खान्देश

गोंधळी खासदारांना क्रॉमवेलची प्रतीक्षा?

संसदेतला गदारोळ आता नित्याचाच झाला आहे. गेली कित्येक वर्षे संसदेत काम कमी आणि गोंधळच जास्त होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने गोंधळाचे तंत्र अवलंबत सरकारला त्रास देण्याचेच ठरविले आहे की काय, असे वाटावे एवढी नकारात्मक भूमिका घेऊन कॉंग्रेस वागत आहे. कॉंग्रेससोबतच अन्य विरोधी पक्षांचे सदस्यही गोंधळ घालूनच स्वत:च्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसला गोंधळाविषयी टोकले असता, कॉंग्रेसकडून भाजपाकडे बोट दाखविले जाते. आम्ही जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा भाजपाचे लोक गोंधळ घालून

पुढे वाचा

सोशल मीडियावरील माहिती सुवर्णापेक्षाही अनमोल‘जळगाव तरुण भारत’तर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशांत पोळ यांचे प्रतिपादन

फेसबुकने १९ बिलियन यूएस डॉलर्स खर्च करून व्हॉट्सऍप विकत घेतले. फेसबुकने एवढा खर्च का करावा? असा प्रश्‍न आजही अनेकांना पडतो. पण व्हॉट्सऍपवर माहितीचा (डेटा) जो अतिप्रचंड स्त्रोत उपलब्ध आहे त्याचे हे मूल्य आहे. जगात १० ते १५ वर्षांपूर्वी तेल आणि सोन्याला जे महत्त्व होते तेच आज माहितीला आहे. त्यामुळे ज्याच्याजवळ ही माहिती आहे त्याच्याकडे जगाची किल्ली आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील वेब भारतीचे संचालक आणि माध्यम तज्ज्ञ प्रशांत पोळ यांनी केले.

पुढे वाचा

‘समय समर्पण’ सर्वात श्रेष्ठडॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे डॉ. अनंत पंढरेंचे प्रतिपादन डॉ. आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार वितरण सोहळा हर्षोल्हासात

आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ समाजासाठी देणे ही भावना उच्चकोटीची आहे. त्यामुळेच समय समर्पण हे सर्वात श्रेष्ठ कार्य आहे. ज्याला हे समजते, ज्यात असे काम करण्याची शक्ती आणि इच्छा आहे; तोच हे कार्य करू शकतो. हे कार्य मीराताई कुलकर्णी आणि दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने केले आहे. देश बदलण्यासाठी अजून अशा १० लाख कार्यकर्त्यांची गरज आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे सचिव डॉ. अनंत पंढरे यांनी केले.

पुढे वाचा