कालजयी सावरकर 2019

सावरकर आणि युद्धशास्त्र

‘सावरकर आणि युद्धशास्त्र’ याचा विचार हा व्यापक आणि दूरदृष्टीचा होता, हे त्यांचे चरित्र वाचताना प्रकर्षाने जाणवते. युद्धशास्त्राविषयीची सजगता ही तळमळ त्यांनी अनेक ठिकाणी प्रदर्शित केली, तर काही वेळा परखड शब्दांतूनही व्यक्त केली आहे. ..

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण

सावरकर हे मुसलमान किंवा इस्लामद्वेष्टे होते, असा मोठा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहे. सावरकरांनी मुसलमानांना वगळण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या केली, त्यांना त्यांच्या हिंदुुराष्ट्रात मुसलमानांसह अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचे दुय्यम स्थान द्यायचे होते, त्यांना हिंदूंचा बहुसंख्यावाद अल्पसंख्याकांवर लादायचा होता, अशाप्रकारचे आरोप सावरकरांवर केले जातात. ..

मार्क्स, मार्क्सवाद आणि सावरकर

दोघांच्याही जीवनाकडे बघितले, तर त्यांचे जीवन हे क्रांती करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रांतिकारकासारखे दिसते. पण, मार्क्स हा क्रांतीचा विचार देऊन समीक्षा करून थांबतो, तर सावरकर स्वत: क्रांती करण्यासाठी सिद्ध असलेले दिसतात...

आर्य चाणक्य आणि सावरकर

हिंदुत्व, धर्मसुधारणा, हिंदुराष्ट्र या सर्वांच्या हक्काचं रक्षण करणारी लोकशाही याची सुयोग्य सांगड घालणारी राष्ट्राच्या प्रगतीची नीती सावरकर आपल्याला सांगत होते. अशीच तत्त्व श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्या त्या काळात सांगून ठेवली होती आणि आचरून दाखवली होती...

इतिहासकार सावरकर

एक क्रांतिकारक म्हणून सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जेवढे योगदान आहे, तेवढेच सावरकरांचे ‘इतिहास लेखक’ या नात्याने मराठी साहित्यक्षेत्रात योगदान आहे. त्याविषयी.....

समिधा : येसूवहिनी आणि माई सावरकर

ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आयुष्यातील यश हे त्यांच्या स्वकर्तृत्वाचेच द्योतक असले तरी तात्यारावांच्या जीवनप्रवासात वहिनी येसू सावरकर आणि पत्नी माई सावरकर या दोघींचाही सिंहाचा वाटा आहे. घर, कुटुंब, समाजकार्य अशा सगळ्याच कसोट्यांवर उत्तुंग ठरलेल्या येसूवहिनी आणि माई सावरकर.....

सावरकरांचे ब्रिटिश सहकारी डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड

डेव्हिड गार्नेट आणि गाय अल्ड्रेड या सावरकरांच्या ब्रिटिश सहकाऱ्यांनी केवळ सावरकरांची पदोपदी मदतच केली नाही, तर इंग्रजांनी सावरकरांवर केलेल्या अन्यायालाही त्यांनी वाचा फोडली. आत्मचरित्र, वृत्तपत्रे, मासिकांमध्ये या दोघांनी सावरकरांविषयीच्या आठवणी, प्रसंग यांचे यथोचित चित्रण केले आहे. तेव्हा, सावरकरांच्या या फारसा परिचित नसलेल्या दोन ब्रिटिश सहकाऱ्यांविषयी......

सशस्त्र क्रांतीचे जनक स्वातंत्र्यवीर सावरकर

कडवे राष्ट्रभक्त, सच्चे समाजसेवक, प्रतिभावंत साहित्यिक, नामवंत कवी, हिंदुत्व तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते, वैज्ञानिक द़ृष्टी लाभलेले बुद्धीवादी, जातीभेद-अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय. सावरकरांच्या क्रांतिकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....

सशस्त्र क्रांतिकारकाची सावली

अप्पा फक्त तात्यारावांचे अंगरक्षकच नव्हे, तर सावरकरांच्या सहवासात राहून त्यांना क्रांतिकारकांप्रमाणे आपणही राष्ट्रस्वातंत्र्यार्थ हौतात्म्य स्वीकारावे अन् जीवन सार्थकी लावावे, असे त्यांना वाटू लागले...

भागानगरचा नि:शस्त्र प्रतिकार

स्वा. सावरकरांनी भागानगरचे आंदोलन अधिक तीव्र केले. राज्यात नागरिकांच्या अधिकाराची स्पष्ट मागणी केली. सर्व भारतीयांना निजामाविरुद्ध उभे करून जातीयवादी हुकूमशाही नष्ट करून सामान्य लोकांचं राज्य आणण्याची इच्छा सावरकरांना होती. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचे जत्थे हैदराबाद (भागानगर) कडे निघाले होते. १० महिन्यांत चार हजार स्वयंसेवक तुरुंगात गेले होते. तेव्हा, भागानगरचे आंदोलन आणि सावरकरांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा हा लेख.....

स्वातंत्र्यवीरांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर नेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार कृतिशील कार्य करण्याचा लौकिक असलेले मुंबईचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ हे सर्वार्थाने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार प्रखरतेने नेत असून यात स्तरातील मंडळी सहभागी होत आहेत. तेव्हा, स्मारकाचे विविध उपक्रम तसेच कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख.....

‘जमात-ए-पुरोगामी’ आणि सावरकर

समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराने आलेली सूज्ञता, अभ्यासात पडत असलेली भर आणि मुळातून संदर्भ अभ्यासण्याची प्रवृत्ती वाढीला लागल्याने सध्याच्या काळात सावरकरद्वेषाचे हे उद्योग तग धरणारे नाहीत. मात्र, सर्वच सावरकरप्रेमी अभ्यासकांनी आपापल्या परीने योग्य संदर्भ देत आणि साक्षेपी लेखन करीत या ‘जमात-ए-पुरोगामी’चे पितळ उघडे पाडणे, ही काळाची गरज आहे...

आपण सावरकरांना काय दिले?

राष्ट्रकार्य हे सतीचं व्रत मानून केवळ देशसेवेत त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. आता ही आपली जबाबदारी आहे की, आपण त्यांना जगासमोर 'माफीवीर सावरकर' म्हणून पोहोचवतो की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' म्हणून... ..

‘सावरकर’ आज का वाचावे?

आज सावरकरांवर व्याख्याने देताना मला जाणवतं, गावागावांत ‘सावरकर’ जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. सावरकरांचा अभ्यास करणारी सशक्त पिढी उभी राहते आहे, ऑडिओ बुक्स, नाटक, गीतपर कार्यक्रम यातून सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीदेखील तुम्ही स्वत: वाचल्याशिवाय तुम्हाला ‘उत्तम, उदात्त आणि महन्मधुर’ म्हणजे काय आहे, ते कळणार नाही...

सावरकरांची परराष्ट्र नीती आणि पंतप्रधान मोदी

सावरकरांनी ‘परराष्ट्र नीती’ या विषयावर आपले विचार मांडले होते. जागतिक स्तरावर भारताने इतर देशांशी राखावयाचे संबंध यावर सावरकरांनी मार्गदर्शन केलं होतं आणि मोदींनी आखलेली परराष्ट्रनीती ही सावरकरांनी सांगितलेल्या मार्गाशी मिळतीजुळती असल्याचं दिसून येतं...

अनादि मी, अनंत मी स्वा. सावरकर जीवनगाथा ध्वनिनाट्य स्वरूपात

‘अनादि मी, अनंत मी’ या नाट्य कलाकृतीच्या माध्यमातून, मराठी भाषेतील सर्वोच्च दर्जाची एक उत्तम नाट्यसंहिता आणि स्वा. सावरकरांची समग्र जीवनगाथा पुन्हा एकदा नव्या पिढीला, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती व्हावी आणि स्वा. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या अनमोल, परंतु विसरलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळावा, या उद्देशाने येत्या स्वा. सावरकर जयंती दिनी म्हणजे २८ मे, २०१९ पासून ‘अनादि मी, अनंत मी’ या महानाट्याचे ध्वनिनाट्य स्वरूपात (ऑडियो ड्रामा) रूपांतरण प्रकाशित करण्याचा ..

सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता

‘सावरकर’ या नावाला ज्या बंधूंनी मंत्रसामर्थ्य बहाल केले, त्या बंधुत्रयींचे शिरोमणी म्हणजे तात्याराव. तात्यारावांचं सारं जीवन समिधेसारखं स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडाला समर्पित होतं. पण, आश्चर्य हे की, या समिधा जेव्हा एखाद्या क्रांतिकारक विचाराच्या, कृत्याच्या संपर्कात येत, तेव्हा आतल्या अग्नीने धडाडून पेटून उठत आणि जेव्हा एकांतात विचारमग्न असत, तेव्हा त्याच समिधेच्या काष्ठावर मनातले विचारकाव्याची लसलसती पालवी होऊन अंकुरत; क्वचित प्रेमकवितांची सुकुमार फुलंही त्यावर उमलत! जितकी प्रखर-ज्वलंत ध्येयनिष्ठा..

अंदमानचा तह !

‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण’ भारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किलोमीटर दूर समुद्रात एका बेटावर आपल्या आयुष्यातली अमूल्य ५० वर्षे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेविण व्यय जाणार, या विचारानेच व्याकुळ सावरकरांनी अंदमानात पोहोचायच्या आधीच दुहेरी जन्मठेपेची शिक्षा कमी करून घेण्याचे प्रयत्न सुरू केले; जेणेकरून शत्रूच्या बंदिवासात झुरण्यापेक्षा ‘शत्रूची माफी मागून नाही’ तर शत्रूशी तह करून मायभूमीची निरंतर सेवा करता यावी! स्वदेशस्वातंत्र्यार्थ क्रांतीलढ्यात प्रत्यक्ष भाग घेता आला नाही ..

स्वा. सावरकर आणि डॉ. हेडगेवार एकाच अमृताचे दोन कलश

संघ आणि सावरकर संबंधांची चर्चा जर आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बाबाराव सावरकर या अनुषंगाने केली तर? शेवटी संघ परिवार असो वा हिंदू महासभा किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना, त्यांचं लक्ष्य एकच आहे, या देशाला परमवैभव प्राप्त करून देणे...

मृत्युंजय सावरकर

आपले सारे काही मातृभूमीला अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही राष्ट्राला मार्गदर्शक आहेत. अशा या ‘कालजयी सावरकरां’चे विचार आजही जनसामान्यांसमोर विशेषत: तरुणांसमोर सतत मांडत राहणे अत्यंत आवश्यक आहे..

महाकवी आणि महायोगी सावरकर

‘देहाकडून देवाकडे’ जाताना वाटेमध्ये देश लागतो, याचे सदैव भान असलेले; किंबहुना देशालाच ‘देव’ मानणारे तेजस्वी क्रांतिसूर्य म्हणजे अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वापुढे ‘अष्टपैलू’, ‘बहुआयामी’ वगैरे शब्द फिकेच पडतात. ‘शतपैलू’ असंच त्यांचं वर्णन करायला हवं. भाषाप्रभू, वक्ता, नाटककार, इतिहासकार, महाकवी... ही यादी न संपणारी आहे. मात्र, त्यांनी प्रत्येक पैलू मातृभूमीलाच अर्पण केला. देवाला फूल वाहतात तितक्या सहजतेने देशाच्या चरणाशी त्यांनी मन वाहिलं. त्यांच्याच शब्दात ..

सावरकर काँग्रेसमध्ये का गेले नाहीत ?

सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. परंतु, काँग्रेस ही निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, ‘हिंदुत्व’ या मुद्द्यावर काँग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा, ब्रह्मचर्य, मुस्लीम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या काँग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले...

सावरकर आणि इस्रायल उपेक्षा आणि अपेक्षा

'हिंदुत्व' या ग्रंथातच स्वतंत्र इस्रायल राष्ट्र झाले, तर आमच्या ज्यू मित्रांप्रमाणे आम्हालाही आनंद होईल," असे सावरकरांनी म्हटले आहे. त्यापुढे जाऊन सावरकर असे म्हणतात की, "जर उद्या ज्यू राहत असलेले पाश्चिमात्य देश आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले, तर पाश्चिमात्य देशांत राहाणार्‍या ज्यूंना इस्रायलबद्दल सहानुभूती वाटल्याशिवाय राहणार नाही." सावरकरांनी १९२२ मध्ये उपस्थित केलेला प्रश्न आज जवळजवळ १०० वर्षांनीही तितकाच व्यवहार्य आहे. इस्रायल आणि ज्यूंविषयी सावरकरांच्या सखोल ज्ञानाचे दर्शन त्यातून होते...