पालन पोषण

तिमिरातुनी तेजाकडे...

‘डिप्रेशन’ (नैराश्य) या दुर्दैवाने सर्रास चुकीच्या ठिकाणी वापरल्यामुळे गुळगुळीत झालेल्या संकल्पनेचा खूप गांभीर्याने विचार व्हायला हवा. ‘क्लिनिकल डिप्रेशन’ ही समस्या प्रामुख्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ‘डिप्रेशन’ ही केवळ मानसिक कमजोरी नसून, विशिष्ट लक्षणांचा खरा आजार आहे...

यशाची पहिली पायरी

‘अपयश योग्य तऱ्हेने हाताळण्याचे कौशल्य’ ही अधिकाधिक दुरापास्त होत चाललेली बाब आहे...

करिअर : व्यापक संकल्पना

मानव संसाधन व्ययस्थापनाच्या अभ्यासक्रमात वापरल्या जाणाऱ्या ‘SWOT Analysis’ या तंत्राचा मुलांना लहानपणापासून वापर करायला शिकवता येईल...

माध्यमांचा कंट्रोल

एका समाजमाध्यमातील एका संकेतस्थळावर ‘Raised without Gender’ नावाचा व्हिडिओ पाहण्यात आला. स्वीडन देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत शासन पातळीवर काही योजना केल्या गेल्या आहेत. त्यानुसार मुलांना लहान संस्कारक्षम वयात शाळांमधून लिंगनिरपेक्ष शिक्षण दिले जाते. ..

समानतेचे सूत्र

जीवनावश्यक कौशल्ये मुले, मुली दोघांनाही यायला हवीत याचा आग्रह धरणे म्हणजे खरी समानता...

आंतरजालाचा गुंता

जवळजवळ प्रत्येकच घरात थोड्याफार प्रमाणात इंटरनेटवर घालवलेला वेळ व त्यातून मिळणारे एक्सपोजर ही समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर हा प्रश्न कसा हाताळता येईल, ते आपण पाहू. ..

नशेचा नाश

ड्रग्ससारखी समाज पोखरणारी गोष्ट आपल्या देशात युवा पिढीला इतकी सहजगत्या उपलब्ध आहे ही फार धक्कादायक परिस्थिती आहे...

संवादाचा पूल

तरुण मुलांच्या बाबतीत पालकांना हेतुपुरस्सर धोके पत्करणे आणि तफावतीच्या दरीवर संवादाचा पूल बांधत राहणे अत्यंत गरजेचे आहे. ..

भविष्यवेधी पालकत्त्व

तरुण मुलांशी योग्यप्रकारे संवाद साधू शकणारे पालक मुलांचा आत्मविश्वास वाढवायला खूप मदत करतात. इतकेच नाही, तर त्यातून ते स्वतःही जास्त कल्पक, भविष्यवेधी आणि सकारात्मक राहतात. ..

भावनांची उकल...

आयुष्यात यशस्वी आणि समाधानी होण्याच्या प्रक्रियेतील भावनिक बुद्धिमत्तेचे स्थान महत्त्वाचे आहे. ..

माझे ‘मी’पण घडवताना...

‘परिस्थिती माणसाला खूप शिकवते,’ या उक्तीची उदाहरणे आपण भोवताली पाहतो. कुठलीही परिस्थिती हाताळण्याची ताकद मात्र घराघरांतील वातावरणातून, संस्कारांतून उमलत्या वयात मुलांना मिळते. ..

ऊर्जेचे आरसे

मुलांच्या चर्चेतून त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन लक्षात येतो. पौगंडावस्थेतील मुलांच्या अपरिमित ऊर्जेला चालना देणे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रेरणेने मुलांच्या स्व-निर्मितीला हातभार लावू शकतील..

चांगली व्यक्ती

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बौद्धिक क्षमतेइतकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहेत ती जीवनावश्यक कौशल्ये!..

संवादातील समतोल

टीनएज वयोगटातील मुलांशी संवाद जितका मुक्त आणि दुहेरी होईल; त्यामध्ये मुलांना त्यांचे विचार, भावना मांडण्याची संधी मिळेल तितकी ही मुले पालकांशी जास्त जोडली जातात. ..

‘ते’ शिक्षण

लैंगिकतेविषयीचे योग्य शिक्षण हे मानवी विकासातील फार महत्त्वाचे शिक्षण आहे. वास्तविक पाहता, या शिक्षणाची प्रक्रिया जन्मापासून प्रौढत्वापर्यंत आणि नंतरही निरंतरपणे चालत राहणारी आहे...

पुत्रे मित्रवदाचरेत!

पौगंडावस्थेतील मुले ‘अबोल’ झाली आहेत अशी तक्रार बहुतांश पालकांकडून येते. या वयातील मुलांचे पालकत्व हा, मुलांनी आखलेल्या रेघेच्या एक पाऊल आत आणि दुसरे बाहेर ठेऊन खेळण्याचा, अवघड खेळ आहे खरा. पण, आपल्या मुलांचा स्वतंत्र वैचारिक विकास आपल्या डोळ्यासमोर होताना अनुभवणे यासारखे दुसरे बक्षीसही नाही. ही कसरत जमत गेली की मग मुलांचे कात्रीत पकडणारे प्रश्नही सक्षमपणे हाताळता येतात. ..

वादळाचे आत्मभान

‘टीनएज’ नावाच्या या ‘एज ऑफ स्टॉर्म अॅण्ड स्ट्रेस’ला हाताळताना पालकांनी अधिक संवेदनशील, मनमोकळे असायला हवे. आत्मभानाच्या मार्गाने स्व-निर्मितीकडे जाणाऱ्या या प्रवासाला दिशा देणे ही मोठी रोमांचक प्रक्रिया आहे. ..

गुणसुमनांचा आदर्श

स्वतःच्या स्व-भावाची उकल करण्याच्या मुलांच्या या वयात ‘हिरोवर्शीप’ अर्थात ‘व्यक्तिपूजा’ हा टप्पा बऱ्याचदा येतो. अशावेळी हे ‘हिरो’ कोण आहेत, यावर त्या पूजेचे फलित काय असणार ते अवलंबून असते...

‘स्व-निर्मिती’ची दिशा

आपले प्रश्न कमी करून मुलांना प्रश्न विचारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. मुलांना बोलते करण्यासाठी बहुतांश वेळा पालकांनी केवळ संयमी श्रोता होणेही पुरेसे असते. ‘स्व-निर्मिती’च्या या प्राथमिक टप्प्यामध्ये मुलांवर शिक्कामोर्तब करणे व त्यांची इतरांशी तुलनाकरणे कटाक्षाने टाळावे...

तळ्यात-मळ्यात...

आपल्या मुलांना हळूहळू जास्त सशक्त अशा ‘स्व’ निर्मितीकडे वाटचाल करायला शिकवणे, आपल्या मुलांचे लहानपणापासून निरीक्षण करत असल्याने त्यांचे मूड्स, अबोला, अस्वस्थता याचे संकेत अश्या अनेक लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये होणाऱ्या मानसिक परिणामांचा लेखाजोखा डॉ. गुंजन कुलकर्णी यांनी मांडला आहे.....

स्वावलंबनाचा संस्कार

संस्काराचा उद्देश काय? त्यानंतर मुलांकडून व पालकांकडून काय अपेक्षित आहे? याची माहिती जाणीवपूर्वक घेणे आणि त्यातील महत्वाच्या गोष्टी कालानुरूप अंगिकारणे आवश्यक आहे...

मायाजाल की आठवणींचा गोफ?

’इंटरनेट, गॅजेट्सचे मुलांमध्ये वाढणारे वेड’ असा विषय असलेल्या या सत्राची सुरुवात तर छान सकारात्मक झाली होती...

लर्निंग डिफरंटली...

मुलांच्या वाचन, लेखन, आकडेमोड तसेच इतर शैक्षणिक कौशल्यांचे जाणीवपूर्वक निरीक्षण करणे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे खूप आवश्यक आहे. त्यातून मुलांना त्यांच्या वेगळ्या क्षमतांशी जुळवून घेत प्रगती करणे शक्य होते...

...कारण अभ्यास

आपली सध्याची शिक्षण पद्धती ‘अभ्यास’ या शब्दाचा किती संकुचित अर्थ मुलांसमोर मांडते! ‘शालेय विषयांच्या पाठांचा सराव म्हणजे अभ्यास’ ही किती त्रोटक व्याख्या केली आहे आपण अभ्यासाची?..

पालक-शिक्षक संवाद प्रक्रिया

मुलांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक ऊर्जेला दिशा देण्याचे काम करण्यासाठी पालक आणि शाळेमध्ये सहकार्य हवे..

शाळा कुठली?

आपल्या कुटुंबातील मूल्यांच्या आधाराने ज्या शाळेशी आपण जास्त चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतो, त्या शाळेची निवड आपल्या मुलांसाठी करणे जास्त श्रेयस्कर आहे...

दुधावरची साय

'अशा विसंवादी वातावरणात मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागते,' हे मी नमूद केल्यावर या आईला अश्रू अनावर झाले...

बोले तैसा चाले...

पालकत्वाचा प्रवास आपल्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला आत्मशोधाकडे नेणारा असेल..

भाषा भावनांची...

"आजकाल खूप उद्धटपणाने बोलायला लागला आहे. आत्ताशी चार वर्षांचा आहे, पण सर्रास उलट उत्तरं देतो. राग तर सतत नाकावर बसलेलाच. शाळेतूनही तक्रारी यायला लागल्यात आता, की हा इतर मुलांना मारतो, ढकलतो, चिमटे काढतो म्हणून. खेळतानाही सारखी मारामारीची आणि लढाईचीच भाषा. ..

सकारात्मक शिस्त

त्रासदायक भावनांमधून नकळतपणे प्रवास केल्यानंतर मग ‘मूल कोडगे झाले आहे’ अशी तक्रार घेऊन पालक येतात. मुलांच्या या ’कोडगेपणा’ने पालक खूप दुखावतात व हतबल होतात...

बंध मैत्रीचे...

उगाचच कृत्रिमता न आणता आपल्याला हव्या असलेल्या अटी व निर्बंधता न लादता मैत्रीला मुक्तपणे फुलू द्या आणि मग पाहा तिचा प्रभाव...

मुलांच्या मनाची कवाडे

मुलांच्या कलाने त्यांच्याबरोबर खेळणे’ ही गोष्ट पालकांनी दिवसभरातून 15 मिनिटे जरी अंमलात आणली तरी त्यातून निर्माण होणारे बंध खूप घट्ट व शाश्वत ठरतात...

विकासाची पायाभरणी

जर्मन-अमेरिकन मानसतज्ज्ञ एरिक्सनच्या मते, मूल तान्हे असताना त्याचे भावनिक शिक्षण प्रामुख्याने आशावादावर आधारित असते...

अभ्यासपूर्ण जगण्याची कला

आजचा काळ शैक्षणिकदृष्ट्या अटीतटीचा आहे. जो शिक्षणात व परीक्षांत टिकला, तो पुढे गेला, तोच आयुष्यात पुढे जाईल, या पालकांच्या सर्वसाधारण मताला आव्हान देणे तसे कठीणच आहे. तरीही पालकांनी आपल्या मनावर दबाव आणून, त्यांच्या अभ्यासात किंवा परीक्षेच्या तयारीत सुधारणा होईलच, याची ग्वाही देता येत नाही. ..

नेचर की नर्चर ?

नेचर की नर्चर, निसर्ग की संगोपन, कशाची भूमिका मानवी विकासात जास्त महत्त्वाची आहे? हा फार सनातन प्रश्न आहे. विकासाचे मानसशास्त्र याचा दोन अंगांनी विचार करते...

पालकत्वाच्या पतंगाची दोरी....

पालकांच्या हातातील मुलांच्या पतंगाची दोरी त्या पतंगाला उंचीवर उडवते खरी, पण इतर अधिक सक्षम पतंगांच्या दोर्‍यांनी ती सहज कापली जाते. तो पतंग दिशाहीन भरकटतो आणि कुठे जाऊन पडतो याची जाणीवही पालकांना होत नाही. मुलांच्या आयुष्यातही नेमके असेच होते. ..

सृजनोत्सव...

इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवी मूल हे जन्माला येताना आणि त्यानंतरही बराच काळ पालकांवर अवलंबून असते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, जन्माच्या आधी गर्भावस्थेत मुलांचा भावनिक विकास होत नाही. ..

अवास्तव अपेक्षांच्या ओंजळीत...

आजकालच्या पालकांनी जमिनीवर पाय ठेवून चालणे आवश्यक आहे. वास्तवाचे पूर्ण भान ठेवायला पाहिजे. आपण असामान्य पालक आहोत आणि आपले मूल जणू एक राजकुमार आहे व त्याने पुढे भविष्यात राजाच व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवून चालणार नाही. मुलं काही काळानंतर पालकांच्या सुरक्षाकवचातून बाहेर पडतात व त्यांना पंख फुटतात हे सत्य आहे...

कशासाठी? स्वतःसाठी!

मुलांवर जीवापाड प्रेम करत, त्यांच्यात आपले सर्वस्व गुंतवून, आपली सगळी कल्पकता वापरून, त्यांना अतिशय सबल बनवणे; जेणेकरून एक दिवस ती आपला हात सोडून इतकी उंच भरारी घेतील की जिथे आपली नजरदेखील पोहोचू शकणार नाही, असा हा पालकत्वाचा प्रवास पालकांनाही खूप शिकवणारा आणि समृद्ध करणारा असतो. ..

मूल वाढवताना...

'Developmental disorders' म्हणजे काय? तज्ज्ञांचा सल्ला कधी, कसा उपयोगी आहे? या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण ‘रुजवात’ या नवीन सदरातून दर रविवारी करणार आहोत...