वाशीम

काळाकामठा येथील आदिवासी अनुदानित आश्रम शाळेची मान्यता रद्द

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात एकूण १९ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी काळाकामठा, ता. मालेगांव, जि. वाशिम येथील अनुदानितआश्रमशाळेची मान्यता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी रद्द केली. दरम्यान आश्रमशाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालकांनी तातडीने आपल्या पाल्यांचे प्रवेश आश्रमशाळे जवळ असलेल्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळेमध्ये करावे, यासाठी प्रकल्पाचा कार्यालयाला भेट द्यावी, असे ते म्हणाले.

पुढे वाचा