सांगली

शासन आणि प्रशासनाचा समन्वय ठेवून जिल्ह्याचा विकास करणार 

शासनाच्या फ्लॅगशिप योजना प्रभावीपणे राबवताना, शासन आणि प्रशासनाचा समन्वय ठेवून सर्वांच्या सहकार्याने सांगलीला अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी आज येथे दिली. सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी विजयकुमार काळम-पाटील आज रुजू झाले. त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडून स्वीकारला. त्यानंतर मावळते जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचा निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी यांचा स्वागत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे वाचा