वेध

प्रगतीबरोबर प्रतिमाही सुधारा!

मुंबईसह महानगर क्षेत्रात महानगरपालिकांच्या मराठी शाळांची चिंतादायक परिस्थिती लक्षात घेता, ही गळती रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध योजना राबविल्या आहेत. ..

ताकीद नको, ताकदच दाखवा!

तपासणी, शोधमोहिमा, रुग्णवाहिका, श्वानपथक, बॉम्बपथक असा सगळा लवाजमा घटनास्थळी दाखल होतो. पण, नंतर या केवळ पोकळ धमक्या असल्याचे लक्षात येते आणि सुरक्षा यंत्रणांचा सगळा वेळ, पैसा, मेहनत खर्ची पडते. नागरिकांचीच गैरसोय होते ती वेगळी!..

मुंबईचे स्पिरीट इथेही दाखवा

पाऊस अनुभवांच्या कडू-गोड आठवणींच्या सागरात भिजवून टाकतो. पण ही अनुभूती मुंबईबाहेरची बरं का. कारण, मुंबईचा पाऊस आठव रे... असे एखाद्या मुंबईकराला म्हणून पाहा...

दोष हा कुणाचा...?

२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर अजूनही पराभूत मानसिकतेत बुडालेले विरोधक सावरलेले नाहीत. एकीकडे राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्षपद नकोसे झाले, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात सपा-बसपाने वेगळी चूल मांडली...

राष्ट्रवादीची 'भाकरी आणि पीठ'

राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. (साजरा होण्यापेक्षा 'शोक'च जास्त व्यक्त झाला.) यावेळी राष्ट्रवादीचे नवे 'युवराज' रोहित पवार यांनी क्रांतिकारक अशी फेसबुक पोस्ट केली...

'हरित नाशिक'साठी स्वागतार्ह श्रमदान

यंदाच्या मोसमात नाशिक जिल्ह्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या आणि यातूनच नाशिक शहराचे पर्यावरण अबाधित राहण्यासाठी आवश्यक असणारी वृक्षराजींची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. नाशिक..

बंद, भाडेवाढ आणि मनस्ताप

लाखो मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करतात. मुंबईकरांसाठी लोकल, रिक्षा आणि टॅक्सी अत्यंत महत्त्वाची प्रवासाची साधने असल्याने त्यांच्याशिवाय मुंबईकरांचे पानही हलत नाही...

'युवराज' म्हणजे...

ज्या रोगाचं नाव ऐकूनही माणसं मुळापासून कोसळून पडतात, अशा कर्करोगाशी यशस्वीपणे झुंज देऊन हा गडी पुन्हा मैदानात खेळायला उतरला...

टप्पल ते ट्विटर...

ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर द्वेष, उद्विग्नपूर्ण भावनांना वाचा फुटते. पण, अवघ्या काही दिवसांत विरोधाचे हे सूर मावळतात...

चर्चा 'आंध्र पॅटर्न'ची

चंद्राबाबू नायडू यांनी जरी आपल्या कार्यकाळात आंध्रमधील शहरे सुधारली असली तरी डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी आंध्रच्या ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास केल्याचे म्हटले जाते...

डॉ. आ. ह. साळुंखेंचा इतिहास

विज्ञान किंवा समाजशास्त्राची संकल्पना गृहितकांवर आधारित असू शकते. पण, इतिहास गृहितकांवर आधारित नसतो. तो निष्पक्षपणे आणि मनात कोणतीही किल्मिष गृहितक न मांडताच मांडावा लागतो...

अव्वल स्थान टिकविण्याचे आव्हान

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू सेवन याला प्रतिबंध करण्यासाठी असणाऱ्या (सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा) ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने काटेकोरपणे करण्यात आली...

शक्ती मिल कंपाऊंड....

बलात्कार करणाऱ्या नराधमांमुळे पीडित मुलीच्या आयुष्याच्या आणि भावविश्वाच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या होतात. तिची काहीही चूक नसताना तिला आयुष्यभर नरकयातना भोगाव्या लागतात. खरे म्हणजे जिवंत असूनही तिला मृतप्राय जगणेच जगावे लागते, एकवेळ हत्या केल्यावर माणूस मरतो आणि इहवादाने त्याचे सगळे सगळे संपते...

मोफत नको, दर्जात्मक सेवा द्या

अण्णांच्या आंदोलनातून सिव्हिल सोसायटी आणि पर्यायी राजकारणाचा वेगळा प्रयोग म्हणून दिल्लीकरांनी केजरीवालांच्या ‘आप’ला बहुमताने सत्तेच्या चाव्या दिल्या. पण, केजरीवालांना ना धड आश्वासनपूर्ती करता आली, ना काही विशेष कामगिरी...

हम बेगाने हो गये!

ब्रिटिशांच्या काळातही काँग्रेसला कोणत्याही संस्थात्मक घटकांनी मदत केली नाही. तरीही त्यावेळी काँग्रेस ब्रिटिशांशी लढली आणि जिंकली. आताचे राज्य त्यावेळच्या ब्रिटिश राजवटीसारखे आहे...

राम नाम तू जप कर देख...

'जय श्रीराम’ची घोषणा देणारे बंगालमध्ये गुन्हेगार आणि गुंड ठरवले जात असतील, तर ती हिंदूंच्या दृष्टीने निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल...

बेदरकार 'कोरे' प्रशासन

घोड्यावर मांड ठोकणे हे जसे कौशल्य आहे, तसे नोकरशाहीकडून जनतेची कामे करून घेणे हेदेखील महाकौशल्याचे काम.नोकरशाहीवर नियंत्रण ठेवणे राज्यकर्त्यांना दिवसेंदिवस कठीण जात आहे...

सामाजिक हिटलरशाही

बाळाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवले पण, आता ते नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी हे नाव ठेवले गेले. ..

ठाकरे ’आमदार’ होणार?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक आठवडाही उलटला नसताना आदित्य ठाकरेंच्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारीच्या चर्चांनी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. का..

कळा या लागल्या जीवा...

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, भाजप आणि रा.स्व.संघ यांचे काहीतरी नक्की होईल, असे वाटावे इतके ते शब्दांचे अस्त्रशस्त्र वापरीत. अर्थात पेशवाई गाडू, मनूबिनू यांचीही फोडणी त्यामध्ये असे. अर्थात, प्रकाश यांच्यापाठी महामानवांचे आडनाव आहे...

विजय‘स्मृति’

अमेठीवासीयांच्या रोषाचा फटका राहुलला बसला तर, त्याच अमेठीवासीयांच्या प्रेम-आपुलकीमुळे २०१४ साली अमेठीतूनच पराभव पत्कराव्या लागलेल्या स्मृती इराणी यंदा ‘जायंट किलर’ ठरल्या...

लोकलची तहान, मेमूवर समाधान

मुंबई-पुणे-नाशिक या राज्यातील सुवर्ण त्रिकोणाची चर्चा वाहतूक आणि दळणवळण क्षेत्राच्या नेहमीच केंद्रस्थानी असते...

वाढत्या आत्महत्या आणि समाज

एकीकडे कितीही अडचणींना सामोरे जावे लागले तरी खुल्या मनाने जगणारी माणसं, तर दुसरीकडे अगदी क्षुल्लक कारणांसाठी लोकांच्या जीवावर उठणारी माणसंही कमी नाहीत..

मरणारी मुकी झाडे

कुणाला घरासमोरचं अंगण मोकळं करून तिथे गॅलरी काढायची होती किंवा घराचे क्षेत्रफळ वाढवायचे होते...

रसिकप्रेक्षक आणि रंगभूमी

'शारदा' गेली, 'चित्रा'ही गेली.....

राव, रेड्डी आणि पटनाईक...

देशात सध्या सगळ्यांचे लक्ष २३ तारखेकडे लागले आहे. विविध पक्षांचे राजकीय नेते तर आपापल्या छोट्या-मोठ्या राजकीय गणितासाठी आगामी गुरुवारकडे डोळे लावून बसले आहेत. सध्या देश पातळीवर तीन आघाड्या समोर येत आहेत...

थेट संवादाची उपयुक्तता

कोणत्याही समस्येचे निराकरण करावे, असे जर मनापासून वाटत असेल तर त्यासाठी थेट संवाद हा आवश्यकच असतो. या थेट संवादामुळे नेमकी समस्या आणि त्यामागील कारणे यांचा उलगडा होण्यास मदत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे पाहावयास हवे. ..

टिकटॉकची व्यर्थ टिकटिक...

जगभरात टिकटॉकने सर्वांना अक्षरशः वेड लावले आणि खासकरुन तरुणांना. पण, आता अगदी वृद्ध नागरिक व लहान मुलंही या टिकटॉकच्या वेडाला बळी पडताना दिसतात. आधुनिक मनोरंजनाचे साधन म्हणून नेटकर्‍यांमध्ये टिकटॉक प्रसिद्ध आहे...

पॅथॉलॉजी लॅबची दुकानदारी

मुंबईकर हा घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. मुंबईचे जनजीवनच धाकधुकीचे. अशा परिस्थितीत एकदा आजार जडल्यास त्याचे तत्काळ निदान करण्याची घाई रुग्णांना असते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या लवकर करण्यासाठी खासगी पॅथॉलॉजी लॅबचा आधार घेतला जातो. ..

सिद्धू-पाजी

सिद्धूंनी स्वतःला काँग्रेसच्या दावणीला बांधले आणि मग काँग्रेसने आणि सिद्धूने स्वतःचे त्यागण्यायोग्य जे काही गुण होते, ते आपसात अतिशय प्रेमाने वाटून घेतले...

मायावतींची संघ अभिव्यक्ती

स्वतःचे पुतळे मोक्याच्या जागी बांधणे आणि ‘तिलक-तराजू-तलवार’ वगैरे वगैरे करत जातीयतेचे विष पसरवणे, हीच या बहनजींची आयुष्यभराची कमाई...

पवारांचे तथाकथित 'गांधीप्रेम'

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर आताच्या देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे बरोबर दोन दशकांपूर्वी सोनिया गांधी यांच्या विरोधात बंड पुकारून काँग्रेसबाहेर पडले. ..

फलनिष्पत्ती संघटित प्रयत्नांची

नुकतीच राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'कायाकल्प' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत नाशिक जिल्हा रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला...

ममतांची ठोकशाही

लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही’ अशी लोकशाहीची व्याख्या केली जाते. ‘लोकशाही’ हे कल्याणकारी राज्य असून यामध्ये प्रत्येकाचे सन्मानपूर्वक हित साधले जाते. तिथे हिंसेला नाही, तर कायदेशीर तत्त्वांना मान्यता असते..

दुष्काळावरुन राजकारण

मातीतून शेती की शेतीची माती?..

खोट्याच्या कपाळी गोटा

खोटारडेपणाचा कळस करणाऱ्या काँग्रेस आणि आघाडीला सत्ता मिळेल का? तर उत्तर आहे, खोट्याच्या कपाळी गोटा. खोटारड्यांना जनता पराभवाचा नुसता गोटा नव्हे तर जमालगोटा देणार आहे...

जावेद अख्तर आणि ओवेसी

जावेद अख्तर यांनी नुकतेच एक वक्तव्य केले की, “फक्त बुरखाप्रथेलाच बंदी नाही, तर घुंगट प्रथेवरही बंदी आणायला हवी.” वा! कवीमन सर्व स्तराच्या भेदापलीकडे मानवी मूल्यांचे जागर करणारे असते, असे वाटायचे. पण, हाय रे दैवा, जावेद अख्तर यांचे वक्तव्य ऐकून त्यांचेच शब्द आठवले- इस शहर मे जिने का अंदाज निराला होठोंपे लतिफे आवाज मे छाले है..

वाखाणण्याजोगा उत्साह

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात दि. २९ एप्रिल रोजी १७व्या लोकसभेसाठी मतदान पार पडले. दि. २६ पासून नाशिक शहरात असणारी उष्णतेची तीव्रता लक्षात घेता दि. २९ एप्रिलला नेमके काय चित्र राहील, पुण्यासारख्या शहरात घसरलेली मतदानाची टक्केवारीची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होईल का, असे नानाविध प्रश्न नाशिककरांना दि. २९ एप्रिलच्या सकाळपर्यंत सतावत होते...

मतदानाचा वाढता टक्का स्वागतार्ह

महाराष्ट्रापुरता तरी लोकसभा निवडणुकीचा धुमधडाका आता संपला आहे. सोमवारी चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडल्याने आता निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे...

अनुपस्थित तरी उत्तीर्ण!

मुंबई विद्यापीठाचे गुण पडताळणीमध्ये होणारे गोंधळ, निकालात दिरंगाई असे विविध कारनामे समोर आले आहेत. आता त्यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे, परीक्षेला उपस्थित न राहताही उत्तीर्ण होण्याची...

तेरा वैभव अमर रहे माँ!

या देशात असहिष्णुता आहे, या देशात इतके वाईट चालले आहे, तितके खराब वातावरण आहे असे म्हणण्यात गेल्या पाच वर्षांत काही लोकांची अहमहमिका लागली होती. अर्थात यात तथाकथित राजकीय संबंधामुळे साहित्यिक वगैरे झालेले, वशिलेबाजी करून पुरस्कार प्राप्त झालेले लोकच होते, हे नक्की...

आधी होकार...

वाराणसीतून मोदींना पराभूत करणे केवळ अशक्यप्राय असल्याची पूर्ण कल्पना सोनिया आणि राहुल गांधी यांना आहेच. त्यामुळे प्रियांकाने तिच्या पहिली निवडणुकीत असा मोठा पराभव पत्करणे प्रियांकाच्या आणि काँग्रेसच्याही सोयीचे निश्चितच नाही...

कर‘नाटकी’ राजकारण...

बेळगावातील जारकीहोळी बंधू या अस्थिर कर्नाटकी राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असून माजी मंत्री आणि काँग्रेस आ. रमेश जारकीहोळी हे कर्नाटकी बंडाचे नेते आहेत...

ही बेफिकिरी कशासाठी?

नाशिक शहरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत म्हणजेच केवळ ९० दिवसांत ३७ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या ३७ पैकी ३४ दुचाकीस्वार हे केवळ हेल्मेट परिधान न केल्यामुळे मृत्युच्या कवेत ओढले गेले आहेत..

विकासाच्या प्रतीक्षेत पूर्वउपनगरे

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपर ते मुलुंड या मुंबईतील पूर्व उपनगरांचा भाग मोडतो. या भागात अनेक प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळलेले आहे. ..

मुंबईची नालेसफाई गाळात

मुंबईला शुद्ध हवेची गरज..

काका, टोपीत गुंतू नका!

देशात प्रत्येक देशप्रेमी आणि नीतिमान व्यक्ती संघाचेच प्रतिनिधीत्व करत असते. मग ते शाखेत जावोत वा न जावोत, काळी टोपी घालोत वा न घालोत. कारण सकारात्मक परिवर्तनाची साक्ष घेतच आज संघाची नीती प्रकाशमान आहे...

उर्मिलेची उत्तरी ‘दौड’

आधी नेत्यांच्या मागे तिकीट मिळावे म्हणून पळा, तिकीट प्राप्तीनंतर कार्यकर्त्यांच्या जुळवाजुळवीमागे लागा आणि मग गल्लोगल्ली जाऊन मतदारांसमोर हात जोडा. उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या राजकीय ‘दौड’मध्ये एकाएकी सामील झाल्या आणि मग.....

देवेगौडा आणि कुटुंबकबिला

सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना विविध पक्षांचे काही वरिष्ठ नेते आपल्या कुटुंबकबिल्यामुळे व विशेषतः पुत्रप्रेमामुळे आपल्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. ..

कास नवविचारांची...

जाणीव सामाजिकतेची..

ये कुछ ‘आझम’ नही हुआ!

सपाचा नेता आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचा वाचाळ उमेदवार आझम खान याची जीभ पुन्हा एकदा घसरली. त्याने आपल्या कलुषित बुद्धीचे प्रदर्शन जगजाहीर केले...

शिक्षणक्षेत्राचे बाजारीकरण

शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची ओळख असते. व्यक्ती -समाज-राष्ट्रनिर्मितीचा मार्ग हा शिक्षणातून जातो. ..

फुटीरता गाडिली...

बाबासाहेबांच्या नावाने समाजाला बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर करणाऱ्या लोकांना समाज दूरच ठेवेल...

कीडक्या ‘कुमार’बुद्धीची कीव

“ज्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, तेच लोकं सैन्यात जातात.” जीभ सैल सोडून हे असली गरळ ओकणार्‍या मुख्यमंत्र्याची निंदा करावी तितकी कमी. ..

कीडक्या ‘कुमार’बुद्धीची कीव

एकीकडे मोदींवर २०१९ची निवडणूक राष्ट्रवादाच्या आणि सैन्यशक्तीच्या बळावर लढविली जात असल्याचा आरोप करायचा, तर दुसरीकडे सैन्यावर अविश्वास दाखवून त्यांच्याविषयी काहीतरी अभद्र बरळायचे, असा काहीसा लज्जास्पद प्रकार प्रचारादरम्यान शिगेला पोहोचलेला दिसतो...

निवडणुकीत प्रदेशाध्यक्षांचा ‘शोक’

स्वपक्षाचे सरकार अस्थिर, तर नेत्यांना कायम अस्वस्थ ठेवण्याच्या अघोरी पद्धतीलाच ‘काँग्रेसी राजकारण’ म्हटले तर वावगे ठरणार नाही...

स्वागत नव्या निकषांचे

पोलीस म्हणजे करारी नजर आणि सुदृढ शरीरयष्टी. मात्र, हल्ली कोणत्याही प्रकारची सुदृढता नसणारे आणि बॉडीमास्क इंडेक्समध्ये नसणारे अधिकारी व कर्मचारीच पोलीस दलात सहज दिसून येतात. ..

पोकळ आश्वासनांचा खेळ

शिक्षण म्हणजे भविष्याचा पासपोर्टच. एकदा का माणूस शिकला की, आपसूकच त्याला स्वहिताबरोबरच समाजहिताचीही जाणीव होते...

दुसरा मोदी? नको रे बाबा!

पुण्याची जहागिरी आमच्या ताब्यात होती तर आम्ही लवासाची राजधानी उभारली आणि याच्या ताब्यात सगळा देश आहे. पण हा स्वतःला चौकीदार समजतो. आता हा चौकीदार झाला म्हणून माझा पुतण्या त्याच्या विशिष्ट करामतीने धरण पण भरू शकत नाही आणि मी पुन्हा लवासा उभा करू शकत नाही. ..

पंतप्रधान बनायचं, बनू दे न वं...

राजकुमारांना देशाचा पंतप्रधान व्हायचे आहे. इतके सर्वोच्च पद भूषवायचे आहे. मात्र, सध्या देशात काय चालले आहे? देशाची परिस्थिती कशी आहे? देशावर ज्यांची सत्ता आहे, त्यांच्या कारकिर्दीत देशामध्ये काय घडामोडी घडत आहेत? याबाबत राहुल गांधींनी जराही अभ्यास केलेला दिसत नाही...

...म्हणूनच संघ सदैव वर्धिष्णू

रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची तिथीनुसार जयंती. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या संघाचे ध्येय-राष्ट्रीय भावनेचा हुंकार करत ती प्रत्येकाच्या मनामनात चेतवणे हे होय...

बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना !

सामान्य माणसांमधूनच राजकारणी पुढे येतात. त्यामुळे सामान्यांचे गुणदोष राजकारण्यांमध्ये असतातच. मनस्वी, लहरी, हेकेखोर, हट्टी, माजोरडेपणा हे अवगुण कमीअधिक प्रमाणात सर्व माणसांमध्ये आढळतात. पण, या अवगुणांचा अतिरेक झाल्यास ते कोणासाठीही हानिकारकच असते...

उदाहरण सेवाभावी सेवकांचे

जिल्हा रुग्णालयातील सेवाभावी डॉक्टर व कर्मचारी यांच्या कार्यसुलभतेमुळे वयाच्या उतरंडीला असलेल्या या आजी आता आपले सामान्य जीवन व्यतीत करू शकणार आहेत...

भूल गया सब कुछ...

हम निभायेंगे!’ अरे हो, पण काय निभायेंगे ते तर सांगाल की नाही? ‘हम निभायेंगे’ या वचनात काय, कुठे, केव्हा याबाबत कमालीची गुप्तता आहे...

सुस्त प्रशासनाची हतबलता

जोगेश्वरीमधील तब्बल ५०० कोटींचा भूखंड पालिकेच्या विधी आणि विकास नियोजन खात्यामधील अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या घशात घातला. विशेष म्हणजे, गैरव्यवहार करण्यासाठी आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर झाला आहे...

अमेठी, वायनाड फक्त दोनच?

एक अमेठी आणि एक केरळमधले वायनाड. निवडणूक जिंकायचे इतके फंडे असताना लोक कसल्या रॅलीबिली काढतात? उगीचच मला भाषणबिषण करायला देतात...

देशद्रोह करा, फाशी नाही!

कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैय्याकुमारची निवडणूक स्टाईल काय वर्णावी? ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणत देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्या देशद्रोही आणि विघातक गँगचा सहकारी असलेला कन्हैय्या हा कम्युनिस्ट पक्षाचा हस्तक. ..

संजयचा पराजय!

आपल्या देशातील ‘काँग्रेसी राजकारण’ हा आजपर्यंत कित्येकांच्या संशोधनाचा विषय ठरला आहे. त्या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांचा काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर काहीएक परिणाम झालेला नाही, हा भाग वेगळा. ..

तत्त्वशून्य राजकारण

निवडणुकीच्या आखाड्यात सत्ता-समीकरणे बांधण्यासाठी उमेदवारांची मोट बांधण्याचे कार्य लोकशाहीच्या या उत्सवादरम्यान सर्वच राजकीय पक्ष करत असतात. मात्र, त्यात नैतिकतेचे आणि तत्त्वनिष्ठतेचे अधिष्ठान असावे अशी माफक अपेक्षा ही भारतीय मतदारांची असते. ..

भिकेचे स्वप्न देऊ नका

एक लोककथेमध्ये गरजूला मासे देऊ नका तर मासे पकडण्याचे जाळे द्या, कला द्या, त्यामुळे त्या गरजूला पुन्हा कधिही मासे द्यायची वेळ येणार नाही. ..

काळ्या यादीचा फायदा काय?

दक्षिण मुंबईतील नाना चौक परिसरातील पाणीगळतीच्या तक्रारीचे निवारण करण्यास गेलेल्या जल अभियंता खात्याच्या कामगाराचा शनिवारी मृत्यू झाला..

पंतप्रधानपदाची मोह‘माया’

पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या पक्षाची देशभरात ताकद, वैयक्तिक कर्तृत्वाचा दबदबा असावा लागतो, केवळ एका राज्याचे नेतृत्व करून मोदींशी तुलना करण्याच्या नादात मायावतींनी फुकाची स्वप्ने रंगवू नये...

कोण लालबहादूर शास्त्री?

संतापजनक आणि दु:खदायक, संस्कार नसणे म्हणजे काय? हे प्रियांका वढेरा या महिलेने नुकतेच दाखवून दिले. प्रियांकाने आपल्या गळ्यातला लाल रंगाचा पुष्पहार चक्क माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेस अर्पण केला...

पडझड थांबविणार कशी?

महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचं केंद्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि या पश्चिम महाराष्ट्रावर पकड कोणाची तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, असंच समीकरण राज्यात गेली तीस-चाळीस वर्षं रूजलं होतं...

रेनवॉटर हार्वेस्टिंगचा फज्जा

काही वर्षांपूर्वी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने २००२ मध्ये पाणीटंचाईच्या समस्येवर पर्याय म्हणून नव्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले...

आता वाजले की बारा!

कसे ऋणानुबंध जुळतील सांगता येत नाही. त्याकाळी मी असा उठलो काहीतरी नवनिर्माण करण्यासाठी. तेव्हा त्यांनी उपदेश केला नेता बनायचे असेल तर पहाटे लवकर उठायची सवय लाव. जगदंबे शपथ, मायमराठी शपथ तेव्हापासून त्यांचे घुबडासारखे माफ करा घारीसारखे बारीक लक्ष माझ्याकडे होते. सख्ख्या काकांनी मला राजगादी दिली नाही. लोक म्हणतात, बरे झाले, नाही दिली. नाही तर आज काकांच्या कर्तृत्वाची निशाणी असलेली सेना मी घड्याळावरहुकूम दावणीला लावली असती...

मुंबईतील ‘हिमालय’ का कोसळला?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणार्‍या हिमालय पादचारी पुलाचा काही भाग कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू आणि ३४ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. या पुलावरून रेल्वेस्थानकात ये-जा करणार्‍यांची रोज मोठी गर्दी असते. ..

प्रियांकाचे गांधीप्रेम

“मी पहिल्यांदा साबरमतीला आले.” असो, नावात काय आहे म्हणा!! पण, ‘गांधी’ नाव उपाधीसारख्या लावणाऱ्या प्रियांकाचे गुजरातमधले हे वक्तव्य ऐकले आणि वाटले ज्या गांधींचे नाव घेऊन प्रियांकाच्या सगळ्या खानदानाने सत्ता उपभोगली, त्या प्रियांकांना उभ्या हयातीत गांधीजींच्या साबरमती आश्रमाला जाण्यासाठी उसंत मिळाली नाही? प्रियांका यांच्या लहानपणी त्यांच्या आजी इंदिरा, पिता राजीव किंवा आई सोनिया यांना नाही वाटले का की, आपल्या नातीला किंवा मुलीला महात्मा गांधींची स्मरणवास्तू दाखवावी. काय हा विरोधाभास म्हणावा? ..

‘आप’विश्वासाचा उसना आव

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी प्रसारमाध्यमांनी नायकत्व बहाल केलेल्या अरविंद केजरीवालांकडे कितीतरी पुरोगामी, बुद्धिजीवी व विचारवंत डोळे लावून बसले होते. केजरीवालांच्या रूपाने आता भारतीय लोकशाहीरूपी भ्रष्ट व्यवस्थेचे निर्दालन करणारा कोणीतरी उद्धारकर्ताच अवतरल्याचे तेव्हा ही मंडळी उच्चरवाने सांगत होती...

ये कैसे हुआ ‘जी’?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेषाची विचारधारा असून काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची विचारधारा असल्याची भूमिका काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात मांडली. याआधीही गेली अनेक वर्षं राहुल गांधी याप्रकारची भूमिका सातत्याने मांडत आहेत. ..

शाळांची संख्या वाढविण्याची गरज

केंद्र सरकार शिक्षणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे परंतु, सरकारने एखादी योजना सुरू केल्यानंतर प्रशासनाने त्याची पारदर्शकपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असते...

चोराच्या वाटा चोराला ठाऊक

सरकारचा नाही भरवसा, मतदान यंत्रे तपासा... असे म्हणणाऱ्या उमेदवाराचा उत्साह काय वर्णावा? आता हे कोण कुणाला म्हणाले, हे काय सांगावे लागणार आहे? ‘आता उरलो पंतप्रधानपदाच्या स्वप्नापुरता...’ म्हणता म्हणता राष्ट्रपतीपदासाठीही या उमेदवाराने आखाडा मांडला होता...

मुंबापुरी ही श्रीमंतांची पंढरी

'क्नाईट फ्रँक'च्या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक संपत्ती अहवालात जगभरातील श्रीमंत शहरांपैकी आपल्या मुंबईने १२ वे स्थान पटकावले...

तिचा तर प्रत्येक दिवस...

जगाला अर्थ देणार्‍या स्त्रीशक्तीच्या जगण्याचा वेध घेतला तर काय जाणवते? निदान मुंबई शहराचा वेध घेऊ. कालपरवाच ‘प्रजा फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने महिलांवर होणार्‍या अत्याचारांसंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. ..

एकमेका साहाय्य करु...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांचं ’तुझं माझं जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’ असचं काहीसं नातं. मुळात या दोघांचं ध्येय एकच, क्रिकेटचा प्रसार आणि या खेळातून कमाई...

काँग्रेसी राजकारणाचे ‘नगरी नमुने’

महाराष्ट्रात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सुरू असलेला वाद हा काँग्रेसी राजकारण म्हणजे काय, याचा अप्रतिम नमुना मानता येईल..

जंक फूडवर कारवाईची गरज

२०१६ मध्ये चायनीज आणि जंक फूड विक्रेत्यांवर बंदी घालण्याची सूचना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सभागृहात केली. संपूर्ण सभागृहाने जंक फूडविरोधात भूमिका मांडली. प्रशासनानेही कारवाई करू, असे आश्वासित करताना अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले...

खुर्शीदांची खुशी

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २००४ साली अभिनंदन वर्धमान वायुसेनेत सहभागी झाले व आताच्या त्यांच्या पराक्रमामागे काँग्रेसचेच कर्तृत्व असल्याचा अचाट दावा सलमान खुर्शीदांनी केला. म्हणजेच जे काही केले ते काँग्रेसनेच, हे सांगण्याचा हा सगळा आटापिटा. पण २००४ ते २०१४ ही दहा वर्षे काँग्रेसचेच सरकार सत्तेवर होते व तेव्हाही दहशतवादी हल्ले झाले. यावेळी का काँग्रेसने कधी पाकिस्तानच्या नाकी दम आणला नाही? ..

आम्हीच आमचे शत्रू...

सुरुवात होण्याआधीच संपण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू करण्याचा काहींचा स्वभाव असतो. काहीही चांगलं करणं बहुधा या मंडळींना जमतच नसावं...

शांतीच्या कबुतरांची व्यंगचित्रे

‘युद्ध नको पाकसोबत चर्चा करा, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती हे प्रश्नाचे उत्तर नाही,’ हे शांतीप्रवचन कुणी द्यावे तर राज ठाकरेंनी! अर्थात, शांती कुणाला नको, स्थिरता कुणाला नको? पण, स्वतःच्या रक्ताच्या बंधूला हरवल्यावर सॉलिड मारामारीची भाषा करणाऱ्यांच्या तोंडी शांतीची भाषा अजिबात शोभत नाही...

आयसीसी देणार पाकला मौका?

येत्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने खेळतील, याची शक्यता आधाची धुसर असताना आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठीशी घालण्याचे काम केले आहे...

उत्तर प्रदेशातील ‘यादवी’

मुलगा वडिलांच्या नावाने मतं मागतो आहे आणि वडील मुलासह स्वपक्षावर रोज नव्याने टीका करताहेत, त्यांच्या मित्रपक्षावरही ते नाराज आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या प्रमुखाची जाहीर स्तुती थेट लोकसभेत करत आहेत, अशी काहीशी विचित्र परिस्थिती उत्तर प्रदेशच्या राजकारणात निर्माण झाली आहे. ..

...म्हणून शिक्षक उपेक्षित

सत्ताधाऱ्यांच्या अंगवळणी पडलेल्या या वृत्तीमुळे बेस्टपासून आरोग्य सेविका, शिक्षक, सफाई कामगारांचे नुकसान होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे...

प्रकाशबापूंचे प्रेम

एक मात्र खरे की, प्रकाश आंबेडकरांसारख्या आणि ओवेसींसारख्या लोकांचे मनू आणि आता मनूसोबत पेशवे यांच्यावर भारी प्रेम आहे. त्यामुळेच कुठेही काहीही झाले की, हे लोक ‘मनू मनू, पेशवा पेशवा’ म्हणत उर बडवतात. कालच्या वंचित आघाडीच्या सभेमध्ये म्हणून तर प्रकाश आंबेडकर यांनी मनूची आठवण काढली तर त्यांचे सहयोगी ओवेसी यांनी पेशव्यांची आठवण काढली. ..

‘जातीयवाद्यां’ना रोखण्यासाठी..

शरद पवारांनी काय टीका केली, यापेक्षा ही टीका शरद पवारांनी केली, हे जास्त महत्त्वाचं आहे. शरद पवार असं काहीतरी बोलून जातात आणि मग इच्छा नसताना उगाचच काही लोक इतिहासाची पानं चाळू लागतात...

भारत-पाक आमने सामने ?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय देशांकडून पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली असताना, अगदी चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानबरोबर एकही सामना खेळू नये, अशी मागणी जोर धरत होती...

अखेरच्या घटका?

भारत संचार निगम लिमिटेड अर्थातच ‘बीएसएनएल’ गावोगावी, डोंगर-पाड्यांवर पोहोचलेली एकमेव मोबाईल कंपनी. सरकारी मालकीची ही कंपनी असल्यामुळे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ही कंपनी सुरू करण्यात आली. ..

पोपदरबारी न्याय पुकारी...

एरवी पोप यांचे समस्त ख्रिस्ती बांधवांना संबोधन-संदेशासाठी प्रसिद्ध असलेले व्हॅटिकन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे...

...तर ‘क्लीन अप मार्शल’च भरतील दंड

मुंबई महापालिकेने ‘क्लीन अप मार्शल’ संदर्भातील नियमावलीत सुधारणा केली आहे. मुंबईकरांना विनाकारण त्रास देणाऱ्या ‘क्लीन अप मार्शल’वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे...

हाऊ इज दी जोश?

एनडीटीव्हीमध्ये जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या निधी सेठ या महिलेने फेसबुकवर मत मांडले की, ‘काल्पनिक ५६ इंचावर ४४ जण भारी पडले.’ ..

मी ख्रिश्चन-हिंदू!

एक भारतीय आहे. त्यामुळे हो, मी एक ख्रिश्चन-हिंदू आहे.’ असं बेधडकपणे सांगणाऱ्या फ्रान्सिस डिसुझा यांचं गुरूवारी निधन झालं. नगरसेवक ते गोव्याचे उपमुख्यमंत्री अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेले फ्रान्सिस डिसुझा हे भाजपचे गोव्यातील पहिले अल्पसंख्याक आमदार होत. ..

अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय

विद्यापीठामध्ये भारतविरोधी नारे लावणाऱ्या आणि पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या काही सापांची पिलावळही तयार होते...

मुंबई संघाला उतरती कळा

मुंबई रणजी संघ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या संघ निवड समितीतील सदस्यांना पदावरून दूर करण्यात यावे, यासाठीचे एक पत्र नुकतेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य क्लबचे प्रतिनिधी खोदादाद याझदेगार्दी यांनी लिहिले आणि पुन्हा एकदा मुंबई संघाच्या अपयशाच्या चर्चेलासुरुवात झाली. ..

दोघांच्या भांडणात...

गेले अनेक दिवस चीन आणि अमेरिकेत सुरू असलेले व्यापार युद्ध सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले आहे. एकीकडे अमेरिका आपल्या निर्णयावर ठाम आहे, तर दुसरीकडे चीनही आता व्यापाराच्या दुसऱ्या वाटा शोधण्याच्या तयारीत आहे. ..

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी

यावेळच्या लोकसभा निवडणुकांत म्हणे, पवार कुटुंबातील (की घराण्यातील?) चार चारजण निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये स्वतः शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे हे तर आहेतच आणि त्यांच्यासोबत अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार हेही असण्याची शक्यता आहे. ..

आधीच मर्कट त्यात प्यायले...

म्यानमारच्या रोहिंग्या मुसलमानांवरून मुंबईच्या ‘अमर जवान ज्योती’चा अपमान करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राजकीय पार्टीचा नेता म्हणून हा इसम देशाला चांगलाच परिचित. आपण कसे खरे मुसलमान आहोत, हे सिद्ध करण्यासाठी हा उठसूठ हिंदू समाजाची निंदा करू लागतो तेव्हा या माणसाची जीभ नेहमी चराचरा चालते. ..

गिरणी कामगारांची घरे - नॉट टेकन

मुंबईतील गिरण्या बंद पडल्यावर त्या भूखंडांवर कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी गेले काही वर्षं सातत्याने मागणी केली जात आहे. म्हाडाचे भूखंड लहान असल्याने त्यावर मैदान किंवा घरे उभारणे शक्य नाही...

कौमार्य चाचणी?

कौमार्य चाचणी’ या अनिष्ट प्रथेची लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नुकतेच दिले, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार...

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

दिवाळखोरीची परिस्थिती ही जितकी कंपनीच्या मालकासाठी दुर्देवी तितकीच त्या कंपनीतील नोकरदारांसाठीही. कारण, शेवटी कंपनीबरोबर नोकरदारांचे भविष्यही टांगणीला लागते. ..

पांढऱ्या हत्तींचं करायचं काय?

नुकतीच एअर इंडिया कंपनीच्या विमानातील खाद्यपदार्थात चक्क झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना घडली. ..

अण्णांच्या अंगणाचा ‘राज’मार्ग

राजकारणात कधी, कोण, कोणाच्या गळ्यात हात घालून अगदी पळत सुटेल आणि कधी, कोण, कोणाच्या पायात पाय घालून त्याला जमिनीवर पाडेल, याचा नेम नाही. सध्या हेच चित्र देशात अगदी धडधडीतपणे दिसते. एकमेकांच्या सावलीलाही कधी उभ्या न राहणार्‍या सार्‍या मोदीविरोधकांनी आता हातात हात घातल्यामुळे त्यांना मनगटात ‘एकीचे बळ’ संचारल्याचे भ्रम होतात..

उंदीर-राजा आणि बालकथा...

‘राहुल गांधींना घाबरून मोदी सरकारने असा अर्थसंकल्प सादर केला’ : पृथ्वीबाबा उर्फ पृथ्वीराज चव्हाण साहेब (संदर्भ १- महाराष्ट्राचे कोणे एकेकाळचे मुख्यमंत्री, संदर्भ २- शरद पवार काकांनी ज्यांच्या हाताच्या लकव्यावर भाष्य केले होते ते, इतके संदर्भ पृथ्वीराज चव्हाणांच्या ओळखीसाठी पुरेच आहेत म्हणा.)..

आघाडीच्या जोडीला इंजिन ?

सध्या एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय ती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला राज्यात मनसेचं इंजिन खेचणार का?..

किवींचा दुहेरी पराभव

एकदा पुरुष संघाकडून तर, दुसरा महिला संघाकडून. एकीकडे भारतीय पुरुष संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने ही मालिका आपल्या खिशात घातली...

हा ‘चौकीदार’च खरा संरक्षक...

केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून सुशासन आणि पारदर्शक कारभाराचा नारा देण्यात आला. मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत आपला हा नारा खरा करून दाखवत भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासन दिले, हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. ..

महाराष्ट्रधर्म लांछीला काही, तुम्हां कारणे!

२०१४ मध्ये मोदींना त्यांनी मागितले नसताना उगाचच समर्थन देण्याचा आततायीपणा करून झाल्यानंतर लगेच पलटी खात मोदींचा तीव्र विरोध करणारे राज ठाकरे लोकांना खटकले होतेच. परंतु, परवा त्यांनी जे काही केले ते कुणालाच रूचले नाही...

राजकुमार शुद्धीत या

रा. स्व. संघप्रणित सेवाकार्य हे आधुनिक सेवातीर्थ आहे. अर्थात, कुणी निंदा कुणी वंदा अशा भावाने चालणारे हे सेवाकार्य प्रसिद्धीपासून दूरच आहे. त्यामुळे डोळेबिळे मारून प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकुमारांना या सेवाकार्याची माहिती नसावी..

राहुल गांधींना ‘अहमद’ मिळाला?

वेणुगोपाल यांनी गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आता अहमद पटेल तितके प्रभावी नसताना राहुल यांनी आपला स्वतःचा ‘अहमद’ वेणुगोपाल यांच्या रूपाने शोधल्याचे दिसत आहे. ..

सेवाकार्य ते आतंक

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर. ..

विराट एके विराट

आज भारताकडे एक असा खेळाडू आहे, ज्याने ते सारे पायंडे मोडून आपलं स्वत:चं अधिराज्य गाजवलंय. तो म्हणजे विराट कोहली. ..

मराठीच्या नावाने...

मराठीच्या नावाने.....

मान, मद्यपान आणि अभिमान

पुन्हा एकदा पक्षाने तिकीटरूपी आशीर्वाद द्यावा, यासाठी मग सगळा खटाटोप सुरू होता. आम आदमी पक्षाचे पंजाबचे खासदार भगवंत मानही याला अपवाद नाहीत...

सोंगाड्यापेक्षा सोमटे बरे!

पवार खानदानाने ५० वर्षे बारामतीमध्ये सत्तेची माती केल्यामुळे त्यांच्या मतीची गती मंद झाली आहे, असे वाटते. त्यामुळे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून अजितदादा म्हणाले, “हे कुठलं सोमटं आलंय.” आता सोमटं म्हणजे काय हे माहिती नाही...

संपाचे राजकारण नको

न्यायालयाने कर्मचारी आणि प्रशासन यांना चांगलेच सुनावल्यामुळे संप मागे घेण्यात आला. या संपामुळे कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या, पण या संपात राजकारणाने जास्त जोर धरला...

कुचिंतनाचा फ्लू

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. यावर एका प्रसिद्ध वेबपोर्टलच्या पत्रकाराने एक ट्विट केले. ‘स्वाईन फ्लूमुळे लोक मरतात, बरोबर ना?’ असे त्या पत्रकाराने नेमके आताच ट्विट करण्यामागचे कारण न समजायला लोक दुधखुळे नक्कीच नाहीत. ..

'तो' अजून संपलेला नाही...

खेळाडूने निवृत्ती घ्यावी, त्याचा काळ संपला, आता नव्या पिढीला संधी द्यावी, हे असले फुकटचे सल्ले क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी अजिबात नवीन नाही...

कानडी प्राणायाम...

महाराष्ट्राच्या शेजारी कर्नाटक राज्यात सध्या सत्तेचा कानडी प्राणायाम पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर वाजतगाजत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एच. डी. कुमारस्वामी यांना सध्या सरकार शाबूत राखतानाही पळता भुई थोडी झाली आहे...

एक पाऊल ऑलिम्पिकच्या दिशेने

पुढच्या वर्षी टोकियोमध्ये ऑलिम्पिकला सुरुवात होईल आणि भारताची तयारी याआधीच सुरू झाली आहे. भारतात खेळाडूंची कमी नाही, त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या या कच्च्या सोन्याला तळपणारे, झगझगीत सोने कसे करावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अगदी उत्तमरित्या ठाऊक होते आणि यात त्यांच्या या कार्याचा भार उचलला, तो क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आणि २०१८ पासून ‘खेलो इंडिया’ या युथ गेम्सची सुरुवात केली. ..

सप-बसप आघाडी आणि उतावळ्यांची लगीनघाई

लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या आणि त्यामुळे राजकीयदृष्ट्या भलत्याच वजनदार ठरणाऱ्या उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय समीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे...

विकास कोणाचा ?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने मुंबईकरांना विकासाची आश्वासने दिली होती, परंतु भूखंड घोटाळे समोर येत आहेत...

घाबराघाबरी आणि राहुल

राजकुमार राहुल गांधींना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. नोटीस यासाठी की राहुल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात म्हणून त्यांनी स्त्रीला पुढे केले आहे...

बीसीसीआयच्या नसत्या उठाठेवी

एकीकडे देशभरात निवडणुकांचा ज्वर चढायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे बीसीसीआयची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बीसीसीआयने आयपीएलचे सामने निवडणुकीतच होणार, असे घोषित केले आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. ..

चला संपावर...!

आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपाचं हत्यार उपसण्याशिवाय कामगारांकडे, युनियनकडे अन्य कोणताही उत्तम पर्याय नसतो. ..

पर्यायाची पर्याप्तताही पुसटच!

पप्पू आज जितका बदनाम आहे, तितकीच केजरीवालांची प्रतिमाही विश्वासार्ह नक्कीच नाही. त्यामुळे केवळ दिल्ली जिंकली, म्हणजे राष्ट्रीय निवडणुका खिशात घालता येतील, या भ्रमात केजरीवालांनी २०१९ मध्ये तर अजिबात राहू नये...

गज्वी आणि बिटविन द लाईन

साहित्य मानवी शाश्वत मूल्यांसाठीच नव्हे तर जीवसृष्टीच्या प्रत्येक हुंकाराच्या आविष्काराचा समर्थपणे आवाज होते, ज्या साहित्याला करुणा आणि जागृती या विशिष्ट चौकटीत न राहता वैश्विकतेचे परिमाण लाभते, ते चांगले साहित्य असे म्हणतात. ..

बॅनरबाजीला लगाम हवा

मुंबई शहर व उपनगरात बेकायदा फ्लेक्स, पोस्टर, बॅनर्स लावणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी २२७ प्रभागात प्रत्येकी एक पदनिर्देशित अधिकारी नेमावा, अशी मागणी नुकतीच भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केली आहे...

लबाड लांडगं ढ्वाँग करतंय...

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसावेत’ तसे सत्तेत आल्या आल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी, कमलनाथ यांनी देशाप्रती आपली नसलेली बांधिलकी दाखविण्यास सुरुवात केली. ..

इतिहासाची पुनरावृत्ती?

१९९६ पासून दोन उत्कृष्ट फलंदाज सुनील गावस्कर आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावाने भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये या कसोटी सामन्यांची सुरुवात झाली आणि हा अटीतटीचा सामना गेली २३ वर्षे सुरू आहे...

गर्भ भाड्याने देणे आहे!

काही जणांनी अक्षरश: सरोगसीचा बाजार मांडला. भारतातही होणाऱ्या सरोगसीच्या या बाजारीकरणामुळेच प्रामुख्याने सरोगसी कायद्याची गरज होती आणि त्यादृष्टीने याला आळा घालणारे सरोगसी विधेयक, २०१६ हे नुकतेच संसदेत पारित करण्यात आले. ..

दुर्लक्षाचे बळी

मुंबईमध्ये गेल्या साडेपाच वर्षांत तब्बल २ हजार, ७०४ इमारत दुर्घटनांमध्ये एकूण २३४ लोकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे...

वर्षाअखेर स्वप्नपूर्ती

जवळजवळ ३४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मैदानावर यजमानांना ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशीच हरवत विराटसेनेने वर्षाअखेर स्वप्नपूर्ती केली. ..

दौऱ्याची हौस कशासाठी?

दौऱ्याची हौस कशासाठी?..

तोडकीमोडकी युतीसम्राट

‘कोणी निवडणूक लढण्यासाठी जागा देतं का जागा?’ न जाणो, कित्येक वेळा लढून लढून या हरणाऱ्या पण जिंकण्यासाठी सारं काही धाब्यावर बसविणाऱ्या, सत्तेसाठी हपापलेल्या स्वयंघोषित नेत्याला आणि त्याच्या गल्लीबोळापुरत्या विस्तारलेल्या राजकीय पक्षाला कुणी निवडणूक लढण्यासाठी जागा देत का जागा? इति तोडकेमोडके युती सम्राट! ..

विश्वविक्रमवीर लष्कर

भारतीय सैन्याच्या अथक प्रयत्नाने टेक्निशियन टीम आणि पायलट यांच्या मिशनला जुलै महिन्यात पहिले यश मिळाले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला पुन्हा तळछावणीला आणण्यात आले...

कुमारांचे जीवे मारण्याचे आदेश

एका कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर हे कुमारस्वामी इतके संतापले की, त्यांनी चक्क फोनवरून त्या कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना जीवे मारण्याचे आदेशच देऊन टाकले. ..

सत्तालोभाची लक्षणे

‘राजकारण म्हणजे सत्ता असलेल्यांनी ती टिकवण्यासाठी व नसलेल्यांनी ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न’ अशी एक अगदीच प्रॅक्टिकल वगैरे म्हणावी, अशी व्याख्या आहे जी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाशी जुळणारी आहे...

मुंबईची मुक्तता

गेल्या दहा वर्षांत मुंबईमध्ये ४९ हजार वेळा आगीमुळे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. या ४९ हजार घटनांमध्ये १४ हजार, ३२९ घटनांची कारणं तत्सम होती...

दिव्यांगाबाबत असंवेदनशीलता

मुंबई महापालिकेतर्फे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना मॉल अथवा अन्य ठिकाणी सहलीसाठी नेण्यात येते. ..

वांगखेमचा फुटीरतावाद

त्या गटाचे सदासर्वकाळ एकच काम आहे की, कोणत्याही परिस्थितीत विविधतेमध्ये एकता मानणाऱ्या भारतीयांमध्ये समरस एकात्मता उत्पन्न होऊ नये. देशातील जनतेच्या मनात भारतीयत्व लोप पाऊन फुटीरतेचे बीज रुजावे...

अपमानाची पोळी, सर्वांग जाळी

पहिल्या सामन्यात अगदी काठावर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसर्‍या कसोटी सामन्यात पार भुईसपाटच झाला आणि चार सामन्यांच्या या मालिकेत आता भारत आणि ऑस्ट्रेलियाची बरोबरी झाली. पण, या सामन्याच्या पलीकडे..

तिहेरी तलाकला काँग्रेसचा विरोध का?

तिहेरी तलाक विधेयकाबाबतची काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका पाहिली की वाटते, यापेक्षा ते काही वेगळे करूच शकत नाहीत...

बरं झालं ‘दादा’ तुम्हीच बोललात!

विलासराव देशमुख, अशोक चव्हाणांपासून ते पृथ्वीराजबाबांपर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री आले अन् गेले, पण राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे काही ‘हाता’ने फिरवता आले नाहीत...

अवा चालली पंढरपुरा...

अयोध्येला महाआरती केल्यानंतर आता ते आणि त्यांचे अंमलदार वगैरे पंढरपुरामध्ये चंद्रभागेतिरी विठूरायासमोर महाआरती करणार आहेत...

सर्वांना शिस्तिचे धडे

मुंबई महानगरपालिकेच्या ४ हजार, ७८८ भूखंडांपैकी २ हजार, ३७७ मालमत्तांबाबत महापालिकेकडे कायदेशीर दस्तावेज असले तरी, त्या मालमत्ता पालिकेच्या नावावर नव्हत्या...

महाराष्ट्रातील अब्दुल्ले

पोर शेजाऱ्याचे, मात्र पेढे मीच वाटणार,’ अशा प्रवृत्तीची माणसं जगात सगळीकडेच असतात. पण, ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ म्हणत नाचणारे काही राजकारणी हे तद्दन स्वार्थी, ढोंगी आणि सत्तेसाठी लाचारच असतात, असेच म्हणावे लागेल. सध्या आपल्या महाराष्ट्रातही असे बरेच ‘अब्दुल्ला’ दिवाने झाले आहेत. ..

खरी कसोटी पर्थमध्ये

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाला खरं तर निसटत्या पराभवाची आणि विजयाची अशा दोन्हींची सवय झाली आहे. ..

नियम पाळू, अपघात टाळू

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्याच रोजच्या वापरातल्या गोष्टीबाबत धक्कादायक टिप्पणी केली. ..

चिरदाह वेदनेचा शाप...

महाराष्ट्रात भाजपप्रणित सरकार सत्तेत आल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपने एकामागोमाग एक निवडणूक जिंकण्याचा सपाटा लावला आहे. मग ती महापालिका असो वा नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक...

...तर मला जबाबदारी कोणाची ?

गेल्या पाच वर्षांमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तब्बल १५ हजार जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपेक्षा जास्त आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका समितीच्या अहवालावर नुकतेच नोंदविले आहे. मुंबईतील खड्ड्यांचीही तीच गत. रस्तेबांधणी आणि रस्तेदुरुस्तीसाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मात्र सुधारणा होताना दिसत नाही. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडतात, परंतु मुंबईच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे, झाकणरहित गटारे, मेनहोल, पालिकेचे ..

गृहकर्जाच्या निमित्ताने...

सध्या छोटंसं घर घेणंही सर्वांच्या आवाक्यात राहिलंय, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरेल. अनेक वर्षांची मेहनत, साठवलेला पैसा पदरी असूनही आज मोठ्या शहरांमध्ये घर घेणं सहजशक्य नाही. ..

‘गंभीर’ची निवृत्ती

२०११ चे विश्वचषक, मुंबईतील गच्च भरलेले वानखेडे मैदान... भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना... आधीच सेहवाग आणि सचिनची विकेट गेल्यानंतर हिरमुसलेले लाखो क्रिकेटप्रेमी... पण, त्यानंतर बंद झालेले टीव्ही पुन्हा सुरू झाले ते, गौतम गंभीरमुळेच...

असंगाशी संग, प्राणांशी गाठ

’असंगाशी संग आणि प्राणांशी गाठ,’ अशी एक छान म्हण मराठीत प्रचलित आहे. ही म्हण आत्ता सुचण्याचं खरं तर काहीच कारण नाही...

चहा एवढा कडू का लागतोय?

मोदींचे आई-बाप काढणे, चहावाला म्हणून त्यांची सतत निंदा करणे यांसारख्या गोष्टी मतदारांनाही रुचणाऱ्या नाहीत...

मोकळ्या जागांचा कोंडलेला श्वास

मोकळ्या जागा विकासकांच्या घशात घालण्याचा डाव रचला जातोय...

नरेंद्र मोदींची जहागिरी

“मोदीजी, भारत हा काही तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची जहागीर नाही.” चंद्रशेखर राव यांच्या या विधानावरून खूप वादंग उठले. ..

वाद चव्हाट्यावर कशाला?

दोन दशकं खेळाचे मैदान गाजवून, पुरुष खेळाडूंना टक्कर वगैरे देत, आपलं स्थान कायम ठेवणाऱ्या मितालीची कारकीर्द संपविण्याचा रचला जाणारा डाव हे माध्यमांनी रंगवलेलं स्वरूप, यामुळे महिला संघातील समीकरणं बदलतायत...

मौनीबाबांचे फुकाचे सल्ले

मनमोहन सिंगांनी नरेंद्र मोदींना, “पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा,” असा न मागितलेला सल्ला दिला. मनमोहन सिंगांचे अर्थशास्त्रातले ज्ञान आणि अर्थमंत्री असतानाचे कर्तृत्व नक्कीच वादातीत आहे. पण, पंतप्रधानपदी येताच मनमोहन सिंगांनी आपले ज्ञान आणि कर्तृत्व सोनियांच्या पदरी गहाण टाकले...

जब मिल बैठेंगे तीन यार...

पोपटपंची करून डाव्यांच्या संविधान बचाव यात्रांच्या नावाखाली अस्तित्व प्रदर्शनाची धडपड सुरू असते. ..

पिढीजात गुलामगिरीचा शाप!

आज यांचा पक्ष इतका रसातळाला गेला असतानाही, या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. पक्ष अपयशी का ठरतो आहे, याचं उत्तर या मानसिकतेत दडलेलं आहे...

मनसेचा गाशा गुंडाळणार

शिवसेनेतून वेगळे झाल्यानंतर ९ मार्च, २००६ मध्ये राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या नावावर मनसे नावाची नवी चूल मांडली. त्यानंतर २००७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले. तद्नंतर शिवसेनेने २००९ साली रेल्वे भरती परिक्षेवेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले...

महामुंबईसाठी ‘माईलस्टोन’

मुंबईच्या अवतीभोवती, मुंबईला केंद्रस्थानी मानून ही शहरे वाढत गेली. मुंबईत आणि आता ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतही घर घेणे न परवडणारे...

पाकचे स्वप्नभंग

राजकीय अस्थिरता, आर्थिक कोंडी आणि दहशतवादी कुरघोड्या यामुळे चहूबाजूंनी स्वतःवर संकट ओढवल्यानंतरही भारताकडे सदैव अपेक्षेने पाहायची पाकची सवय काही केल्या जात नाही...

धर्मांतराचा बालमहोत्सव

बालदिनाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माचा प्रसार-प्रचार आणि सरळसरळ धर्मांतराचा कावा आहे. या महोत्सवामध्ये मुलांकडून चित्रं काढून घेण्यात आली. त्यापैकी एक चित्र म्हणजे हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या ओमवर फुली, तर ख्रिश्चन धर्माच्या क्रूसवर बरोबरचे चिन्ह...

‘ठग्ज ऑफ काँग्रेस’

अनेक वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर सत्तेपासून दुरावलेल्या नेतेमंडळींवर कशी नामुष्की ओढवते, हे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांतच्या बेताल वागणुकीवरुन दिसून येतेच. आगामी काही महिन्यांतच लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजतील. ..

पुतना ममतामावशी

ममता बॅनर्जींचे ‘मी, सत्ता, स्वार्थ’चे राजकारण सुरू असतानाच त्यांच्या नगरसेवकाने मात्र त्यांच्यावर ‘माँ’ नावाचा लघुपट बनवावा आणि कोलकात्यामध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तो लघुपट दाखवला जावा, हे काही नैसर्गिक नाही. ..

...तर पाणीकपात टळली असती

गेल्या महिन्याभरापासून मुंबई शहरातील विविध भागात पालिकेकडून पाणीकपात सुरु करण्यात आली. त्याविरोधात पालिकेत नगरसेवकांनी आवाजही उठवला होता...

लबाड सर्जनशीलतेचा निषेध

मला तर नेहमी वाटत असते की, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग, शशी थरूर इथे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, संजय राऊत म्हणजे अर्थोअर्थी उद्धव ठाकरे हे सगळे जण एकमेकांच्या स्पर्धेतच आहेत. दररोज या सगळ्यांची नवीन नवीन मुक्ताफळे वाचून चांगलीच करमणूक होते. ..

कोण संपत्ती? कोण आपत्ती?

भाजपला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणणाऱ्या शरद पवारांनी एका प्रश्नाचे उत्तर नक्कीच द्यावे. भाजप जर राष्ट्रीय आपत्ती असेल तर खुद्द शरद पवार आणि ते ज्यांच्या गळ्यात गळे घालून इच्छितात ते राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, देवेगौडा वा चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, सीताराम येच्युरी ही मंडळी वा त्यांचे पक्ष काय ‘राष्ट्रीय संपत्ती’ आहेत?..

याहून भीषण अन्याय कोणता?

पंधरा मिनिटे पोलीस बाजूला हटवा, मग या देशात हिंदूंची काय अवस्था होते ते पाहू.” मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन अर्थात ‘एमआयएम’ या पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे हे एका जाहीर सभेतील उद्गार...

सरदार के दर पर...

२०१७ मध्ये ५.२ कोटी पर्यटकांनी भेट दिलेल्या गुजरातमध्ये आगामी काळात पर्यटकांची संख्या आणखीन वाढेल, यात शंका नाहीच. त्याचा साहजिकच मोठा सकारात्मक आर्थिक परिणाम रोजगाराच्या संधी आणि स्थानिकांचे राहणीमान उंचावण्यावर होईल..

कौरची ‘अ’शक्य खेळी

सर्वोच्च न्यायालयाने या दिवाळीत फटाक्यांवर बंधने घातली. त्यामुळे हिरमुसलेले सगळे अखेर भारतीय क्रिकेटच्या मैदानावरील आतशबाजीकडेच डोळे लावून बसले होते. कारण, क्रिकेटप्रेमींसाठी ही दिवाळीची सुट्टी खरी आनंददायी होती. ..

हिटलर, फाशी वगैरे...

‘तुका म्हणे ऐसा नरा मोजुनी माराव्या पैजारा’ या अभंगपंक्ती ज्यांच्यासाठी एकदम चपखल बसतात, अशांच्या मनात नेहमी विचार सुरू असतो....

पोपटांचा विचार व्हावा!

काही लोकांना नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती वाटते. या सहानुभूतीसाठी ते कारण देतात की, ‘नक्षलीही माणसेच आहेत.’ यावर मग प्रश्न निर्माण होतो, हिंसेमध्ये मरणारी माणसं नाहीत का? ..

किती सांगू, मी सांगू कुणाला...

महाराष्ट्रातील ढाण्या वाघांचा आणि शूरवीर मर्द मावळ्यांचा वगैरे पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांची सध्या बहुधा ही अशीच अवस्था झालेली दिसते. इतक्या व्यथा, इतकी दुःखं की, ती कुणाला सांगावित आणि किती सांगावित, यालाही काही सुमार राहिलेला दिसत नाही...

‘देवबंद’ सांगते नेलपॉलिश बंद

सौंदर्य हा स्त्रीचा दागिना. त्यात मेकअप, नेलपॉलिशसारखे प्रकार या सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी अगदी सामान्यपणे महिलांकडून वापरले जातात. त्यात गैर, कोणत्याही धर्माचा अपमान करणारे काही नाही..

काँग्रेसचे घंटावादन

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा. नाव जनसंघर्ष. पण या यात्रेत लोकांपेक्षा जास्त उपस्थिती होती, ती काँग्रेसच्या आजी-माजी नेतेमंडळींची. या नेत्यांच्या पाठीपुढे फिरत असणाऱ्या त्याच त्याच लोकांची...

नक्षल्यांची नोटबदली

क्रांतीचे, गोरगरीबांच्या हिताचे नाव घेऊन स्वतःच्या जीवनधारेला सत्तासधन कसे बनवावे, यामध्ये नंबर एक क्रमांकावर कोण असतील तर ते नक्षलवादी. हे लोक कामधंदे तर काही करत नाहीत. गाववाल्यांना शस्त्राच्या बळावर घाबरवून, त्यांच्याकडून बळजबरीने पैसे वसुलायचे, तिथल्या उद्योजकांना, व्यावसायिकांना इतकेच काय सरकारी विकासकाम करणार्‍या कंत्राटदारांकडूनही हप्ता बांधायचा, हे त्यांचे आर्थिक स्रोत. अर्थात, हप्ते गोळा करण्याची हद्द गावापुरतीच मर्यादित राहत नाही, ही गोष्ट अलहिदा...

‘शशी’ची काँग्रेसी शीळ...

सरदार वल्लभभाई पटेलांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आणि पुरोगाम्यांसह काँग्रेसींना पोटदुखी अगदी असह्य झाली. ..

धोनीशिवाय सारंच कठीण...

बदल हा काळाचा नियम आहे, असं म्हणतात. पण, बदल हा इतर अनेक घटकांवर अवलंबून असतो. असाच काहीसा खेळ सुरू आहे भारतीय क्रिकेट संघात...

हक्काची जमीन, हक्काचे घर...

राजस्थानमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, राज्यात निवडणुका घोषित होण्याआधीच मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी एक असा निर्णय घेतला, जो कोणत्याही प्रकारच्या मानवाधिकाराच्या दृष्टीने केवळ प्रशंसनीयच नव्हे, तर अनुकरणीय ठरू शकेल...

हे वंचितांमध्ये येत नाहीत का?

स्वयंघोषित वंचित शोषितांच्या नेत्यांना सफाई कामगारांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यांच्या एकाही आंदोलनात या सफाई कर्मचाऱ्यांचे जगणे मानवयोनीत येण्यासाठी ठोस, असे काही नसते...

आरम्भ है प्रचण्ड !

भाजयुमोची निर्मिती ही जनसंघाच्या काळातच, १९७८ मध्ये झाली. त्यानंतर जसजसा पक्ष वाढत गेला तसा भाजयुमोही वाढत गेला. कलराज मिश्रा, प्रमोद महाजन, राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान अशा दिग्गजांनी एकेकाळी भाजयुमोचं नेतृत्व केलं...

पुढचा पंतप्रधान मीच ठरवणार!

लोकांना असे खो देण्यात माझ्यासारखा तरबेज मीच. कबड्डी कबड्डी मी पुटपुटत पण नाही पण माझ्या पकडीतून कोणी महाराष्ट्रातून दिल्लीच्या रेषेत गेला तर त्याला तिथून परत आणण्याचा खेळकर्तब माझ्याकडे आहे...

पवारांची मैदानाबाहेर ’खेळी’

गेली बारा वर्षे खो-खो असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता पुतण्यालाही काकांप्रमाणे वेध लागले ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे. आता हा फक्त खुर्चीचा प्रश्न असावा, असे वाटणार्‍या अनेकांना खरे ठरवित अजित पवारांनी चार दिवसांत सगळे खेळ बदलले...

भविष्य सांगण्याचा धंदा

भविष्य सांगण्याच्या व्यवसायात प्रसिद्धी आणि पैसाही असल्याने शरद पवारांनी नुकतेच, २०१९ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी सत्तेत येणार नसल्याचे भाकीत केले. खरे म्हणजे ज्यांना स्वतःच्या राजकीय भविष्याचाच अगदी काँग्रेसची शकले होण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करेपर्यंत आणि नंतरही वेध घेता आला नाही, त्यांनी अन्य कोणाचे भविष्य वर्तवणे म्हणजे मोठा विनोदच...

मी टू = मिटून गेलेले

२०१४ सालच्या जबरदस्त सत्तापालटात बऱ्याच स्वयंघोषित नेत्यांची आणि राजकीय पक्षांची चळवळ म्हणा किंवा वळवळ म्हणा मिटून गेली. आता २०१९ जवळ येऊ लागले आहे. त्यामुळे हे मिटू लागलेले स्वयंघोषित नेते, राजकीय पक्ष हे स्वतःच्या वकूबाप्रमाणे मिटू मिटू करत आहेत...

आजकल पाँव जमीं पर...

मध्य प्रदेश-छत्तीसगढमध्ये गोंडवाना पक्षाने काँग्रेसला चांगला धक्का दिला. दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युतीचा प्रश्नच नाही, असं सांगत पक्षप्रमुख हिरासिंह मरकाम यांनी काँग्रेसला अक्षरशः झटकून टाकलं...

उशिरा सुचलेलं शहाणपण...

कर्नाटकातील काँग्रेस नेते व मंत्री डी. के. शिवकुमार या महाशयांना आपल्या आणि आपल्या पक्षाच्या कर्माची फळं बहुधा डोळ्यासमोर दिसू लागली आहेत, म्हणूनच ते आता पश्चात्तापाची भावना व्यक्त करत आहेत...

मनपाचे सामाजिक दायित्व

शहराचे पालकत्व घेणे आणि निराधारांना साथ देणे हे कार्य करून नाशिक महानगरपालिका आपले सामाजिक दायित्व निभावत आहे. दोन्ही वर्ष मिळून सव्वा दोन कोटी वृक्षांची लागवड झाली होती. त्यापैकी दीड कोटी म्हणजेच ७४.९६ टक्के वृक्ष जगले आहेत...

पालिकेच्या वाहनांवर ‘वॉच’

मुंबई महापालिका ही देशातील श्रीमंत महापालिका. परंतु, पालिकेच्या कामकाजाच्या जुन्या पद्धतीमुळे कामात दिरंगाई होत होती. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता. आता मात्र मुंबई महापालिकेने आधुनिक धोरणाची कास धरली आहे...