वर्षांपूर्वी नागपूर येथून अवघे १०० रुपये घेऊन घरातून निघालेल्या उदय केळकर यांच्या कट्याल स्पोर्ट्स आणि केमिकल कंपनीने अल्पावधीत उंच भरारी घेतली. जिद्द, सचोटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या आधारे आजमितीस या कंपनीने सात ते आठ कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचा टप्पा गाठला आहे...

हाडाचा नव्हे, धातूचा उद्योजक

व्यावसायिक जीवनात अनेक संकंटांचा सामना करत कोट्यवधींची उलाढाल करणार्‍या या ‘वेल्थ क्रिएटर’ची ही यशोगाथा.....

दूरदृष्टीचा ‘विजय’

जुन्नर तालुका म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची जन्मभूमी म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा एक स्वाभिमानी कप्पा इथे जपला गेला आहे. कारण, हे ठिकाण आहे शिवजन्मभूमीचे. या सर्व गुणसंपदेचे उत्तम उदाहरण म्हणून आज आपल्याला डोंबिवली येथील ‘हॉटेल बल्लाळेश्वर’चे मालक विजय बबन गावडे यांच्याकडे पाहाता येते. त्यांनी अल्पावधीत साधलेली ही प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. ..

गोष्ट पाच तरुणांच्या पॅशनची, संघर्षाची..

सारे तरुण एकामागोमाग एक एकत्र येतात काय आणि बघता बघता क्रिटिकल इक्विपमेंटस आणि केमिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एक आघाडीची आणि ७० हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी उभी करतात काय... ..

ग्रामीण उद्योजकाची ‘कृपा’दृष्टी

उद्योग आणि उद्योजक फक्त शहरांतच बहरतात, या समजुतीला छेद दिला तो ‘कृपा हेअरटॉनिक’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेल्या राजन दळी या उद्योजकाने...

ग्राहकांचा विश्वास हेच भांडवल

मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाचा डोलारा उभा करणे आणि तो यशस्वीपणे वाढवणे हे शिवधनुष्य पेलण्याचे काम ‘पद्मजा एरोबायोलॉजिकल प्रा. लि.’ अर्थात ‘पीएपीएल’च्या माध्यमातून कंपनीचे संस्थापक व संचालक डॉ. नंदकिशोर जोशी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरुंधती जोशी यांनी केले आहे. ‘संतुष्ट ग्राहक हेच आमचे ध्येय’ मानणाऱ्या ‘पीएपीएल’चा महाराष्ट्रासह गोव्यातही विस्तार झाला आहे...

कल्पकतेचे मूर्तिमंत उदाहरण

अकोल्यासारख्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या महानगरात येऊन स्वतःची ओळख निर्माण करून, स्वतःचा व्यवसाय उभा करून तो यशस्वी करून दाखवणं हे सोपं निश्चितच नाही परंतु, ही कामगिरी ‘माइंडफ्लो पार्टनर्स’ कंपनीचे संस्थापक गिरीश सांगवीकर यांनी प्रत्यक्षात करून दाखवली...

पितांबरी : बस्स, नाम ही काफी है!

‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी!’ हे घोषवाक्य महाराष्ट्राला तसे सुपरिचितच.एखादा उद्योजक आपल्या अविश्रांत मेहनतीने कसे उज्ज्वल यश संपादित करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई. वामनराव प्रभुदेसाई या आपल्या वडिलांकडून उद्योजकतेचे बाळकडू घेतलेल्या रवींद्र प्रभुदेसाई यांनी अत्यंत परिश्रमाने ‘पितांबरी’चा डोलारा उभा केला. ..

उद्योगविकासाचा ध्येयवाद

देशभरातील आयआयटी उत्तीर्ण बुद्धिवंत मुले वेगवेगळ्या क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता आजमावत होती. असेच १९७४ साली श्रीपाद मोंडकर आयआयटीमधून केमिकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडले. तंत्रकौशल्य, प्रामाणिकपणा, मेहनत या त्रिसूत्रींच्या आधारावर या क्षेत्रात त्यांनी चांगला जम बसवला. आज मोंडकर यांच्या ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’ने जगभरातील १६ देशांमध्ये आपला पसारा वाढवला आहे...

जिद्द उद्योगभरारीची...

‘रोजगार निर्मिती’ हा शब्द जितका ऐकायला सोपा वाटतो, तो खऱ्या अर्थाने तितकाच कठीण. दोन जणांना जरी रोजगार देण्याचा आपण विचार केला, तरी त्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल उभं करणं किंवा त्यासाठी आवश्यक सामग्री उभी करणं हे खऱ्या अर्थाने मोठं आव्हानच. हे आव्हान पेलणाऱ्या सामान्य घरातून मोठी स्वप्नं घेऊन आलेल्या अशाच एका अवलियाच्या ‘वेल्थ क्रिएशन’ची ही कहाणी... ..

छोटी दुनिया, बडा नाम...

१९९३ साली सुरू झालेल्या ‘सारा-केम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची कहाणीही तशीच वेगळी आहे...

उद्योगातून शपथ पर्यावरणरक्षणाची

व्यवसायासह पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, या उद्देशाने २००९ साली केओसीपीएल कंपनीची स्थापना झाली. कुटूंबातूनच व्यवसायाचे बाळकडू मिळाल्याने रघुनाथ यांनी व्यवसायात अवघ्या काही वर्षांतच जम बसवला. ..

तंत्रकौशल्याचे शिरोमणी

‘क्वांटिटी’ आणि ‘क्वालिटी’ हे दोघे हातात हात घेऊन चालू शकतात, याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘ईच्हार इक्विपमेंट्स प्रा. लि.’ होय. सीएनसी प्रोग्रॅमवर आधारित उत्पादनहे ‘ईच्हार इक्विपमेंट्स’चे वैशिष्ट्य. रमेश पांचाळ व कीर्ती पांचाळ या दोन भावांनी आपले वडील हेमचंद पांचाळ यांच्या स्वप्नांना मेहनतीचे पंख दिले आणि हे साम्राज्य उभे केले. या तंत्रकौशल्याचे शिरोमणी ठरलेल्या पांचाळ बंधूंची ही यशोगाथा.....

व्यवसाय हेच तत्त्व मानणारा उद्यमी

‘तुमची कंपनी केवळ तुमच्या तत्त्वांनी ओळखली जावी,’ यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मोहन गुरुनानी यांनी ‘मोराज ग्रुप’ची सुरुवात केल्यानंतर काही वर्षांतच एक अग्रगण्य कंपनी म्हणून ‘मोराज ग्रुप’चे नाव घेतले जाऊ लागले. गुरुनानी यांचा प्रवास उद्योगजगताच्या तत्त्वनिष्ठतेबद्दल जास्त बोलतो. केवळ उद्योजकांनीच नव्हे, तर सामान्य माणसानेही आदर्श घ्यावा, असा हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास.....

छोटी दुनिया, बडा नाम

उद्योग कितीही लहान असो, तुमचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असेल, तर यश तुमच्या पायाशी लोळण घालेल. १९९३ साली सुरू झालेल्या ‘सारा-केम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची कहाणीही तशीच वेगळी आहे...

जगण्याची क्वालिटी टेस्टिंग

प्रत्येकाला त्याचा एक स्वत:चा ‘फॅमिली डॉक्टर’ असतो. एकविसाव्या शतकात ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना बदलण्याचे काम एका ध्येयवेड्या कंपनीने केले. त्या कंपनीचे नाव म्हणजे ‘एन्व्हायरो केअर.’ ‘एन्व्हायरो केअर लॅब’ आज टेस्टिंग उद्योगातील मापदंड मानली जाऊ लागली आहे. केवळ व्यवसायाचेच नव्हे, तर जगण्याचे नवे मंत्रदेखील ती देऊ पाहत आहे...

ध्यास नवतंत्रज्ञानाचा

पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि अमेरिकेतून ब्रुकलेन पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले हरीश मेहता हे आज ‘ऑनवर्ड टेक्नोलॉजीस पब्लिक लिमिटेड’ या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. नवउद्योजकांना मार्गदर्शनासह माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सुमारे ४० लाख रोजगार निर्मिती करणाऱ्या ‘नॅसकॉम’ या संस्थेचे ते सहसंस्थापक आणि माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यालयात सुरू झालेल्या ‘नॅसकॉम’ या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबाबत नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचा गौरवही झाला ..

शून्यातून विश्व उभारणारा उद्योजक

ग्रामीण भागातून, सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून, अल्प शिक्षण असतानाही एखादी व्यक्ती जर मुंबईसारख्या शहरात येऊन उद्योजक बनण्याची स्वप्ने पाहत असेल, तर त्या व्यक्तीने रमेश नाना म्हात्रे यांची कारकीर्द डोळ्यापुढे ठेऊन वाटचाल करायला हरकत नाही. ..

कुटुंब रंगलंय उद्योगात...

आज शंभर कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या ‘अशिदा इलेक्ट्रॉनिक्स’चा जन्म हा प्रतिकूलतेतून झाला. ‘प्रतिकूल तेच घडेल आणि प्रतिकूलतेतही आहे अनुकूलता,’ अशी सावरकरांची वचने ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती, अशा भाऊ तथा मनोहर कुलकर्णी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने व एस.डी. नाईक आणि सुनील कुलकर्णी यांच्या सहकार्याने ‘अशिदा’ नावाचा वटवृक्ष बहरला...

शून्यातून उद्योगनिर्मितीचा वसा

अभियांत्रिकी अभियंता ही पदवी घेतलेल्या प्रभाकर खिरे यांची उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती. अशात व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. ..

लॅब इंडिया : यशाचे पृथक्करण

जगातील २२ देशांत कार्यविस्तार, अकराहून अधिक कार्यालये आणि साडेतीनशे कोटींहून अधिक उलाढाल हा झाला ‘लॅब इंडिया’चा वर्तमान. रत्नागिरीमधील नांदिवडे गावात भिक्षुक असलेल्या शंकर बापट यांचे चिरंजीव श्रीकांत बापट यांचा उद्योजक म्हणून झालेला प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. ..

‘डेअर इट वर्क’

एका पाचशे लोकवस्तीच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या नारायण पवार यांनी ‘जीएनपी ग्रुप’ या आज ५० कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीची बीजं आपल्या संघर्षमय आयुष्यात पेरली होती. ‘डेअर इट वर्क’ असे घोषवाक्य घेऊन ‘जीएनपी’ समूह काम करीत असून प्रत्येक कर्मचारी हा ‘जीएनपी’ समूहाचे नेतृत्व करतो आणि आज या कंपनीची ५०० कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल सुरू आहे...

सेवाक्षेत्रातील ‘श्री कृपा’

एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबाने परिश्रमपूर्वक उभा केलेला आणि वाढवलेला उद्योग म्हणजे ‘एसकेएसपीएल’ अर्थात ‘श्री कृपा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड.’ पुण्याच्या महेश व राघवेंद्र खेडकर बंधूंनी उभी केलेली ही कंपनी आज सेवा व व्यवस्थापन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. ..

उद्यमशीलतेची प्रयोगशाळा

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुरू केलेल्या प्रदीप ताम्हाणे यांच्या ‘विनकोट’ कंपनीने अल्पावधीत जगभरात ख्याती मिळवली. १९९७ साली सुरू झालेली ‘विनकोट’ ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटिंग करणारी एकमेव कंपनी आहे. आज ‘विनकोट’ कंपनी जगातील पन्नासहून अधिक औषधनिर्मिती करणाऱ्या देशांना उत्पादन निर्यात करते...