मनोरंजन

२४ वर्षांनंतर पुन्हा एकदा "लो चली मैं" : माधुरी - रेणुकाचा हा व्हिडियो नक्की बघा

तब्बल २४ वर्षांआधी म्हणजेच १९९४ मध्ये आलेला चित्रपट "हम आपके हैं कौन" खूप गाजला होतं, त्याचं कारण म्हणजे माधुरी. आणि त्याकाळी रेणुका शहाणे आणि माधुरी दिक्षीत यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं "लो चली मैं अपने देवर की बारात ले के" हे गाणं प्रत्येकाच लग्नाकार्य, समारंभांमध्ये दिसून वाजवण्यात यायचं. प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या गाण्यावर तब्बल २४ वर्षांनंतर रेणुका आणि माधुरी पुन्हा एकदा नाचल्या आहेत. आणि त्यांचा हा व्हिडियो पाहुन प्रेक्षतकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य नक्कीच येणार.

पुढे वाचा

कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये श्रीदेवी यांना सन्मान

कान्स फिल्म फेस्टिव्हल हा नावाजलेला चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षी या चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या अभिनेत्र्यांच्या 'लुक' विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येते. मात्र आता या चित्रपट महोत्सवाची चर्चा करण्यामागचे कारण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या चित्रपट सृष्टीतील कार्याला मरणोपरांत कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारापैकी कुणीही उपस्थित नसल्या कारणाने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

पुढे वाचा

श्रीदेवी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल काय म्हणतायेत बोनी कपूर ?

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'मॉम' या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीदेवी यांची काहा काही दिवसांपूर्वीच अत्यंत दुर्दैवी मृत्यु झाल्या कारणाने त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक अत्यंत भावनिक बाब होती. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्वच स्तरातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मात्र या बाबतीत त्यांचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक होते.

पुढे वाचा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : न्यूटनसह कच्चा लिंबूने मारली बाजी

आज ६५वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये हिंदी भाषेत 'न्यूटन' या चित्रपटाने तर मराठी भाषेत प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाने बाजी मारली आहे. राजकुमार रावच्या 'न्यूटन'ला जागतिक स्तरावर मोठी प्रशंसा मिळाली आहे. तर 'कच्चा लिंबू'चा विषय वेगळा असल्या कारणाने देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. आता या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. या चित्रपटांच्या निवडीसाठी परीक्षकांचे नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले.

पुढे वाचा