महाराष्ट्र

जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचीउपोषणकर्त्यांशी चर्चा निष्फळ

जामनेर तालुक्यातील पाळधी येथील भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा अपूर्ण योजनेची चौकशी समिती नेमून सखोल चौकशी पुर्नमुल्यांकन आणि चौकशी करुन दोषी आढळणार्‍यांवर ठेकेदार, सचिव, पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरपंच, उपसरपंच, सदस्य शुक्रवारपासून आमरण उपोषणाला बसलेे आहेत. शनिवारी, १९ रोजी दुसर्‍या दिवशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली. लेखी आश्वासनानंतर निर्णय जोपर्यंत सीईओ शिवाजी दिवेकर यांचे लेखी आश्‍वासन मिळत न

पुढे वाचा

चार चंद्रपूरकर आदिवासी विद्यार्थी माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर

आपल्या अनोख्या कार्यशैलीने, लोककल्याणाच्या आगळ्या योजनांसाठी, गोरगरीबांच्या हितार्थ चाललेल्या धडपडीसाठी, अगदी शासकीय कार्यातही आपल्या शैलीतून रौनक निर्माण करण्याची ख्याती लाभलेले राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यातल्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या एका उपक्रमाचे ऊर अभिमानाने भरून यावा असे फलित समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करत मंत्र्यांच्या धडपडीला अनोख्या यशाचा नजराणा सादर केला आहे.

पुढे वाचा

बंदी महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी देवकीनंदन उपक्रम राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांचे प्रतिपादन

तुरुंगातील बंदीवान महिलांसोबत असलेल्या त्यांच्या लहान मुलंावर तुरुंगातील वातावरणाचे अनिष्ट परिणाम होवू नये आणि त्यांचे योग्य संगोपन व्हावे यासाठी प्रायोगिकस्तरावर ठाणे जिल्हयात समतोल प्रकल्पाच्या सहयोगाने ‘देवकीनंदन ’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट् राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली. शनिवारी त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली त्यावेळी बोलतांना याविभागातील विविध कामे आणि उपक्रमांची सध्या असलेली स्थिती आणि भविष्यातील योजना याबद्दल मनमोकळेपणे चर्चा केली.

पुढे वाचा

धुळे जिल्ह्यात १५ मे पासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा - ना . दादाजी भुसे

महसूल विभागाचा चेहरा- मोहरा बदलविणारा व अत्यंत दूरगामी परिणाम करणारा राज्यातील सर्वांत मोठा ऑनलाइन सातबारा प्रकल्प असून धुळे जिल्ह्यात ६७८ गावांपैकी ६५० गावांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २८ गावांचे सातबारा संगणकीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात असून १५ मे २०१८ पासून जिल्ह्यातील सर्व खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.

पुढे वाचा