राजकारण

जीएसटीची वर्षपूर्ती, पंतप्रधानांनी राज्यांचे मानले आभार

आज जीएसटी करप्रणाली लागू होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे दिल्ली येथे मोठे आयोजन करण्यात आले आहे. या दिनानिमित्त केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्हिडियो कान्फरेंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यादिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आणि राज्यांचे आभार मानत या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रत्येक राज्याची विचारधारा वेगळी असते, वेगळ्या मतांची लोकं सत्तेवर असतात, मात्र जीएसटी मुळे सर्व राज्यांनी एकत्र येऊन देशातील सगळ्यात मोठी "एक राष्ट्र एक क

पुढे वाचा

सामाजिक सुरक्षा योजना, जनतेच्या जनतेसाठी असलेल्या योजना : पंतप्रधान

केंद्र सरकार देशातील गरीब जनतेसाठी संवेदनशील आहे, त्यांच्या प्रश्नींची उत्तरे शोधण्यासाठी केंद्र सरकारतर्फे अनेक योजना तयार करण्यात आल्या आहेत. सामाजिक सुरक्षा योजना या जनतेच्या, जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आहेत कारण देशातील वंचित नागरिकांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही, अशा भावना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी आज पंतप्रधानांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे वाचा

जम्मू काश्मीर येथे राजकीय भूकंप : भाजप सत्तेतून बाहेर

जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवादी कारवायांचे संकट उभे असतानाच आता आणखी एक राजकीय भूकंप आला आहे. जम्मू काश्मीर येथे आज भारतीय जनता पक्षाने पीडीपी पक्षासोबत असलेली युती तोडली आहे, तसेच भारतीय जनता पक्ष आता सत्तेतून बाहेर पडला आहे. आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी पत्रकार परिषद आयोजित करून ही माहिती दिली. जम्मू काश्मीर येथे वाढत चाललेल्या दहशतवादी कारवाया, त्याकडे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे दुर्लक्ष आणि संपूर्ण सत्ता हातात नसल्या कारणाने आलेली बंधनं लक्षात घेता पक्षाने हा निर्णय घेत

पुढे वाचा