विचारविमर्श

सागरी अपारंपरिक आव्हानांमुळे नौदलांच्या पोलिसिंग भूमिकेचे वाढते महत्त्व

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. आज भारताच्या सागरी सुरक्षेसाठी अनेक घटक समुद्र किनार्‍यावर कार्यान्वित आहेत. यामध्ये कोस्टगार्ड, सागरी पोलिस, गुप्तहेर माहिती देण्याकरिता गुप्तहेर संस्था, मोठ्या बंदरांचे रक्षण करण्यासाठी सीआयएसएङ्ग, लहान बंदरांसाठी खासगी सुरक्षा कंपन्या आणि आपले कोळी बांधव हेही सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. यापैकी एखादा घटक पूर्णपणे समर्थ नसेल तरीही त्याचा अर्थ आपल्या सागरी सुरक्षेमध्ये उणीव आहे, असा होत नाही. कारण, ही बहुस्तरीय सुरक्षारचना आ

पुढे वाचा

पश्चिम महाराष्ट्रातील ‘साखरपेरणी’

आजवर भाजपसाठी अवघड कोडं बनलेल्या या पश्चिम महाराष्ट्राच्या स्वभावाची उकल हळूहळू भाजपला होत असल्याचंच या सगळ्यातून स्पष्ट होत असून २०१९ च्या दृष्टीने तशी जमीन तयार होऊ लागल्याचं दिसून येतं. मात्र, येथील राजकारणाची नाडी असलेल्या सहकाराला ताब्यात घेतल्याशिवाय भाजपला येथे पूर्णपणे जम बसवणे असून भाजपनेही हे वेळीच ओळखत वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर १४५ चा जादुई आकडा गाठायचा असल्यास पश्चिम महाराष्ट्रात आत्ता असलेल्या २१ जागांना दुपटीपर्यंत न्यावं लागणार असून त्याच दृष्टीने आतापासूनच ‘साखरपेरणी’

पुढे वाचा

डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे अकलेचे तारे!

जम्मू-काश्मीरची समस्या चिघळायला जे अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यात अब्दुल्ला घराणेही आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे पिताश्री शेख अब्दुल्ला यांच्या त्या काळातील राजकारणामुळे तसेच त्याला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मिळालेल्या सहकार्यामुळे जम्मू-काश्मीरची समस्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरील जखमेसारखी आजही भळभळत आहे. यावर आजपर्यंत देशातील कोणाही राज्यकर्त्यांना उपचार करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाकव्याप्त काश्मीर या शब्दातच काश्मीरवर पाकिस्तानने जबरदस्तीने कब्जा केल्याचे दिसून येते.

पुढे वाचा

तातडीने पूल उभारण्यासाठी लष्कराची मदत : एक स्वागतार्ह निर्णय

मुंबईतील तीन स्थानकांतील पादचारी पूल बांधण्याचे काम लष्कराकडे सोपविण्याच्या निर्णयाचे ज्या प्रकारे स्वागत होत आहे, त्यातून नागरिकांची लष्करावरील श्रद्धा, लष्करातील शिस्तबद्ध व्यवस्थेचे कौतुक पुढे येते. या लष्कराच्या हाती सर्व व्यवस्था द्यावी, यामुळे कामाचा वेग आणि दर्जा वाढेल असे त्याला मनोमन वाटत असते. यातून पुढे येणारी एक बाब म्हणजे अंदाधुंदी, भ्रष्टाचार, हलगर्जी अशा दोषांनी ग्रस्त असलेल्या मुलकी व्यवस्थेवर लोकांचा विश्वास कमी आहे. मुलकी व्यवस्थेपेक्षा लष्कर शतपटीने चांगले असे लोकांना वाटते.

पुढे वाचा

हिंदुत्व आणि ते नाकारणारे डावे उदारमतवादी

२०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भारतीय राजकारणात एक वैशिष्ट्यपूर्ण घटनाक्रम दिसू लागला आहे. नरेन्द्र मोदीसरकार आणि हिंदुत्व यांना विरोधी पक्षांपेक्षा राजकारणाबाहेरील ‘डावे उदारमतवादी’म्हणवणार्‍यांकडून विरोध होऊ लागला आहे. गोरक्षण, नोटाबंदी किंवा अगदी गुजरात निवडणूक, असा कोणताही मुद्दा असतो तेव्हा संघविरोधी आणि मोदीविरोधी अजेंडा राबवत जनतेचे ध्रुवीकरण करण्यासाठी ते किती उतावीळ असतात हे दिसून येते. डावे-उदारमतवादी हा शब्दप्रयोग नवीन नाही. तो आता अधिक प्रचलित झाला आहे एवढेच. त्याचबरोबर त्याचा अर्थ आणि त्याती

पुढे वाचा

भारताची सागरी आव्हाने आणि  सुरक्षा : धोरणस्तरावरील शिफारसी

 भारतास ५,४२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी नऊ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांना स्पर्श करते. त्यात नौकानयन, भूपृष्ठ वाहतूक, देशांतरण, व्यापार आणि वाणिज्य, संरक्षण आणि गृह या मंत्रालयांचा समावेश आहे. अनेक संस्थांचाही यामध्ये समावेश होत असतो, जसे की भारतीय नौदल, भारतीय तटरक्षकदल, सीमा सुरक्षादल जलशाखा, समुद्री पोलीस, गुप्तवार्ता  संस्था, सीमाशुल्क, अबकारी. या सगळ्यांत परस्परांतील समन्वय अजून वाढणे जरुरी आहे. गुप्तवार्ता विभाग दहशतवाद्यांचे प्रत्यक्षाहून खूप मोठे चित्र रंगवतो. ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय किनारप

पुढे वाचा

रोहिंग्या मुस्लीम व भारतातील मुसलमान

 रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावरून भारतातील मुसलमानांना चिथविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मुस्लिमांच्या वेगळ्या धार्मिक अस्मितेच्या मुद्द्यावरून भारताची फाळणी झाली. त्यामुळे मुस्लिमांचे कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. याच धार्मिक अस्मितेमुळे हिंदू व मुस्लीमसमाजात अविश्वासाचे वातावरण आहे. भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, या प्रचाराला बळी पडून हा अविश्वास अधिक वाढवायचा की रोहिंग्या मुस्लिमांपेक्षा आपण शेकडो वर्षे ज्यांच्यासोबत राहात आहोत त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व द्यायचे, याचा विचार त्यांनी करायचा आहे.

पुढे वाचा