Advertisement

महाराष्ट्र

पुण्यातून ज्ञानोबा -तुकारामांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ

'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रात घुमतोय. त्याला कारणही तसेच आहे. विठ्ठल भक्तांची वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. काल अभंग आणि भजनांच्या गजराने संपूर्ण पुणे नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. त्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी काल पुण्यात मुक्काम केल्यानंतर आज या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर श्री विठ्ठल मंदिर येथे तर ज्ञानेश्वरांची पालखी सासवड येथे मुक्काम करणार आहे.

पुढे वाचा

स्वमग्न स्वयंसेवक विद्यार्थ्याचे दहावीत सुयश

राज्य शिक्षण मंडळातर्फे (एसएससी) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये रा. स्व. संघाचा स्वयंसेवक जय मनोज जाधव या स्वमग्न-ऑटीझमग्रस्त विद्यार्थ्याला तब्बल ८०.२ टक्के गुण मिळाले आहेत. जयसारख्या स्वमग्न विद्यार्थ्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तोडीसतोड अभ्यास करून उत्कृष्ट गुण मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचबरोबर जयच्या वाशी येथील फादर ऍग्नेल शाळेचेही अभिनंदन केले जात आहे. कारण जयसारख्या स्वमग्न विद्यार्थ्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने वर्गात दाखल करून घेणे आणि त्याच्याकडून उत

पुढे वाचा