विदर्भ

दसऱ्यादिवशी नागपूर मेट्रोची पहिली चाचणी फेरी

उद्या नागपूर मेट्रोची पहिली चाचणी फेरी होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित असणार आहेत. माझी मेट्रो असे नामकरण झालेली ही मेट्रो मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसरी मेट्रो आहे. यावेळी मेट्रो प्रवाशांकरिता स्मार्ट मोबिलीटी कार्ड, महा कार्डचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर मेट्रोची सुरुवात करून वाहतूक व्यवस्थेला गती देण्याचा हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. उद्या सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम नागपूरमधील मिहा

पुढे वाचा

चंद्रपूर जिल्हयातील पुरातन वारश्याच्या जतनासाठी भरीव निधी उपलब्ध करू

या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्हयातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने या महानगरातील इतिहासकालीन परकोट, मंदिरे, वास्तु तसेच अन्य पुरातन ठेव्याच्या जतन आणि जोपासणेकरिता ऐतिहासिक किल्ल्याचा सौदर्याच्या दृष्टीने विकासाकरीता भरीव निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्राी डॉ. महेश शर्मा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.

पुढे वाचा

काळाकामठा येथील आदिवासी अनुदानित आश्रम शाळेची मान्यता रद्द

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात एकूण १९ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी काळाकामठा, ता. मालेगांव, जि. वाशिम येथील अनुदानितआश्रमशाळेची मान्यता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी रद्द केली. दरम्यान आश्रमशाळेमध्ये शिकत असलेल्या पहिली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालकांनी तातडीने आपल्या पाल्यांचे प्रवेश आश्रमशाळे जवळ असलेल्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळेमध्ये करावे, यासाठी प्रकल्पाचा कार्यालयाला भेट द्यावी, असे ते म्हणाले.

पुढे वाचा

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात पक्‍क्‍या रस्‍त्‍यांवर पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे तसेच जिवती तालुक्‍यात वनविभागाशी संबंधीत प्रश्‍नांची सोडवणुक त्‍वरित करावी या मागण्‍यांसदर्भात महाराष्ट्राचे वित्‍त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्‍लीत केंद्रीय पर्यावरण, वन तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेत विस्‍तृत चर्चा केली. या विषयांसंदर्भात त्‍वरित सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन डॉ. हर्षवर्धन यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

पुढे वाचा