ठाणे

ध्येयाच्या दिशेने झपाटल्यासारखे चालत रहा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणत असत की, प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी जे ध्येय निश्चित केले आहे त्या ध्येयाच्या दिशेने झपाटले सारखे चालत रहा. युवकांच्या हातात ताकद आहे. त्यांच्यातील बुध्दिमतेमुळे देशाचे सामर्थ्य वाढू शकते. विद्यार्थ्यांतून प्राध्यापक शास्त्रज्ञ देशाला प्राप्त होऊ शकतात. देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न विद्यार्थी पुर्ण करु शकतात असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात केले.

पुढे वाचा

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांंची किन्हवली दवाखान्यास भेट

शहापूर तालुक्यातील किन्हवलीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील नाविन्यपूर्ण दिशादर्शक प्रकल्प व राज्यातील पहिल्या शेतकरी वाचनालयाने प्रकाशझोतात आणले आहे. याच पार्श्र्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाचे ठाणे व पालघर जिल्हा उपायुक्त डॉ. रायकवार व जिल्हा कृत्रिमरेतन अधिकारी डॉ.कावळे यांनी विशेष तपासणीच्या निमित्ताने पशुवैद्यकीय दवाखाना किन्हवली येथे भेट दिली.या भेटीत त्यांनी संस्थेने राबविलेल्या गांडूळ खत प्रकल्प, चारा बाग, देशी गायीचे जीवामृताने तयार केलेली फुलबाग, वेलवर्गीय भाजीपाला व शेतकरी वाचनालयाची पाहणी केली.

पुढे वाचा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकण विकास मंचाचे आमरण उपोषण

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन करुन पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करणे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विद्यमान दोन संचालकांचे निधन झाल्याने रिक्त पदांची निवडणूक घ्यावी, अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, मनोर-वाडा-भिवंडीरस्त्याच्या अपूर्ण व निकृष्ट कामाची चौकशी करावी, चिंचोटी-कामण-अंजूर-माणकोली या निकृष्ट कामातील भ्रष्टाचाराबाचीचौकशी करावी तसेच लवकरात लवकर ठाणे-पालघर जिह्यातील जनतेचे प्रश

पुढे वाचा