राजकारण

टाइम मासिकातून पंतप्रधान मोदींवर टीका : वाद उफाळण्याची चिन्हे

आंतरराष्ट्रीय मासिक 'टाइम' या मासिकाच्या आशिया आवृत्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कव्हर पेजवर स्थान दिले असले तरीही या कव्हर स्टोरीवर केलेल्या उल्लेखामुळे आता वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ', असा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीनिमित्त टाइम मासिकाने विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?', असे या लेखाचे शिर्षक आहे.

पुढे वाचा

मसूद अजहरच्या बंदीला पुलवामा हल्ला ठरला कारणीभूत : भारताची प्रतिक्रिया

जैशचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यासाठी पुलवामा येथील भीषण आत्मघाती हल्लाच कारणीभूत ठरला,” अशी प्रतिक्रिया भारत सरकारने आज गुरुवारी दिली. “मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला,” असा दावा आता पाकिस्तान करीत आहे, पण, “ही घडामोड पाकिस्तानला मोठा हादरा देणारी ठरली असून, आपला राजनयिक पराभव लपविण्यासाठीच हा देश अशा प्रकारचा दावा करीत आहे,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.

पुढे वाचा