ऋणानुबंध रक्ताचे

माय मरो, मावशी जगो !

पुढे पहा

जनकल्याण रक्तपेढीमध्ये आल्यानंतर इथल्या मावश्यांची अर्थात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची ओळख झाली आणि आधीच्या मावश्यांमध्ये आणखी दहा-बारांची भर पडली..

’समर्पणा’ ची कथा

पुढे पहा

शाळेत शिकत असताना इयत्ता आठवी ते दहावी या तीनही वर्षी वर्गशिक्षकांच्या प्रेरणेने आमच्या वर्गाचे एक हस्तलिखित ’ज्ञानदीप’ या नावाने आम्ही प्रकाशित केले होते. स्वरचित कविता, कथा, लेख, विनोद, कोडी, मुलाखती अशा विविध साहित्यप्रकारांची रेलचेल ’ज्ञानदीप’मध्ये होती. चांगले हस्ताक्षर असलेल्या काही निवडक मुलांचा समावेश ज्ञानदीपच्या ’संपादक मंडळा’मध्ये केला गेलेला होता. ..

येथे(ही) लागतात जातीचे !

पुढे पहा

तरुणांमध्ये स्वभावत:च निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जाण्याची एक उर्मी असते. अशा आव्हानांचा पुरेपूर अंतर्भाव असलेली अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यांचा दुर्दैवाने ’करियर’ म्हणून फ़ारसा विचारच होताना दिसत नाही...

आपण हे करुच !!!

पुढे पहा

रुग्णालयांत ’सुरक्षित रक्तसंक्रमण’ या विषयाचे प्रशिक्षण व्हावे हेच या भेटींचे मुख्य सूत्र असे. हा उपक्रम सुरु व्हायला एक साधंच निमित्त घडलं. मला तो दिवस अजूनही चांगला आठवतो, जेव्हा जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी एका बैठकीत आपला हात आत्मविश्वासपूर्वक उंचावत ’आपण हे करुच, नव्हे आपल्याला हे करायचंच आहे’ असं विधान ठामपणे केलं होतं...

ढाई अक्षर प्रेम का…

पुढे पहा

’शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है’ हाच मंत्र इथल्या मदतनीस मावश्यांपासून ते संचालकांपर्यंत सर्वांनीच जपला आहे...

तो ’वेगळाच’ होता…

पुढे पहा

तुमच्यासाठी पुन्हा एकदा लाडु-चिवडा घेऊन येईन’ असे आश्वासनही त्याने मला दिले होते. दुर्दैवाने हा फ़राळ मात्र मला कधीच मिळु शकला नाही...

रक्तपेढीतला विनोद

पुढे पहा

रक्तपेढी कधी हसतच नाही असे मात्र मुळीच नाही. रक्तपेढीतील गंभीर काम करत असताना, रक्तदान शिबिरांमध्ये अथवा रुग्णालयांमध्येही भरपूर गमती-जमती होत असतातच...

कविमनाचे ’खरे’पण

पुढे पहा

दुसऱ्यांदा संदीप खऱ्यांची भेट झाली ती त्यांच्याच घरी. यावेळी मात्र मी एकटाच त्यांना भेटायला गेलो होतो. निमित्त जरा वेगळे होते...

रक्ताचे मोल

पुढे पहा

रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचतो आणि त्यामुळे त्याचे कुटुंब पुन्हा हसु-खेळु लागते, तेव्हा या रक्ताची किंमत कुठल्या संजीवनीपेक्षा कमी भरेल काय ?..

अवघे धरु सुपंथ

पुढे पहा

सर्व रक्तपेढ्यांमधील परस्परसौहार्द हे केवळ एखाद्या कार्यक्रमापुरते मर्यादित नाही, हे नंतरही अनेकवेळा माझ्या प्रत्ययास येत गेलं...

​याचसाठी केला होता अट्टाहास !

पुढे पहा

एक नितांतसुंदर बोधकथा मागे वाचण्यात आली होती. सत्तरीतले एक आजोबा समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी निघालेले असतात. समुद्राच्या ओहोटी दरम्यान हजारो स्टारफिश किनाऱ्यावर वाहत आलेले असून एक शाळकरी मुलगा आपल्या छोट्याशा हातांनी हे स्टारफ़िश समुद्रात फेकत असल्याचे दृश्य या आजोबांना दिसते. ..

​धन्याचा तो माल…

पुढे पहा

रुग्णासाठी डॉक्टरांच्या सूचनेनुसार ’सिंगल डोनर प्लेटलेट’ (SDP) हा रक्तघटक घेण्यासाठी ते रक्तपेढीत आले होते. त्यातील एकाने बोलण्याचा प्रयत्न केला, पण दाटलेल्या कंठामुळे त्यांना ते काही साधेना. ..

’हस्तस्य भूषणं दानं’

पुढे पहा

हस्तस्य भूषणं दानं' असं एक सुभाषित आपल्याकडे सांगितलं जातं, आणि ते खरंच आहे. दान करणारे हात नेहमीच आदरास पात्र असतात. पण हल्लीचा काळ फ़ार विचित्र झालाय.द्यायला तयार असणारे अक्षरश: हजारोजण भेटतात, परंतु या दात्यांच्या दानाकडे थोडे डोळसपणे पाहिल्यास त्यामागचे हेतू आपल्याला भासतात त्यापेक्षा फ़ारच निराळे असल्याचे ध्यानात येते. आपल्या कंपनीचा सेल वाढविणे, समाजामध्ये आपले राजकीय वजन वाढविणे, आपल्या काळ्या पैशाचा भार कमी करुन त्या बदल्यात त्यापेक्षा जास्त तोलामोलाचानावलौकिक पदरात पाडून घेणे हे णि यांसारखे ..

दिव्यत्वाची तेथ प्रचीती

पुढे पहा

यानंतर दुसऱ्याच दिवशी दुपारच्या वेळेत या मुली पुन्हा मला भेटायला आल्या. रितसर ’तुमच्याशी थोडं बोलायचं आहे’ वगैरे विचारुन त्या माझ्यासमोर आल्या आणि त्यांच्यातल्या एकीने प्रातिनिधिक स्वरुपात एक मागणी माझ्यापुढे ठेवली. ही मुलगी मला म्हणाली,..

मैं बस तुम्हें, देखते हुए देखुं ।

पुढे पहा

’जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ या म्हणीप्रमाणे थॅलेसेमियाग्रस्त असण्याची वेदना म्हणजे काय हे त्या घरात असल्याशिवाय नीट्पणे कळत नाही. थॅलेसेमिया हा विकार मुलांच्या बालपणावरच आघात करतो. अर्थात याही मुलाच्या बाबतीत असेच झाले होते...