आमची सदरे

रासायनिक कीटकनाशकांना पर्याय गोशेतीचा

 यवतमाळ जिल्ह्यात सोयाबिन आणि कापूस या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करणार्‍या शेतकर्‍यांना विषबाधा होऊन त्यात १९ जण मृत्युमुखी पडल्याच्या घटनेने रासायनिक औषधांचे दुष्परिणाम आणि सुरक्षित शेती हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, साडेपाचशे लोकांना श्‍वसनातून विषबाधेचा तीव्र त्रास झाला आहे. गेली पन्नास-साठ वर्षे चालत आलेला हा रासायनिक खतांच्या बेसुमार वापराच्या सवयीचा परिणाम म्हणावा लागेल. रासायनिक खतांच्या या दुष्परिणामाबाबत काय निर्णय घ्यायचा तो सरकार घेईलच, पण गेल्या तीन वर्षांत गोविज्ञानाच्या

पुढे वाचा

#शिल्पकथा : उदयगिरीचा शेषशायी नारायण 

हिंदू उपासनापद्धतीमध्ये त्रिमूर्तींची कल्पना आहे. सृष्टीच्या तीन अवस्था आपण मानतो, निर्माण, पालन आणि संहार, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात तर श्रीविष्णू सृष्टीचे पालन करतात आणि शिवशंकर सृष्टीचा संहार करतात असे आपण मानतो. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर ह्यांनी आपल्या विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम ह्या पुस्तकात विष्णू ह्या नावाची उत्पत्ती सांगताना असं म्हटलं आहे की जो चराचर भूतांच्या ठिकाणी प्रविष्ट असतो तो श्रीविष्णू. पार ऋग्वेदापासून आपल्याला श्रीविष्णूचे उल्लेख आढळत

पुढे वाचा