माणसं

खेडे सक्षम होण्यासाठी...

शिक्षणातील बाजाराची चौकट भेदत 'राजा का बेटाही राजा नाही बनेगा। तो जो हकदार है वो राजा बनेगा।' अशी वास्तविकता निर्माण करणार्‍या हरीश बुटले यांच्या आयुष्याचा हा संवदेनशील पट.....

सर्वांगीण अभिनयाचा 'सुहासित' प्रवास

प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशींच्या अभिनयाच्या प्रदीर्घ आणि भरीव कामगिरीबद्दलच २०१८ चासंगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल... ..

वन विभागाची 'अरण्यकन्या'

वृक्षसंपदेचा बेकायदेशीरपणे र्‍हास करणार्‍या आणि वन्यजीव गुन्ह्यांमधील आरोपींच्या बेधडकपणे मुसक्या आवळणारी वन विभागाची 'अरण्यकन्या' म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे.....

'परिवर्तना'ची 'विद्युल्लता'

समाजातील उपेक्षित वनवासी महिला व बालकांसाठी आपले आयुष्य वेचणार्‍या वर्षाताई परचुरे यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख.....

बी.एल.संतोष : एक कुशल संघटक

दक्षिण भारतातील राजकारणात कुशल संघटक, अशी ओळख असलेले बी.एल.संतोष यांच्यावर भाजपतर्फे राष्ट्रीय महासचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या कार्याबद्दल.....

विक्रमांची रणरागिणी...

धावण्याच्या स्पर्धात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेकानेक पदके पटकावणार्‍या द्युती चंदचीओळख आता विक्रमांची रणरागिणी अशी झाली आहे. जाणून घेऊया भारताच्या याच धावपटूविषयी.....

चल, चल रे नौजवाँ...

हरीशचंद्र काळे तसे श्रीमंत घरातले. मात्र, परिस्थितीमुळे पुढे त्यांना हमाली करावी लागली. पण, हार न मानता त्यांनी समाजात स्वत:चे आर्थिक आणि सामाजिक स्थान निर्माण केलेे. त्यांचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास.....

जागतिक बँकिंग क्षेत्रात भारतीय चेहरा

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अन्शुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक-मुख्य वित्त अधिकारीपदी निवड करण्यात आली. त्यांनी जागतिक बँकेच्या पहिल्या महिला आर्थिक वित्त अधिकारी होण्याचा मान मिळवला. बँकिंग क्षेत्रात इतक्या उच्चपदावर पोहोचणाऱ्या या भारतीय बँकरविषयी.....

काळाच्या पुढे धावणारा ‘तेजस’

वडिलोपार्जित व्यवसायाला स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवणाऱ्या तेजस गोयंका यांनी आपल्या कर्तृत्व व बुद्धिमत्तेच्या जोरावर तरुणाईपुढे एक वेगळा विचार करण्याचा आदर्श ठेवला आहे...

'प्रदीप लोखंडे - पुणे-१३'

खेड्यापाड्यातील गरीब-गरजू मुलांपर्यंत ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञानगंगा पोहोचविणार्‍या प्रदीप लोखंडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

'दर्याचा राजा'

परदेशात स्थिर पगाराची नोकरी असतानाही शाश्वत मासेमारीसंदर्भात काम करण्याच्या ध्येयाने मायदेशी परतलेल्या आणि सध्या 'ऑल इंडिया पर्ससीन फिशरमॅन वेल्फेअर'चा अध्यक्ष असलेल्या गणेश नाखवाविषयी... ..

पाणीपुरी विक्रेता ते 'यशस्वी' क्रिकेटपटू

अगदी शून्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पायरी चढणार्‍या 'यशस्वी' जयस्वालच्या जीवनाची कहाणी उलगडून सांगणारा हा लेख.....

खेळ लिंगभेदापलीकडे...

मुंबईत स्वत:ची पहिली क्रिकेट अकादमी सुरू करणार्‍या महिला क्रिकेटपटू नीता चापले. अशा या क्रिकेटमध्ये राष्ट्रीयस्तरावर आपल्या खेळाची छाप सोडणार्‍या नीता चापले यांच्या आयुष्याचा हा आलेख.....

ज्ञानदीप उजळविणारा फौजी

सैन्य दलातील आपली सेवा पूर्ण केल्यानंतर समाजकार्य करत डहाणूतील 120 वनवासी मुलांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंध:कार दूर करणाऱ्या कृष्णा बसवत यांच्याविषयी.....

जिगरबाज ‘लेपर्ड मॅन’!

जिगरबाज ‘लेपर्ड मॅन’!..

एका शिक्षकाची ‘जंगलातील शाळा’

हाडाचे शिक्षक असलेल्या पी. के. मुरलीधरन यांनी केरळच्या मुथ्थुवन वनवासींच्या वस्तीत राहून त्यांना शिक्षणाचे बाळकडू देण्याचा निर्णय घेतला आणि सुशिक्षित पिढ्या घडवल्या. अशा या शिक्षकाविषयी.....

‘अमृतयात्रा’चे जनक

मानवी मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार्‍या विविध क्षेत्रातील माणसांच्या भेटी घडवणार्‍या सहली आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम राबविणार्‍या नवीन काळे यांच्याविषयी जाणून घेऊया.....

'सेंकड इनिंग' समाजासाठी...

रवींद्र गजानन कर्वे, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या सेवाकार्यांत अग्रणी असलेले नाव. नि:स्वार्थी नि:स्पृह समाजसेवा करणारे रवींद्र कर्वे यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख.....

७५ देशांची 'क्षितिज' सवारी

७५ देशांची सायकलस्वारी करण्यासाठी निघालेल्या क्षितिजने 'वसुधैव कुटुम्बकम्' हा संकल्प सोडत एक पराक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या प्रवासाबद्दल.....

बेजार ते पिळदार...

एचआयव्ही एड्सग्रस्त के. प्रदीपकुमार सिंगने शरीरसौष्ठवपटूंनाही लाजवेल असे शरीर कमवून 'मिस्टर मणिपूर,' 'मिस्टर इंडिया,' 'मिस्टर साऊथ एशिया' यांसारखे मानसन्मान पटकाविले आहेत. त्याच्या जिद्दीची ही कहाणी.....

भारतमाता मंदिराचा अध्वर्यु

‘भारतमाता मंदिरा’चे संस्थापक स्वामी सत्यमित्रानंद यांचे मंगळवारी महानिर्वाण झाले. रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजींचा स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. अखंड मानव व धर्मसेवेचे कार्य करण्याच्या इच्छेने शंकराचार्य पदाचा, मठाचा, वैभवाचाही त्याग करणाऱ्या सत्यमित्रानंदांनी पहिल्यांदा श्रीगुरुजींची भेट घेतली. त्यावेळी गुरुजींनी सत्यमित्रानंदांच्या निर्णयाचे समर्थन करत “आता तुम्ही समाजसेवा अधिक उत्तम प्रकारे करू शकता,” असे म्हटले होते...

सकारात्मक समरस समाजासाठी...

समाजउत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या अशोक शेल्हाळकर यांच्या शब्दाला समाजात चांगलीच किंमत आहे. माझगाव डॉकमध्ये उच्चपदावर कार्यरत अशोक शेल्हाळकर हे सकारात्मक समरस समाजाबाबत आशावादी आहेत...

‘शूटिंग’मध्ये चमकणारी ‘धाकड गर्ल’

नेमबाजीच्या विश्वात सध्या नाव गाजते आहे ते म्हणजे हरियाणाची ‘धाकड गर्ल’ मनूभाकर हिचे. तिने नुकतेच आयएसएसएफ विश्वचषकामध्ये सुवर्णपदक पटकावले...

उमद्या मनाचा वनाधिकारी!

गेल्या ३१ वर्षांपासून वनविभागाच्या सेवेत कार्यरत असलेला एक उमद्या मनाचा वनाधिकारी म्हणजे सुनील लिमये. त्यांची नुकतीच राज्याच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम (वन्यजीव) या पदावर बदली झाली. त्यानिमित्ताने.....

'क्रियायोगी' ते 'आध्यात्मिक गुरू'

क्रियायोगाचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर संपूर्ण विश्व आपले कुटुंब मानत समाजकार्य करणाऱ्या योगगुरू मंगेशदा यांच्या कार्याचा आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा अल्प परिचय.....

'डॉक्टर फॉर बेगर्स'

रुग्णसेवेसोबत अनेक डॉक्टरांनी समाजसेवेचेही व्रत हाती घेतलेले दिसते. पण, फक्त रस्त्यावरील गरीब-भिकाऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठीच तत्पर असे डॉक्टर दिसत नाहीत. पण, याला अपवाद ठरले ते डॉ. अभिजित सोनावणे...

‘कचरेवाले’तून स्वच्छतेची ‘गरिमा’

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांपैकी नील बेट अर्थात शहीद बेटाला ‘कचरेवाले’ अभियानातून कचरामुक्त करणार्‍या गरिमा पूनिया या तरुणीची ही प्रेरक कथा.....

हमारे मुठ्ठी में है आकाश सारा...

प्रतिकूल परिस्थितीमध्येही अनुकूल समाजभान जपणाऱ्या आणि स्वत:सोबतच अनेकांच्या आयुष्याला घडवणाऱ्या सुचित्रा देहेरकर-इंगळे...

कोल्हापूरची 'तेजस्वी' राही...

आयएसएसएफ विश्वचषक २०१९ मध्ये नेमबाज राही सरनोबतने सुवर्णपदक जिंकून २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमधील स्वतःचे स्थान निश्चित केले. आज जाणून घेऊया तिच्याबद्दल... ..

ज्ञानमार्गावरील पथदर्शी

२००५ पासून देशाच्या भावी पिढीला दिशा देण्याचे काम करणारी ‘स्पंदन फाऊंडेशन’ ही सामाजिक संस्था आपल्या काही विद्यार्थ्यांसह यशस्वीपणे चालवणार्‍या प्रमोद मोहिते यांचा हा जीवनप्रवास.....

रक्षक वन्यजीवांचा !

अगदी लहानपणापासून वन्यजीव बचावाच्या ध्येयाने झपाटलेल्या ठाणे शहराच्या मानद वन्यजीवरक्षक पवन शर्माची ही कहाणी.....

'बौद्धजन समिती' व्हाया 'बाबासाहेब'

राहुल सवणे यांचे वडील नामदेव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक होते. तो परिसस्पर्श सवणे कुटुंबाला झाला. त्यामुळेच राहुल सवणे बाबासाहेबांच्या विचारांसाठी सर्वस्व अर्पून काम करत आहेत...

'दासी' ते 'सुपर फार्मर'

शेतीतले दाणाभरही ज्ञान नसलेली 'दासी' ही कर्नाटकची वनवासी महिला आज सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वार्षिक चार लाखांचे उत्पन्न घेते. अशा या 'सुपर फार्मर' म्हणून सन्मानित दासीची कथा.....

'निसर्गव्रती'

आजच्या आधुनिक जगातही विजेशिवाय ६० वर्षांपेक्षा जास्त काळ निसर्गाच्या सान्निध्यात जगणाऱ्या डॉ. हेमा साने यांच्या जगावेगळ्या निसर्गप्रेमाविषयी आपण जाणून घेऊया...

खाष्ट सासूचा भोळा चेहरा...

मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतील एक ज्येष्ठ कलाकार दया डोंगरे यांना यंदाचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.....

निसर्गासाठी कार्य करणारा ‘इडियट’

‘बीएनएचएस’ या आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेल्या संस्थेत साहाय्यक संचालक (शिक्षण) या पदावर कार्यरत असलेल्या निसर्गवेड्या डॉ. राजू कसंबे यांची ही कर्तृत्वगाथा.....

'सरहद' का रखवाला...

'सरहद फाऊंडेशन'च्या संजय नहार यांच्या सामाजिक कार्याविषयी आजच्या 'माणसं' या सदरात जाणून घेऊया...

समाज एकसंघ करण्यासाठी...

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांतील देशप्रेम समाजात रूजवण्यासाठी बाबुराव मुखेडकर अहोरात्र प्रयत्नशील आहेत. समाजहितासाठी समाज एकसंघ राहिला पाहिजे, या सूत्रावर त्यांचे काम सुरू आहे...

पॅडवुमन

गावातील गरीब महिला-मुलींच्या निरोगी आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स पुरविणाऱ्या सुहाना मोहन या तरुणीची ही प्रेरणादायी कहाणी.....

नेहमीच सूर्य नसतो...

समाज पुरुषाशी विद्रोह नव्हे, तर समन्वय आणि निष्ठा राखली तर स्वत:सोबतच समाजही घडत जातो, हे सांगणारे डवरी गोसावी समाजाच्या कांता शिंदेंचे जगणे.....

मराठमोळा स्पायडरमॅन

कोळ्यांवर संशोधन करणाऱ्या देशातील काही मोजक्या संशोधकांपैकी असलेल्या मराठमोळ्या 'स्पायडरमॅन' राजेश सानपविषयी.....

‘ती’ची जिद्द सुवर्णविजयाची...

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रिंकीने स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ किंवा परिस्थिती नसते, हे दाखवून दिले. तिच्या या सुवर्णविजयाची कहाणी.....

पुरुषत्वाकडून मातृत्वाचा प्रवास

पुरुष ते ट्रान्सजेंडर आणि एक आई हा अफलातून प्रवास गौरी सावंतने कसा केला,याची सविस्तर माहिती आपण घेऊया...

‘राजा’ तू तुझ्या मनाचा...

वयाच्या पाचव्या वर्षीपासून हातापायांनी पूर्णपणे अधू असलेला राजा महेंद्र प्रताप वित्तशास्त्रात एमबीए करून आज आपल्या तिशीत ओएनजीसीमध्ये कार्यरत आहे. त्याच्या मनोधैर्याची ही विचारप्रवर्तक कहाणी... ..

वकिलीमध्ये संस्कृती जपताना...

गुन्हेगारी खटल्यामध्ये अशिलाला यशस्वीपणे न्याय मिळवून देणार्‍या निरपराध व्यक्ती निर्ढावलेल्या गुन्हेगार बनू नये म्हणून काम करणार्‍या अॅड. विमला चौनाल...

अनाथांचे मायबाप!

हजारोंच्या अनाथांचे मायबाप बनलेले भारद्वाज जोडपे समाजासाठी उत्कृष्ट काम करीत आहेत. समाजसेवेसाठी त्यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानाची ही यशोगाथा.....

समुद्रसोबती...

सागरी परिसंस्थेमधील जीवांविषयी लोकमनात नवी चेतना जागृत करण्याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे प्रसिद्ध सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे यांना जाते...

‘वनमाला‘ एक तेजस्वी अभिनेत्री

दि. २३ मे ही प्रसिद्ध अभिनेत्री वनमाला यांची जयंती. सुशीलादेवी पवार उर्फ ‘वनमाला’ यांच्या चित्रपट क्षेत्रातील जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा.....

समाजसागरातील समरस दीपस्तंभ

‘नाही रे’ गटातल्या व्यक्तीने आयुष्यातील काटे बाजूला सारत फुलांच्या सुगंधाचे देणेकरी व्हावे. परंतु, हे सगळ्यांनाच शक्य नसते. या पार्श्वभूमीवर सुनील यांचे जगणे पथदर्शक आहे...

बालनाट्य रंगभूमीची नवी उमेद

मराठी बालनाट्य रंगभूमीला पुन्हा प्रकाशझोतात आणण्यासाठी झटणार्‍या व मुलांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना उलगडणार्‍या पल्लवी वाघ-केळकर यांच्याविषयी.....

नव्या भारताची 'हिरकणी'

मनात जिद्द आणि चिकाटी असली की, आपण कुठलेही शिखर सर करू शकतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते. आज जाणून घेऊया या आधुनिक भारताच्या हिरकणीबद्दल थोडेसे.....

अनाथांच्या आयुष्यातील ‘सुरज’

वडिलांप्रमाणे देशसेवा करण्याची संधी मिळाली नाही म्हणून युद्धभूमी ऐवजी कर्मभूमीवर अनाथ मुलांसाठी समाजकार्य करण्याचे स्वप्न पाहणार्‍या सुरज दिलीप सावंत यांच्याविषयी.....

सोलारमॅन!

सचिनने पाड्यांमध्ये सौरउर्जेवर चालणारी उपकरणे आणि दिवे लावण्यास सुरुवात केली. या कामामुळे त्यांची ओळख आता 'सोलारमॅन' अशी झाली आहे...

‘कावळेवाले काका’

पक्ष्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणार्‍या आणि कावळ्यासारख्या अशुभ समजल्या जाणार्‍या पक्ष्याला आपला मित्र बनविणार्‍या एका अनोख्या पक्षीप्रेमाची ही कहाणी.....

महावितरणची ‘बिजली गर्ल’

बहुतांशी महिलांचा सुलभ मार्गावरून जीवनप्रवास करण्यावर भर असतो, तर काहीजणी भेगाळली वाट निवडून नवा स्वत:चा नवीनच मार्ग निर्माण करतात. त्यापैकीच एक म्हणजे उषा जगदाळे.....

एक है रजनी...

‘मरू घातलेले जगणे, जीत्त सपान झालं माय, रडू नको, लढ आता’ सांगणारी चित्तरकथा अशी रजनी कर्डक झाली की गं माय.....

‘विशेष’ मुलांसाठीची प्रेरणा

सीबीएसई निकालांमध्ये राजहंस विद्यालय, अंधेरी पश्चिम या शाळेतून ममता नायक या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के गुण मिळवत घरच्यांसह सार्‍यांनाच सुखद धक्का दिला आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी.....

वास्तववादी दर्शन रंगमंचावर मांडणारे लेखक

मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यलेखक वामन तावडे हे मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेले. वामन तावडे यांच्या स्मृतीस वंदून त्यांच्या नाट्यक्षेत्रातील प्रवासावर एक नजर टाकूया.....

'आजोबा' आणि 'ती'

वन्यजीव संशोधनासारख्या पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात 'आजोबा' नामक बिबट्याचा प्रवास जगासमोर आणून बिबट्याप्रती समाजाचा दृष्टिकोन बदलणाऱ्या डॉ. विद्या अत्रेय यांच्याविषयी.....

तंत्रज्ञानाच्या कक्षा भेदणारा माणूस

‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना नुकताच फ्रान्सतर्फे ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला. तेव्हा, आज जाणून घेऊया या तंत्रज्ञानाच्या कक्षा भेदणाऱ्या माणसाविषयी... ..

'फनी' वादळग्रस्तांचा 'तारणहार'

ओडिशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या 'गंजम' जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना कामगिरी आणि नियोजन काय असते हे त्यांनी दाखवून दिले. या ठिकाणच्या कार्यकाळात त्यांनी दोन चक्रीवादळावर यशस्वी मात दिली आहे. 'तितली' चक्रीवादळाच्या वेळी एका रात्रीत दोन लाख लोकांचे स्थलांतर असो कि दीडशेहून अधिक आंध्र मच्छीमारांची सुटका असो, ही सर्व जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडली...

‘सुयश’कार सुभाष

जातीमुळे नव्हे, तर क्षमतेमुळे आयुष्य यशस्वी होते आणि सवलतीमुळे नाही, तर नीती, स्वावलंबनामुळे यश मिळते, असा संदेश देणारे यशस्वी उद्योजक सुभाष चाफेकर...

‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चा मराठी मानकरी

कलेची साधना करत असतानाच सामाजिक भान जपणार्‍या मंदार वैद्य यांना ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान नुकताच मिळाला आहे. त्यांच्याविषयी... ..

माणुसकीची तृतीया...

समाजाने दुय्यम वागणूक देऊनही आपल्या समाजाला नवी दिशा देणाऱ्या मुंबईच्या तृतीयपंथीय प्रिया पाटील यांचा हा खडतर प्रवास.....

बेवारस मृतदेहांना मोक्ष देणारी...

अंत्यसंस्कारानंतर मृतात्म्याला मोक्ष मिळतो, असे म्हणतात. बेवारस मृतदेहांवर माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्कार करुन त्यांना मोक्ष देणाऱ्या मुंबईतील रेल्वे पोलीस कर्मचारी नयना दिवेकर.....

कष्टाच्या जगण्याला बळ संस्काराचे

सामान्य जीणे जगताना आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे हेसुद्धा माणूसपणच आहे. हे माणूसपण अनुभवसंपन्न असते. असे माणूसपण लाभलेले रघुनाथ काळे...

पहिले पाऊल सोनेरी पदकाचे...

अंगात ताप असतानादेखील 'भारताला सुवर्णपदक जिंकून द्यायचेच' या दृढनिश्चयाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उतरलेल्या अमित पंघलबद्दल जाणून घेऊया.....

धनुर्धारी सुवर्णक्षणांचा...

न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या ‘इनडोअर वर्ल्ड चॅम्पियनशीप’ स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवणाऱ्या लाभेश तेलीची कहाणी.....

सागरी कासवांचा रक्षणकर्ता

काही माणसं केवळ वन्यजीव संवर्धनाचे काम करण्यासाठीच जन्माला आलीत का, असा प्रश्न पडतो आणि कासवमित्र मोहन उपाध्ये याला भेटल्यानंतर तर त्याचं नक्कीचं होकारार्थी उत्तर मिळतं...

नेत्रदानाचा मंत्र देणारा अवलिया...

‘देणाऱ्याने देत जावे...’ असा नेत्रदानाचा संदेश आपल्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने देणाऱ्या रूप पटेला यांच्याविषयी जाणून घेऊया...

पायांनी विमान उडविणारी जेसिका!

हात नसतानाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न जेसिका कॉक्सने पाहिले अन् ते साकारही केले. जेसिकाच्या धैर्याचा आणि जिद्दीचा हा विस्मयकारक प्रवास.....

मुक्ततेचा ठाव घेणारा चित्रकार...

नुकताच ललित कला अकादमीचा चित्रकला क्षेत्रातला राष्ट्रीय पुरस्कार चित्रकार विक्रांत भिसे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या चित्रातील सत्य उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न.....

सर्वगुणसंपन्न नृत्यगुरू 'सुचेताताई'

नृत्यगुरू, नृत्यदिग्दर्शिका आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांना यंदाचा मानाचा 'मास्टर दीनानाथ पुरस्कार' जाहीर झाला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या नृत्यकलेचा प्रवास... ..

देशातील पहिला दलित अब्जाधीश

भारताचे पहिले दलित उद्योजक, अशी ओळख असलेले आणि लाखो युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे राजेश सरैया यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

मुंबईकर पेंग्विन्सची पालक

पेंग्विनच्या पिंजराबंद अधिवासाविषयी माध्यमांमधून होणारी टीका आणि समाजाचा रोष पोटात घेऊन डॉ. मधुमिता काळे-वझे आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पेंग्विनच्या देखभालीची जबाबदारी जिद्दीने पार पाडत आहेत. ..

‘अ टायनी क्वीन’

निसर्गाच्या सुंदर दृश्यांना आपल्या जादूई हाताने लहान लहान आकारात त्यांच्या चित्रकृती साकारणार्‍या ‘टायनी क्वीन’ महालक्ष्मी यांच्या अनोख्या कलेचा प्रवास पाहूया.....

जिणे वैधव्याचे, जिणे सन्मानाचे....

विधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी शिक्षिका लता बोराडे यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ‘विधवा हळदी-कुंकू समारंभ’ साजरा करून त्यांना सधवेचा सन्मान दिला. त्यांच्याविषयी.....

अपना टाईम आयेगा...

वर्षा गांगुर्डे या मुंबई महानगरपालिकेमधील ‘बी’वॉर्डपासून ‘एल’ वॉर्डपर्यंतच्या महानगरपालिकांच्या ९५ शाळेच्या बिट ऑफिसर म्हणून काम करतात. इथपर्यंतचे त्यांचे जगणे म्हणजे परिस्थितीवर मात करण्याचे एक प्रेरणादायी वास्तव आहे...

माहिती तंत्रज्ञानाचा 'डेटा रक्षक'

सध्या माहिती-तंत्रज्ञानातील डेटा सुरक्षित ठेवणे खूप आव्हानात्मक. सुरक्षा कवच तयार करण्याच्या कामात 'दिनेश जोशी' या मराठमोळ्या तरुणाने जगभर नावलौकिक केले आहे. जाणून घेऊया याबद्दल थोडेसे.....

निसर्ग संवर्धनातील ‘भाऊ’ माणूस

वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाची व्याप्ती असूनही प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर राहिलेले महाराष्ट्रातील एक नाव म्हणजे भाऊ काटदरे...

एका वीरांगनेची यशोगाथा

डॉ. आश्लेषा तावडे-केळकर यांनी सैन्यासारख्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. त्यांचा जीवनप्रवास आणि सैन्याविषयीचे त्यांचे विचार यावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

‘मिसाईल वुमन ऑफ इंडिया’

भारतीय क्षेपणास्त्र प्रकल्पांच्या प्रमुखपदावर काम करणार्‍या डॉ. टेसी थॉमस या इतक्या सर्वोच्च पदावर पोहोचणार्‍या पहिल्या महिला आहेत. त्यांच्याविषयी...

दलित जीवनाचे भाष्यकार

ज्येष्ठ दलित साहित्यिक शंकरराव खरात यांची आज पुण्यतिथी. शंकररावांच्या लेखनाची, कथा-कादंबऱ्यांची माहिती बहुतेकांना असेलच, पण त्यापलीकडचे शंकरराव जाणून घेऊयात.....

महाराष्ट्राच्या कन्येची ‘गुगल’ भरारी

काही काळ अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत ‘गुगल इंडिया’मध्ये उच्चपदावर नियुक्त झालेल्या मयुरी कांगो हिने अभिनयाच्या कारकिर्दीनंतर अनेक भूमिका सक्षमपणे निभावल्या आहेत...

बॅडमिंटनमध्ये भारताचे ‘यथिराज्य’

आशियाई पॅरालिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत देशाला पदक मिळवून देणार्‍या दिव्यांग सुहास लालिनाकेरे यथिराज यांची ही प्रेरणादायी कहाणी.....

गँगस्टर ते प्रसिद्ध धावपटू

कधीकाळी तो मुंबईतील अंडरवर्ल्डचा गँगस्टर होता. आज तो प्रसिद्ध धावपटू आहे. त्याचा हा त्याचा थक्क करणारा प्रवास आजच्या आपल्या ‘माणसं’ या सदरात उलगडणार आहोत...

आर्थिक नियोजनाचा वाटाड्या

भविष्यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन करणे आजघडीला तसे खूप महत्त्वाचे. परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी पुढाकार घेतला आहे. ..

ठाणेकर सागरची ‘फोर्ब्स’ भरारी

सकाळी सकाळी दारावर दूध देणाऱ्या भैय्याने त्यासोबत ब्रेड, बटर, बिस्कीटं आणि भाज्याही घरपोच आणून दिल्या तर??? ही कल्पना, सत्यात उतरविणाऱ्या सागर यरनाळकरची ही यशोगाथा.....

शिक्षण आणि नोकरीतील ‘पुलकरी’

कौशल्यावर आधारित शिक्षण नसेल, तर पदवी असूनही चांगली नोकरी मिळत नाही. पण प्रशिक्षण देऊन शिक्षण आणि नोकरीमधील प्रगतीचा पूल नारायण महादेवन यांनी बांधला आहे...

भारतीय राजकारणातला ‘तेजस्वी सूर्या’

जर तो लोकसभेची निवडणूक जिंकला, तर सर्वात कमी वयात खासदार होण्याचा मान असेल कर्नाटकच्या तेजस्वी सूर्याचा. कर्नाटकसह देशभरात ज्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे, अशा या तेजस्वी सूर्याविषयी.....

पालावरच्या जगण्याच्या वेगळ्या वाटा

मुंबई-पुणे मार्गावरील फूड मॉलचे व्यवस्थापक सुनील भिंगारे यांचा संघर्ष आणि समन्वय कदाचित वेगळ्या वाटेवरचा आहे. पण तो संघर्ष, समन्वय आज पालावरच्या जगण्याचा चिंतनीय विषय आहे...

न्यायमूर्ती ते देशाचे पहिले लोकपाल

नुकतीच पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्ताने पिनाकी चंद्र घोष यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.....

जीवन फुलवणारी ‘पूजा’

शहरांत राहणाऱ्यांना आपल्या जवळपास हिरवीगार अशी जागा मिळणे तसे अवघडच. पण, पुण्याच्या पूजा भाले यांनी अशा लोकांची ही अडचण दूर केली आहे. कोण आहे पूजा भाले आणि काय केलेय त्यांनी? जाणून घेऊया.....

त्याला जीवन ऐसे नाव...

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत आणि मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी नवीन लादे या युवकाकडे एक ध्येय आहे. त्यांच्या ध्येयाची, अथक परिश्रमाची ही कहाणी.....

आधुनिक कर्ताकरविता नारायण!

विवाह जुळवणे आणि तो सिद्धीस नेणे, हा प्रा. प्रीतिश कुलकर्णी या माणसाचा छंद आहे. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी छंद जोपासत आतापर्यंत सुमारे १०० विवाहसोहळे थाटात पार पाडले आहेत. यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्याच 'व्यक्ती आणि वल्ली'मधील नारायण म्हणजे एक सार्वजनिक नमुना! लग्नसोहळ्यात त्याची उपस्थिती विशेष लक्षवेधी नसली तरी त्याच्यावाचून लग्नकार्यात सगळ्यांचेच गाडे अडते. नारायण ही केवळ व्यक्ती नसून संस्थाच आहे. अशा व्यक्ती निरपेक्ष वृत्तीने व स्वयंस्फूर्तीने कामाला वाहून घेतात. त्यांचा स्वयंसेवकाचा ..

मिथिलेची चित्रकर्ती

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात नव्वदीच्या गोदावरी दत्त यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. कारण, गोदावरी यांचे कार्यच असे की, ज्याची कीर्ती ही सर्वदूर पसरलेली... ..

गोमंतकाचा नवा आवाज

आयुर्वेदिक डॉक्टर ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे आणि मनोहर पर्रिकरांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविषयी थोडेसे.....

हवा बदलणारी ग्रेटा...

स्वीडनमधील ग्रेटाने टूनबर्ग हिला ‘अस्पर्जर सिंड्रोम’ हा आजार असतानाही तिने ‘पर्यावरण संवर्धना’साठी व ‘जागतिक तापमान वाढ रोखण्या’साठी स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन करून लोकचळवळ उभारली. त्याच्याविषयी.....

अंधारलेल्या जगण्यातला सूर्य...

सूर्यकांत गायकवाड यांना समाजकल्याण खात्याचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१९’ मिळाला. त्यांचे समरसता साधणारे विचार आणि कार्य महत्त्वाचे आहे...

संस्कृत संवर्धनाची अनोखी आरती

संस्कृत या विषयाकडे ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ म्हणून बघितले जाते. पण, ही भाषा केवळ गुण मिळवण्यापुरती मर्यादित नसून तिला तिचे स्वत:चे सौंदर्य आहे, तिला स्वत:ची ओळख आहे. परंतु, कठीण भाषा, किचकट व्याकरण यांसारख्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे संस्कृतची वाढ कुठेतरी खुंटवण्याचा प्रयत्न होतो. पण, या भाषेला जीवंत ठेवण्यासाठी पुण्याच्या संस्कृतच्या शिक्षिका आणि अभ्यासक आरती पवार गेली २३ वर्षे अहोरात्र झटत आहेत. ..