गेल्या वर्षी हाफिजला पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवल्यानंतर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी मिली मुस्लीम लीगची स्थापना केली होती.
पुढे वाचा
पाकिस्तानने कधी काळी बांगलादेशच्या नागरिकांवर प्रचंड अत्याचार केलेले आहेत.
मालदीव सर्वोच्च न्यायालयाने काल यामीन यांना देशातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचे आदेश दिले होते.
कृष्णा कुमारी असे या महिलेचे नाव असून पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधून तिची सिनेट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, विशेष म्हणजे कुमारी या दलित समुदायातून असून पाकिस्तानमधील महिला आणि अल्पसंख्यांक समुदायासाठी त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.
देऊबा यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी नेपाळच्या डाव्या आघाडीनी आपले नेते के.पी.ओली यांचे नाव पुढे केले आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी येमेन यांनी मालदीवमध्ये राष्ट्रपती आणीबाणी लागू केली आहे. आणीबाणी लागू केल्यानंतर यामीन यांनी देशांतर्गत असलेल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक करून तुरुंगात डांबले आहे.
आपल्या शेजारील राष्ट्रांबरोबर असलेले संबंध आणखीन दृढ करण्यासाठी यापुढे पाकिस्तान आपल्याला लागणारे सैनिकी साहित्य आणि सहाय्यांसाठी चीन, रशिया आणि युरोपियन देशांवर अवलंबून राहील, असे दस्तगीर यांनी स्पष्ट केले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान राजा फारुख हैदर खान यांनी याविषयी आज घोषणा केली आहे.
गेल्या शनिवारी काबुलमधील सैनिकी प्रशिक्षण केंद्रावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या भीषण हल्ल्यामध्ये १०३ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता.
'हाफिज सईद साहब के उपर पाकिस्तान मे कोई भी केस रजिस्टर नाही है' अशी प्रतिक्रिया अब्बासी यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.
भारत आणि इस्राइल यांच्यातील वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानच्या पोटामध्ये पुन्हा पोटशूळ उठू लागला आहे. 'भारत आणि इस्राइल हे दोघे एकाच माळे मनी असून मुस्लीम देशांच्या भूमीवर त्याची नेहमीच वाकडी नजर असते' अशी टीका पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी केली आहे.
या नव्या करारानुसार बांगलादेशमध्ये असलेल्या सर्व रोहिंग्या मुस्लिमांना त्यांच्या मूळस्थानी अर्थान राखीने प्रांतात सुरक्षितपणे परत पाठवण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही देशांच्या संगत मताने २ वर्ष इतकी मुद्दत ठरवण्यात आली असून या कालावधीमध्ये सर्व रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमध्ये परत पाठवले जाईल, असे दोन्ही देशांनी कबुल केले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये देखील थंडीमुळे २९ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे अवघ्या दोन आठवड्यामध्ये नेपाळमध्ये थंडीमुळे ४५ नागरिकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमेरिका जे काही करत आहे ते इस्राईलच्या सांगण्यावरून करत असून अफगाणिस्तानमध्ये झालेल्या पराभवाचा राग अमेरिका पाकिस्तानवर काढू पाहत आहे. त्यामुळे सर्व मुस्लीम देशांनी एकत्र येऊन अमेरिका आणि इस्राइलविरोधात जिहाद पुकारला पाहिजे' असे हाफिजने म्हटले.
दिवसा येथील कमाल तापमान ह्हे १३ अंश सेल्सिअस एवढे तर रात्री ते ४ ते २ अंश सेल्सिअस एवढे खाली येत आहे.
उद्या सकाळी वाघा बोर्डर येथे या सर्व मच्छीमारांना भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
अमेरिकेने जारी केले नवीन अफगाण धोरण हे पूर्णपणे पाकिस्तानविरोधी असून अमेरिकेच्या या धोरणामुळे भारताकडून पाकिस्तानच्या भूमीवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होऊ शकते' अशी प्रतिक्रिया पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून आज देण्यात आली आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तेहमिना जानजूआ यांनी इस्लामाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले.
दहशतवादाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने लाथाडल्यानंतर जगाचे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा 'काश्मिरी राग' आळवण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानच्या या कृतीचे आम्हाला कसलेही आश्चर्य वाटत नाही. कारण पाकिस्तानला खोट्या गोष्टींचा प्रचार करण्याची सवयच आहे. परंतु आता जगाला पाकिस्तानचा खरा चेहरा काय आहे ते समजलेले आहे. त्यामुळे खोट्या गोष्टींचा प्रसार केल्यामुळे जगातील इतर आपल्या सांत्वनासाठी पुढे येतील, ही आशा पाकिस्तानने सोडून द्यावी'
ट्रम्प यांच्या या भूमिकेचे अफगाणिस्तानकडून देखील स्वागत करण्यात आले असून अमेरिकेने अत्यंत योग्य निर्णय घेतला असल्याचे मत अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्रपती हमीद कारझई यांनी व्यक्त केले आहे.तसेच भारताने देखील यावर आपली प्रतिक्रिया देत, ट्रम्प यांच्या आजच्या वक्तव्यामुळे भारताची पाकिस्तान विषयीची भूमिका आणि बाजू भक्कम झाली आहे, असे भारताने म्हटले आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यापासून तब्बल ६ लाखांहून अधिक रोहिंग्या निर्वासित बांगलादेशमध्ये आलेले आहेत. परंतु यामधील एकाही रोहिंग्या मुस्लीमचा मृत्यू बांगलादेशाच्या भूमीत झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बांगलादेश आणि म्यानमार दोघे मिळून हि समस्या लवकरात लवकर सोडवतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानच्या नॅशनल डायरेक्टरेट ऑफ सिक्युरिटीच्या कार्यालयाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. या व्यक्तीच्या अंगावर बॉम्बसदृश वस्तू पाहून त्याला पकडण्याचा सुरक्षा रक्षकांनी प्रयत्न केला.
तब्बल १ वर्षानंतर जाधव यांच्या कुटुंबियांना आज यांची भेट घेता येणार आहे. भारताने वारंवारपणे केलेल्या मागणीनंतर पाकिस्तानकडून जाधव यांच्या कुटुंबियांन व्हिसा देण्यात आला आहे.
रस्त्यावरील भिकाऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी अगोदर त्यांना या चिखलामधून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला आज पाकिस्तानकडून व्हिजा देण्यात आला आहे.
पुढील वर्षी पाकिस्तामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण देखील उतरणार असल्याची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी हाफिज सईदने केली होती.
बांग्लादेशच्या चटगांव भागात एका माजी महापौर यांच्या अंतयात्रेच्या वेळी अचानक चेंगराचेंगरी झाल्याने १० नागरिक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेत १५ नागरिक जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
भारताने नेपाळला सदैव संकटात मदत केलेली आहे. तसेच या सरकारबरोबर काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याची ग्वाही या अगोदरच भारताने दिलेली आहे, त्यामुळे भारताबरोबर असलेले नेपाळचे संबंधी आणखीन दृढ आणि वृद्धिंगत होतील.
बलुचिस्तानमधील क्वेटा येथे असलेल्या बेथेल मेमोरियल मेथोडीस्ट चर्चमध्ये आज दुपारी हा हल्ला झाला. आज सकाळी चर्चाच्या परिसरातील जवळपास ४०० नागरिक रविवारच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमा झाले होते.
थेट निवडून येणाऱ्या १६५ जागांपैकी आतापर्यंत १३७ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये सीपीएन-यूएमएलला आणि सीपीएन-माओवादी गटाला आतापर्यंत १०० जागांवर विजय मिळाला असून आणखीन १७ जागांवर ही युती आघाडीवर आहे.
अमेरीकेचे संरक्षण सचिव मॅटीस हे काल पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पाक पंतप्रधान आणि लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी अफगाणिस्तान धोरणासंबंधी चर्चा केली. तसेच आशिया खंडामध्ये शांती आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी येथील दहशतवादाचे उच्चाटन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले
जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना आता राजकीय पक्ष म्हणून पाकिस्तानात सक्रीय होणार आहे.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती तसेच लष्कर प्रमुख पपरवेज मुशर्रफ यांना लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा सारख्या संघटनांवर आपले विशेष प्रेम असल्याचे कबुल केले आहे.
हिंदू समुदायाप्रमाणेच ख्रिस्ती समाजाला देखील बांगलादेशमध्ये आपल्या सुरक्षेसाठी संघर्ष करावा लागत आहेत. दररोज हिंदू आणि ख्रिस्ती समाजांवर बांगलादेशमधील कट्टरपंथीय इस्लाम समुदायाकडून हल्ले केले जातात.
स्ट्रीड हे स्वीडनमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते मुळात स्वीडनमधील डेमोक्रॅटिक पक्ष हा आपल्या देशात येत असलेल्या निर्वासितांचा कट्टर विरोधी मानला जातो. निर्वासितांवर बंदी घालण्यात यावी,तसेच त्यांना देशाबाहेर हाकलून देण्यात यावे, असे स्पष्ट मत या पक्षाचे आहे. त्यामुळे अनेक वेळा या पक्षाने अशा प्रकारची बेताल वक्तव्य केलेले आहेत.
पाकिस्तान सरकारमध्ये घेण्यात येणाऱ्या शपथविधीमध्ये झहीद यांनी नवीन बदल केले आहे. या नवीन बदलांमुळे अल्ला आणि पैगंबर यांना कमी लेखले जात असून हा एक प्रकारे त्यांचा अपमान असल्याची भावना 'तहरीक ए लब्बेक या रसुल अल्ला' (टीएलवाय) या कट्टर इस्लाम पंथीय संघटनेनी व्यक्त केली होती.
उद्या नेपाळमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाली ७ वाजता सुरुवात होत आहे. यामध्ये ३७ प्रतिनिधी सभा (लोकसभा) तर ३२ प्रांतीय विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ३२ विधानसभेच्या जागांसाठी होणारे मतदान नेपाळच्या डोंगरभागातील म्हणजेच उत्तर नेपाळमधील राज्यांसाठी होणार आहे. दिवसभर सुरू असणारी मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजता पूर्ण होईल.
तब्बल ८ हजार पोलीस आणि ३ हजार आंदोलनकर्ते यांच्यामध्ये सुरु असलेल्या चकमकींमुळे संपूर्ण इस्लामाबाद शहराला युद्ध छावणीचे स्वरूप आले आहे.
'२०१७ हे वर्ष काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करण्यात आले होते. त्यामुळे भारताने अमेरिकेला फूस लावून पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला तब्बल १० महिने नजरकैदेत ठेवण्यात आले.
रोहिंग्या मुस्लिमांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार सरकार आता बांगलादेशाची मदत घेणार असल्याचे म्यानमार सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. या संबंधी लवकरच दोन्ही देशांमध्ये एक करार होणार असून रोहिंग्या मुस्लिमांच्या समस्येवर दोन्ही देश मिळून काम करणार असल्याचे म्यानमार सरकारकडून सांगण्यात आले आहे.
आपल्या या दौऱ्यामध्ये स्यू की या राखीने प्रांतातील तीन प्रमुख शहरांना भेटी देणार आहेत.
एनएबीने या संबंधी एक परिपत्रक देखील जारी केली असून शरीफ हे पाकिस्तानमध्ये आल्याबरोबर त्यांना अटक करण्यात यावी, असे यात म्हटले आहे
'चाबाहार बंदरामुळे भारत आणि आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि व्यापारी संबंधांमध्ये वाढ होणार असून दक्षिण आशिया खंडाच्या प्रगतीमध्ये या बंदराच्या भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे'
'फक्त इस्लामनुसार हे योग्य आहे' असे म्हणत देशातील इतर धर्मीय महिलांच्या लग्नासाठी ठरवण्यात येणाऱ्या वयोमर्यादेला या देशातील सिनेटने नामंजुरी दिली आहे' त्यामुळे पाकिस्तानसह अनेक ठिकाणी असलेल्या मानवतावादी आणि महीला सक्षमीकरण संस्थाकडून पाकिस्तानच्या या कृतीवर टीका केली जात आहे.
बलुचिस्थानमधील फतेहपुर येथे असलेल्या एक सुफी दर्ग्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.
२०१४ साली पाकिस्तानच्या पेशावर येथील सैनिकी मुलांच्या शाळेत केलेल्या हल्ल्यातील कैद अतिरेक्यांच्या बदल्यात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना देण्याची मागणी केली गेली असल्याचे ते बोलत होते.
गेल्या महिन्यामध्ये अराकन रोहिंग्या साल्वेशन आर्मी (एआरएसए) या दहशतवादी संघटनेनी राखीने प्रांतातील हिंदू आणि बौद्ध वस्त्यांवर हल्ले करून तेथे हिंसाचार घडवून आणला होता.
माम अहमद या ३७ वर्षीय जगातील सर्वाधिक वजनदार महिलेचे आज पहाटे अबुधाबीच्या बुर्जिल इस्पितळात निधन झाले. याबाबत निदान करताना इस्पितळाने म्हटले आहे की, “एकेकाळी इमाम यांचे वजन ३०० किलोहून अधिक झाले होते. आरोग्यविषयक अनेक गुंतागुंत आणि हृदयाचे आजार व मूत्रपिंडाला झालेला संसर्ग यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर २० विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. इमाम यांंचे जाणे दुःखद आहे.”
राखीने प्रांताच्या उत्तरेकडे असलेल्या खा मुंग गावाजवळील जंगलामध्ये हे मृतदेह लष्कारांना आढळून आले आहेत. हे मृतदेह १० ते १२ दिवस जुने असल्याचे लष्कराने सांगितले आहे.
'आजच्या घडीला संपूर्ण म्यानमार हे अशांत आहे. देशाचे सरकार आणि नागरिक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे जगाने म्यानमारच्या एकाच भागाच विचार करू नये, तर संपूर्ण म्यानमारचा विचार करावा' असे आवाहन त्यांनी केले आहे.
तप्रधान मोदींनी आज म्यानमारमधील काही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
दोन्ही देशांमधील परस्पर संबंध आणखीन दृढ व्हावेत या उद्देशाने सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांशी निगडीत हे अकरा करार करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच अधिकृत म्यानमार दौरा आहे. या अगोदर २०१४ मध्ये मोदी हे म्यानमारला गेले होते, परंतु त्यावेळी म्यानमारमध्ये आयोजित आशियान देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ते गेले होते.
देशातंर्गत समस्या असो व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कसलाही मुद्दा असो चीनने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेऊन त्याला मदत केली आहे
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्च्यावा विषयांवर चर्चा झाल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या आजपासून आपल्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर गेल्या आहेत. याठिकाणी होणाऱ्या १५ व्या बिमस्टेक संघटनेच्या बैठकीत त्या सहभागी होणार असून चीन आणि भारत यांच्यात डोकलाम येथील सीमेवरून सुरु असलेल्या तणावावर देखील त्या बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई हल्ल्याचा सुत्राधार हाफिज सईद याने आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या दबावानंतर पाकिस्तानने जमात-उद-दावावर बंदी घातल्यानंतर हाफिज सईद आणि त्याच्या साथीदारांनी नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. 'मिली मुस्लीम लीग' असे पक्षाचे नाव असून हाफिस सईदचा अत्यंत विश्वासू समजला जाणारा सैफुल्ला खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधूजल वाटप प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात वॉशिंग्टन येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वर्ल्ड बँकेने दिली आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील यांच्यात घेण्यात आलेली पहिली बैठक यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशांनी पाणीवाटपप्रश्नी सकारत्मक प्रतिसाद दिल्याचेही वर्ल्ड बँकने सांगितले आहे.
अब्बासी यांनी पीपल्स पार्टीच्या नवीद कमर यांचा पराभव करत संसदेच्या ३४२ मतांपैकी २२१ मत मिळविले. केवळ ४ दिवसात पाकिस्तानमध्ये लोकशाही पुर्नस्थापित झाली, असे त्यांनी प्रतिपादन केले. अब्बासी यांचे सगळीकडे अभिनंदन केले जात आहे.
वाझ शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अब्बासी आपल्या पदाचा राजीनामा देतील.
नवाझ शरीफ यांच्या 'पाकिस्तानी मुस्लीम लीग-नवाझ' या पक्षाच्या अन्य नेत्यांचे नाव सध्या चर्चेत आहे.
जागतिक सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी चीनमध्ये आज होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांची वार्षिक बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये अजित डोवल हे भारताचे प्रतिनिधित्व करणार असून भारत-चीन यांच्यातील सीमेवरील तणाव या विषयी देखील ते चर्चा करणार आहेत. डोकलाम मुद्द्यावर झिनपिंग यांच्या बरोबरच चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जेची यांची देखील भेट डोवल घेणार आहेत.
मालदीवच्या ५२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी शरीफ हे तीन दिवसीय मालदीव दौऱ्यावर गेले आहेत. त्यावेळी मालदीव-पाकिस्तान यांच्यात घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर पनामा पेपर गैरव्यवहार प्रकरणी खटला सुरु आहे.त्यात त्यांच्या कुटुंबियांसह कारागृहाची हवा खायला लागण्याची शक्यता आहे. अश्या परिस्थितीत पाकिस्तानचे पुढच्या पंतप्रधानाची निश्चिती केली गेली आहे.
पाकिस्तान सरकारने आपल्या भूमीत वाढता असलेल्या 'हकानी नेटवर्क' या दहशतवादी संघटनेवर कसलीही ठोस कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानने अद्याप दिली नसल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे सचिव जेम्स मॅटीस यांनी काल अमेरिकन कॉंग्रेसला दिली.
स्वदेशाची अस्मिता आणि स्वाभिमानाविषयी अत्यंत जागरूक आणि प्रेम असलेला देश म्हणून 'चीन'ची जगभरात ओळख आहे. आपल्या स्वायत्ततेला आणि स्वाभिमानाला चीन कधीही धक्का लागू देत नसल्याचे नुकतेच एक उदाहरण चीनमध्ये घडले आहे. देशाच्या सर्वोच्चपदाची खिल्ली उडवली जात असल्याच्या
भारत आणि चीन या दोन जागतिक महाशक्ती आहेत. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध हे जागतिक शांतातेतील अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे मत परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी आज व्यक्त केले. सिंगापूर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ५० व्या आसियान देशाच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
भारतीय सैनिकांनी अनधिकृतपणे चीनच्या सीमेत प्रवेश करून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच भारतीय सैन्य जर चीनला टक्कर देण्याच्या तयारीनिशी डोकलाममध्ये तळ ठोकून बसले असेल तर यामुळे दोन्ही देशांमध्ये कसलीही चर्चा होऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे चर्चेसाठी भारताने विनाअट आपले सैन्य तातडीने मागे घ्यावे, असे शुयांग यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसापासून चीन-अमेरिका यांच्यात सुरु असेला तणाव आता चांगलाच वाढला आहे. अमेरीकेच्या युद्धनौकेने चीनच्या सागरी भागात अनधिकृतपणे प्रवेश केल्यामुळे चीनने आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने अमेरिकेने घुसखोरी केलेल्या भागात पाठवली आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहेत.
अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सैयद सलाहुद्दीन यांनी भारतामध्ये झालेले काही हल्ले हे आम्हीच केले होते, असा कबुलीजबाब दिला आहे. अमेरिकेने घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैयदने भारत आणि अमेरिका यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
नेपाळ येथे आज सकाळी भूकंपाचे झटके बसले असल्याची माहिती समोर येत आहे. हा भूकंप ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यामध्ये कुठलीही जानहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिका आणि तैवान यांच्या झालेल्या शस्त्रास्त्र खरेदी करारावर चीनने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तैवान बरोबर अमेरिकेने केलेला हा करार आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून अमेरिका चीन बरोबर केलेल्या करार मोडत असल्याची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तसेच अमेरिकेने हा व्यवहार रद्द करावा असे देखील चीनने म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारच्या नॅशनल काउंटर टेरेरिस्म ऑथॉरिटी विभागाकडून नुकतीच यासंबंधी एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह देशात तसेच देशाबाहेर दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या आरोपावरून ७१ संघटनांवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
भूटानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते १९८८ मध्ये चीन आणि भूटानमध्ये एक करार झाला होता. या करारानुसार दोन्ही देशांमध्ये असलेला सीमावाद जो पर्यंत सुटत नाही, तो पर्यंत दोन्ही देश सीमाभागावर शांतता ठेवण्याचा प्रयत्न करतील, तसेच कोणताही देश सीमेप्रश्न आपल्या सैनिकीबलाचा वापर करणार नाही. व वर्तमान सीमेचे स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार नाही,'
'द वेसल मार्क' असे या युद्धनौकेचे नाव असून चीनच्या आरमारातील आतापर्यंतची ही सर्वात शक्तिशाली युद्धनौका असल्याचे चीन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब येथे बहावलपुर हायवे वर तेलाचे टँकर उलटल्याने मोठी आग लागली आहे. या आगीत १४० नागरिक ठार झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच यामध्ये १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. टँकरची गती अधिक असल्याने हा अपघात घडला असे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानातील एका हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा धर्म बदलून तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
याआधी देखील पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा व्हिडिओ प्रदर्शित केला होता. मात्र त्याचा निकालावर प्रभावी परिणाम जाणवून आलेला नाही, त्यामुळे या पत्राचा केलेला कांगावा पाकिस्तानला अधिक फायद्याचा ठरेल अशी शक्यता कमी आहे.
काल रात्री बेगराम येथील हवाई तळावर हे सैनिक जात असताना वाटेत त्यांच्यावर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैनिकांची गाडी वाटेत अडवून त्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये ८ जवान शहीद झाले तर ५ जण जखमी झाले.
लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल सामी खान यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यांच्या खंडपीठासमोर हाफिज सईदच्या प्रकरणावर सुनावणी करत आहेत. या प्रकरणावर आज सुनावणी करण्यात येणार होती. परंतु या प्रकरणी डिप्टी अटॉर्नी जनरल न्यायालयात हजर नसल्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे सईदच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे जमात-उद-दावाकडून पत्रकारांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मक्कीने उपस्थित पत्रकारांना अत्यंत केविलवाण्या स्वरात काश्मीर प्रश्नी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
३० वर्षीय तैमुर रझा या तरुणाने सोशल मिडियात केलेल्या पोस्टमुळे दहशतवाद विरोधी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
बांग्लादेशातील बंदरबन येथील कालाघाट आणि लेमुजीरी या दोन्ही ठिकाणी काल या घटना घडल्या. देशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री या दोन्ही ठिकाणी लागोपाठ भूस्खलन झाले.
काश्मीर प्रश्नी रशियाने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर छापलेल्या नकाशामध्ये काश्मीरचा भाग हा अधिकृतपणे पाकिस्तानमध्ये भारताचा
हाफिज आणि त्याच्यासह प्रोफेसर मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद, काझी काशफ हुसेन आणि अब्दुल्ला उबेद या त्याच्या साथीदारांना तीन महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवले होते.
जगातील सगळ्यात वजनदार महिला इमान अहमदच्या बहिणीने डॉक्टरांवर केलेल्या आरोपांनंतर डॉ. लकडावाला आणि इतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इमानला पुन्हा तिच्या घरी म्हणजेच अबूधाबीला परत घेवून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इमानचे वजन ५०० किलो होते, जे शस्त्रक्रियेनंतर ११७ किलोंवर आले होते. मात्र इमानच्या प्रकृतीत सुधार होत नसल्याचा व डॉक्टर खोटे बोलत आहेत असा आरोप इमानच्या बहिणीने केला होता, ज्यानंतर इमानवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे.