सर्वसाक्षी

समतोल साधण्यास दैवी स्त्रीभाव आवश्यक

माझ्या अंतर्मनात काहीतरी प्रचंड आणि मूलभूत बदल होत होते. आणि अचानक, मला माझे आयुष्य तसेच फसव्या समाजव्यवस्थेतील कर्तव्ये, अपेक्षा आणि आव्हाने यांची दहशत वाटण्याऐवजी, या सर्व मानवी संरचनेहून काही वेगळे असलेल्या, खूप सखोल तत्त्वाचा आपण एक भाग असल्याची भावना होत गेली. चमत्कार वाटावी अशी या पृथ्वीची बुद्धिमत्ता आणि मनापासूनची संगोपन करण्याची तिची प्रेमळ शक्ती यांचा मला अनुभव येण्यास प्रारंभ झाला आणि कुणी दुसर्‍यांनी सांगितले म्हणून नाही, तर माझ्या स्वत:च्या हृदयातूनच मी तिला ‘पृथ्वी माता’ मानू लागले...

अमेरिकन मूलनिवासींमध्ये स्त्रीचे स्थान

एसडी यंगवोल्फ हे अमेरिकेच्या मूळ निवासींपैकी एक असून स्वत: कलाकार, कथाकथनकार आणि शिक्षक आहेत. अमेरिकेच्या मूळनिवासी वंशाचा इतिहास, परंपरा जतन करणार्यांपैकी ते एक आहेत. उत्तर कॅरोलिना आणि टेनेसी येथील पर्वतीय प्रदेशात ते वाढले असून, चेरोकी जमातीचे आहेत...

लिथुआनिआच्या रोमुआ परंपरेतील स्त्री-शक्ती

बाल्टिक भाषांच्या अध्ययनातून हे स्पष्ट झाले आहे की, इण्डो-युरोपियनच्या प्राचीन भाषा या लिथुआनियन होत्या आणि सर्व बाल्टिक भाषा या भारताची प्राचीन भाषा- संस्कृतशी घनिष्ठतेने जुळल्या होत्या. १८७५ साली असे लक्षात आले की, बाल्टिक प्रदेशातील धार्मिक संकल्पनांची, इतर युरोपियन लोकांशी तुलना केली असता, अनेक प्राचीन वैशिष्ट्ये भारतातील वैदिक धर्माशी मिळतीजुळती आहेत. लॅटव्हिया व लिथुआनिआसारख्या छोट्या बाल्टिक देशांमधील भाषा फार कमी प्रसिद्ध होत्या, तसेच या क्षेत्रात बाल्टिक विद्वानांनी तुलनेने अलीकडेच संशोधन ..

अर्धनारीनटेश्वराची संकल्पना

फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात, मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टटीज (आयसीसीएस) द्वारा, सहावी आंतरराष्ट्रीय परिषद व प्राचीन परंपरांच्या मान्यवरांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात जगभरातील अनेक विद्वानांनी आपले विचार मांडले. त्यात विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्षा, पद्मश्री निवेदिता भिडे यादेखील सहभागी होत्या. त्यात त्यांनी ‘आध्यात्मिक तसेच सांसारिक जगात स्त्री देवतांचे प्रकटीकरण’ या विषयावर आपले विचार मांडले. या अत्यंत विचारप्रवर्तक भाषणातील काही ..

प्राचीन संस्कृतींमधील स्त्रैण दिव्यत्वाचा वेध...

इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज (आयसीसीएस)चे त्रैवार्षिक संमेलन १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत होत आहे. यात जगभरातील, आजही अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन परंपरांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाची या वर्षीची संकल्पना अतिशय लक्षवेधक किंवा भृकुटी उंचावणारी आहे. ..

शी जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती (भाग 3)

२००६ साली चीनने जागतिक बौद्ध परिषद (वर्ल्ड बुद्धिस्ट फोरम) आयोजित केली, तेव्हा भारतातीलच नव्हे, तर जगातील अनेकांना आश्चर्य वाटले. या परिषदेत विविध देशांचे बौद्ध विचारवंत आणि भिक्खूंनी भाग घेऊन जागतिक सौहार्दावर चर्चा केली. बर्‍याच प्रसिद्ध विद्वानांना सहभाग व बोलण्यासाठी निमंत्रणे पाठविली असली, तरी पूजनीय दलाई लामा यांना निमंत्रण नव्हते आणि त्याचे कारण सर्वांनाच ज्ञात आहे. तेव्हापासून, चीनच्या सांस्कृतिक धोरणात झालेल्या बदलाबाबत अनेक जण अनेक गोष्टी बोलत आहेत. ..

शी जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती (भाग २)

‘‘आजच्या चीनच्या पायाभूत संकल्पना व संस्कृती ही पारंपरिक चिनी संकल्पना आणि संस्कृतीचाच पुढचा आणि परिष्कृत भाग आहे. आजचा चीन समजून घ्यायचा असेल, आजचा चिनी समाज समजून घ्यायचा असेल तर, चीनचा सांस्कृतिक रक्तप्रवाह शोधून काढावा लागेल तसेच, चिनी लोकांचे पोषण करणार्‍या सांस्कृतिक भूमीला देखील अचूकपणे ओळखावे लागेल,’’ हे विधान आहे शी जिनपिंग यांचे. २०१४ च्या नोव्हेंबरमध्ये कन्फ्युशिअस यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त आयोजित, जगभरातून आलेल्या विद्वानांच्या एका सभेला ते संबोधित करीत होते. या व्याख्यानातून चीनची ..

शी जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती

आजचा शी जिनपिंग हा नेता माओ आणि डेंग यांच्या स्तरापर्यंत चढला याबाबत समाधान व्यक्त करण्याऐवजी, आंतरराष्ट्रीय भाष्यकारांनी चिंताच व्यक्त केली आहे. सशक्त नेत्याचा नाट्यमयरीत्या उदय, त्याच्या सामर्थ्यवान खेळींचे यश, आपल्या सर्व विरोधकांचे निर्दालन यातून शी जिनपिंग यांच्या हातात जी अफाट शक्ती एकवटली आहे, त्याचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठे परिणाम होणार आहेत...

कोरियाच्या दृष्टीने अयोध्येचे महत्त्व

२०१५ सालच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या सेऊलला भेट दिली तेव्हा घोषणा केली की, कोरिया आणि अयोध्या यांच्यातील हा जो ऐतिहासिक स्नेहबंध आहे तो अधिक बळकट करण्यात येईल. ..