क्रीडा

पाकिस्तानचा मैदानात व सोशल मीडियावर देखील धुव्वा

भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला 8 विकेटनी धूळ चारत सलग दुसरा विजय नोंदविला..

भुवीचा डबल धमाका; पाकचे सलामीवीर तंबूत

फखर जमान शून्यावर तर इमाम-उल-हक दोन धावा करून बाद झाला. दोन्ही संघामधील हा १३० वा एकदिवसीय सामना असणार..

हाँगकाँगला लोळवले, आज पाकिस्तानची बारी

गेल्यावर्षी १८ जून २०१७ रोजी भारत-पाक यांच्यात अखेरची लढत झाली होती. यामध्ये भारतीय संघाला १८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता..

अर्जुन पुरस्कार; यांच्या नावाची शिफारस

रि.जस्टिस इंदरमीत कौल कोचर यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने २० अर्जुन पुरस्कारांसाठी २० जणांची नावे क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली..

खेलरत्न पुरस्कारासाठी 'यांची' शिफारस

निवड समितीने या शिफारसी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे पाठवल्या आहेत...

...म्हणून मी कर्णधारपद सोडले: धोनी

विराट कोहलीला २०१९ विश्वचषकासाठी तयार करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा नुकताच त्याने रांचीत एका कार्यक्रमात केला...

मेरी कॉम आणि सरिता देवी यांचे पदक निश्चित

भारताकडून खेळणाऱ्या सरिता देवी व मेरी कोम यांनी पोलंडमधील सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीमध्ये धडक मारून आपले पदक निश्चित केले आहे...

...तरीही भारतीय संघ नंबर वन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने ४-१ असा पराभव जरी स्वीकारला असला तरीही गुणतालिकेत अजून पहिल्या क्रमांकावरच राहील. ..

तेलगू टायटन्सच्या माजी खेळाडूचे निधन

तेलगू टायटन्सचे माजी खेळाडू एस. महालिंगम याचा ९ सप्टेंबरला दुपारी अपघाती मृत्यू झाला. तो अवघ्या २७ वर्ष्याच्या होता...

इशांत शर्मा मोडणार 'यांचा' विक्रम

दोन्ही संघानी पाचव्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अनेक विक्रम नोंदवले आहेत. यामध्ये भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माने कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली..

भारताच्या खात्यामध्ये तिन्ही पदक

भारतीय नेमबाजांनी व्यक्तिगत स्पर्धेत रौप्य आणि कांस्य जिंकले ..

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड करणार का?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली...

भारताचा युवा नेमबाज ह्रदयचा सुवर्णवेध

भारताने आतापर्यंत १८ पदकांची कमाई केली असून कोरिया नंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे. यात ६ सुवर्ण, ७ रौप्य तर ५ कांस्य पदकांचा समावेश आहे...

हेप्टाथलॉनमध्ये भारताचे सुवर्णपदक 'स्वप्न' पूर्ण

हाय जम्प, लॉंग जम्प, शॉट पुट, १०० मी, २०० आणि ८०० मी स्पर्धेमध्ये आपल्या चमकदार खेळीचे प्रदर्शन करत २१ वर्षीय स्वप्नाने एकूण ६ हजार २६ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले...

सुवर्णपदकासाठी मनजीतला कारावा लागला ‘हा’ त्याग

गेल्या काही महिन्यांपासून मनजीत आशियाई स्पर्धेसाठी मेहनत घेत होता. या दरम्यान मनजीतला त्याच्या मुलाच्या जन्माच्यावेळी उपस्थित राहता आले नाही...

धावपटू मनजीत सिंहला सुवर्णपदक

आशियाई स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय धावपटूंनी दोन पदके जिकली आहेत...

आशियाई क्रीडा स्पर्धेत सिंधूची ऐतिहासिक कामगिरी!

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य मिळवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. ..

सिंधूने रचला आणखी एक इतिहास

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला एकेरीच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय खेळाडूने धडक घेतली आहे. त्यामुळे सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी सध्या सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. ..

आशियाई क्रीडा स्पर्धेत सायना नेहवालला कांस्यपदक

पहिल्या सेटमध्ये यिंगने २१-१७ अशा गुणांनी सायनाचा पराभव केला. ..

तेजिंदर पाल सिंहमुळे भारताला सातवे सुवर्ण पदक

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जोडल्या गेलं आहे. गोळा फेक स्पर्धेत त्याने २०.७५ मीटर गोळाफेक करत एक विक्रम रचला आणि भारताला सातवे सुवर्ण पदक मिळवून दिले. यासोबतच भारताला २९ पदक मिळाले आहेत. ज्यामध्ये ७ सुवर्ण, ५ रजत आणइ १७ कांस्य पदकांचा समावेश आहे...

भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा

येथे चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आजच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळी करत दोन सुवर्णपदक तर तीन कांस्यपदकाची कमाई केली आहे. ..

...अखेर भारतीय संघाने कसोटी विजय मिळवला!

नॉटिंघममधील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे...

२५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेत राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले आहे. २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिने ही कामगिरी केली आहे...

हरवलेला सूर 'गब्बर' कधी शोधणार?

भारताचा धडाक्याचा सलामीवीर शिखर धवन देखील या पत्त्यांच्या बंगल्याचा भाग बनला आहे. गब्बर म्हणून ओळख असलेला शिखर कमी चेंडूत अधिक धावा करण्यात पटाईत आहे. मात्र आतापर्यंतच्या या दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याला सूर गवसलेला दिसत नाही, तो अजूनपर्यंत आपल्या कामगिरीला साजेशी खेळी करू शकला नाही...

आशियाई स्पर्धा : संजीव राजपूत याला रौप्य पदक

नेमबाज संजीव राजपूत याने आज ५० मीटर पोझिशन ३ यामध्ये रौप्य पदक पटकाविले आहे. भारताच्या खात्यात आता रौप्य पदकांची संख्या ३ झाली आहे. ..

सौरभ चौधरीने दिले भारताला आणखी एक सुवर्णपदक

आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. नेमबाज सौरभ चौधरीने ही सुवर्ण कामगिरी केली आहे...

इंग्लंड वि. भारत : विराटने पुन्हा एकदा ठरवले मीच ‘बेस्ट’

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली याचे झुंजार शतक थांबायला काही नाव घेत नाही आहे...

आशियाई स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्णपदक!

आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी विनेश फोगाट ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे...

आशियाई स्पर्धेत दिपक कुमारला रौप्यपदक

१० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये नेमबाज दिपक कुमारने रौप्य पदक मिळवले आहे...

आशियाई स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण पदक

भारताचे खेळाडू सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावत आहेत. आशियायी खेळामंध्ये काल नेमबाजीत कांस्य पदक जिंकल्यानतर आता भारताचा कुश्तीपटू बजरंग पुनिया याने सुवर्ण पदक जिंकत भारताचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले आहे. ६५ किलोग्राम वजन गटात फ्रीस्टाइल कुश्ती प्रकारात त्याने जापानच्या ताकातानी दाईची याला ११-८ अशा फरकाने मात देत विजय मिळवला...

एशियन गेम्स : अपूर्वी चंदेला आणि रविची अपूर्व कामगिरी

मेक्सिको येथे सुरु असलेल्या एशियन्स गेम्स मध्ये भारताने आपले खाते उघडले असून अपूर्वी चंदेला आणि रवि कुमार यांनी नेमबाजीत पहिले पदक जिंकले आहे. १० मीटर एयर राइफल मिश्र गटात अपूर्वी आणि रवि यांनी अपूर्व अशी कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं आहे...

१८ व्या आशियाई खेळांना आजपासून सुरुवात

१८ व्या आशियाई खेळांना आजपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी इंडोनेशियामध्ये हे खेळ खेळले जाणार आहेत. यावर्षी भारताचे सगळ्यात मोठे दल इंडोनेशियाला १८ व्या आशियाई खेळासाठी पाठवण्यात आले आहे...

विराटने गमावले कसोटीतले अव्वल स्थान

क्रिकेटपटू विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामान्याबरोबरच आपले अव्वल स्थान गमावले आहे ..

ध्यानचंद पुरस्कार विजेते हकम सिंह भट्टल यांचे निधन

एशियन चॅम्पियनशिप विजेते आणि ध्यानचंद पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेले प्रसिद्ध हॉकीपटू हकम सिंह भट्टल यांचे आज सिंगरुर येथील एका रुग्णालयात निधन झाले. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती...

फुटबॉल स्पर्धा : भारतीय खेळाडूंचे चांगले प्रदर्शन

स्पेनमध्ये सुरु असलेल्या कोटिफ कप फुटबॉल स्पर्धा यामध्ये भारताच्या २० वर्षांखालील मुलांनी चांगली कामगिरी करून दाखविली आहे. ..

रुपेरी सिंधूचं 'सुवर्णा'च स्वप्न भंग

खेळाच्या सुरुवातीपासून सिंधूने आपल्या नेहमीच्या आक्रमक खेळीचा वापर करत पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली होती. ..

कोहली इज 'बेस्ट'

इंग्लंडविरोधातील आपल्या शतकी खेळीमुळे विराटच्या खात्यात सध्या ९३४ गुण जमा झाले असून सचिन तेंडूलकरनंतर कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान गाठणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ..

बॅडमिंटन चॅम्पियनशिप : सिंधूची उपांत्य फेरी धडक

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने चीनमध्ये सुरु असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मागच्या वर्षीच्या पराभवाचा बदल घेत सिंधूने जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला मोठ्या गुण फरकाने पराभूत करत बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपली जागा कायम केली आहे. ..

कोहलीने इंग्लंडकडून वसूल केला लगान, धुवाधार शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे कालपासून सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने सामना आपल्या हातातून गमावला असला तरी देखील या सामन्यात कर्णधार विराट कोहली याने धुवाधार शतक करत इंग्लंडकडून लगान वसूल केला. ..

हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार सामना

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा लंडन येथे सुरु असून उपांत्यपूर्व फेरीत आजचा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार असून दुसरा सामना नेदरलँड्स आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे...

महिला हॉकी विश्वचषक : महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारतीय महिला संघाने महिला हॉकी विश्वचषक २०१८ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. काल इटलीसोबत भारताचा मुकाबला झाला..

आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणार कसोटी सामना

आजपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांचा कसोटी सामना खेळला जाणार आहे...

हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारतीय संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारताने अमेरिकेला १-१ अशा समान गोलवर रेटून धरले असून यामुळे भारताने आता प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे...

मुष्टियोद्धा स्पर्धेत दीपक पुनियाने मिळविले सुवर्ण

नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आशियाई ज्युनिअर मुष्टियोद्धा स्पर्धेत भारताचे मुष्टियोद्धा यांनी सुवर्ण कामगिरी करत भारताला तीन सुवर्ण पदक मिळवून दिले आहे...

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा आजपासून लंडन येथे सुरु

आजपासून महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा लंडन येथे सुरु होत असून पहिला सामना भारत आणि इंग्लन यांच्यात खेळवला जाणार आहे...

एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव

इंग्लंडचा जो रूट आणि इओन मोर्गन यांच्या अनुक्रमे शतकी आणि अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने दिलेल्या २५७ धावांचे आव्हान इंग्लंडने लीलया पार केले आहे...

भारताने ठेवले इंग्लंडपुढे २५७ धावांचे आव्हान

लंडनमधील हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारताने ५० षटकांत ८ गडी गमावत २५६ धावांपर्यंत मजल मारली आहे...

भारतीय महिला क्रिकेट संघाला आता नवे प्रशिक्षक

बीसीसीआयकडून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अंतरीम प्रशिक्षकपदी भारतीय संघातील माजी फिरकीपटू रमेश पोवारची नेमणूक करण्यात आली आहे. ..

फिफा २०१८ : अंतिम सामन्यात फ्रान्सचा रोमहर्षक विजय

५९ व्या आणि ६५ व्या मिनिटाला फ्रान्सने लागोपाठ दोन करत, आपला विजय निश्चित केला...

फिफा विश्वचषक २०१८ : फ्रान्स वि. क्रोएशिया रोमहर्षक सामना

आतापर्यत फ्रान्सने दोन गोल करून सामन्यात आघाडी घेतली आहे...

हिमा दास : 'धान'च्या शेताने दिले देशाला नवीन 'धन'

नशीब ज्यांना सगळ्या सुख सुविधा देतं, त्यांच्या जिंकण्याची आपण अपेक्षा करतोच मात्र शेती आणि शेतकरी सारख्या पार्श्वभूमीतून आलेल्या कन्या जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव मोठे करतात, त्यावेळी हा आनंद द्विगुणित होतो. हिमा दास या कन्यारत्नांपैकीच एक आहे. फिनलँड येथील टेम्पेयर शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या अंडर - २० एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हिमा दासने प्रथम क्रमांक पटकावत या खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे...

भारताच्या हिमा दासची अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

विश्व ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या हिमा दासने २० वर्षाखालील मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर ट्रॅकसाठी सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली आहे...

एकदिवसीय मालिकेत भारताची १-० ने आघाडी

भारताचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा याच्या नाबाद १३७ धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने दिलेले २६८ धावांचे आव्हान भारतीय संघाने लीलया पार केले आहे...

भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात

नॉटिंगहॅममधील ट्रेन्ट ब्रिज मैदानावर आज या मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. ..

फिफा विश्वचषक : फ्रांसची अंतिम फेरीत धडक

फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रांसने धडक मारली आहे. बेल्जियमला १-० अशा केवळ एका फरकाने मागे टाकत फ्रांसने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले आहे...

वर्ल्ड जिम्नॅस्टिक्स चॅलेंजमध्ये दीपाची 'सुवर्ण' कामगिरी

विशेष म्हणजे दुखापतीमुळे तब्बल दोन वर्षांच्या अंतरानंतर तिने पुन्हा एकदा स्पर्धेत पुनरागमन केले असून पहिल्याच प्रयत्नात तिने सुवर्णपदक मिळवले आहे. ..

Happy Birthday M.S. Dhoni : सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सगळ्यांचा आवडता क्रिकेटर ‘माही’ अर्थात एम.एस.धोनी याचा आज ३७ वा वाढदिवस आहे...

इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधु आणि प्रणव उपांत्यपूर्व फेरीत दाखल

सिंधूने ओहोरीचा अवघ्या दोन सेटमध्ये २१-१७, आणि २१-१४ अशा गुणांनी पराभव केला..

टी-२० मालिकेमध्ये भारताच्या पहिला विजय

इंग्लंड संघाने २० षटकांमध्ये दिलेले ८ बाद १६० धावांचे आव्हान भारतीय संघाने ८ गडी राखून अवघ्या १८.२ षटकांमध्येच पूर्ण केले आहे. या विजयासह या मालिकेमध्ये भारतीय संघाने १-० अशा गुणांनी आघाडी घेतली आहे. ..

फिफा विश्चचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील आणि बेल्जियमची धडक

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज ब्राझील आणि बेल्जियमने देखील धडक मारली आहे...

भारत-इंग्लंड क्रिकेट मालिकांना आजपासून सुरुवात

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांच्या मालिकांना आजपासून सुरुवात होणार आहे. ..

फिफा विश्चचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत रशिया आणि क्रोएशियाची धडक

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल रशिया आणि क्रोएशियाने धडक मारली आहे...

मलेशिया खुली बॅटमिंटन स्पर्धा : सिंधू आणि श्रीकांत यांची मजल

मलेशिया येथे सुरु असलेल्या खुल्या बॅटमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे स्टार बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि श्रीकांत किदंबी यांनी मजल मारली आहे. ..

फिफा विश्वचषक स्पर्धेत आज खेळले जाणार चार सामने

फिफा विश्वचषक स्पर्धेत आज तब्बल एकामागून एक चार सामने खेळले जाणार आहे. ..

भारताच्या दिपिका कुमारीचा 'सुवर्णवेध'

सॉल्टलेक सिटी येथे होत असलेल्या यूएसए तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (USA Archery World Cup) भारताच्या दिपिका कुमारीने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे...

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची अर्जेंटिनावर मात

हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग या दोघांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने हा विजय मिळवला असून ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली आहे. ..

१ डाव २६२ धावांनी अफगाणिस्तानवर भारताचा विजय

कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने अफगाणिस्तानवर आज १ डाव २६२ धावांनी विजय मिळवला आहे...

फीफा विश्वचषकातील दुसऱ्या दिवशी होणार तीन सामने

रशिया येथे सुरु असलेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत आज तीन सामने खेळले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात 'अ' समूहात उरुग्वे आणि इजिप्ट यांच्यात लढत होईल. इजिप्टचा संघ तब्बल २८ वर्षांनंतर फीफा मध्ये खेळणार आहे, त्यामुळे हा सामना महत्वाचा ठरेल. मात्र दुखापत झाल्यामुळे संघातील प्रमुख खेळाडू मोहम्मद सालाह याच्या खेळण्याविषयी अजूनही खात्री नाहीये...

वीरेंद्र सेहवागमुळे सिहोरची ही 'सुपरवुमन' झाली प्रसिद्ध

अनेकदा आपल्यासमोर अनेक असे व्हिडियोज येतात ज्यामुळे आपल्याला या न त्या रुपाने काहीतरी प्रेरणा मिळते. काही व्हिडियोज फेक म्हणजेच खोटेही असतात. मात्र काही सामान्यातील सामान्य लोकांचे खरे व्हिडियोज आपल्याला नक्कीच प्रेरित करतात. असाच एक व्हिडियो प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या सिहोर येथील एक महिला टाईपरायटरवर अनन्य साधारण गतीने टाईप करताना दिसतेय. कौतुकाची बाब म्हणजे ही महिला ७२ वर्षांची आहे. आणि या वयात देखील तिने तिचे कृत्व सिद्ध ..

भारत-अफगाण कसोटी : भारताचा पहिला डाव ४७४ धावांवर संपुष्टात

आज सकाळी भारताने ६ बाद ३४७ धावांवर आपल्या दुसऱ्या दिवशीच्या खेळला सुरुवात केली होती...

बंगळूरू कसोटी सामना : मुरली विजयचे दमदार शतक

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याला आज बेंगळूरू येथे सुरुवात झाली असून या सामन्यात क्रिकेटपटू मुरली विजयने दमदार शतक ठोकले आहे...

भारत-अफगाणिस्तानमधील कसोटी सामन्याला सुरुवात

भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानात उतरला आहे. ..

स्वाती बोरा हिला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

भारताची महिला मुष्टियोद्धा स्वाती बोरा हिने रशियामध्ये सुरु असलेल्या उमाखानोव मेमोरियल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. ..

इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकावर 'भारता'चे नाव

खेळाच्या सुरुवातील पहिल्या ८ व्या मिनिटाला छेत्रीने पहिला गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली व त्यानंतर २९ व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताला निर्णय आघाडी मिळवून देत, संघाचा विजय साजरा केला...

आशिया महिला चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत

भारतीय महिला संघाला यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. २००४ मध्ये ही स्पर्धा सुरु झाल्यापासून भारतीय संघाने प्रत्येक वेळी या चषकावर आपले नाव कोरलेले आहे. ..

पाकिस्तानला नमवून महिला संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश

क्वालालंपूर येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध भारत या महिला संघाच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानला नमवून आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात मजल मारली आहे...

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत राफेल नदालची धडक

क्रमांक एकचा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ..

हरियाणा सरकारच्या नवीन निर्णयावर बबीता फोगाट नाराज

भारतीय खेळाडूंनी आजवर अनेक समस्यांवर भाष्य केले आहे. याच प्रमाणे भारताची प्रमुख कुश्तीपटू बबीता फोगाट यांनी देखील हरियाणा सरकारच्या नवीन निर्णयावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ..

हैदराबादला नमवत चेन्नई सुपर किंग्जचा दमदार विजय

इंडीयन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेच्या अकराव्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्ज संघाने पटकावले आहे. ..

का टाकतायत सर्वजण आपला व्यायाम करतानाचा व्हिडियो ?

हे चॅलेंज सेलिब्रिटींमध्ये तर हिट झालंच पण सामान्य लोकांमध्येही याची खूप क्रेज सध्या पाहायला मिळते आहे...

एबी डिव्हीलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

डिव्हीलियर्स नुकत्याच काही वेळापूर्वी सोशल मिडियावरून याविषयी घोषणा केली असून डिव्हीलियर्स अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे सर्व चाहत्यांमध्ये सध्या दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. ..

आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

इंग्लंड, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या संघांशी होणाऱ्या एकदिवशी, टी-२ आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघांची आज घोषणा करण्यात आली आहे. ..

अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे ला जाहीर

राष्ट्रीय निवड समिती ही अफगाणिस्तानच्या विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे रोजी जाहीर करणार अशी माहिती सध्या मिळत आहे. ..

आयपीएलचे दोन 'प्ले ऑफ' पुण्याऐवजी आता कोलकत्तामध्ये

आयपीएल-२०१८ चे दोन प्ले ऑफ सामने हे पुण्याऐवजी कोलकत्ता येथे होणार असल्याचे आयपीएल संचालक मंडळाकडून आज जाहीर करण्यात आले आहे. ..

सानियाच्या घरी येणार चिमुकला पाहुणा

प्रसिद्ध भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाकडे गोड बातमी आहे. तिच्याकडे आता एक चिमुकला पाहुणा येणार आहे. याबद्दल तिने स्वत: आपल्या ट्विर आणि इंस्टाग्राम अकाउंट्सच्या माध्यमातनं चाहत्यांना सांगितलं आहे...

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६६ पदकांसह भारत तिसऱ्या स्थानावर

ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अखेर काल सांगता झाली. या स्पर्धेत भारताने उत्तम खेळाचे प्रदर्शन कर पहिल्या तीन क्रमांमध्ये स्थान मिळवलं आहे. एकूण ६६ पदकांची कमाई करत भारत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे...

पी.व्ही सिंधूवर सायना नेहवालचा विजय, दोन्ही पदकं मायदेशी

गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतीय खेळाडू उत्तम प्रदर्शन करत आहेत. काल भारताला एक अत्यंत रोमांचक सामन्याचा अनुभव घेता आला. राष्ट्रकुल बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम लढतीत भारताच्याच सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधूव एकमेकांसमोर होत्या. या सामन्यात सायना नेहवाल हिने पी.व्ही. सिंधूला मात देत विजय मिळवला. आणि सुवर्ण आणि रौप्य दोन्ही पदकं भारताने पटकावली आहेत. ..

भाला फेक खेळात भारताला पहिले सुवर्णपदक

भाला फेकमध्ये भारताला आज सुवर्ण पदक मिळाले आहे. नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे...

गौरव सोलंकी आणि संजीव राजपूत यांची देखील सुवर्ण कमाई

बॉक्सर गौरव सोलंकी आणि नेमबाज संजीव राजपूत यांनी दोघांनी आज सुवर्ण कामगिरी करत भारताला १९ वे आणि २० वे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे...

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर

ऑस्ट्रेलिया येथील गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ सुरु आहे. या स्पर्धेत भारताचे खेळाडू खेळाचे उत्तम प्रदर्शन दाखवत आहेत...

१५ वर्षीय अनिशने दिले देशाला १६ वे सुवर्णपदक

रायफल शुटींगमध्ये झालेल्या सर्व सामन्यांमध्ये मिळून तेजस्विनीने एकूण ४५७.९ इतक्या गुणांची कमाई करून राष्ट्रकुल स्पर्धेत एक नवीन विक्रम नोंदवला आहे...

थाळीफेक स्पर्धेत भारताने केली रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताची उत्तम कामगिरी दर दिवशी सुरु आहे. आज भारताने थाळीफेक स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. सीमा पूनिया हिने या स्पर्धेत रौप्य पदक तर नवजीत ढिल्लों हिने कांस्य पदक पटकावले आहे...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : भारताला प्रथमच मिळाले डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदक

त्याचबरोबर या स्पर्धेतील हे १२ वे सुवर्ण पदक आहे...

भारताच्या खात्यात अजून दोन पदकं पक्की

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या खात्यात अजून दोन पदकं पक्की झाली आहेत. भारतीय मुष्टियोद्धा मनोज कुमार याने आज ऑस्ट्रेलियाच्या टैरी निकोलस याला ४-१ अशा फरकाने मागे टाकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे...

भारोत्तोलन, नेमबाजीनंतर आता बॅडमिंटनमध्ये देखील भारताची सुवर्ण कामगिरी

गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी सुरुच आहे. भारोत्तोलन, नेमबाजीनंतर आता भारताने बॅडमिंटन या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे. ..

नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय खेळाडूंचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली त्या खेळाडूंचे ट्वीटरच्या माध्यमातून मनापासून कौतुक केले आहे...

भारताला नेमबाजीत सुवर्ण पदक तर वेटलिफ्टिंगमध्ये रजत पदक

ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले आहे...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला संघाची आणखी एक 'सुवर्ण' कामगिरी

भारताच्या मणिका बात्रा हिच्या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३-१ अशा गुणांनी सिंगापूर संघाचा पराभव केला आहे. ..

नेमबाजीत भारताने मारली बाजी : मनु भाकेरला सुवर्ण पदक

गोल्डकोस्ट येथे सुरु असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारोत्तोलनानंतर आता नेमबाजीत भारताने बाजी मारली आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मनु भाकेर हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच सुवर्ण तर हिना सिद्धूने रौप्य पदक पटकावले आहे. ..

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : वेंकट राहुल रगाला ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

८५ किलो वजनी गटात त्याने ३३८ किलो वजन उचलून हे पदक पटकावले आहे...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : सतीश शिवलिंगमने दिले भारताला तिसरे सुवर्ण

सतीशच्या या विजयाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. ..

भारतीय महिला हॉकी संघाचा मलेशियावर ४-१ ने विजय

कॉमनवेल्थ खेळांचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये भारतीय महिला हॉकी संघाने मलेशियावर मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. ..

भारताच्या दीपक लाथेरची वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकाची कामगिरी

भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू दीपक लाथेरने राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ च्या ६९ किलो वजनी पुरुष गटात कांस्यपदकाची कामगिरी केली आहे. ..

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : संजीता चानूने पटकावले वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडू संजीता चानूने ५३ किलोच्या महिला गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. भारतासाठी सलग दुसरा दिवस देखील आनंदाचा ठरला आहे. ..

दूरदर्शनच्या दर्शकांसाठी आनंदाची बातमी

दूरदर्शनच्या दर्शकांसाठी दूरदर्शन आनंदाची बातमी घेवून आले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून क्रिकेट प्रेमींना भुरळ पाडणारे ‘इंडियन प्रीमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल’ हे आता दूरदर्शनच्या स्पोर्ट वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे...

कॉमनवेल्थ खेळांमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडुंचे नरेंद्र मोदी यांच्यातर्फे कौतुक

कालपासून ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे कॉमनवेल्थ खेळांना सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कामगिरी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या सगळ्या खेळाडूंचे कौतुक केले आहे...

नव्या विश्वविक्रमासह राष्ट्रकुलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाहिल्यास दिवशी भारताने सुवर्ण कामगिरी करत वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे. भारताची मीराबाई चानू हिने नवा विश्वविक्रम रचत ४८ किलोग्रॉम वजनीगटामध्ये हे सुवर्णपदक पटकावले आहे. ..

राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुराजला मिळाले रौप्य पदक

गोल्ड कोस्ट येथे सुरु झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची दमदार सुरुवात झालेली मानली जात आहे...

कॉमनवेल्थचा इतिहास ...

याही वर्षी भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करून भारताचे नाव उंचवतील अशी प्रत्येक भारतीयाची आशा आहेच...

भारतीय खेळाडू कॉमनवेल्थसाठी सज्ज

या स्पर्धेत जिमनॅस्टिक, स्वॅश, स्विमिंग, अॅथलॅटिक्स, बॅडमिंटन, मुष्टीयुध्द असे विविध खेळ खेळले जाणार आहेत. ..

सनरायझर्स हैदराबाद संघात आता डेविड वॉर्नरच्या जागी अॅलेक्स हेल्स

बॉल टेंपरिंगमुळे अडचणीत आलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू डेविड वॉर्नर यांच्या यंदाच्या आयपीएल प्रवेशावर रोख आणण्यात आली आहे. ..

हि चूक मी कधीही विसरणार नाही - स्टीव्ह स्मिथ

आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो ढसाढसा रडला. ही चूक मी कधीही विसरू शकणार नाही, मी पूर्णपणे उध्वस्थ झालो आहे, मला माफ करा, असे उद्गार त्याने यावेळी काढले...

आयएसएसएफ स्पर्धेत भारताचा आणखीन एक 'सुवर्णवेध'

या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात एकूण २२ पदक जमा झाली आहेत. ज्यामध्ये ९ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदकांचा समावेश आहे. या पदकांसह भारत सध्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून २५ पदकांसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे...

वॉर्नर आणि स्मिथला आयपीएलमध्ये 'नो एंट्री' ?

आयपीएलचे संचालक राजीव शुक्ला यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल मिळावा, यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला एक पत्र पाठवले आहे. ..

ऑस्ट्रेलिया बॉल टेंपरिंग : स्टीव्ह स्मिथ याचा कर्णधार पदाचा राजीनामा

स्मिथबरोबर संघाचा उपकर्णधार असलेल्या डेविड वॉर्नर याने देखील आपल्या उपकर्णधार पदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतला असून यापुढे टीम पेन हा संघाच नेतृत्व करणार आहे,..

प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या कारला अपघात

ल्या काही दिवसांपासून भारताचा प्रसिद्ध गोलंदाज मोहम्मद शमी याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण काही सुटण्याचं नाव घेत नाहीये. आधी पत्नीच्या आरोपांमुळे चर्चेस आलेले मोहम्मद शमी यांच्या गाडीला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला असून टाके लावावे लागले आहेत. देहरादूनहून दिल्लीला परत येत असताना हा अपघात झाला...

युकी भांबरी मियामी मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत दाखल

भारताचा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू युकी भांबरी मियामी मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. बोस्नियाच्या मिर्झा बासिकला मात देत त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. युकीने बासिकला ७-५ आणि ६-३ अशा अंकाने मात दिली आहे...

भारताच्या इलावेनिल वालारिवन हिला नेमबाजीत सुवर्ण पदक

सिडनीमध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोट्स फेडरेशन अर्थात ‘आयएसएसएफ’च्या जूनियर विश्वचषक स्पर्धेत भारताच्या इलावेनिल वालारिवन हिला नेमबाजीत सुवर्ण पदक मिळाले आहे...

जागतिक जल दिनानिमित्त क्रिकेटपटू रोहित शर्माचे आवाहन

आज जागतिक जल दिन आहे. यानिमित्ताने जगभरातून अनेक लोक आपली मतं मांडत आहेत. त्याप्रमाणेच भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने देखील आपल्या आयुष्यातील एक प्रसंग सांगत आजच्या दिनानिमित्त पाणी वाचवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. ..

भारतीय संघाने उभारली विजयाची गुढी

बांग्लादेश संघाने प्रथम फलंदाजी करत असताना भारतापुढे विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. ..

भारत वि. बांगलादेश : अंतिम सामन्याला सुरुवात

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे...

निदास चषक : भारतीय संघाची अंतिम सामन्यात धडक

भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कोलंबो येथे सुरु असलेल्या निदास चषकाच्या कालच्या सामन्यात भारताने बांगलादेश संघाचा १७ धावांनी पराभव करून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक घेतली आहे...

टी-२०: भारताला पहिला धक्का, शिखर धवन बाद

भारत आणि बांग्लादेश यांच्यात आज टी-२० सामना प्रेमदासा मैदानावर सुरु झाला असून बांग्लादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ..

आयएसएसएफ स्पर्धेत भारताचे स्थान अव्वल

आंतरराष्ट्रीय नेमबाज स्पोर्ट फेडरेशन अर्थांत आयएसएसएफ स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील पदतालिकेत भारत अव्वल क्रमांकावर आहे. ..

श्रीलंकेला लोळवून भारताचा सलग दुसरा विजय

श्रीलंका संघाने दिलेले दिलेले ९ बाद १५२ धावांचे आव्हान भारताने ६ गडी राखून अगदी लीलया पार केले. तसेच मालिकेतील दुसरा सामना आपल्या खिशात घातला आहे. या विजयासह सध्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ अव्वलस्थानी पोहोचला आहे...

टी-२० : भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु

भारत आणि श्रीलंका यांच्यात आजचा टी-२० सामना कोलंबो येथील प्रेमदासा मैदानावर सुरु झाला असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे...

टी-२०: भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरु

भारत आणि बांग्लादेश यांच्यात आजचा टी-२० सामना सुरु झाला असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून सध्या मैदानावर बांग्लादेशचे खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. ..

तिरंगी सामन्यात श्रीलंकेची विजयी सलामी

भारतीय संघाने दिलेले १७४ धावांचे आव्हान श्रीलंकेने पाच गडी राखून लीलया पार केले असून श्रीलंकेने या मालिकेतील आपली पहिली विजयी सलामी दिली आहे...

टी-२० : भारताने श्रीलंकेपुढे ठेवले १७५ धावांचे लक्ष्य

श्रीलंकेतील कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी-२० सामन्याला सुरुवात झाली असून भारताने श्रीलंकेपुढे १७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे...

आणीबाणी स्थितीत देखील भारत-श्रीलंका टी-२० सामना होणार

आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा टी-२० सामना हा वेळेप्रमाणेच होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. ..

१६ वर्षीय मानुची 'सुवर्ण' कामगिरी

या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण २ सुवर्ण आणि ३ कांस्यपदक जमा झाले आहेत...

७ एप्रिलपासून होणार आयपीएलच्या यंदाच्या सत्राला सुरुवात

दरम्यान या अगोदर हा कार्यक्रम ६ एप्रिलला घेण्याचा विचार बीसीसीआयकडून केला जात होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या तारखेवर बीसीसीआय शिक्कामोर्तब केला नव्हता...

अफगाणिस्तानचा रशीद ठरला जगातील सर्वात 'तरुण' कर्णधार

या अगोदर बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार राजिन सालेह (वय २०) हा सर्वात कमी वयाचा कर्णधार म्हणून ओळखला जात होता. परंतु आता त्याच्या जागी रशीद हा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला आहे...

भारताच्या शाहझार रिझवीचा विश्वविक्रम

रिझवीने संपूर्ण सामन्याद्वारे सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली असून, १४ व्या गोळीनंतर आघाडी केली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवली. ..

आशिया मुष्टियोद्धा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

आशिया मुष्टियोद्धा स्पर्धेत भारताची मुष्टियोद्धा नवजोत कौर हिने महिला फ्रीस्टाईल गटामध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. ..

भारताची स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आता सांभाळणार 'डीएसपी'ची जबाबदारी

भारताची स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हिला पंजाब पोलिसांनी 'डीएसपी' या पदावर नियुक्त केले आहेत. नुकताच तिने डीएसपी पदाचा कार्यभार सांभाळला. तसेच याबद्दल आनंद व्यक्त करत तिने पंजाब पोलिस, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे आभार मानले...

मराठी भाषा दिनानिमित्त सचिनला आली वडीलांची आठवण

आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठमोळ्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आज मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेतून व्यक्त होत आपल्या वडीलांची आठवण काढली. आज २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिवस. या निमित्ताने सचिन तेंडुलकर याने मराठी भाषेत ट्विट केले आहे...

कोहली आणि धोनीला विश्रांती - श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहिर

दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या कालच्या टी-२० सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकला नव्हता. त्यामुळे तात्पुरते कर्णधारपद हे रोहित शर्माकडे देण्यात आले होते...

भारत वी. दक्षिण आफ्रिका : आज शेवटचा टी-२० सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी-२० सामन्यातील शेवटचा सामना आज केपटाऊन येथे खेळला जाणार आहे...

चेतेश्वर पुजारा याला कन्यारत्न

क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याला आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ही गोड बातमी चेतेश्वर पुजारा याने स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे...

भारत वि द. आफ्रिका टी-२०: दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा विजय

भारताचे १८९ धावांचे लक्ष्य अवघ्या १८.४ षटकांत दक्षिण आफ्रिकेने केले. ..

भारत वि. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आज आमने-सामने

आज दुपारी भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आमने-सामने येणार आहे. ..

तब्बल २५ वर्षांनी लाराचा 'हा' विश्वविक्रम तोडून कोहली अव्वलस्थानी!

'आयसीसी'ने सादर केलेली अभ्यासपूर्ण आकडेवारी वाचल्यावर तुम्हीही व्हाल आवक.....

नाणेफेक जिंकत भारताची प्रथम गोलंदाजी करण्यास सुरुवात

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात आजचा सहावा एकदिवसीय सामना सुरु झाला आहे...

दीपा करमाकरची कामगिरी उत्तम नसल्याने ती कॉमनवेल्थमध्ये खेळणार नाही : प्रशिक्षक

भारताची प्रसिद्ध जिमनॅस्ट दीपा करमाकरची कामगिरी उत्तम नसल्याने तसेच तिला आणखी मेहनतीची आवश्यकता असल्याने ती कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खेळणार नाही. अशी माहिती दीपा करमाकर हीचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी दिली. आणखी मेहनत करुन ती 'एशियन गेम्स' या स्पर्धेत उतरेल असेही त्यांनी सांगितले...

एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी आघाडी

भारताच्या रोहित शर्मा याच्या झुंजार शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने दिलेले २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावांवरच कोलमडून पडला. ..

आजच्या सामन्यात हिटमॅनची शतकी खेळी

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा एकदिवसीय सामना सेंट जॉर्ज पार्क येथे सुरु आहे. या सामन्यात भारताच्या रोहित शर्माने शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला चांगलेच नमवले आहे...

भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे ठेवले २७५ धावांचे लक्ष्य

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचवा एकदिवसीय सामना सेंट जॉर्ज पार्क येथे सुरु झाला असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे...

सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारत सुस्थितीत

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज चौथा एकदिवसीय सामना होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली असली तरी शिखर धवन व कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे...

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक विजेतेपदावर भारताची नजर

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आज भारताची नजर ऐतिहासिक विजेतेपदावर असणार आहे...

३६ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने १२ सुवर्ण पदक पटकावली. तर मुष्टियुद्धात तब्बल ७ सुवर्ण पदके मिळाली आहेत...

दक्षिण आफ्रिकेवर सलग तिसरा विजय

भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद दीड शतकी खेळीच्या बळावर भारताने अफिकेला दिलेले ३०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, आफ्रिका संघ १७९ धावांवरच कोलमडून पडला. ..

आजच्या सामन्यात विराटचे दमदार शतक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज पुन्हा एकदा शतक ठोकले आहे. ..

भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात

६ सामन्यांच्या या मालिकेतील २ सामने भारताने जिंकले असून २-० अश्या गुणांनी भारत आघाडीवर आहे. ..

भारत वि. दक्षिण आफ्रिका : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताची सरशी

८ षटके व २ चेंडूत केवळ २२ धावा देऊन ५ बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले...

'खेलो इंडिया'मध्ये ३९ पदकांसह महाराष्ट्र अव्वल

स्पर्धेच्या कालच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राने एकूण १४ पदके पटकाविली असून यामध्ये ७ सुवर्ण ४ रजत आणि ३ कांस्य पदके यांचा समावेश आहे...

भारतीय अंडर १९ क्रिकेट संघावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय अंडर १९ क्रिकेट संघाने आज चौथा अंडर १९ क्रिकेट विश्वचषक जिंकला असल्याने सगळे भारतीय यावर आनंद व्यक्त करत आहे...

अंडर १९ क्रिकेट विश्वचषक: भारताने पुन्हा रचला इतिहास

न्यूझीलंड येथे आज झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे...

अंडर १९ विश्वचषक: ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ठेवले २१७ धावांचे लक्ष

येथे सुरु असलेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतापुढे २१७ धावांचे लक्ष ठेवले आहे. ..

इंडिया ओपेन: पी.व्ही. सिंधूने गाठली उपांत्य फेरी

नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या इंडिया ओपेन स्पर्धेत भारताची स्टार पी. व्ही. सिंधू हिने स्पेनच्या बीट्रिज कोर्रलेस हिला मागे टाकत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. ..

आणि भारतीय संघाचा दणदणीत विजय....

भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी सामना जरी गमावला असला, तरी एकदिवसीय सामन्यात मात्र भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने रचलेल्या १८९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळवला...

इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत मॅरीकॉमची सुवर्ण कामगिरी

भारताची प्रसिद्ध बॉक्सर एम. सी. मॅरी कॉमने इंडियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. मॅरी कॉमने ४८ किलो वजन गटाच्या अंतिम लढतीमध्ये फिलिपाईन्सच्या जोसी गाबुको हिचा ४-१ असा पराभव करत सुवर्ण पदावर आपले नाव कोरले आहे. मॅरी कॉमसह संजीत, मनिष कौशिक, पी. बासुमातर, लव्हलीना बोर्गाहेन आणि पिंकी राणी हिला देखील सुवर्ण पदक मिळाले आहे...

भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना सुरु

दक्षिण आफ्रीकेसोबत खेळल्या गेलेली कसोटी मालिका गमावल्यानंतर आता आजपासून भारतीय संघ एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. ..

राज्यवर्धन सिंह राठौड ट्विटरच्या माध्यमातून साधणार संवाद

देशातील युवकांना खेळांसाठी प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठौड आज सायंकाळी ७.३० वाजता खास 'ट्विटर प्रश्नोत्तर गप्पां'च्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांनी स्वत: याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ..

अंडर-१९ च्या उपांत्य फेरीत भारताकडून पाकचा धुव्वा

भारताच्या शुभम गिल याच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय साजरा केला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात धडक घेतली असून यापुढील सामन्यात विश्वचषकासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे आव्हान असणार आहे...

...आणि रॉजरला झाले अश्रू अनावर

रॉजरचे भाषण ऐकून उपस्थित सर्व प्रेक्षकांनी जाग्यावर उभे राहून रॉजरसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. चाहत्यांचे हे प्रेम पाहून यावेळी रॉजरला आपले अश्रू अनावर झाले. विश्वविक्रम करणाऱ्या या खेळाडूच्या डोळ्यात पाणी पाहून उपस्थित प्रेक्षक देखील गहिवरून गेले होते...

इंडोनेशिया मास्टर्स : सायनाचा ताईजुयिंग कडून पराभव

जुनी प्रतिद्वंद्वी आणि जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाची बॅडमिंटन खेळाडू ताईजुयिंग हिने प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम सामन्यात पराभव केला...

भारत वि द. आफ्रिका कसोटी : शमीच्या गोलंदाजीने घेतली दक्षिण आफ्रिकेची विकेट

५ बळी घेत आफ्रिका संघाला १७७ धावांवर गुंडाळून ६३ धावांनी भारताने हा सामना जिंकला...

आयपीएल क्रिकेट: अकराव्या हंगामाच्या लिलावाला सुरुवात

गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात आयपीएल क्रिकेटच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आहे...

इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम सामन्यात सायना नेहवाल दाखल

४९ मिनिटे चाललेला हा खेळ सायनाने २१-१९, २१-१९ अशा फरकाने हा सामना जिंकला. ..

भारताचे सामन्यात पुनरागमन; 'बुमराह'ने आफ्रिकेला केले 'गुमराह'

जसप्रीत बुमराहने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. ..

भारतीय अंडर-१९ संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल

सध्या स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि न्युझीलंड हे संघ आघाडीवर असून यापुढे उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. हा सामना येत्या ३० तारखेला क्रिस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे...

भारत वि. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात

जोहान्सबर्ग येथील न्यू वंडेरियर मैदानावर या सामन्याला सुरुवात होत आहे. सलग दोन सामन्यामध्ये पराभव पत्करलेल्या हातातून गमावलेल्या कसोटी मालिकेचा तिसरा सामना जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय संघ आज मैदानात उतरत आहे. त..

अंध क्रिकेट विश्वचषकात भारताची बाजी

याबद्दल सर्वस्तरातून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. ..

दिव्यांग क्रिकेट विश्वचषक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना

५ व्या दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आजचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. ..

आफ्रिकेच्या 'लुंगी'ने वाजवली 'पुंगी'; भारताने कसोटी सामन्यासह मालिकाही गमावली

आफ्रिकेच्या 'लुंगी'ने वाजवली 'पुंगी'; भारताने कसोटी सामन्यासह मालिकाही गमावली ..

चेतेश्वर, रोहित किंवा हार्दिक भारताला पराभवापासून वाचवू शकतील का?

चेतेश्वर, रोहित किंवा हार्दिक भारताला पराभवापासून वाचवू शकतील का?..

मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताला पार करावे लागणार २८६ धावांचे लक्ष्य

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताला पार करावे लागणार २८६ धावांचे लक्ष्य...

तर क्रीझवरुन अशा व्यक्त केल्या विराटने अनुष्कासाठी आपल्या भावना..

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गेल्या सामन्यापेक्षा भारताचा खेळ नक्कीच उत्तम आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने देखील उत्तम खेळाचे प्रदर्शन करत १५० धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र चाहत्यांना केवळ याचेच कौतुक नसून आपल्या या धावांचे श्रेय विराटने अनुष्काला ज्या प्रकारे दिले त्याचे कौतुक अधिक आहे. १५० धावा पूर्ण केल्यानंतर खेळाच्या मैदानावरून त्याने अनुष्कासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...

भारत वि. आफ्रिका : आफ्रिकेकडे अद्याप १५२ धावांची आघाडी

आज दिवसअखेरपर्यंत भारताच्या ५ बाद १८३ धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे अद्याप १५२ धावांची आघाडी असून आफ्रिकेने पहिल्या डावामध्ये ३३५ धावा केलेल्या आहेत. ..

अंडर १९ विश्वचषक: भारताचा ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी विजय

माउंट मौनगुनिया येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर १९ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजय मिळविला आहे. ..

भारत वि. द.आफ्रिका कसोटी : आफ्रिकेची ३३५ धावांची आघडी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळला सुरुवात झाली असून द. आफ्रिका संघ अद्याप देखिल भक्कम स्थितीमध्ये असून दुसऱ्या दिवशी शंभर षटकांमध्ये द.आफ्रिका संघाने ७ बाद २८६ धावांची मजल मारली आहे. ..

दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारताचा

दुसऱ्या कसोटीतील आजचा पहिला दिवस भारताच्या नावावर जमा झाला आहे. सुरुवात चांगली करूनही दक्षिण आफ्रिकेला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही...

२ रा कसोटी सामना, दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका

आज दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु झाला असून भारताने बऱ्याच वेळेनंतर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला आहे. ..

आज भारत वि. दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना

आज दक्षिण आफिकेतील सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरीयन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेबरोबरचा दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. ..

सहवागने दिल्या द्रविडला खास अंदाजमध्ये शुभेच्छा

भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसह त्याच्या खास शैलीसाठी देखील प्रसिद्ध आहे. समाज माध्यमांवर सतत वावर असणाऱ्या सहवागने नेहमीच आपल्या खास शैलीत इतर क्रिकेटपटूंना किंवा कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमीप्रमाणे यावेळी देखील त्याने आपल्या विशिष्ट शैलीत राहुल द्रविडला शुभेच्छा दिल्या आहेत. आज राहुल द्रविडचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने एका वेगळ्या पद्धतीने वीरुने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत...

आंचल ठाकूर हिला हरियाणा सरकारकडून बक्षीस

तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत भारताच्या आंचल ठाकूर हिने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकाविले आहे...

आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत भारताचे नाव चमकले

तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत भारताच्या आंचल ठाकूर हिने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकाविले आहे...

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतून विराटची घसरण

दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताला मिळालेल्या अपयशानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतून स्थान घसरले आहे...

डोपिंग चाचणीत युसुफ पठाण दोषी

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आणि इरफान पठाण याचा भाऊ युसुफ पठाण डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्याची बातमी समोर आली आहे. डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने युसुफ पठाणला ५ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. ..

सुरेश रैनाचे हे गाणे ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल!

क्रिकेटपटू सुरेश रैना याने चक्क एक गाणे काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड केले असून आता हे गाणे सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे...

गब्बर, हिटमॅन, कर्णधार अन पांड्यासह सर्वच फलंदाज अपयशी

भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात केपटाउन येथे सुरु असेलल्या कसोटी सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी भारताचा ७२ धावांनी पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रीका ने आजच्या सामन्यात १३० धावा केल्या होत्या. भारतासमोर एकूण २०८ धावांचे आव्हान होते. मात्र भारताच्या आजच्या प्रदर्शनामुळे भारताचे एकामागोमाग एक गडी बाद होते गेले. भारताने १३५ धावा केल्या मात्र एकूण धावसंख्या पूर्ण न करू शकल्याने भारताचा पराभव झाला. ..

दिव्यांग क्रिकेट विश्वचषक : भारत आणि ऑस्ट्रेलिया आज आमने सामने

५ व्या दिव्यांग क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने येणार आहे. ..

भारत-द.आफ्रिका कसोटी : आजच्या सामन्यावर पावसामुळे 'पाणी'

आजच्या सामन्याच्या सुरुवातीपासून केपटाऊनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे पाऊस थांबल्यानंतर खेळ चालू करण्यात येईल, असे बोर्डकडून जाहीर करण्यात आले होते. ..

तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विजयी

तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्राच्या पदरात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद आले आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपद पटकावलं आहे. ..

‘महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ला आजपासून सुरुवात

हरियाणामधील रोहतक येथे आजपासून ‘महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ला सुरुवात होत आहे. ३०० पेक्षा जास्त महिला मुष्टियोद्धा या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. ..

दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे ठेवले २८७ धावांचे लक्ष

केपटाऊनमधील न्यूलँड येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे २८७ धावांचे लक्ष ठेवले आहे...

भारत वि. द.आफ्रिका : पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात

न्यूलँडमधील केपटाऊन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे...

विराट ठरला आयपीएलचा सर्वाधिक महागडा खेळाडू

यंदाची आयपीएल एक वेगळा चर्चेचा विषय बनली आहे. ती केवळ भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट कोहली मुळेच. विराट कोहली आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे...

भारत आणि द.आफ्रिका पहिला कसोटी सामना आज

भारतीय स्थानिक वेळेनुसार आज दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे...