नागपूर

भय्याजी जोशी चौथ्यांदा सरकार्यवाहपदी प्रतिनिधी सभेत एकमताने निवड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची पुन्हा सरकार्यवाहपदी निवड केली आहे. सुरेश उपाख्य भय्याजी जोशी चौथ्यांदा सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळतील. अशी माहिती संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेचा आजचा दुसरा दिवस होता आणि आज सरकार्यवाहांची निवड होणार होती. त्यामुळे उत्सुकतेने भारलेल्या माध्यम प्रतिनिधींनी रेशीमबाग येथे गर्दी केली होती.

पुढे वाचा

कृषी विकासासाठी बहुआयामी धोरण आवश्यक : उपराष्ट्रपती

मध्य भारतातील सर्वात मोठ्या अ‍ॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सायंकाळी स्थानिक रेशीमबाग मैदानावर करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्धव्यवसायमंत्री महादेव जानकर, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, खा. कृपाल तुमाने, जिप अध्यक्ष निशा सावरकर, सल्लागार डॉ. सी. डी. मायी, संयोजन सचिव गिरीश गांधी, रमेश मानकर, रवींद्र बोरटकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस

पुढे वाचा

दसऱ्यादिवशी नागपूर मेट्रोची पहिली चाचणी फेरी

उद्या नागपूर मेट्रोची पहिली चाचणी फेरी होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित असणार आहेत. माझी मेट्रो असे नामकरण झालेली ही मेट्रो मुंबईनंतर महाराष्ट्रातील दुसरी मेट्रो आहे. यावेळी मेट्रो प्रवाशांकरिता स्मार्ट मोबिलीटी कार्ड, महा कार्डचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर मेट्रोची सुरुवात करून वाहतूक व्यवस्थेला गती देण्याचा हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. उद्या सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम नागपूरमधील मिहा

पुढे वाचा