न मम..

श्रीमंत सलमान आणि गरीब सलमान...

पुढे पहा

दोन्ही प्रकारच्या युक्तिवादात, न्यायालयाला आपला विवेक व समबुद्धी शाबूत ठेवून, निर्णय द्यायचा असतो. कारण या निर्णयावरच, किती प्रमाणात न्याय मिळाला, हे समाज ठरवीत असतो. गुन्हेगारांना शिक्षा ठोठावली नाही किंवा सौम्य प्रमाणात शिक्षा केली तर, राज्याच्या दंडशक्तीचा धाक समाजात कमी होण्याची भीती असते...

डेटा चोरी प्रकरणापासून बोध

पुढे पहा

आपल्या भारतात नाही का होत हे असले? त्यामुळेच तर निवडणूक आयोगाने कितीतरी नवनवे कडक नियम तयार केले आहेत. मतदानाच्या आधी दोन दिवस जाहीर प्रचार बंद वगैरे अशा अनेक अटी आपल्या येथे आहेत. त्यामुळे मतदारांना प्रभावित करणे, हा काही मुद्दा होऊ शकत नाही. प्रश्न, मतदारांनी स्वत: प्रभावित व्हायचे की नाही हे ठरविण्याचा आहे. गेली कित्येक वर्षे, सत्तारूढ कॉंग्रेस पक्ष सर्व प्रकारची आयुधे वापरून मतदारांना प्रभावित करून निवडणुका िंजकून येतच होता ना!..

श्रमाची आणि घामाची लाज...

पुढे पहा

नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आश्वासित केल्यानुसार रोजगार निर्माण झाले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार केला जातो. हा तसा फार सोयीचा आरोप आहे. सरकारने कितीही आकडेवारी समोर ठेवली, तरी पुढची व्यक्ती ही आकडेवारी सहजतेने नाकारू शकते आणि लोकांचा त्यावर चटकन विश्वास बसतो. झी टीव्हीवर काही दिवसांपूर्वी दाखविलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बेरोजगारीच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला...

तीन राज्ये, पाच खासदार...

पुढे पहा

स्वतंत्र भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात ईशान्य भारतातील राज्यांच्या निवडणुकींकडे कुणाचेच लक्ष नसायचे. 2018च्या निवडणुकीने मात्र केवळ भारताचेच नाही, तर जगाचेही लक्ष वेधून घेतले आहे. याचे श्रेय नरेंद्र मोदींनाच द्यावे लागेल. त्रिपुरातील कम्युनिस्टांची सत्ता निर्णायकपणे उलथवून तिथे आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आहे. त्रिपुरात 1978 ते 2018 या 40 वर्षांच्या काळात 1988 ते 1993 ही पाच वर्षे सोडली, तर उर्वरित काळात कम्युनिस्टांचेच सरकार होते. यावरून भाजपाच्या या विजयाची महत्ता लक्षात येईल. भाजपाच्या ..

अपारंपरिक, समाजाभिमुख शंकराचार्य...

पुढे पहा

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती समाधिस्थ झालेत आणि भारतातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले. ते ब्रह्मलीन झालेत आणि या जिवा-शिवाच्या मिलनात, खुनाच्या आरोपाची त्यांची वेदनाही विरघळून टाकली असेल, निश्चित. त्यांनी त्यांच्या परीने त्यांचे कर्तव्य केले; परंतु, हिंदू समाजाने, शंकराचार्यांच्या तपस्वी जीवनावर लावण्यात आलेला खुनाच्या आरोपाचा कलंक कधीही विसरता कामा नये. तो न विसरणे हे आपले कर्तव्य आहे...

कमल हसन यांचा नवा राजकीय पक्ष

पुढे पहा

दक्षिणेतील सुप्रसिद्ध व प्रतिभावंत अभिनेता कमल हसन यांनी अखेर बुधवार २१ फेब्रुवारी रोजी राजकीय क्षेत्रात अधिकृतपणे पदार्पण केले आणि नवा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाचे नाव आहे-मक्कल नीधि मैअम. याचा तामीळ भाषेत ढोबळ अर्थ आहे- जनतेच्या न्यायाचा मंच. कमल हसन यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि ध्येयधोरणेही घोषित केली आहेत. भारतीय राजकारणात आणि विशेषत: तामिळनाडूच्या राजकारणात ही धक्कादायक घटना म्हणता येणार नाही. कारण, आपण राजकीय पक्ष स्थापन करणार, हे बऱ्याच आधीपासून कमल हसन यांनी जाहीर केले होते. ..

शिवाजी महाराजांचे ‘शिवाजीपण!’

पुढे पहा

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महापुरुषांचे सम्यक् आकलन होण्यास दृष्टीही आभाळासारखीच व्यापक, सखोल लागत असते. ही दृष्टी फारच कमी लोकांकडे असते. आपल्यासारखे सर्वसामान्य ‘संकुचित’ दृष्टीने या महापुरुषांचे आकलन करीत असतात. त्यांच्या कवेत या महापुरुषाचा जो पैलू आला, त्यालाच ते त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजून बसतात. त्यात त्यांचाही काही दोष नसतो. कारण तुमच्याजवळ ज्या आकाराचे भांडे असेल, तेवढाच समुद्र तुमच्याकडे येत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अगदी हेच घडले आहे. आम्ही त्यांचा एकेक पैलूच घेऊन बसतो ..

शिवाजी महाराजांचे ‘शिवाजीपण’

पुढे पहा

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महापुरुषांचे सम्यक् आकलन होण्यास दृष्टीही आभाळासारखीच व्यापक, सखोल लागत असते. ही दृष्टी फारच कमी लोकांकडे असते. आपल्यासारखे सर्वसामान्य ‘संकुचित’ दृष्टीने या महापुरुषांचे आकलन करीत असतात. त्यांच्या कवेत या महापुरुषाचा जो पैलू आला, त्यालाच ते त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजून बसतात. त्यात त्यांचाही काही दोष नसतो. कारण तुमच्याजवळ ज्या आकाराचे भांडे असेल, तेवढाच समुद्र तुमच्याकडे येत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अगदी हेच घडले आहे. आम्ही त्यांचा एकेक पैलूच घेऊन बसतो ..

डार्विन, डार्विन काय म्हणतोस...

पुढे पहा

केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताबाबत वेगळे मत मांडले, स्पष्टच बोलायचे झाले, तर त्यांनी डार्विनचा उत्क्रांतिवाद चूक असल्याचे मत मांडले आणि भारतात बौद्धिक गुलामांचा गदारोळ सुरू झाला. गंमत म्हणजे, काही राजकीय पक्षांनी, डॉ. सत्यपाल सिंह यांचे मत म्हणजे जणूकाही भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक जाहीरनाम्यातील एक कलम आहे, असे गृहीत धरून आपला पारंपरिक काक-विरोध सुरू केला. ..

समता : राजकीय, आर्थिक व सामाजिक

पुढे पहा

राजकीय, आर्थिक व सामाजिक समता या तीन भिन्न अवस्था आहेत. संविधानामुळे राजकीय समता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला, तरी त्यामुळे आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित होईलच असे नाही. ..

सरकारी हस्तक्षेप वाईट असतोच असे नाही!

पुढे पहा

सरकारी हस्तक्षेप आला की भ्रष्टाचाराचा शिरकाव होतो, याचा सर्वांनाच अनुभव असेल. शेतकर्‍यांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर त्यांना एकाधिकार कापूस खरेदी योजनेचा चांगलाच अनुभव आहे. राज्याचे माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांच्या संकल्पनेतून एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू झाल्याचे सांगितले जाते. मूळ उद्देश फार चांगला होता...

मॅकोलेपुत्री निधी बहुगुणांचे संघीकरण!

पुढे पहा

स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षणपद्धतीने ही भारतीयत्वाची स्पंदने दडपून टाकण्याचे काम केले. खोटानाटा इतिहास, दंतकथा सांगून भारतीय विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचे काम केले. परंतु, ज्या वेळी या तरुणांना, आपल्याला फसविले गेल्याचे लक्षात येते, तेव्हा ही मंडळी ज्या त्वेषाने सक्रिय होतात, हे बघण्यालायक असते. अशीच कथा निधी बहुगुणा यांची आहे. इतिहासाचे अन्वेषण करणे हा त्यांचा छंद आहे. जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांच्या संदर्भात त्या तज्ज्ञ मानल्या जातात. ‘मॅकोलेपुत्री ते राष्ट्रवादी’ हा त्यांचा प्रवास त्यांनी ..

काँग्रेस, राजा, कनीमोळी यांचा क्षणभंगुर आनंद

पुढे पहा

२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातून सर्वच्या सर्व म्हणजे १९ आरोपी निर्दोष सुटल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ..

भारत, अमेरिका, जपान यांची युती

पुढे पहा

काही गोष्टी काळाच्या उदरात असतात आणि योग्य वेळी त्या वर येऊ लागतात. अशाच काही घटना 2014 सालापासून जगाच्या पटलावर दृग्गोचर होऊ लागल्या आहेत..

राज्यव्यवस्थेवरील विश्वास...

पुढे पहा

राज्यव्यवस्थेवरील विश्वास.....

बोंडअळी नंतर, आधी भन्साळी...

पुढे पहा

पद्मावतीला विरोध करण्यात अजूनही आमचा महाराष्ट्र निष्क्रिय आहे. साधारणत: अशा प्रकरणात उत्साहाने उडी घेणारे राज व उद्धव ठाकरे, कसे काय हातावर हात ठेवून शांत बसले आहेत, कळायला मार्ग नाही. ..