शिल्पकथा

भारतीय शिल्पकलेला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न - वेरूळचा कैलास

'आधी कळस मग पाया रे' अश्या स्वरूपात खोदवून काढलेल्या ह्या भव्य शैलमंदिराचा मूळ गाभारा राजा कृष्णराजाच्या कारकिर्दीत पूर्ण होऊन इथली प्राणप्रतिष्ठा झाली होती...

सार्वजनिक वाहतुकीला द्या पसंती!

वाहनांची वाढती संख्या, आवाक्यावर बाहेर जाणारे प्रदूषण, पेट्रोलियमपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, खासगी वाहनांचा वापर थोडा कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे...

शिल्पकथा - कांचिपुरमची भिक्षाटनशिवमूर्ती

आज आपण जे शिल्प बघणार आहोत ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर आहे. हे शिल्प आहे भिक्षाटन शिवमूर्तीचे. ..

शिल्पकथा - सोमनाथपूरची नृत्यलक्ष्मी

मुळात श्रीलक्ष्मीची लक्ष्मी-नारायण किंवा गजलक्ष्मी ह्या स्वरूपात अंकन केलेली शिल्पे खूप ठिकाणी आढळतात, पण नृत्यमग्न लक्ष्मी त्यामानाने दुर्मिळ...

शिल्पकथा - दक्षिणामूर्ती शिव 

आज आपण बघणार आहोत ते अद्वितीय शिल्प कांचिपुरमच्या कैलासनाथ मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले दक्षिणामूर्तीचे शिल्प आहे. श्री शंकर हे सर्व देवांचे अधिपती, आद्य योगी आणि संगीत, नृत्य इत्यादी अभिजात कलांचे प्रणेते.....

शिल्पकथा - कांचिपुरमचे किरातार्जुनीयम

साक्षात महाकवी कालिदासाने कांचीचे वर्णन करताना 'नगरेषु कांची' असे गौरवोद्गार काढले आहेत...

शिल्पकथा : सोमनाथपूरची महिषासुरमर्दिनी

दरवर्षी हजारो पर्यटक ह्या दोन मंदिरांना भेट देतात पण ह्याच होयसळ शिल्प परंपरेतलं एक खूप सुंदर मंदिर म्हैसूरजवळ सोमनाथपुरा येथे आहे..

शिल्पकथा - हळेबिडूचा उग्रनृसिंह 

मंदिरशिल्पांच्या शोधात मी भारतभर फिरले आहे. अगदी गुप्तकाळच्या साध्या, तुलनेने अनलंकृत शिल्पांपासून ते पुढे चोल, चंदेल, होयसळ काळातल्या अत्यंत बारीक कोरीव कामाने सजलेल्या मूर्तींपासूनची भारतीय शिल्पकलेतील स्थित्यंतरे मुळातूनच समजून घेण्यासारखी आहेत. त्यातही काही देवतांची शिल्पे सुरवातीला दिसतात पण पुढेपुढे त्यांचं अंकन कमी होतं तर काही देवतांची शिल्पे गुप्तकाळात फारशी आढळून येत नाहीत पण पुढे त्यांचे शिल्पांकन फार मोठ्या प्रमाणात कसे होते हा कलाप्रवास बघणे अत्यंत उद्बोधक आहे. गुप्तकाळात अत्यंत लोकप्रिय ..

#शिल्पकथा : उदयगिरीचा शेषशायी नारायण 

हिंदू उपासनापद्धतीमध्ये त्रिमूर्तींची कल्पना आहे. सृष्टीच्या तीन अवस्था आपण मानतो, निर्माण, पालन आणि संहार, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात तर श्रीविष्णू सृष्टीचे पालन करतात आणि शिवशंकर सृष्टीचा संहार करतात असे आपण मानतो. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर ह्यांनी आपल्या विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम ह्या पुस्तकात विष्णू ह्या नावाची उत्पत्ती सांगताना असं म्हटलं आहे की जो चराचर भूतांच्या ठिकाणी प्रविष्ट असतो तो श्रीविष्णू. पार ऋग्वेदापासून आपल्याला श्रीविष्णूचे उल्लेख ..

#शिल्पकथा - देवी सर्व भूतेषु

सध्या देशभरात शारदीय नवरात्र सुरु आहे. ह्या दिवसात देवीची शक्तिरूपात मोठ्या थाटाने आराधना केली जाते...

#शिल्पकथा - उदयगिरीचा महावराह

गुप्त राजांच्या काळात वराहोपासना जोरात होती. संकटात बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करणारा श्रीविष्णू हे रूपक त्या काळच्या गुप्त राजांना भावले असावे...

प्रथम नमू गजवदनु

शिल्पकथा ह्या माझ्या नवीन सदरातील हा पहिला-वाहिला लेख. कुठल्याही शुभ कार्याची सुरवात नेहमी गणेश वंदनेने करायची असा आपल्या संस्कृतीत संकेत आहे. त्यामुळे ज्या शिल्पाबद्दल मी आज लिहिणार आहे ते आहे विघ्नहर्त्या गजाननाचं...

शिल्पकथा

मंदिरात येताना माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे आणि आत शिरताना मात्र अंतर्मुख व्हावे असा काहीसा भाव शिल्पे कोरणाऱ्यांच्या मनात असावा. म्हणूनच अगदी कामशास्त्रापासून ते प्राणिसृष्टीपर्यंतची शिल्पे आपल्याला जुन्या मंदिरांच्या भिंतीवरून दिसू शकतात...