मुंबई

आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

आज मुंबई येथे रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रविवार असल्या कारणाने अधिक नागरिकांना याचा त्रास भोगावा लागणार नाही, मात्र रविवारी प्रवास करत असलेल्यांना विविध मार्गांचा विचार करणे भाग पडणार आहे. तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परळ स्थानकाच्या नव्या फलाटासाठी मध्य रेल्वेवर आठ तासांचा, तर हार्बर मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना थोड्या फार प्रमाणात यामुळे त्रास सह

पुढे वाचा

'आम्ही बदला घेऊ' नक्षलवाद्यांची मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीचे पत्र आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील नक्षलवाद्यांकडून धमकीची २ पत्रे मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली या भागात पोलिसांनी उत्तम कामगिरी करत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला, त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना धमकी दिली आहे, तसेच केवळ तेच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना देखील धडा शिकवण्याची धमकी देण्यात आली आहे. याविषयी तपास सुरु असल्याची माहिती गृहखात्याने दिली आहे.

पुढे वाचा