नाशिक

आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याचे महापौरांचे आदेश 

आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. साथीचे आजार पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. शहरात डेंग्यू व स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. त्यामुळे काहीवेळ सभागृहात गदारोळ झाला. शिवसेना नगरसेवक तोंडावर ‘मास्क’ लावत पालिका सभागृहात दाखल झाले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीनेही अस्वच्छता व कचर्‍यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याचे टीकास्त्र सोडले. आरोग्य विभागाच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन महापौ

पुढे वाचा

कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १८ लाखांवर शेतकर्‍यांनी केली नोंदणी

राज्य सरकारने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शासनातर्फे आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार २६४ शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे तर नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतून सुमारे १८ लाख १८ हजार ८२६ शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली आहे. ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे तर कर्ज परतफेड करणार्‍यांना २५ टक्के तर कमाल २५ हजार र

पुढे वाचा

हार जीत नसल्याने लोकअदालत यशस्वी - जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे

लोकअदालतमध्ये दोन्ही बाजूंचे श्रम, पैसा, वेळ वाचतो. तसेच दोन्ही पक्षांना न्याय मिळत असल्याने हार-जीत नसते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लोकअदालत यशस्वी झाल्याचे मत प्रधान सत्र आणि जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले. जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार द़ि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्हा न्यायालयाने इतिहास रचत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत राज्यात सर्वाधिक दावे निकाली काढण्याचा विक्रमप्रस्थापित केला आहे़. या पार्श्वभूम

पुढे वाचा

वनवासी आश्रमातर्फे ‘वनभाजी महोत्सव’ उत्साहात साजरा

सुरगाणा तालुक्यातील रगत विहीर येथे वनवासी कल्याण आश्रम गुही व रगत विहीर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रगत विहीर या ठिकाणी ’वनभाजी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या भागातील सहा बचत गटाच्या ६३ महिलांनी पाककृतीत सहभाग घेतला होता. वनवासी बांधवांकडून या ठिकाणी वनभाजी महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला होता. हे बांधव जंगलात राहून जंगलातील अमूल्य अशा ठेव्याचा आस्वाद घेतात, हे सर्वसामान्य माणसांना माहीत नव्हते. तसेच यांच्या परंपरागत बाबींची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन क

पुढे वाचा

क्रीडा संकुल आणि सिंथेटिक ट्रॅकसाठी  प्रयत्न करू: कुलगुरू डॉ. करमाळकर

तैवानमध्ये तैपाई येथे झालेल्या १० हजार मीटर जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणार्‍या भोसला मिलिटरी कॉलेजची विद्यार्थिनी संजीवनी जाधव व विद्यापीठातील अन्य सहभागी खेळाडू किसन तडवी, कांतीलाल कुंभार, शरयू पाटील व मार्गदर्शक विजेंद्रसिंग यांचा जाहीर सत्कार सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे भोसला मिलिटरी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भोसला मिलिटरी स्कूलच्या मुंजे सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, क्रीडा मंडळ संचालक डॉ. दीपक माने, पुणे यांच्या प्रमुख उ

पुढे वाचा

बाललैंगिक अत्याचार जागृती यात्रेचे आयोजन ;कैलाश सत्यार्थींचे मार्गदर्शन

भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कारप्राप्त कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रेन फाऊंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने दि. ११ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंत कन्याकुमारी ते दिल्ली अशी ११ हजार किलोमीटरची ’भारतयात्रा’ काढण्यात येणार आहे. सदर यात्रा दि. २९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे दाखल होणार आहे.

पुढे वाचा

नाशिकमध्ये निघणार अनेक विसर्जन मिरवणुका

गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या गणेश उत्सवाचे स्वरूप पालटले असून शहराच्या विविध भागात होणारा उत्सव लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मिरवणुका निघणार असून त्याचा मार्ग पोलिसांनी निश्‍चित केला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अधिसूचना काढून नाशिक शहर, नाशिकरोड, गंगापूर या ठिकाणच्या मिरवणूक मार्गांत बदल केले आहेत. मंगळवारी दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गाऐवजी पर्यायी मार्गांचा वाहनचालकांनी वापर करावा, असे आवाहन पा

पुढे वाचा

गणपती आरतीचा मान वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयातील गणपती आरतीचा मान आज नाशिक येथील वात्सल्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा शितलताई सांगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, नगरसेवक राकेश दोंदे, नगरसेविका स्वातीताई भामरे, भारतीताई बागुल, रेडिओ मिरची आरजे भूषण यांनी गणपती पूजनासह यावेळी उपस्थितांसोबत गप्पा मारल्या व सर्वांनी सोबत अल्पोपहार केले. उपस्थितांपैकी शैलजा वाघमारे आजी, जॉनी बाबा, दावडा बाबा या सर्वांनी स

पुढे वाचा

भोसला मिलिटरी स्कूलचा ८० वा वर्धापनदिन उत्साहात

मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूलचा ८० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांसोबत सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिकचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी शहीद स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले . तसेच संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या समाधीस प्रमुख पाहुण्यांनी माल्यार्पण केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ

पुढे वाचा

उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे तंतोतंत पालन - विखे पाटील यांची टीका

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून नाले साफ केल्याचा दावा केला होता. मग संपूर्ण मुंबईत पाणी साचले कसे? असा सवाल उपस्थित करून महापालिकेने नेमकी कोणाची सफाई केली, अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच पावसाच्या काळात घराबाहेर पडू नका, या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केले. त्यामुळेच मुंबईकरांची झालेली अवस्था पाहण्याचे धाडस ते करू शकले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. काल नाशिक येथे माध्यमांच्या प्रतिनिध

पुढे वाचा

भोसलाची आंतरराष्ट्रीय विजयाची परंपरा

महिनाभरापूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या २२व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून देणार्‍या संजीवनी जाधवने पुन्हा आंतरराष्ट्रीय विजयाची परंपरा राखली आहे. तैवानमध्ये ताईपे येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. तिने यावेळी स्वतःची सर्वोत्तमवेळ नोंदवली आहे. ३३ मिनिटे २२ सेकंद. प्रथमक्रमांक आणि तिच्यातील अंतर तीन सेकंदाहून कमी आहे. याअगोदर आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तमकामगिरी करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेल्या कलिंगा स्टेडियमवर २२ व्या आशियाई स्पर्धेत संजीवनी जाधवने भोसला

पुढे वाचा

बाजार समितीच्या अवैध व्यवहारांवर पांघरूण नको!

नाशिक बाजार समिती बरखास्त होणार असल्याची चर्चा विविध वृत्तपत्रांतून वाचायला मिळत आहे. आपल्या सरकारने नाशिक बाजार समितीबाबत निर्णय घेताना गेली २० वर्षे या संस्थेत भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या आणि शेतकर्‍यांचे शोषण केलेल्या संचालक मंडळाला कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यातील कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या अवैध कारभारावर पांघरुण घालण्याची कृती अथवा संधी शासनाने देऊ नये, असे विनंती पत्र भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘मनोगत’चे समन्वयक रवींद्र अमृतकर यांनी मुख्यमंत्री

पुढे वाचा

चीनला प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज : व्हाईस ऍडमिरल सिन्हा

चीनला प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज असल्याचे प्रतिपादन निवृत्त व्हाईस ऍडमिरल शेखर सिन्हा यांनी केले. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या दर महिन्याच्या विशेष व्याख्यान मालिकेतील सत्रात समुद्री कार्यक्षेत्र व नौदल हवाईक्षेत्र यातील भारतीय सद्यस्थिती या विषयावर व्हाईस ऍडमिरल शेखर सिन्हा (निवृत्त) बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष अतुल पाटणकर, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष आशुतोष रहाळकर, प्राचार्या डॉ. सुचेता कोचरगावकर, लेफ्टनंट कमांडर एस. डी. कुलकर्णी आदी मान्यवर

पुढे वाचा

भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी पूर्ण केली रेस

नाशिकच्या सायकलिस्ट ने जगभरातील सायकलिंग स्पर्धा जिंकण्याचा जणू धडाकाच लावला असून लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराऊंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण करत विक्यम केला आहे. रेस अराऊंड ऑस्ट्रिया ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय बनले असून नाशिकच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवण्यात ते यशस्वी झाले आहेत. लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे नाशिक आर्टीलरिच्या स्पेस सेंटरमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअर असून ब्रेवेट उपक्यमातून त्यांनी रॅन्डोनर सायकलिस्ट आहेत, तर सुपर रॅन्डोनर सायकलि

पुढे वाचा