पालघर

नागरिकांच्या सहकार्यातूनच विकास साध्य करू शकतो - खा. चिंतामण वनगा

जिल्हा विभाजनानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या अनेक गाठीभेटीतून, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पालघर हा आदर्श जिल्हा म्हणून निर्माण होत असून शासनाच्या ३१ हजार कोटी रुपयांच्या निधीतून पालघर जिल्ह्यात अनेक मोठ मोठे प्रकल्प निर्माण केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्र्यांच्या माध्यमातून केळव्याचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास करण्याचा प्रयत्न असून नागरिकांच्या सहकार्यातूनच हा विकास आपण साध्य करू शकतो, असे प्रतिपादन खासदार चिंतामण वनगा यांनी केले. ‘केळवे बीच पर्यटन महोत्सव २०१८’ च्या कार्यक्रमाप्

पुढे वाचा

१५ वर्षांपासून सफाळेतील रस्त्याची अवस्था बिकट

सफाळे पश्‍चिमेकडील तिघरे-अंबोडे-दांडाखाडी-खटाळी-मधुकरनगर गावातील रस्त्यांची गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झाली असून संबंधित शासकीय अधिकारी नागरिकांच्या मागणीनंतरही सदर रस्त्यांची डागडुजी करण्यास उदासीनता दाखवीत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाखांचा निधी मंजूर होऊन स्थानिक आमदारांनी दि. ४ मार्च रोजी या रस्त्यांचे भूमिपूजन केले. मात्र, अद्याप रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे रस्त्यावरचे उरले-सुरले डांबर आणि मातीही निघून गेल्याने रस्त्याची पूर्णतः चाळण

पुढे वाचा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत वाहतूक सर्व्हे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएकडून प्राधिकरणाच्या अंतर्गत असणार्‍या रस्त्यावरील वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीचा सर्व्हे ली असोसिएशन साऊथ एशिया प्रा. लि. कापूरबावडी, ठाणे या खाजगी कंपनीमार्फत करण्यात येत आहे. यामध्ये प्रवासी वाहने, माल वाहतूक करणारी वाहने, खासगी व रस्त्यावर धावणारी इतर वाहने यांचा सर्व्हे करण्यात येत असून प्राधिकरणांतर्गत येणार्‍या रस्त्यावरील २९ ठिकाणांवर दि. २९ सप्टेंबरपर्यंत सोमवार ते शुक्रवार या प्रत्येक दिवशी दोन ठिकाणी हा सर्व्हे करण्यात येत आहे.

पुढे वाचा

वसई ग्रामीण भागात हंगामी किवाची मासेमारी

मागील आठवड्यात जोरदार पावसामुळे वसईतील परिस्थिती ही पूरसदृश्र बनली होती. ग्रामीण वसईतील सखल भागात जिकडे तिकडे पाणी साठले होते. नद्यानाले ओसंडून वाहत होत्या तर शेतीमध्येही पाणीच पाणी येऊन पिके बुडाली होती. तालुक्यातील मुख्य नदी असलेल्रा तानसा नदीचा प्रवाह अत्यंत तीव्र होऊन किनाऱ्याबाहेर पाणी आल्याने नदीला जोडणारे नाले, उपनद्या व डोंगरी भागातून वाहणारे ओहोळ तुडुंब भरून वाहत होते. यामुळे पाण्राच्या ओघाने मुख्य नदीतील लहानमोठे मासेही पाणी आलेल्या भागात चढले होते. आता पाणी पूर्णपणे ओसरले असले तरी ओहोळ, नाले व उप

पुढे वाचा

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘वसईच्या राजाची’60 वर्षांची वाटचाल

अ वसई तालुक्यातील पारनाका येथील सर्वात जुने गणेशमंडळ असलेल्या ’वसईच्या राजाला’ यंदा 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. सन 1957 मध्ये अनेक समाजसुधारकांनी एकात्मतेचा संदेश देत हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. सन 1998 पर्यंत हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात सुरू होता. त्यानंतर सन 1999 साली हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या घोषणेने भारतीय विद्यार्थी सेनेच्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी प्रेरित होऊन पुढे सरसावत सार्वजनिक गणेशोत्सव थाटात व समाजोपयोगी उपक्रम राबवित साजरा करण्याचा विडा उचलत धुरा आपल्

पुढे वाचा

पर्यटनाच्या माध्यमातून जव्हारच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

अ पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. जव्हार नगर परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त ते बोलत होते. चांगले रस्ते जव्हार शहराच्या पर्यटनाला चालना देऊ शकतील. त्यामुळे जव्हारच्या भवती चांगल्या रस्त्यांचं जाळं विणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पुढे वाचा

‘भारतीय मजदूर संघ’ तर्फे रुग्णांना रक्षाबंधन

रक्षाबंधन हा सण बहीणभावाच्या नात्यापर्यंत सीमित न ठेवता प्रत्येकाने प्रत्येकाला या राखीच्या बंधनाने बांधून एकमेकांचे रक्षण करून देशाला अत्युच्य शिखरावर नेत भारतमातेचे रक्षण करावे हा संदेश दिला. वसई जनता सहकारी बँकेचे कर्मचारी महासंघाचे जुने कार्यकर्ते भाईंदरचे शाखाधिकारी महेश राव यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रमघेण्याची कल्पना सुचवली. जिल्ह्याचे महामंत्री चंद्रकांत नेवे यांनी ही कल्पना उचलून धरली व तीन ते चार दिवसांत सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वीज उद्योगातील कामगार महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाव

पुढे वाचा

वसई रेल्वे स्थानक अद्ययावत सुविधांनी सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरू - चिंतामण वनगा

गुजरातपासून येथील नायगावपर्यंत रेल्वेच्या चौपदरीकरणाचे कामयुद्ध पातळीवर सुरु आहे. यासाठी यासाठी २ हजार ५०० कोटींची तरतूद केली असून हे काम२०२२ -२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास खा. ऍड चिंतामण वनगा यांनी केला. वसई रेल्वे परिषदेचे चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रेल्वेचे अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्या दिवशी या रेल्वे प्रवासी परिषदेचे अध्यक्ष पद स्वीकारले त्यानंतर लगेचच रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याशी येथील प्रवाशांच्या समस्यांबाबत

पुढे वाचा

वसईमध्ये टँकरचे गढूळ पाणी; सामान्यांच्या आरोग्याशी होतो खेळ

वसई-विरार क्षेत्रात आजही नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले असले तरी पालिका क्षेत्रातील अनेकांचे निरनिराळे प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. मग त्यात पाण्याचा प्रश्‍न असो, रस्त्यांची दरवर्षी होणारी दुरवस्था असो किंवा अन्य कोणतीही समस्या. गेल्या चार-पाच वर्षांपासून पालिका क्षेत्रामध्ये तांत्रिक कारणांमुळे नव्या पाण्याच्या जोडण्या देण्यात येत नव्हत्या. त्यातच मोठ्या प्रमाणात वाढते नागरिकीकरण आणि पाण्याच्या टंचाईमुळे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टँकरच्या पाणीपुरवठ्याची गरज भासू लागली.

पुढे वाचा