पुस्तक परिचय

ते झिजले म्हणून...

देशाला परम वैभवाला नेण्याचे आणि उत्तम व्यक्ती व समाजनिर्मितीचे ध्येय गाठीशी घेऊन १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची लक्ष्मीबाई केळकर यांनी स्थापना केली आणि आजही समितीचे कार्य देशभरात उत्कृष्टपणे सुरू आहे. सुशीला महाजन यांनी आपल्या ‘डाव मांडियेला’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून राष्ट्र सेविका समिती, जनसंघ, पती मधुकरराव महाजन आणि एका विचाराला वाहिलेल्या परिवाराचा लेखाजोखा मांडला आहे. ..

सत्यसन्मान

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुरूप ‘पद्म पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली. ‘पद्मभूषण’च्या १४ सन्माननीय भारतीयांच्या यादीत एक नाव प्रकर्षाने लक्षवेधक ठरले ते नांबी नारायण यांचे...

कथा एका ध्येयसाधनेची : अविरत आरोग्यसेवेचा वसा

वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून स्वस्तात उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न बाळगून ४ जानेवारी, १९६६ रोजी ‘विवेकानंद रुग्णालय’हे रोपटं लावलं आणि सुरू झाला एक अखंड सेवायज्ञ!..

मंदिरप्रवेशापूर्वी...

शुक्रवार दि. २५ जानेवारी रोजी डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'राम मंदिरच का?' या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली येथे होणार आहे. ..

‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे पुस्तक

सत्तेचा मोह, नेतेपदाचा गर्व आणि नोकरशाहीला हवं तसे झुकवण्याची काही काँग्रेसी नेत्यांची हुकूमशाही वृत्ती यांचे या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन मनस्वी चीड आणणारे आहे. त्यामुळे ‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे हे पुस्तक प्रत्येक हिंदू बांधवाने तर वाचलेच पाहिजे, शिवाय हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांची पुराव्यांसहित बोलती बंद करण्यासाठी या पुस्तकातील संदर्भ कामी येऊ शकतात...

तपासाची दिशा वळविण्याचे कारस्थान

हिंदू दहशतवादाची भ्रामक संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी मालेगाव स्फोट, समझोता एक्सप्रेस आदी घटनांचा तपास वळविण्याचा अभद्र उद्योग केला आहे. ..

‘हिंदू दहशतवादा’च्या भ्रामक संकल्पनेची पोलखोल

आरव्हीएस मणी यांचे ‘दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे...

गजाननभक्तांचे समग्र चित्रण

गजानन महाराज... केवळ महाराष्ट्रभूमी नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातूनही महाराजांच्या दर्शनाला शेगावला आवर्जून भेट देणारे भक्त आजही दिसतात..

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी

महात्मा गांधींच्या हत्येमागे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर होते, अशा स्वरूपाच्या आरोपांची द्वेषरूपी जन्मठेप सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांना त्यांच्या उत्तर आयुष्यात, तर दिलेली होतीच, त्याशिवाय ती मरणोत्तरही चालू ठेवलेली आहे..

‘अशी पुस्तके होती’: विस्मृत पुस्तकांचा खजिना

‘अशी पुस्तके होती’ या नव्या पुस्तकात १८५० ते १९४५ या काळात प्रकाशित झालेल्या आणि आता वाचकांच्या स्मृतीआड गेलेल्या मराठी पुस्तकांबद्दल त्यांनी सविस्तर लिहीलं आहे...

‘कासवांचे बेट’ : डार्विनची नोंदवही

गालापगोस द्वीपसमूह पृथ्वीवर अगदी अलीकडे म्हणजेच फक्त तीस ते चाळीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाला...

गांधीजींचा उदयास्त व भारत

देशाची फाळणी होऊन आज इतकी वर्षे लोटली, पण फाळणीची चिकित्सा, मीमांसा, चर्चा अजून थांबत नाही. त्याचे कारण ही जखम भारताच्या जिव्हारी लागलेली आहे. गांधीहत्या आणि फाळणी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...

जे.कृष्णमूर्ती : एक आनंद मेघ

जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातील एक थोर तत्त्वज्ञ होते. त्यांच्या विचारांचा गाभा या पुस्तकाच्या रुपाने वाचकांपुढे लेखिकेने ठेवला आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका पुढीलप्रमाणे आहे- मनातील संवेदनशीलता आणि करुणा जपत निरीच्छ, निर्व्याजवृत्तीचा वस्तुपाठ आमच्यापुढे ठेवणाऱ्या आमच्या वडिलांना, नरसिंह गोपाळ केसकर यांना सादर समर्पित...

गीताधर्मयोगी भिडेशास्त्री : डॉ. मीरा केसकर

आठव्या वर्षीच डोळ्यांपुढे कायमचा अंधार पसरलेला असता खेड्यात राहणारा एक मुलगा... कसा शिकतो, स्वावलंबी होतो आणि प्रगाढ विद्वान होऊन डोळस जगाचे डोळे दीपवणारा पराक्रम कसा करतो, याची ही कहाणी केवळ अद्भुत आहे. ती सत्यकथा आहे...

‘बौद्ध - मुस्लिम संबंध : आजच्या संदर्भात’ : ऐतिहासिक संघर्षाचा परामर्श

कालपटलाकडे दृष्टीक्षेप टाकला असता ‘धर्म’ या संकल्पनेबद्दलच्या मतभेदांमधून होणाऱ्या संघर्षाने प्रचंड मोठी मनुष्यहानी घडवून आणल्याचं दिसून येतं. धर्मांची निर्मिती आत्मिक उन्नती, सदाचरण अशा विविध उद्देशांतून झाली खरी पण एखादा धर्म, उपासनापद्धती मानणाऱ्या मनुष्यसमूहांनी ‘आपला धर्म, आपलं आचरण हेच आदर्श' या दृष्टिकोनातून दुसऱ्याला हीन ठरवायला सुरुवात केली. ..

शिवचलनाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख

नाणीसंग्राहकांची आपल्याकडे काही कमी नाही. काही संग्राहक हे संख्येवर भर देतात तर, काही दर्जा किंवा विशिष्ट प्रकारावर! पण एकूणच पाहता संग्राहकांचा कल हा फक्त नाणी गोळा करण्याकडे असतो आणि इथेच आशुतोष इतरांपेक्षा वेगळा ठरतो...

पुस्तक परिचय : 'प्रवास वर्णनांचा प्रवास : मराठी मुलुखगिरीचा धांडोळा'

पृथ्वीवर जीवसृष्टी स्थिरस्थावर होण्याच्या सुरुवातीच्या काळात वनस्पती वगळता अन्य सजीवांची हालचाल प्रामुख्याने अन्न मिळवण्यासाठी केली गेलेली हालचाल होती.. अन्न मिळवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती/टोकाचे हवामानबदल यापासून वाचण्यासाठी नुसती हालचाल नाही तर स्थलांतरं सुरू झाली. पक्षी, प्राणी यांनी खंडच्या खंड ओलांडले ... माणसानेही सुरुवातीला हे केलं, पण नंतर शेतीचा शोध लागल्यामुळे त्याला काहीसं स्थैर्यही आलं. इतर जीवांपेक्षा मानवाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्याने त्याची विचारांची झेप अधिक होती. ..

‘आम्ही आणि आमचे संविधान’

‘आम्ही आणि आमचे संविधान’ पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे आपल्या मनोगतात बेधडकपणे म्हणतात. एकूण १४ प्रकरणांचा आपण वादळी आढावा घेत लेखक रमेश पतंगेंचे पुस्तक पुढे जाते...

‘अमिलिया एयरहार्ट’ : आकांक्षांपुढती गगन ठेंगणे...

अमिलिया एयरहार्ट हे एक उदाहरण आहे की जिने पुरुषप्रधान असणाऱ्या वैमानिक क्षेत्रात एवढी विलक्षण चमक दाखवली की ते पाहून कित्येक महिलांनी आकाशात भरारी घ्यायची स्वप्नं पाहिली. प्रस्तुत पुस्तक अमिलियाच्या गगनभरारीचा प्रवास मांडतं. ..

'आंधळी' : फिटे अंधाराचे जाळे...

जन्मापासून माणूस काही ना काही ग्रहण करत असतो, आपल्या पंचेंद्रियांनी विश्वाचे तपशील प्राशून घेत असतो. प्रत्येक इंद्रिय त्याच्याकडे पोहोचवत असणाऱ्या ज्ञानबिंदूंची जुळवाजुळव करत तो आपल्या मेंदूत चित्रं रेखाटत असतो. जसजसे त्याचे अनुभव वाढत जातात तसतशी त्याच्या डोक्यातल्या विचार आणि धारणांची दिशा पक्की होत जाते. ..

वर्तमान संदर्भात सावरकर

१९९१ साली सोव्हिएत रशिया कोसळला आणि शीतयुद्ध संपले. अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. ही पोकळी भरून काढण्यासाठी चीन पुढे सरसावला. अफाट लोकसंख्या हाताशी उपलब्ध असणार्‍या आणि सर्वंकष साम्यवादी हुकूमशहा असणार्‍या चिनी सत्ताधार्‍यांना त्यांच्या देशांतर्गत कोणताच विरोध नव्हता..

‘मी, मनु आणि संघ' : समरसतेच्या ध्यासाचा प्रवास

पुस्तकाचं स्वरूप आत्मकथनपर असलं तरीही हे आत्मचरित्र नाही. हा आहे एका स्वयंसेवकाचा आधी कार्यकर्ता आणि पुढे तत्वचिंतक बनण्याचा असा प्रवास...

अस्सल अमेरिकेच्या आंबट-गोड आठवणी...

प्रवास हा आयुष्यालाही सर्वार्थाने प्रवाही करतो. नवे खूप काही शिकवून जातो. लोकांकडे, परिस्थितीकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोनही या प्रवासामुळे घडत असतो, बदलत असतो. हे पुस्तक वाचताना ही बाब अगदी प्रकर्षाने जाणवते...

'अष्टचक्री रोमायण' : वेडात मराठे वीर दौडले आठ !

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान या प्रांतांमधला वैराण, मातकट, खडकाळ परिसर, जनतेची बेतास बात आर्थिक परिस्थिती इथपासून ते युरोपमधील सुजलाम सुफलाम वातावरणापर्यंत टोकाच्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या...

'मुद्रणपर्व' : भाषा, कला आणि मुद्रणतंत्राच्या आकलनाचा प्रवास

पुस्तकदिनाच्या निमित्ताने मुद्रणतंत्र आणि मुद्रणकला या दोन्हींच्या उत्क्रांतीचा सखोल आढावा घेणाऱ्या 'मुद्रणपर्व' या पुस्तकाविषयी जाणून घेणं सयुक्तिक ठरेल...

चीपर बाय दी डझन’ : लेकुरे उदंड झाली !

‘चीपर बाय दी डझन’ भावण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यातली वैश्विकता. एका परक्या देशातल्या लोकांच्या राग, लोभ, प्रेम या मूलभूत भावना आपल्याहून यत्किंचितही वेगळ्या नाहीत...

‘वैभवशाली विजयनगर साम्राज्य’ : संपन्न वारशाचं देखणं दर्शन

आपल्या वैभवशाली इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणारं आणि आपल्या बुकशेल्फची शोभा द्विगुणित करणारं असं हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रहात असायलाच हवं !..

'मुक्तांगणची गोष्ट' : गर्तेतून बाहेर काढताना...

हजारो व्यसनांध माणसांचे आयुष्य रुळावर आणणारी संस्था. आपल्या नानाविध प्रयोगांमधून व्यसनमुक्तीचे काम अधिकाधिक प्रभावीपणे करत जाणाऱ्या या संस्थेचा प्रवास जाणून घेणं म्हणजे जगाच्या चांगुलपणावर आपला विश्वास अधिक दृढ करणं...

‘मेळघाटावरील मोहर’ : एक पालवी आशेची

‘मेळघाटावरील मोहर’ : एक पालवी आशेची..

'तांडव' : धर्मांध वादळात उद्ध्वस्त धर्मशाळा

गोव्यातल्या धर्मांधतेच्या नंग्या नाचाने जगण्याचे संदर्भच बदलून गेलेल्या आयुष्यांचा एका प्रतिभावान लेखकाने घेतलेला वेध म्हणजे म्हणजे ‘तांडव’ ही कादंबरी. ..

‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ : मराठी चित्रपटसृष्टीची सोनपावलं

चित्रनिर्मितीतील पाट्यांच्या इंग्रजी नावांची अडचण मा. विनायकांनी सांगताच सावरकर त्याला एकेक माराठी प्रतिशब्द सांगू लागले .....

मेट्रोमॅन श्रीधरन : कार्यक्षमतेचे दीपस्तंभ

श्रीधरन यांच्या निवृत्तीचा तपशील पुस्तकात येतो तेव्हा लक्षात येतं की अजून अर्धं पुस्तक बाकी आहे. त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य सांगणारा हा गमतीदार योगायोग. ..

द ब्लड टेलिग्राम : बांगलादेश युद्धामागच्या गुन्हेगारांचा पंचनामा

भारतीय उपखंड आणि खुद्द आपला भारतदेशही अमेरिकेच्या हीन दर्जाच्या डावपेचांमुळे होरपळून निघाला होता हे आपल्या चट्कन लक्षात येत नाही. या घटना होत्या १९७१ मधल्या, ज्यांना आपण ‘बांगलादेश मुक्तीसंग्राम’ या नावाने ओळखतो...

प्रिय रामू : हिमालयाच्या सावलीची चरितकथा

रमाबाईंच्या जीवनावर म्हणावा तितका प्रकाश पडलेला नाही असं वाटल्याने त्यांचे आयुष्य बारकाव्यांसह उभं करण्याचा ध्यास योगीराज बागुल यांनी घेतला...

एका कबुलीजबाबाची कथा...

‘उसबा’ म्हणजे काय? हाच प्रथम प्रश्न वाचकाला कादंबरीची पाने उलगडण्यास प्रवृत्त करतो...

जय महाराष्ट्र : एका वादळाचा जमाखर्च

शिवसेनेच्या प्रवासात आपुलकी आणि दहशत या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच चालत आल्या आहेत. ..

मार्क इंग्लिस : पायांचे ज्याच्या पंख झाले

जीवावर बेतू शकणाऱ्या संकटापासून ते एव्हरेस्ट चढाईची एकमेवाद्वितीय कामगिरी करून दाखवण्यापर्यंतचा हा सारा प्रवास प्रचंड थक्क करणारा आहे...