दिवाळी विशेषांक 2018

नर्मदा किनारें मोरा गांव...

विकासाचा मापदंड म्हणून परिचित असलेला हा प्रकल्प या विस्थापितांचे प्रश्न, त्यावरून झालेलं राजकारण, आंदोलनं, यामुळेही परिचित आहे. काय करावं हे सांगणारा आणि काय करू नये हेही सांगणारा, हा तीन पिढ्यांचा एक जिवंत इतिहास.....

माझ्या पॅलेटवर रंग

चित्रकलेच्या आवडीपासून ते आज एक ख्यातनाम चित्रकार म्हणून वासुदेव कामत यांच्या जीवनाचा त्यांच्याच शब्दांत रेखाटलेला हा कलाप्रवास.....

अमेझिंग थायलंड

एकीकडे बौद्ध संस्कृतीची संपन्नता, तर दुसरीकडे गगनचुंबी इमारतींची परस्पर स्पर्धा असा पारंपरिक वारसा जपूनही आधुनिकतेचा साज ल्यायलेला थायलंड हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश. भारताच्या पूर्वेला आणि अंदमान-निकोबार बेटांपासून केवळ एक हजार किमी दूर अशा या देशातील बँकॉक आणि पटाया या दोन प्रमुख पर्यटन शहरांना भेट देण्याचा योग जून महिन्यात जुळून आला. याच अनुभवांचे प्रवासवर्णन रेखाटणारा हा लेख.....

बालपूनर्वसनाचा विजयी ‘समतोल’

मायानगरी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हजारो मुले महाराष्ट्रातून तसेच परराज्यांतून विविध कारणांसाठी दाखल होतात. त्यांची न कुठे दखल, ना कुणाला चिंता.....

मुंबईच्या नद्यांची करुण कहाणी...

२६ जुलै २००५च्या महापुरानंतर मुंबईकरांनीही ‘मिठी’ नावाची एक नदीही या महानगरातून वाहते, याचा साक्षात्कार झाला. पण, या सात बेटांवर वसलेल्या मुंबईत एक नाही, तर तब्बल चार नद्या आजही प्रवाही आहेत..

पत्थलगडी - संविधानापलीकडचे जग

आठ दिवसांच्या वास्तव्यात पत्थलगडी, मुंडा समाज, चर्चव्यवस्था, माओवादी, गुन्हेगारी आणि जिवावर उदार असलेले रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आणि काही बहादूर पोलीस अधिकारी यांचा सामना झाला. आयुष्यातला सगळ्यात रोमहर्षक काळ हा या खुटी शहरातला म्हणावा लागेल. त्याचेच हे चित्रण.....

सुरगाणा-दिंडोरीतील वनवासींचे अनोखे विश्व

वनवासी जीवन हे मूलतः निसर्गाशी मानवी जीवनाचे द्योतक सांगणारे. वनवासी बांधव म्हणजे ‘आदि’वास असणारा मानवी समुदाय. ते खरे जंगलाचे राजे..

ग्रँड ट्रंक रोडचा शेवट

प्राचीन संस्कृतींचा उदय-उगम जसा प्रामुख्याने नदीकिनारी झाला, तशीच व्यापार-उदिमाला चालना दिली ती व्यापारमार्गांनी. या हजारो किमीच्या मार्गांवरुन केवळ वस्तूंची देवाणघेवाण झाली नाही, तर एकापेक्षा अनेक भिन्न संस्कृतीचा मिलाफ साधला गेला. त्याचाच एक साक्षीदार म्हणजे कोलकातापासून ते काबूलपर्यंतचा ग्रँड ट्रंक रोड, ज्याचा आज अमृतसरलाच शेवट होतो. ..

टिपू सुलतान जसा आहे तसा...

शेकडो ब्राह्मणांना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, मुली-महिलांवर बलात्कार करणारा, आपल्या जनानखान्यात ठेवणारा एखादा शासक ‘महान’ असू शकतो?..

यंत्रमानवाच्या जगात...

यंत्रमानवाच्या या जगात प्रवेश करताना या क्षेत्राचा रोजगाराच्या संधींवर, अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच समाजावर होणारा परिणाम दुर्लक्षित करुन चालणार नाही..

लोकमान्य टिळक आणि महर्षी शिंदे - आदरयुक्त विरोधभावाचे नमुनेदार उदाहरण

‘भारतीय राष्ट्रवादाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे कार्य करणाऱ्या महर्षी शिंदे या दोन परस्पर भिन्न महारथींच्या आदरयुक्त विरोधभावाचा आढावा घेणारा हा लेख... ..

शुद्धीचा संक्षिप्त इतिहास

परकीय शक्तींनी या भारतभूमीवर आक्रमण करत वर्षानुवर्षे हिंदू धर्मावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला. दांभिक धार्मिक प्रचारापासून ते क्रूर अनन्वित अन्याय-अत्याचार, बाटवाबाटवी अशी सगळी अस्त्र मुस्लीम-ख्रिश्चन शासकांनी अगदी बेमालूमपणे वापरली. पण, तरीही हिंदू धर्म भ्रष्ट-नष्ट झाला नाही. या संपूर्ण प्रक्रियेत बळजबरीने, आमिषांना बळी पडून हिंदू धर्माचा त्याग केलेल्या धर्मबांधवांना शुद्धीच्या माध्यमातून पुनश्च हिंदू धर्मात सामील करण्यात अनेक विद्वानांचे अमूल्य योगदान लाभले. तेव्हा, अशा या शुद्धीच्या संक्षिप्त ..

शहरी माओवादाला ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याही मदतीचा संशय - प्रवीण दीक्षित

शहरी माओवादाची ही समस्या, त्याला ख्रिश्चन मिशनरीजच्या मदतीचा संशय आणि एकूणच या समस्येवरील उपाययोजना याविषयी महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मंत्रालयीन प्रतिनिधी जयदीप दाभोळकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.....

आत्मकथेसारखं काहीतरी...

आधी वाणिज्य शाखेत प्रवेश, त्यानंतर पत्रकारिता आणि मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा... आज लेखक, दिग्दर्शक, कलाकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या अभिराम भडकमकर यांच्या जीवनातील हे तीन टप्पे खरं तर खूप काही सांगून जातात..

रशिया आणि पुतीन यांचे अद्वैत

रशियाचा पूर्वेतिहास, पुतीन यांची गाजलेली कारकीर्द, लोकप्रियता, एकूणच रशिया आणि पुतीन यांचे अद्वैत आणि पर्यटनस्नेही रशियाचे अनुभवांवर आधारित चित्रण करणारा हा लेख.....

नाणार प्रकल्प - कोकणचा विकासमार्ग की विनाशमार्ग?

नाणारचा प्रकल्प कोकणसाठी विकासाचा मार्ग ठरेल की विनाशाचा, यावर आयोजित परिसंवादामध्ये मान्यवरांनी उपस्थित केलेल्या विचारांचा हा परामर्श.....

पहिले महायुद्ध आणि बदलते जग

११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध संपले, त्या घटनेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. एक शतकाच्या अवधीनंतरही त्या घटनेची पाळेमुळे आजच्या जीवनातही घट्ट रोवून उभी आहेत, असे आपल्याला दिसते. त्याची मुळे किती खोलवर गेली आहेत आणि गेल्या शंभर वर्षांमध्ये आपले जीवन कसकसे बदलत गेले, याचा हा लेख म्हणजे एक धावता आढावा आहे...