कालजयी सावरकर

VIDEO : सावरकर आणि बंधुता

सावरकरांचे सामाजिक बंधुतेविषयी विचार उद्धृत करणारा माहितीपट..

संपादकीय

सावरकर म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती प्रखर देशभक्त-राष्ट्रभक्त प्रतिमा. ज्यांनी मन, वक्तृत्व, कविता, लेखासह सर्वच मातृभूमीला अर्पण केलंय त्या सावरकरांचे विविध पैलू, जे आजही आपल्याला वैयक्तिक जीवनात तसेच समाजासाठी व राष्ट्रासाठी उपयोगी ठरतील, अशा काही निवडक व अज्ञात पैलूंची ओळख करून देणे, हा या सावरकर विशेषांकाचा हेतू आहे...

समाजक्रांतिकारक सावरकर आणि सद्यस्थिती

मी कोणाचा भाट होऊ इच्छित नाही, पण ज्या स्वातंत्र्यवीराने आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या सात वर्षांत ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या, बॅ. सावरकरांचा किती गौरव करू, असे मला झाले आहे. त्यांनी चालविलेली ही सामाजिक क्रांतीची चळवळ पाहून, इतका प्रसन्न झालो आहे की, माझे अपुरे राहिलेले हेतू पुरवील तर हा निधड्या छातीचा वीर सावरकरच पुरवील असे मला वाटत आहे,” हे उद्गार आहेत दि. २५ फेब्रुवारी १९३३, ज्या दिवशी रत्नागिरीत जन्मजात अस्पृश्यतेचा पुतळा जाळला गेला, त्या दिवशीचे. हे उद्गार आहेत, ’डिप्रेस्ड क्लासेस ..

सावरकरांची कूटनीती

सावरकर निश्चितच एक कूटनीतीकार होते, यात तिळमात्र शंका नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या साहित्यांतूनच नव्हे, तर मार्सेलिसच्या उडीचा प्रसंग असो वा स्वदेशीसाठी विदेशी कपड्यांच्या होळीचे पेटवलेले आंदोलन, सावकरांच्या कूटनीतीने ब्रिटिशांनाही बुचकळ्यात टाकले. सावकरांच्या कूटनीतीच्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेणारा हा लेख... ..

अर्थचिंतक सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अत्यंत व्यवहारी आणि उपयुक्ततावादी बुद्धिमत्तेचे. स्वदेशीबद्दलही ते प्रचंड आग्रही होते, कारण त्यामागील अर्थकारण ते नीट जाणून होते. तेव्हा, सावरकरांचा एक अर्थचिंतक म्हणून विविध पैलू उलगडणारा हा लेख.....

क्रांतिकारकांचे मुकुटमणी - स्वातंत्र्यवीर सावरकर

कडवे राष्ट्रभक्त, सच्चे समाजसेवक, प्रतिभावंत साहित्यिक, जहाल पत्रकार, ख्यातनाम कवी, अंधश्रद्धेचे कट्टर विरोधक, हिंदुत्व तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या वीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली...

नाव गांधींचे, वाटचाल सावरकरवादाकडे...

नाव गांधींचे घेतलं जात आहे, पण वाटचाल सावरकरवादाकडे होत आहे का? म्हणजे सावरकरवादाला गांधीवादाचे लेबल लावलं जात आहे का? मुखात गांधी, कृतीत सावरकर का? पण, वाटचाल सावरकरवादाकडे होऊनही नाव गांधींचे का घेतलं जात आहे? कारण, गांधींनी लोकांच्या भावनेला साद घातली, तर सावरकरांनी लोकांच्या बुद्धीला साद घातली व त्यात आपण भारतीय जरा जास्तच भावनिक! त्यामुळे गांधी श्रद्धेय विषय ठरले...

सावरकर आणि संस्था

’मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ च्याहीपुढे जाऊन, मरावे परी विचाररूपी उरावे, असा आदर्श निर्माण करणार्‍या व्यक्तींची आपल्या महन्मंगल मातृभूमीत वानवा नाही. पण मृत्यूनंतर नव्हेच, जिवंत असतानाही ज्यांचे जीवन चरित्र आख्यायिकाच आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन, आज समाजकार्य देशसेवा करणार्‍या संस्था आहेत. त्या संस्था सावरकरांचे विचार जगतात आणि त्या जगण्यावर कित्येक सकारात्मक विचारांचे अनुबंध फुलतात. महाराष्ट्रातील शेकडो संस्थांपैकी काही संस्थांचा घेतलेला वेध..

स्वा. सावरकर आणि स्त्री सबलीकरण

स्वा. सावरकरांनी स्त्री स्वातंत्र्याबद्दल चिंतनपर लिहिले नाही अथवा स्त्री स्वातंत्र्यासाठी कोणतीही चळवळ केली नाही, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. स्वा. सावरकरांनी स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न हा स्त्री जन्ममरणाचा किंवा तिच्या अस्तित्वाचाच ज्वलंत प्रश्न आहे, असे मानून लेखन वा चळवळी केल्या नाहीत, हे खरे आहे. परंतु, त्यामागील सावरकरांची दृष्टी विचार कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे...

इस्लामविषयक स्वा. सावरकरांचे विचार

प्रस्तुत लेखात सावरकरांच्या इस्लामविषयक विचारांचा परामर्श घ्यावयाचा आहे. सावरकरांनी मुस्लीम राजकारणाचे केलेले विश्लेषण अत्याधिक महत्त्वाचे असले तरी ते या लेखाच्या कक्षेबाहेर आहे. ..

विज्ञाननिष्ठ सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका काव्यातील या ओळी आहेत. आपल्यापैकी बहुतांश लोकांना विनायक दामोदर सावरकर हे एका नायकाच्या रुपात समोर आलेले दिसतात. छोट्याशा भगूर गावापासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी तसेच नंतर जपान अशा विविध देशांत केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटन, त्यांनी उभ्या केलेल्या ‘मित्रमेळा’, ‘अभिनव भारत’ या गुप्त सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटना यातून तात्याराव एक कुशल संघटक म्हणून दिसतात...

सावरकर संशोधन कार्य

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे विविध पैलू असलेले रोमहर्षक व्यक्तिमत्त्व. त्यामुळे अनेक भक्तिभावयुक्त किंवा राजकीय द्वेषाने लिहिलेले लेख आणि पुस्तकेही वाचावयास मिळाली. संघावर अभ्यास करताना मुंबईतील सावरकर सदनामधील १९२४ ते १९५० या कालखंडातील हजारो कागदपत्रे बाळाराव सावरकरांनी मला बघण्यास दिली. यातून ब्रिटिश सरकारला सावरकर कसे दिसले हे कुतूहल मनात निर्माण झाले...

सावरकर आणि आजचा युवक

भारत हा युवकांचा, तरुणांचा देश आहे, असे अभिमानाने आपण म्हणतो, ऐकतो. पण, सद्यस्थिती पाहता, तरुणांची ही ऊर्जा खरंच देशहितासाठी कामी येतेय का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे सावरकरांचे युवकांविषयीचे विचार, अपेक्षा आणि त्यांनी दाखवलेली दिशा आजच्या युवापिढीलाही तितकीच मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही...

सावरकरांच्या लोकविलक्षण व्यक्तित्वछटा

साधारणपणे व्यक्तीची कार्यतत्परता तिला मिळणाऱ्या यशापयशावर अवलंबून असते. यश उत्साह भरते, तर अपयश व्यक्तीला उदास, निरुत्साही करते हा मानसशास्त्रीय नियम आहे. या नियमाला अपवाद ठरावे असे सावरकरांचे व्यक्तित्व. सदासर्वदा उपेक्षा, अवहेलना, प्रतारणा व विद्वेष यात वावरणारे तरीही कार्यमग्न, प्रसन्न, प्रफुल्लित असणारे देवदुर्लभ व्यक्तित्व स्वा. सावरकरांना लाभले होते. असे देवदुर्लभ व्यक्तित्व लाभलेल्या व्यक्तीच्या व्यक्तित्वछटा कशा असाव्यात हे शोधण्याचा प्रयास प्रस्तुत लेखात करणार आहे...

सावरकर व सामाजिक बंधुता

सावरकर प्रखर हिंदुत्ववादी असले तरी ते कधीही जातीयवादी नव्हते, उलट त्यांच्या साहित्यांतून, भाषणांतून वेळोवेळी जातीनिर्मूलन, समता, बंधुता यावर प्रकर्षाने भर दिलेला जाणवतो. त्यामुळे सावरकरांचे सामाजिक बंधुतेविषयी विचार उद्धृत करणारा हा लेख.....

राष्ट्रीय साहित्यिक स्वा. सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर महान क्रांतिकारक होते, हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ होते, त्याचबरोबर एक महान साहित्यिकही होते. चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, नाटक, लेख, निबंध, काव्य असे अनेक प्रकार त्यांनी आपल्या साहित्यात समर्थपणे हाताळले. ..

सहा सोनेरी पाने व हिंदुत्व ग्रंथाचे महत्त्व

हिंदूंना आत्मभान देण्यासाठी आणि त्यांच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा इतिहास समीक्षक ससंदर्भ ग्रंथ आपल्या तर्कशुद्ध दृष्टिकोनातून सावरकरांनी उतार वयात लिहिला...

भारतीय घटनेला सावरकरांचे योगदान

कुठल्याही देशाचा कारभार हा त्या त्या देशातील राज्यघटनेनुरुप चालतो. त्यामुळे राज्यघटना जितकी सर्वस्पर्शी आणि सक्षम, तितकाच त्या देशाचा कारभार सुरळीत. सावरकरांनीही वेळोवेळी त्यांच्या भाषणांतून, साहित्यांतून यासंबंधीचे स्पष्ट आणि परखड विचार मांडले. तेव्हा, सावरकरांचे घटनेविषयीचे विचार या लेखात जाणून घेऊया.....

प्रेमकवी सावरकर

आपल्यापैकी अनेकांनी ‘प्रेमकवी’ आणि ‘सावरकर’ हे दोन शब्द शीर्षकात वाचून काहीसा आश्चर्याचा धक्काही बसला असेल. पण, सावरकर साहित्यावर सखोल नजर फिरवली असता सावरकर केवळ कठोर नव्हते तर तेवढेच मृदू, कोमल स्वभावाचे होते, हे प्रकर्षाने जाणवते. तेव्हा, या लेखात उलगडलेली प्रेमाची सावरकरी परिभाषा.....

सावरकरांचा मानवतावाद

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ओळख सर्वांना प्रखर राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी म्हणून आहेच. पण, या राष्ट्रवादाच्या मुळाशी ‘मानवतावाद’ दडला आहे, हे फार जणांना ठाऊक नसते. याच तथ्याची उजळणी आज आपण करणार आहोत...

हिंदू जगताचे सैनिकीकरण

राष्ट्राच्या रक्षणासाठी देवाचा धावा करत बसण्यापेक्षा आणि अहिंसेची, सहिष्णुतेची जपमाळ ओढत बसण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन मनगटातील शक्ती एकवटून शत्रूवर तुटून पडणारा आणि विजयाचे गीत गाणारा तरुणवर्ग सावरकरांना निर्माण करायचा होता. ..

सावरकरांचे गो-विचार व भूमिका

सावरकरांच्या सर्व तत्त्वज्ञानात जर सगळ्यात जास्त चर्चिलेला झालेला विषय असेल, तर तो ‘गाय’ हा आहे. त्या काळी आणि आजही या विषयाचे पडसाद वैचारिक जगात उमटतात. अगदी सावरकरांच्या इतर मतांशी सहमत नसलेले लोकही सावरकरांची गायीविषयीची मते हिंदुत्ववाद्यांना ऐकवत असतात. त्याविषयी.....

सावरकर आणि भाषाशुद्धी

सदर लेखात हिंदुहृदयसूर्य विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘भाषाशुद्धी’ या विषयाचे महत्त्व आणि आजच्या काळातील त्याची गरज ही गोष्ट अधोरेखित केली आहे. ..