Advertisement

जळगाव

फुले मार्केट मध्ये ताडपत्री बांधतांना विजेचा धक्का लागून तरूण गंभीर

विद्युत खांब्याला ताडपत्री बांधत असतांना तरूणाला विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना गुरूवारी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास फुलेमार्केटमध्ये घडली. यात तरूण गंभीर जखमी होवून भाजला गेला. दरम्यान, तरूण डिपीला चिपकताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत लाकडी दांड्याचे मदतीने त्याला बाहेर ओढले आणि त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू प्रकृति चिंताजनक असल्यामुळे त्याला तातडीने खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पुढे वाचा

पोंलीस प्रशासन समाजाचे एक अंग- जिल्हा पोलीस अधिक्षक कराळे

विविध सण- उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्यासाठी सर्व धर्मियांमध्ये एकोपा महत्वाचा आहे. काही अडचणी आल्यास संपर्क साधा आम्ही नक्की अडचणी सोडवू पोलीस प्रशासन देखील समाजाचे एक अंग असून समाजात शांतता प्रस्तापित करण्यासाठी सहकार्य करा, कुणालाही जाणून बुजून त्रास देणार नाही, मात्र कुणी उपद्रव केल्यास त्यावर कारवाई करण्यास हयगय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला.रमजाननिमित्त शांतता समितीची बैठक नगरपालिका सभागृहात झाली़ याप्रसंगी ते बोलत होत़े.

पुढे वाचा

दुर्गराज रायगडावर होणार ६ जूनला शिवराज्यभिषेक दिनाचा भव्य सोहळा

दुर्गराज रायगडावर सहा जूनला भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार असून या दिव्य सोहळ्यास देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासकांसह लाखो शिवभक्त सहभागी होणार आहेत. ढोलताशांच्या गजरात होणारे गडपूजन, शाहिरी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, पुस्तक प्रकाशन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. गडावर ५ व ६ जूनला वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले असून दोन दिवस गडावर इतिहासाचा जागर मांडला जाणार आहे. तसेच समितीतर्फे शिवभक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्

पुढे वाचा

कुपोषण रोखण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र उपयुक्त

अतिदुर्गम भागातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र उपयुक्त ठरेल. त्यामुळे आदिवासी बांधवांमधील बालमृत्यूचे प्रमाणही कमी होवून एक सक्षम पिढी निर्माण करण्याच्या शासनाच्या योजनेस बळकटी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपुड्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या पोषण- उपचारासाठी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचे (न्युट्रीशन रिहॅबिलिटेशन सेंटर) उद्घाटन करताना व्यक्त केला. त्यांच्या हस्ते बुधवार

पुढे वाचा