अग्रलेख

प्रगतीकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प

दळणवळणाच्या सुविधा, उद्योगधंद्यांची उभारणी आणि सोबतीला कृषी क्षेत्र यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून बेरोजगारीच्या समस्येवरही मात करता येईल.. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुजलाम-सुफलाम आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याचेच यातून स्पष्ट होते...

फुटीरतावाद्यांचा मालक नापाक पाक

युवकांना, पुरुषांना हाताशी धरून भारत सरकार, भारतीय लष्कराविरोधात विरोध प्रदर्शने करणाऱ्या संघटना अस्तित्वात असतानाच आसियाने काश्मीरमध्ये इस्लामी कायदा म्हणजेच शरियतची अंमलबजावणी आणि काश्मीरच्या 'आझादी'च्या हेतूने 'दुख्तरान-ए-मिल्लत' या महिलांच्या फुटीरतावादी गटाची स्थापना केली, अर्थातच पाकिस्तानच्या आर्थिक रसदीच्या बळावरच...

शिक्षणव्यवस्था पोखरणाऱ्यांना चाप

‘अफाट परिश्रम’ करून बनावट, दर्जाहीन संशोधन नियतकालिकांमध्ये छापून आणत ‘संशोधक’ होणाऱ्या विद्वानांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) यंदाही दणका देत सुमारे साडेतीन हजार नियतकालिकांना बोगस ठरवले. विद्यापीठ अनुदान आयोगाचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह असून शिक्षणव्यवस्था पोखरणाऱ्यांना चाप लावणाराही आहे...

बदलत्या चित्राचे अंतरंग

बिश्केकला जे काही घडत आहे आणि पुढे जपानला जे घडणार आहे, ते भारताच्या संयत व सकारात्मक परदेशनीतीचेच फलित आहे...

भारत विकासाचे 'स्क्रॅमजेट' झेपावले!

'स्क्रॅमजेट'च्या यशस्वी परीक्षणाने भारतीय शास्त्रज्ञांचे मनोबलही वाढले असून विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन तसेच संरक्षण क्षेत्रात भारत पुढेपुढेच झेप घेत असल्याचे यातून स्पष्ट होते..

परस्पर विश्वासाचे प्रतीक

भारत-श्रीलंका संबंध हे काही आजचे नाहीत, तर त्याला हजारो वर्षांपासूनचा, रामायण काळाचा, बौद्धकाळाचाही इतिहास, वारसा आहे. तसाच तो संबंध माजी पंतप्रधान राजीव गांधी, ‘लिट्टे’ आणि तामिळ बंडखोर असाही आहे. मोदींच्या श्रीलंका दौर्‍याकडे या कोनातूनही पाहायला हवे...

बदल घडतो, घडू शकतो

आताही मोदी सरकारने धडाडी दाखत एकाचवेळी १२ अधिकार्‍यांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला. तसेच सरकारी विभागांचा कारभार अधिकाधिक मानवी हस्तक्षेपापलीकडे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने कसा होईल, त्याकडेही लक्ष द्यायला हवे. सर्वसामान्य जनतेलाही यातूनच बदल घडतो, बदल घडू शकतो हे पटेल आणि त्यातूनच तिचा सरकारवरील विश्वास अधिकाधिक वाढेल...

पुरोगाम्यांतली स्मशानशांतता

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी लोकशाही, संविधान धोक्यात येईलच्या हाकाट्या पिटणाऱ्यांना प्रत्यक्षात बंगालमध्ये लोकशाहीद्रोही ममतांच्या गुंडांनी घातलेला हैदोस दिसला नाही. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना ममता बॅनर्जींसारखे आक्रस्ताळे व्यक्तिमत्त्व एकूणच लोकशाही व्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचे प्रतिगामी काम करत असल्याचे समजले नाही. असे का?..

बदलत्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा परिणाम

नरेंद्र मोदींनी मालदीवला भेट देऊन आपल्या द्वितीय कार्यकाळातील पहिल्या परदेश दौऱ्याची केवळ औपचारिकताच पूर्ण केली नाही, तर सामरिक व आर्थिकदृष्ट्या भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या शेजाऱ्यांवरही कडी केली...

सोंगट्या उलट्या का पडत आहेत?

शरद पवार असो, राहुल किंवा ममतादीदी सगळ्याच सोंगट्या आता उलट्या पडताना दिसत आहेत. पवारांना स्वयंसेवकांची चिकाटी भावतेय, तर दीदींना प्रशांत किशोरच्या रणनीतीची गरज भासतेय. हा सर्वस्वी मोदीदिग्विजयाचा धसका आणि आगामी काळातील राजकीय उलथापालथीची नांदीच म्हणावी लागेल...

गठबंधनाची भानगड? नको रे बाबा!!

‘महागठबंधन’ यंदा भाजपच्या चौखूर उधळलेल्या अश्वाला लगाम घालणार, अशी हवा तयार करण्यात आली. या हवेनं ‘महागठबंधना’चा फुगा जोरदार फुगवला खरा, परंतु २३ मे रोजी निवडणूक निकालांची टाचणी लागताच फाटकन हा महाकाय फुगा फुटला आणि अक्षरशः नाहीसाच झाला. त्यानंतर आता ‘महागठबंधना’तील घटकपक्षांनी स्वबळाचे नारे देत या नष्ट झालेल्या फुग्याचं ‘तेरावं’ घालण्याचं कामदेखील सुरू केलं आहे...

दमदार राजकीय इच्छाशक्तीचा प्रत्यय

जम्मू-काश्मीरमधील परिसीमनाचा प्रस्ताव आजचा नाही. जगमोहन यांनी अशाप्रकारचे परिसीमन यापूर्वीही केले आहे. आता फक्त त्यावर कशी प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल...

आम्हाला हे नवीन नाही!

हिंदी ही राष्ट्रभाषा असायला हरकत नाही, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. तसे झाल्यास आपल्या भाषिक वेगळेपणाबाबत जास्तच संवेदनशील असलेल्या दक्षिणेतून विरोधी आवाज उठवला जातो. हे स्वातंत्र्यपूर्व काळातही झालेच होते, स्वातंत्र्यानंतरही आणि आताही होताना दिसते. म्हणूनच हिंदी भाषेचा शैक्षणिक धोरणात समावेश करायचाच असेल तर तो तारतम्याने, चर्चेने आणि सर्वांना विश्वासात घेऊनच करायला हवा...

शेवटची झटापट!

वैफल्याने, नैराश्याने घेरल्याने पवार आता कसलीही विधाने करत आहेत. पण यातून काहीही साध्य होणार नाही, उलट नव्या पिढीसमोर शरद पवारांचेच अधिक हसे होत राहणार. मात्र, आयुष्याच्या संधीकाळी पवारांबाबत असे होणे हे शोकांतिकेसारखेच!..

दोघांत उजवा कोणीच नाही!

अमेरिका अतिशय उघडपणे आर्थिक दहशतवाद पसरवत असून त्याला चीनने ‘आर्थिक दहशतवादाचा नंगानाच’ असे संबोधले. अमेरिकेची भूमिका आर्थिक दृष्टीने उग्र राष्ट्रवादाची-धमकावण्याची आहे, असा आरोप चीनने केला. चीनच्या या तडफडीमागे दोन-तीन कारणे आहेत; त्याचबरोबर चीनने अमेरिकेवर कितीही आरोप केला तरी चीनही अमेरिकेपेक्षा उजवा आहे, असे नाही...

समजदारास इशारा पुरेसा!

खान मार्केटच्या कॅफेटेरियात आता कॉफीच मिळते, असे गमतीने म्हटले जाते. मोदींचे मंत्रिमंडळ मोदींच्या इच्छेपूर्वी कुणालाही कळत नव्हते. त्यात बरेच अर्थ दडले आहेत...

आनंदवनभुवनाची अनुभूती!

लोकप्रतिनिधीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला प्रेरणा देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा, संतुलित, समन्वयवादी आपला माणूस पंतप्रधानपदी विराजमान करणारा हा प्रसंग! भारताला विश्वगुरु, वैभवशाली देश म्हणून उभा करण्यासाठी सतत प्राणपणाने काम करण्याची स्फूर्ती देणारा उत्कट असा हा घटनाक्रम! प्रत्येक भारतीयाच्या मनात असे एक ना अनेक भावतरंग क्षणोक्षणी उमटवणारा, आनंदवनभुवनाची अनुभूती देणारा हा दिन!..

कोलांटउड्यांचा मोसम

कोलांटउडी मारण्यात फक्त ‘टाइम’ मॅगझिन पुढे नाही. पश्चिम बंगालपासून कर्नाटकपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत अशा अनेक कोलांटउड्या मारल्या जाणार आहेत...

मोदींच्या आगामी परराष्ट्र धोरणाची चुणूक

‘बिमस्टेक’मधील देश छोटे छोटे दिसत असले तरी, या देशांना शपथविधीला बोलावण्यातून त्यांचा भारतावरील विश्वास नक्कीच वाढू शकेल. भारताच्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाला बळकटी मिळण्याच्या आणि चीनला शह देण्याच्या दृष्टीने या देशांची उपयुक्तता मोठी व महत्त्वाची आहे. कारण, गेल्या काही काळापासून चीनने या देशांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला...

अमित शाहंची अपरिहार्यता

एका लहानशा गुन्हेगाराच्या चकमकीतील मृत्युमुळे एखाद्या गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागते. ही भारतीय राजकारणातील तशी दुर्मीळ घटना. पण, हे अमित शाहंच्या बाबतीत झाले. काँग्रेसविरोधात यश मिळविण्याचा कडवटपणा हा त्यांच्या पूर्वायुष्यात दडलेला आहे...

पवारांनी संपून कसे चालेल?

संकटे आली की हार मानायची नाही, तर लगेच पलटी मारायची हा पवारांचाच स्वभाव आहे. तसेच पवारांचे ‘अजून मी संपलो नाही’ हे वाक्यही खरेच. कारण, महाराष्ट्रातला जातीयवाद टिकवायचा असेल तर, पवारांनी संपून कसे चालेल? आणि सरतेशेवटी बारामतीत सुप्रियाताईंना पडतानाही पवारांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे, मग पवार संपलेले कसे चालेल?..

जातिभेदविरहित मानसिकतेचा प्रत्यय...

  2019च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून भारतीयांनी जो जनादेश स्पष्ट केला आहे, त्यातून भारत आता एका नव्या आणि आश्वासक वळणावर आलेला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. निवडणुकीच्या आकडेवारीचे विश्लेषण, कुणाला किती टक्के मते मिळाली, कोण कमी पडले, कुणी किती कमी मते घेतली, ‘नोटा’ला किती मते पडली, वगैरे बाबींवर भरपूर चर्चा होत आहे आणि होतही राहणार. परंतु, या निकालाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची मात्र फार चर्चा होताना दिसत नाही. एकतर तशी चर्चा कथित बुद्धिवंतांना, मीडियाला सोयीची नसावी ..

महाराष्ट्राच्या निकालाचा अन्वयार्थ

महाराष्ट्रातल्या आणि एकंदरीतच देशभरातील राजकीय पंडितांना अवाक् करायला लावणारा असा हा निकाल होता. महाराष्ट्रातला अशासाठी की, मुंबई-महाराष्ट्रात जे घडते त्याचे परिणाम देशभरात उमटत असतात...

पुनरागमनायच !

काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्टाचार, जातीधर्माच्या राजकारणाला आणि स्वतःला देशाचे मालक समजण्याच्या अहंकारी वृत्तीला जोरदार चपराक लगावत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपच्या, राष्ट्रवादाच्या, विकासाच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले...

पराभूत मानसिकतेचे बळी

निकाल लागायच्या आधीच सुरू झालेली रडारड ही कसली लक्षणे मानायची? किमान शब्दांत वर्णन करायचे तर, ‘मनाने हरलेली माणसे’ एवढेच त्याचे वर्णन करता येईल. बहुसंख्य मतांनी निवडून येणारे नेते हे काही आपल्याला नवे नाही. मात्र, निकाल लागायच्या आधीच आपला पराजय मान्य केलेले नेते आणि पक्ष मात्र आपण पहिल्यांदाच पाहात आहोत...

पवारांचा नौटंकीबाज भाईचारा !

भाईचार्‍याचा मुद्दा घेतला तरी शरद पवारांकडे पाहून कोणाला वाटेल का, ही व्यक्ती सामाजिक सौहार्द-सलोखा वाढीसाठी काही काम करू शकते? तर कधीच नाही. कारण, पवारांनी आतापर्यंत ‘भाईचारा’ शब्दाचाच खून पाडण्याचे काम इमानेइतबारे केल्याचे निरनिराळ्या घटनांतून दिसते व पटतेही...

अनपेक्षित नक्कीच नाही!

एक्झिट पोलच्या आकड्यात धक्कादायक असे काहीच नाही. राजकारणात अचानक काहीच घडत नाही. कुठलीही राजकीय घटना ही एका सुनिश्चित राजकीय प्रक्रियेचे फलित असते. मोदींना ते जमले आहे. त्यामुळे आज जे आकडे समोर आले आहेत त्यात अनपेक्षित काहीच नाही...

मुद्दा केवळ मंदिर दर्शनाचा नाही!

सोबतच या सगळ्यालाच एका भयगंडाची किनारदेखील आहे. देशात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेवर येण्याची व आपली सद्दी संपल्याची जाणीव या लोकांना होत असल्यानेच हे सगळे घाबरलेले लोक मोदींविरोधात नाही नाही ते उद्योग करत आहेत. म्हणजेच मुद्दा केवळ नरेंद्र मोदींच्या मंदिर दर्शनाचा नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाला लागलेल्या सुरुंगाचा आहे...

आणीबाणीचे ‘ट्रम्प’कार्ड

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या आणीबाणीच्या निर्णयाकडे दुधारी अस्त्र म्हणूनच पाहता येईल. कारण, एकीकडे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून दुसरीकडे चीनला व्यापारीदृष्ट्या शह देणारी ही ट्रम्प यांची खेळी म्हणावी लागेल...

हाहाकार आणि स्मशानशांतता

आज पश्चिम बंगालमध्ये एका बाजूला हाहाकार माजलेला असताना, निवडणूक आयोगाने इथल्या हिंसाचारामुळे कलम ३२४ चा प्रथमच वापर केलेला असतानाही तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, लोकशाहीवादी मंडळींच्या गोटात स्मशानशांतताच आहे. हे लोक कोणाला वाचवत आहेत आणि स्वतःला कोणत्या ‘लोकशाहीचे रक्षणकर्ते’ म्हणवत आहेत, हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो...

शस्त्रसज्ज व्हायलाच हवे!

प्रशिक्षण वा वापरादरम्यान कमअस्सल दारूगोळ्यामुळे जवानांना इजा पोहोचते, ते जखमी होतात. कधी कधी जीवही जाऊ शकतो. अशा स्थितीत ते नुकसान केवळ संबंधित जवानाचे वा परिवाराचे नसते तर ते अवघ्या देशाचे असते. म्हणूनच हा विषय तातडीने लक्ष देण्याइतका महत्त्वाचा म्हटला पाहिजे...

फुटका 'मणी' अवतरला!

नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, अशी भाकिते करणार्‍या मणिशंकर अय्यरसारख्यांची यामुळे जशी गोची झाली, तसेच त्यांचे मानसिक संतुलनही ढळत गेले. गेल्या पाच वर्षांतील मणिशंकर अय्यर वा तशा विचारांच्या लोकांची वक्तव्ये तपासून पाहिली की त्याची खात्री पटते...

फडणवीस समर्थ आहेत!

जिथून आगामी निवडणुकांत फायदा होईल, त्याच ठिकाणी-पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडक गावखेड्यांत पवार जाताना दिसतात. अशावेळी पवारांना राष्ट्रीयच नव्हे, तर ‘राज्य पातळीवरचे नेतृत्व’ म्हणणेही कितपत योग्य, असे विचारावेसे वाटते. म्हणूनच शरद पवारांनी आता राज्याचा विचार करणे सोडून द्यावे, कारण राज्य चालवायला, दुष्काळ निवारण करण्यासाठी फडणवीस समर्थ आहेत...

पाकिस्तान आला ताळ्यावर

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा भारतात सत्तेवर येतील, हे दिसतेच आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आले आणि पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर ते त्या देशाला फार मोठ्या संकटाच्या खाईत लोटेल, हे सत्यच! पाकिस्तानने आता भारतासमोर ठेवलेल्या चर्चेच्या प्रस्तावामागे हेही एक कारण आहे...

इतकी चिंता नको!

नेते आले आणि गेले. मात्र, भारत आपला प्रवास करीतच राहिला. भारताच्या जनमानसाच्या लोकशाहीविषयक जाणिवांविषयी आज शंका व्यक्त केली गेलेली नाही. ती जुनीच पद्धत आहे...

स्वतःचे झाकलेले पाहा!

अहमद पटेल यांनी केलेला भाजपवरील आरोप असो वा राजीव गांधींच्या अवमानाचे म्हणणे असो, दोन्ही गोष्टीशी काँग्रेसचा अधिक संबंध आहे. शिवाय ‘मोदींनीच हे केले, मोदींनीच हे उकरून काढले’ असे म्हणणाऱ्यांनी आधी आपण या माणसाविरोधात काय काय ओकले, तेही पाहावे. स्वतःचे झाकून आणि दुसऱ्याचे वाकून पाहिल्याने काहीही साध्य होणार नाही...

बंगाली जादू चालेना!

बंगालला स्वत:ची अशी एक अस्मिता नक्कीच आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या महिला नेतृत्वाने आजतागायत बुरखा घालून हिंडण्याचे उद्योग केलेले नाहीत. या बाईंनी मतांच्या आशेने तेही केले. आता त्याची फळे मिळण्याची वेळ आली आहे...

लिबरलांची गोची

‘उत्तर प्रदेशातल्या जागा कमी होतील’ हा प्रवाद मोदीविरोधकांना सुखावणारा असतो. मात्र, त्याचवेळी बंगाल व ओडिशामध्ये वाढणार्‍या जागा यांना अस्वस्थ करून जातात...

हे तर तुमच्याच कर्माचे फळ!

आज पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींबद्दलचे सत्य आणि तथ्य समोर आणले तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि चमच्यांनी बिथरण्याचे काहीही कारण नाही. कारण, घराण्याचे चिराग जो चिखल उडवण्याचा खेळ इतके दिवस करत आले, त्याला मोदींनी दिलेले हे प्रत्युत्तर आहे. राहुल गांधींनी आपण करून ठेवलेल्या कर्मांचे कांड पाहावे आणि कर्मसिद्धांत आपल्यालाच लागू होत असल्याची खात्री करून घ्यावी...

नक्षलवाद : कांगावा आणि वास्तव

नक्षलवादाची समस्या सोडविण्याचा मार्ग विकासाची प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करणे आणि कोणतीही दयामाया न दाखवता नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणे, हाच आहे. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत हाच मार्ग अवलंबला आणि काटेकोरपणे अमलातही आणला...

फक्त नावातच ‘सीताराम’

आपला जनाधार टिकविण्यासाठी रामायण डोक्यावर घेऊन चालणारे सीताराम येचुरी आता रामायणातील हिंसेमुळे अस्वस्थ आहेत...

आता मसूदला ठोकाच!

आता फक्त मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ ठरवण्याचे पडसाद नेमके कसे उमटतात व मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर भारत त्याला पाकिस्तानात घुसून ठोकतो का, एवढेच पाहायचे!..

अटीतटीला आलेले पवार

पवार जेव्हा म्हणतात की, “बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल,” तेव्हा त्यामागचे वास्तव काही निराळेच असते...

हिंदू पुतळ्यांची भीती!

एका संकेतस्थळाने भारतातील हिंदू नेत्यांच्या, देवीदेवतांच्या भव्य प्रतिमा मुस्लिमांना बेचैन करत असल्याचे जाहीर केले. म्हणजेच इस्लामी कट्टरवाद्यांनी गेल्या कित्येक वर्षांत शेकडो, हजारो, लाखो लोकांच्या चिंधड्या केल्या तरी मुस्लिमांना भीती वाटते, कोणाची? तर हिंदू मूल्यांच्या विराट अभिव्यक्तीची! यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना?..

आपण आणि श्रीलंका...

आपल्याकडे छद्मी पुरोगामी आपल्या सेक्युलरिझमचा खोटा बुरखा फाटू नये म्हणून ज्या प्रकारचे तर्क देत असतात, त्याच्या चिंध्या करणारी ही कृत्ये आहेत. श्रीलंकेत झालेला हा हल्ला काही पहिला नव्हे आणि शेवटचा नाही. उलट याला जोपर्यंत कठोर उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत अशी कृत्ये करणार्‍यांचे मनोबल वाढतच राहणार आहे. श्रीलंका त्याचा मुकाबला कसा करते ते पाहावे लागेल...

देशाचे आणि आपले भवितव्य घडविण्याची संधी!

कोणीही निवडून आला तरी आपल्या आयुष्यात काय फरक पडणार?, ही मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, कारण तुमच्या एका मताने लोकशाहीचे आणि पुढल्या पिढीचे भवितव्य घडणार असते. म्हणूनच पुढली पाच वर्षेही विचारधारा, राष्ट्रहित सर्वोपरी मानणाऱ्यांकडे देश सोपवणेच योग्य! कारण राष्ट्र टिकले तरच आपणही टिकू! म्हणूनच मतदान करा!..

वडाची साल पिंपळाला

राजकारणात कोणीही काहीही फुकट करीत नाही. राज ठाकरेही फुकट करीत नाहीत. मुद्दा आहे तो त्यांच्याकडून भ्रमनिरास झालेल्या मराठी माणसांचा आणि त्यांच्या स्वत:च्या कार्यकर्त्यांचा...

संकट की संधी?

पेप्सिको व शेतकऱ्यांमधील लढाई आज शेतकऱ्यांच्या बाजूने लागली असली तरी पुढच्या काळात असे अनेक प्रसंग येणार, याची आपण तयारी ठेवली पाहिजे...

पुरावा तर हवाच!

एकंदरीतच हा सगळा मामला दिसतो तितका सोपा आणि वाटतो तितका सरळ नाही. न्या. गोगोईंवरील आरोप सिद्ध होतात का, हे येणारा काळच ठरवेल. पण, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीलाही कशाप्रकारे घेरता येऊ शकते, याचे उदाहरणही हे प्रकरण प्रस्तुत करून जाईल...

इराण-अमेरिका चकमकीचे विविध अर्थ

अमेरिका व इराण यांच्या लढाईत भारताला काही फटके सोसावे लागणारच आहेत. मुद्दा हाच असेल की, ते किती गंभीर असतील...

पाकपेक्षा यांनाच भीती!

नरेंद्र मोदींनी काश्मीरबाबत ठोस भूमिका घेतल्याने आपल्या भवितव्याची, काश्मीरच्या कथित जहागिरीची चिंता त्यांना सतावू लागली. आज मेहबूबा मुफ्ती असो व अब्दुल्ला कुटुंबीय, त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द याचीच साक्ष देतात. आता काश्मीरच्या दुर्दैवासाठी कारणीभूत ठरलेल्या या नेत्यांना किती काळ भुलायचे की हद्दपार करायचे, याचा निर्णय तिथल्या जनतेनेच घ्यायला हवा...

हाँ, मै हूँ माफीवीर!

आज खराखुरा ‘माफीवीर’ झालेले राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या कोठडीतून सुटकेसाठी ब्रिटिशांची माफी मागितल्याचा दावा करत आले. आपल्या मालकानेच सावरकरांना ‘माफीवीर’ म्हटल्याने गांधी-नेहरू घराण्याची थुंकी झेलण्यासाठी आसुसलेल्या राहुल गांधींच्या चमच्यांनाही मग चांगलाच चेव चढत असे...

राहुल गांधी की राऊल विन्सी?

आता राहुल गांधींना की (राऊल विन्सी?) घुसखोरीचा निकष लागू होत नसला तरी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा नक्कीच लागू होतो. म्हणूनच त्यांना खोटी माहिती सादर करण्यावरून निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचा निर्णय अमेठीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही...

नुसत्या माफीने भागेल?

वस्तुत: कुठलाही सेमेटिक धर्म ही एकप्रकारची राजकीय विचारसरणीच असते. मूल्यांची पखरण त्यात केलेली असली तरी, तिचा मूळ उद्देश हा शुद्ध राजकीय आणि जनसमुदायातले सर्वच प्रकारचे घटक सोबत ठेवण्यासाठीच केला जातो. चर्चही तसेच वागत आहे...

आता तरी जागे व्हा!

बुतपरस्तांशी ओवेसींनी केलेली युती केवळ राजकीय फायद्यासाठीची, मुघलांची देशावरची कथित मालकी परत मिळवण्याच्या उद्दिष्टातली एक पायरी असते. त्यात दलितांच्या, बौद्धांच्या किंवा आंबेडकरी जनतेच्या श्रद्धा-आस्थेचा मानसन्मान ठेवण्याची त्यांना गरज वाटत नाही. हे समजून घेऊन प्रकाश आंबेडकरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता तरी जागे व्हावे...

खोटा कलंक पुसला जाणार!

देशासमोर आता दोन प्रकारची उदाहरणे असतील. एक असेल हिंदूंना दहशतवादी ठरविण्याच्या प्रयत्नांचे आणि दुसरे असेल तो खोटा कलंक पुसून काढण्याचे..

आला वाचाळवीरांचा मोसम

शरद पवार, राज ठाकरे, पराभवाच्या भीतीने दुसर्‍या मतदारसंघात पलायन करणारे राहुल गांधी, काश्मिरींच्या कित्येक पिढ्या बरबाद करणार्‍या फारुख अब्दुल्ला यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. प्रचाराचे वातावरण जसजसे तापू लागले, तसतसे या मंडळींच्या तोंडातून खोटारडेपणाचे, विद्वेषाचे, असूयेचे, देशविरोधाची गरळ बाहेर पडू लागली...

अजूनही बरेच आहे...

नेहरूंनी पंतप्रधानपदी आल्यानंतर भारतीय सैन्याची निर्मिती केलेली नाही. नेहरूंना वारसा मिळाला, तो ब्रिटिश सैन्याचा. उलट नेहरूंनी सैन्याच्या बळकटीकरणाकडे दुर्लक्ष करत खच्चीकरणालाच प्राधान्य दिले. सैन्यविघातक नेहरुनिती ही एवढ्यावरच थांबते, असे नाही, तर जवाहरलाल नेहरुंनी अजूनही बरेच कारनामे करुन ठेवले आहेत, ज्याची फळे आजही देश भोगतोच आहे...

तांत्रिक प्रगतीवर भारताची छाप

तंत्रज्ञान वापरात भारत चीनहून पुढे असल्याचा अहवाल ‘मॅकेन्झी’ने नुकताच दिला. ‘फिक्की’नेदेखील भारत डिजिटल उद्योगात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय क्षेपणास्त्रांना जगाच्या बाजारात मागणी असल्याचा दावा केला. एकंदरीत जगभरात तांत्रिक प्रगतीवर भारताचीच छाप पडत असल्याचे यातून सिद्ध होते...

जेटचे विमान उडायलाच हवे!

खाजगी असल्याने ‘पडू दे बंद’ असा पवित्रा घेऊन चालणार नाही. रोजगार, दळणवळण आणि बँकांसाठीची वित्तीय हमी यासाठी जेटचे विमान पुन्हा उडालेच पाहिजे...

हत्या आणि सन्नाटा

एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची हत्या झाली की रस्त्यावर उतरायचे; अन्यथा मंदाडाप्रमाणे बघत राहायचे, ही या देशातल्या काही अभिव्यक्तिवाल्यांची वृत्ती...

कललेले आणि कलंडलेले

शरद पवार काय आणि राज ठाकरे काय, एकेकाळचे हे मोदींचे स्तुतिपाठक आता एकाएकी मोदींच्या विरोधात काँगेसचे गुणगान करू लागले आहेत. २०१४च्या निवडणुकीत अनेकांचे मुखवटे गळून पडले. आता अनेकांचे चेहर्‍यामागचे खरे चेहरेही समोर येणार आहेत...

ते सहाशे आणि हे एकशे सात!

ते सहाशे आणि इथले एकशे सात यात अजून काही लोक जोडून कौरव सहस्त्रक पूर्ण केले तरीही मोदींनी हरवता येणार नाही...

राहुलची निवृत्तीकथा

तरुण रक्ताला संधी देण्याचे राहुल गांधींनी एवढेच मनावर घेतले असेल तर मग मध्य प्रदेश व राजस्थान या दोन्हीही राज्यात तशी संधी होतीच की! मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधियांसारख्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला मुख्यमंत्रिपदी बसविण्याऐवजी कमलनाथांना का लादले गेले? तीच स्थिती राजस्थानचीही...

झुंड आणि तिची भीती...

असहिष्णुतेच्या ज्या गोष्टी हे सांगतात, त्याच्यापेक्षा कितीतरी भयावह गोष्टी या देशाच्या इतिहासात घडल्या आहेत. शिखांचे हत्याकांड असो, काश्मिरी हिंदूंची ससेहोलपट असो, गोध्रात रेल्वे जाळण्याचा प्रकार असो, यातील किती लोकांनी यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली आहे?..

तुका म्हणे ऐशा नरा...

ज्यांच्याशी नवा संसार थाटलाय, त्या पवारसाहेबांचे परिणाम राजू शेट्टींवर इतक्या लवकर दिसायला लागतील, असे वाटले नव्हते...

बुरखे फाटू लागले...

ओमर अब्दुल्ला किंवा मेहबूबा मुफ्ती जे बोलत आहेत, त्याची खरी कारणे निराळी आहेत. खुद्द त्यांच्याच भूमीत त्यांचेच फाटणारे बुरखे ही त्यांची खरी अडचण आहे...

‘नासा’चा कांगावा

‘मिशन शक्ती’बाबत अमेरिकेची अंतराळ संस्था असलेल्या ‘नासा’चे प्रमुख काय म्हणतात यापेक्षा ते असे का म्हणतात, हे समजून घ्यायला हवे...

‘हिंदू दहशतवादा’चा व्यापक कट!

देशात काहीही झाले तरी हिंदूंना सन्मानाने आणि अभिमानाने जगायचे असेल तर काँग्रेसला सत्तेतून उखडून फेकणे का आवश्यक आहे, तेदेखील ‘हिंदू दहशतवादा’च्या या व्यापक कटावरून स्पष्ट होते...

राहुलना पाडण्याची सुपारी!

केरळचे मुख्यमंत्री व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते पिनराई विजयन तसेच प्रकाश करात या दोघांनीही राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढविल्यास आम्ही पराभवाचा हिसका दाखवू, असे स्पष्ट केले. डाव्या पक्षांच्या या भूमिकेमागे निश्चितच काही कारणे आहेत, ज्यामुळे आज त्यांनी उघडपणे राहुल गांधी व काँग्रेसला विरोध करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते...

संशयाची ‘फारुखी’ कीड

फारुख अब्दुल्लांच्या डोक्यात सैनिकांच्या हौतात्म्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे किडे वळवळल्याचे दिसते. म्हणूनच पाकिस्तानने पोसलेल्या, पाळलेल्या दहशतवाद्यांनी ज्यांच्या रक्तामांसाचा चिखल केला, ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यालाच खोटे ठरविण्याचा हिणकसपणा अब्दुल्लांनी केला. म्हणूनच आता जनतेनेच या देशविरोधी कीडीला हद्दपार केले पाहिजे, असे वाटते...

न कमावताच वाटणारे

स्वत:च्या आयुष्यात एक दमडीही न कमवलेला गृहस्थ गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा करतो आणिकुठलीही निवडणूक न लढवता सरंजामी आयुष्य जगणारी त्याची बहीण वाराणसी लढविण्याच्या बाता मारते.....

हा अ‘न्याय’नको राजन!

२००८च्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीचे त्याच्या तीन वर्षांपूर्वीच भाकीत करणार्‍या रघुराम राजन यांनी काँग्रेसलाही संपुआच्या कार्यकाळात वेळोवेळी मार्गदर्शन केले असते, तर आज ‘गरिबी मिटाव’साठी त्यांच्याशीच सल्लामसलत करायची वेळ कदाचित काँग्रेसवरही आली नसती...

नक्की कोणाशी लढायचे?

क्षेपणास्त्राने अत्यंत गुप्त पद्धतीने किमान वेळात ३०० किमी अंतरावर असलेले लक्ष्य भारतीय तंत्रज्ञानाने उद्ध्वस्त करता येऊ शकते, ही भारतद्वेष्ट्यांसाठी चिंता वाढविणारी गोष्ट आहे. ..

मलाला गप्प का?

पाकिस्तानातल्या दोन हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि बळजबरीने निकाह लावण्याचा धक्कादायक विषय समोर आला, तेव्हापासून मलालाची दातखीळ बसल्याचे पाहायला मिळाले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घटनेची दखल घेतली तरी मलालाच्या तोंडातून या घटनेविरोधात एक शब्दही फुटला नाही...

वायुसेनेच्या ताफ्यात ‘चिनुक’ची चुणूक

‘चिनुक’मुळे भारताची क्षमता व सज्जता वाढलेली असतानाच पाकिस्तानकडे मात्र सध्यातरी असे कोणतेही हेलिकॉप्टर नाही, जे ‘चिनुक’ला उत्तर देऊ शकेल. म्हणूनच पाकिस्तानने कितीही बेटकुळ्या दाखवून मोठेपणाचा आव आणला तरी ‘चिनुक’ची चुणूक त्याला घामच फोडेल. सोबतच भारताला आपल्या चीनसारख्या नाठाळ शेजाऱ्यांच्या कट-कारस्थानांवर वचक ठेवता येईल...

नांग्या ठेचल्या!

जम्मू-काश्मीर संदर्भाने मोठ्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुटीर नेते, जमात-ए-इस्लामी व जेकेएलएफवरील बंदीचा ‘कलम ३७०’ व ‘३५ ए’च्या निराकरणाशी, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तानवरील नापाक ताब्याविरोधातील कारवाईशीही असू शकतो. परिणामी भावी काळातील विरोधाची नांगी आताच ठेचण्याची कृती मोदी सरकारने केली असावी...

सॅम अंकलची नापाक वकिली

मोदी सरकारने हिंमत दाखवून दहशतवाद्यांना ‘एकाच्या बदल्यात दहा’ने उत्तर देण्याचा विडा उचलला तर काँग्रेसी बुळ्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या! पाकिस्तानचा जेवढा जीव तुटत नसेल, तेवढा यांचा जीव तीळतीळ तुटू लागला! पित्रोदांचे पित्त खवळले! वास्तविक, दहशतवादाचा राक्षस जेव्हा पाळण्यात होता, तेव्हाच त्याला नेस्तनाबूत, उद्ध्वस्त करता आले असते...

नव्या वळणावरचा महाराष्ट्र

कधी नव्हे असा पेचप्रसंग सध्या शरद पवारांसमोर उभा आहे. बारामती मुलीला दिल्यानंतर आज स्वत:साठीच मतदारसंघ नाही, अशी त्यांची स्थिती आहे. ज्या तिसर्‍या आघाडीची स्वप्ने ते पाहात होते, तिचेही काही खरे नाही. ..

बेरोजगारांची पोपटपंची!

दोनच आठवड्यांपूर्वी ‘सीआयआय’ ने केलेल्या सर्वेक्षणातून ‘एमएसएमई’ क्षेत्रात २०१४ पासून सहा कोटी लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली. पण, धूळफेक करणार्‍या आकड्यांच्या मटक्यावर बोली लावणार्‍या हार्दिक पटेलसारख्यांच्या डोक्यात ही गोष्ट घुसूच शकत नाही. परिणामी ते ‘मैं हूँ बेरोजगार, मैं हूँ बेरोजगार’ची टिमकी वाजवताना दिसतात...

महागठबंधनाची सर्कस

महागठबंधनाची पुडी सोडणार्‍या सगळ्यांना एकाचवेळी मोदींनाही रोखायचेय आणि काँग्रेसलाही शिरजोर होऊ द्यायचे नाही. सवत रंडकी झाली पाहिजे, म्हणतात ते हेच. म्हणूनच उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमध्ये काँग्रेसला कोणी विचारत नाहीसे दिसते. पण ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पुढे तर हे पक्ष या सर्कशीत एकमेकांविरोधात अनेक कोलांटउड्या मारताना दिसतील, हे नक्की. कर्नाटकात कुमारस्वामींच्या शपथविधीवेळी दौलत की बेटी मायावती आणि राहुलबाबाच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी कपाळाला कपाळ लावून दाखविलेल्या स्नेहाची पुरेपूर चर्चा ..

आशय समजून घेताना

खरे म्हणजे पूर्वी ज्यांनी नवयुगाची मुहूर्तमेढ रोवली, त्याची फळे जशी सर्वसामान्यांना मिळाली, तशीच ती राज्यकर्त्यांनाही मिळाली. या बदलाचे व्यक्तीमत्व म्हणून जे प्रतिक भारतीय जनमानस पाहू इच्छित होते, ते आज फक्त मोदींमध्येच दिसते. नाविन्याचे, तंत्रज्ञानाचे प्रतिनिधीत्व करणारे म्हणून मोदी आजच्या पिढीला भावतातही. लोकांना ते आपले आयकॉन वाटतात...

दिग्विजयाचा वारसदार

केवळ राजकारणातल्याच नाही तर राजकारणाबाहेरील लोकांनाही तसे वाटत होते..

शोकांतिकेचा प्रारंभ?

२०१९ची निवडणूक २०१४ प्रमाणेच अनेकांच्या भुवया उंचवणारी होती, तशीच यावेळीही अनेकांना धक्का देणारी असेल. आता ज्या काही शोकांतिका सांगितल्या जात आहेत, त्या सगळ्याच शोकांतिकांच्या अंताचा हा काळ आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे...

होऊन जाऊ द्या!

“अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तसेच मसूद अझहरलाही आम्ही घरात घुसून मारू,” असा संकेत जेटली यांनी दिला होता. चीनच्या नकाराधिकाराने भारताला आता हाच इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाल्याचे त्यामुळेच वाटते. आता भारत या संधीचे सोने कसे, कधी करतो, तेच पाहायचे. तसेही मोदींच्या परराष्ट्रधोरणामुळे आज जग भारताच्याबरोबरच आहे. होऊन जाऊ द्या! ..

आता का मिरच्या झोंबल्या?

जितेंद्र आव्हाडांनीही शरद पवारांच्या खणतेगिरीविरोधात कधी तोंड उघडल्याचे आठवत नाही. उलट टाळ्या पिटण्यात अन् गळ्यात उपरणे घालून स्वागत करण्यातच सुखानुभूती घेतली. तेव्हा दुसऱ्याची घरे तोडताना आव्हाडांना ‘कसं वाटतंय, गार गार वाटतंय’चा फील आला असेल नाही? अन् आता सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आव्हाडांना मिरच्या झोंबल्या? आगी लागल्या, धूर निघाला?..

प्रकाशबापूंचा कच्चा लिंबू!

मुळातच कच्चा लिंबू असल्याने त्याच्या म्हणण्याकडे ना कोणी लक्ष देत, ना कोणी थेट झिडकारून टाकत. तेव्हा मात्र हा कच्चा लिंबू मानभावीपणाने ‘मी नाही येणार बुवा तुमच्यात,’ असे म्हणत स्वतःच फार मोठा तीर मारल्याच्या आविर्भावात वागताना पाहायला मिळते. आज काँग्रेसशी डाव मोडल्याचे सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची अवस्था अगदी तशीच झाल्याचे दिसते. ..

हिंमत नव्हती, त्याचे काय?

आमच्या काळात आम्ही १२ एअर स्ट्राईक केले म्हणणार्‍या मल्लिकार्जुन खर्गेंनी उत्तर द्यावे की, काँग्रेसी गुलाम पाकिस्तानातील दहशतवादी शिबिरे संपविण्यासाठी तिकडे गेले होते काय, म्हणून ही कारवाई तिन्ही सैन्यदलांपासूनही लपून राहिली? खरे म्हणजे बुळेपणा ठासून भरलेल्या काँग्रेस सरकारने तेव्हाही काही केले नाही नि आताही ते एअर स्ट्राईकचे कर्तृत्व नाकारतानाच दिसतात...

लहरी राजा, प्रजा शहाणी...

राज ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना काय कार्यक्रम दिला, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आता कदाचित मनसैनिक त्याचे उत्तर गर्वाने देऊ शकतील की, आम्हाला लोकांना घराबाहेर काढून मारण्याचा तरी कार्यक्रम मिळाला. अर्थात, हा कार्यक्रमही किती दिवस टिकेल, याची शाश्वती मनसैनिक देणार नाहीत. ‘टोल’च्या वेळी पोळून निघाल्याने ‘ट्रोल’च्या वेळी ते थोडे अधिक सावध असतील...

धूळफेक की धूळधाण?

आगामी काळात बलुचींची उग्र आंदोलने, भारतासह अफगाणिस्तान, इराणसोबतही पत्करलेले वैर, अशा परिस्थितीत हा आतून-बाहेरून धुमसणारा कर्जबाजारी पाकिस्तान पुन्हा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची धूळफेक करतो की, त्याचीच धूळधाण उडते ते येणारा काळच ठरवेल. ..

फायदा की नुकसान?

भारताला ‘जीएसपी’ सूचीतून बाहेर काढण्याचे अमेरिकेने जाहीर केले आणि व्यापारी, औद्योगिक क्षेत्रासह माध्यम जगतातूनही बऱ्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. परंतु, भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंना ‘जीएसपी’ सूचीतून वगळण्यामागे काही कारणांचीही पार्श्वभूमी आहे. ..

लोकशाही नव्हे तर, ठोकशाहीचा प्रकाश

प्रकाश आंबेडकरांचा कायद्यावर, न्यायालयावर विश्वास असता तर त्यांनी “मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा,” अशी विधाने केलीच नसती. उलट आपल्यावर होणाऱ्या टीकेत काही आक्षेपार्ह असेल, तर आपण कायदेशीर कारवाईचा आधार घेऊ, असे म्हटले असते. ..

जम्मू-काश्मीरची दोन चित्रे

देशाविरोधात बोलणार्‍यांच्या घोषणांना गाडण्याचे काम अफझल गुरूच्याच मुलाने केले असून “भारतीय असल्याचा अभिमान वाटतो,” असेही कबूल केले. काश्मीर खोर्‍यात तयार झालेल्या दहशतवादाची जीवघेणी बंदुक की जीवनानंदाची संदूक, या दोन चित्रांचाच हा एक दाखला असल्याचे म्हणता येईल. कसे ते पाहुया...

जम्मू-काश्मीरची दोन चित्रे

देशाविरोधात बोलणार्‍यांच्या घोषणांना गाडण्याचे काम अफझल गुरूच्याच मुलाने केले असून “भारतीय असल्याचा अभिमान वाटतो,” असेही कबूल केले. काश्मीर खोर्‍यात तयार झालेल्या दहशतवादाची जीवघेणी बंदुक की जीवनानंदाची संदूक, या दोन चित्रांचाच हा एक दाखला असल्याचे म्हणता येईल. कसे ते पाहुया...

देशी कट्टा आणि एके-२०३

राहुल गांधींनी २०१० साली केवळ कार्बाईन निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास केला होता, त्यात रायफलनिर्मितीचा कोणताही मुद्दा नव्हता, तर रविवारी नरेंद्र मोदींनी ‘एके-२०३’ रायफलनिर्मिती विभागाचे उद्घाटन केले. असे असतानाही असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या राहुल गांधींना कार्बाईन, छोटी हत्यारे व एके-२०३ रायफल, तसेच शिलान्यास व उद्घाटनातील फरक कळत नाही...

पुराव्यांच्या राजकारणाची विकृती

२०१६ सालच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, भारताने असा काही हल्ला केलाच नसल्याचा, दहशतवादी मारले गेलेच नसल्याचा दावा करणाऱ्यांना आताच्या एअर स्ट्राईकची पाकिस्तानने स्वतःच केलेली पुष्टी अडचणीची ठरू लागली. मात्र, म्हणतात ना, एकमेकांवर प्रेम असले की, या मनीची गोष्ट त्या मनीही तत्काळ समजते! तशीच अवस्था एअर स्ट्राईकचे पुरावे मागण्यासाठी आसुसलेल्यांची अन् पाकिस्तानची झाली. सैन्यदलांच्या पराक्रमाला नाकारणारी जमात भारतातही बसलेली असल्याचा विचार करून सकाळी सकाळी हल्ला झाल्याचे मान्य करणाऱ्या पाकिस्तानने नंतर मात्र ..

मोदींमुळेच!

सदैव नायकाच्या शोधात असलेल्या बुभुक्षितांनी राहुल, केजरीवाल, अखिलेश, कन्हैय्या, उमरनंतर इमरान खानला नायकत्व बहाल केले. स्वतःच्या देशाला मातृ-पितृभूमी मानण्याची लाज बाळगणारी ही जमात दुसर्‍याला पितृत्व देण्यात शहाणपणा मानू लागली. मात्र, अशा सगळ्याच बोलघेवड्यांना आज हे ठणकावून सांगावेच लागेल की, पाकिस्तान वठणीवर आला तो जिनिव्हा करारामुळे नव्हे तर त्या करारानुसार पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडणार्‍या मोदींमुळे आणि हे रण अभिनंदनच्या अटकेने वा सुटकेने ना सुरू झाले ना संपेल. जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीवर ..

आधी या पराभूतांना आवरा!

चर्चा कोणाशी करायची? पाकिस्तानचा खरा नेता कोण? ज्याच्याशी बोलणी केल्यानंतर त्यानुसार पाकिस्तान वागेल याची खात्री देता येईल? काहीतरी आकडेवारी टाकल्याने प्रश्न सुटत नाही, उलट या पराभूत मानसिकतेमध्ये जगणाऱ्यांचेच पितळ उघडे पडते. ..

इमरान खानचे भाकड कथापुराण!

भारताच्या संभाव्य कारवाईने गळपटलेल्या इमरान खान यांच्यासमोर गुडघे टेकण्याशिवाय अन्य कुठला पर्याय होता? म्हणूनच खान यांनी पुलवामातील घटनेची चौकशी व दहशतवादासंदर्भात चर्चा करण्याची तयारी दाखवली. मोठ्या युद्धात गणितं चुकतात, असे म्हणत इमरान खान यांनी महायुद्धांचे भाकड कथापुराण ऐकवले. इथे युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नसते हे खरेच, पण ते लादले कोणी याचाही विचार केला पाहिजे. ..

सर्जिकलची ‘उत्तरक्रिया’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकस्थित दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यास खुली सूट दिलेल्या भारतीय वायुसेनेने लोकभावनेचा आदर करत थेट पाकने बळकावलेल्या भूमीतच रक्ताची होळी खेळली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वर्णन केलेल्या भारतमातेचे ‘अधम रक्तरंजिते’चे रूप यावेळी प्रत्येक भारतीयाला आणि पाकिस्तानलाही अनुभवायला मिळाले. ..

सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला पंतप्रधान!

मोदींच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाय धुण्याच्या कृत्याची चेष्टा करणारे आणि निरनिराळ्या प्रांताची वेशभूषा करण्यावर जोक, मिम्स पसरविणाऱ्या या लोकांची एकच जातकुळी असते. पण, लोकांचा ओढा मात्र अशा लोकांत मिसळणाऱ्या लोकांच्या पंतप्रधानाकडेच असतो, हे टीका करणाऱ्यांनी विसरू नये. ..

फक्रुद्दीन अहमद ते नरेंद्र मोदी

काँग्रेसकाळात देशाच्या एका मंत्र्याला पाकिस्तानच्या विरोधावरून आंतरराष्ट्रीय परिषदेतून परत यावे लागले, तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्याच परिषदेत भारताला ‘गेस्ट ऑफ ऑनर’ने सन्मानित करणार असल्याचेही सांगितले गेले. देशाला सर्वोच्चपदी घेऊन जाण्याच्या ध्येयाने झपाटलेली व्यक्ती नेमके काय करू शकते, काय घडवू शकते, त्याचा हा वस्तुपाठच! ..

प्रत्येक थेंबाची किंमत...

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत, पाकिस्तानला इतकी वर्षं फुकटात मिळणारे भारताचे थेंब अन् थेंब पाणी रोखून आता वसूल केली जाईल. “पाणी आणि रक्त एकत्र प्रवाहित होऊ शकत नाही,” या नरेंद्र मोदींनी २०१६ सालीच पाकिस्तानला दिलेल्या या गर्भित इशाऱ्याचा हा परखड परिणाम.....

दिल्लीचा ढोंगबाज!

सत्तेची चटक लागलेल्या निलाजर्‍या राजकारण्याचा वस्तुपाठच केजरीवालांनी आपल्या या वागण्यातून अन् भ्रष्टाचारविरोधाच्या ढोंगातून दाखवून दिला. पण, काँग्रेसला मात्र केजरीवालांची ही धडपड मानवल्याचे दिसत नाही, म्हणूनच तिकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याची निराशा व हतबलताही केजरीवालांनी बोलून दाखवली...

अर्धा-पाऊण तासाचा खेळ!

भारताविरोधात पाकिस्तान, श्रीलंका वा बांगलादेशने आघाडी उघडली तर काय? असा प्रश्न एकदा एका मुलाखतकर्त्यांना के. सुंदर यांना विचारला, तेव्हा सुंदर यांनी दिलेले उत्तर आताही लागू पडेल असेच आहे...

युती झाली, पण शिवसेनेचे काय?

भाजप-सेना युती ही केवळ सत्तातुरांची नाही आणि नव्हतीही. दोन्ही पक्षातील युतीला मोठे कंगोरे आणि पदरही असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पक्षात २५ वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या युतीवेळी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे असे पहिल्या फळीतले कमालीच्या ताकदीचे, क्षमतेचे नेते केंद्रस्थानी होते. अर्थात, तेव्हाच्या युतीचे राजकीय वास्तव नेमके काय होते, हे आताही समजून घेण्यासारखेच आहे...

कमल हसनचे ‘सत्यरुपम’

पाकचीच फुस मिळणार्‍या काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनाही नेहमीच सार्वमताचे डोहाळे लागल्याचे वेळोवळी समोर आले. आता मात्र हीच सर्वामताची मागणी करत कमल हसन यांनी आपणही पाकिस्तानच्याच, फुटीरतावाद्यांच्याच कळपातले असल्याचे ‘सत्यरुपम’ दाखवून दिल्याचे दिसते...

क्षोभ कमी होणार नाही!

जवानांना लाथा मारणारा आणि आता थेट दहशतवादी कारवायात सहभागी होणारा काश्मिरी युवक हीच मोठी डोकेदुखी आहे. सरकारसमोरचा पेच आता उर्वरित देशवासीयांच्या भावना की, जम्मू-काश्मिरी अवामला सोबत ठेवणे असा असेल. ..

घरातल्या पाकप्रेम्यांचे काय?

‘अनेकता में एकता’चा ध्यास घेऊन हजारो वर्षांपासून भारतीयांनी आपला हा वारसा जपला आणि मिरवलाही. पण ज्यांनी आपली बुद्धी देशाबाहेर गहाण टाकत पाकिस्तान्यांपुढे लोटांगणे घातली, त्यांना हे कसे समजणार, कसे जाणवणार? ते पाकिस्तानचेच गोडवे गाणार!! सिद्धूनेही तेच केले...

इतकी मस्ती बरी नाही!

बारामतीत लावलेले बॅनर हे वास्तवापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मस्तीचे लक्षण. अर्थात, बारामतीतल्याच नव्हे तर राज्यातल्या मतदारांनाही कोणाची मस्ती कशी उतरवायची, हे चांगलेच कळते. अन् ही गोष्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही लक्षात घेतलेली बरी, कारण इतकी मस्ती बरी नाही! ..

परिर्वतनाचा सूर्य उगवेल...

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून लडाखकडे अधिक आत्मियतेने पाहिले जाऊ लागले. आताचा लडाखला स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय असो की, ५० हजार कोटींचा रेल्वेमार्ग वा विद्यापीठाची स्थापना, प्रत्येक गोष्ट मोदींनी सुरु केली. या सर्वच प्रकल्पांचा, योजनांचा फायदा लडखीजनांना लवकरच मिळेल आणि त्यांच्या जीवनात परिवर्तनाचा सूर्य उगवेल, हे नक्की. ..

विचार करण्याची वेळ

ज्या भारतभूमीत हिंदू धर्माचा जन्म झाला, जिथे हिंदू अजूनही बहुसंख्य आहेत, तिथेच हिंदू समाजावर एखाद्या प्रदेशात अल्पसंख्य म्हणवून घेण्याची वेळ येणे, हे कोणत्याही परिस्थितीत आनंददायी नव्हे तर विचार करण्याजोगेच म्हटले पाहिजे. हिंदू धर्म व संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या भारताला ही स्थिती परवडणारी नाही. ..

पालेकरांचे माकडचाळे

अमोल पालेकर एकेकाळचे प्रसिद्ध वगैरे अभिनेते, दिग्दर्शक असतील, त्याबाबत दुमत नाहीच. पण गेल्या काही काळापासून अमोल पालेकरांना स्वतःचीच किंमत कवडीमोल करून घेण्याचा म्हातारचळ लागल्याचे दिसते. यातूनच ते जिथे जातील तिथे औचित्य सोडून इतरच विषयावर तोंडाची वाफ दवडताना पाहायला मिळतात. बरवे यांच्यावरील चित्रप्रदर्शनातही पालेकरांनी स्थळ-काळाचे भान सोडून विषय भरकटवण्याचाच प्रयत्न केला. ..

‘अरे’ला ‘कारे’च करणार!

गेल्या ५७ वर्षात ब्रह्मपुत्रेतून बरेच पाणी वाहून गेल्याचे चीनने पक्के लक्षात ठेवले पाहिजे. कारण, भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही किंवा तो मनमोहन सिंग यांच्या काळातलाही नाही. ..

जुन्याच रागाचा आलाप

आपले सरकार आल्यास तिहेरी तलाकचा कायदा बदलून टाकू, अशी वल्गना काँग्रेसने केली आहे. मुस्लीम मतांच्या गठ्ठ्यासाठी मुस्लीम महिलांचा बळी द्यावा लागला तरी चालेल, असे हे वागणे. त्यामुळे निवडणुका येतील आणि जातील, मात्र या मानसिकतेचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. हे उच्चाटन मोदीच पुन्हा सत्तेत आल्याशिवाय शक्य नाही...

‘बेल’पार्टीच्या म्होरक्याची वटवट

मनमोहन सिंग तर ‘मॅडम’शिवाय एक पाऊलही टाकत नव्हते मग या सगळ्याच घोटाळ्यांमागचा रिमोट कंट्रोल कोणाचा होता? गांधी कुटुंबीयांचाच ना? सोनिया गांधींचाच ना? राहुल गांधींना आताही आपल्या मातोश्रींच्या त्याच रिमोट कंट्रोलची आठवण येते ना? राहुल गांधींनी या प्रश्नांची उत्तरे नक्कीच द्यावीत. ..

असंवैधानिक चौकटीतील प्रकाश!

संघाला संवैधानिक चौकटीत बसवण्याची विचित्र मागणी करणाऱ्या प्रकाशबापू, ‘तुम्ही खेळ सुरू केला, आम्ही अंत करू,’ अशी धमकी देणे संवैधानिक आहे का? वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान पत्रकाराला अश्लील भाषेत धमकावणे संवैधानिक आहे का? कसलाही संबंध नसताना संभाजीराव भिडेंना तुरुंगात डांबण्याची भाषा करणे संवैधानिक आहे का? याची उत्तरे देणार का? ..

ममतांना हवी यादवी आणि अराजकता!

केंद्र आणि राज्य असा उभा दावा मांडणाऱ्या ममता बॅनर्जींची एकूणच वागणूक फुटीरतेकडे, अराजकाकडे नेणारी आहे, हे आधी समजून घेतले पाहिजे. जर असेच सुरू राहिले, तर देशात यादवी माजायला वेळ लागणार नाही. ..

गलिच्छ राजकारणाचे ओंगळवाणे दर्शन

पूनम महाजन जे बोलल्या, ते तर खूपच सौम्य होते. पण मुद्दा असा की, पूनम महाजन असे काय म्हणाल्या की, त्यांच्या मृत पित्याच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण केले जावे?..

कांगावखोर आनंद!

मुद्दा तेलतुंबडेचा जरी असला तरी बुद्धिजीवी गोटातला दुटप्पीपणाही समोर आणलाच पाहिजे. दुसरीकडे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पडत जर तेलतुंबडेला अटक केली असेल तर त्यात काय चुकीचे केले? कारण, सर्वोच्च न्यायालयानेच सत्र न्यायालायात जाण्यास सांगितले होते, तसे ते गेलेही. सत्र न्यायालयाने निकाल दिला व तेलतुंबडेला अटक झाली...

भुजबळीय नौटंकी!

डान्स बार बंदी उठवण्याचा निर्णय संपूर्णतः न्यायालयाचा आहे, तरीही छगन भुजबळ हा निर्णय राज्य सरकारनेच घेतल्याचे खोटे सांगतात. यावरूनच छगन भुजबळांना ही छोटीशी गोष्टही समजत नसेल, राज्य सरकार व न्यायपालिकेतील फरक कळत नसेल, तर आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी किती असमंजसपणे निर्णय घेतले असतील, याची कल्पना करता येते. ..

बहरण्याचा सांगावा देणारा...

नरेंद्र मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या पोतडीतून शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीयांसाठी सोनियाचा दिनू अवतरल्याची भावना निर्माण झाली. एकूणच यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे ‘पीयूष गोयल इन जोश, पब्लिक मदहोश व गांधी गँग बेहोश,’ असा हा मामला होता, हे निश्चित...

भाबडेपणाच्या ढोंगापासून विकृतीपर्यंत

राहुल गांधी हिंदुत्वाचा हा गाभा विसरून भोंदूत्वाकडे व तिथून पुढे विकृतीकडेच वाटचाल करत असल्याचे कालपरवा घडलेल्या प्रसंगातून दिसते अन् अशा इसमाला दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची घाई कप्पेबंद विचारात अडकलेल्या मूठभरांना झाली आहे, कमाल आहे की नाही? पण, आता जनतेनेच हे ठरवावे की, या कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्यांना निवडून द्यायचे की विजनवासात पाठवायचे? ..

शे-सव्वाशेंची क्रांती

साहित्यिक कारणाशिवाय भलत्याच विषयासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरण्याची एक पद्धतच गेल्या काही वर्षांत रूढ झाली आहे. ..

स्वप्नवत बंडखोरीची सांगता

२७ जुलै, १९७५ साली अहमदाबादहून जॉर्जनी इंदिरा गांधींना जे पत्र लिहिले आहे, त्याचा तर्जुमा वाचला तर जॉर्ज काय चीज होते, हे लक्षात येईल. इथे डरकाळ्या फोडणाऱ्यांनी शेपट्या घातल्या होत्या, असा काळ होता, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘मॅडम डिक्टेटर’ असे म्हणत जॉर्जनी इंदिरा गांधींची जी काही खबर घेतली आहे, त्याची शब्दयोजना, वाक्यरचना पाहिली की आजही शहारा आल्याशिवाय राहात नाही. ..

अराजकही हळूहळूच पसरते

पालेकरांनी आतापर्यंत जी काही विधाने, वक्तव्ये केली, त्यातून लोकशाही वा जनतेच्या काळजीचा कितीही आव आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून मोदीद्वेषाने मना-मेंदूवर चढलेल्या काजळीचा भागच अधिक ठळकपणे डोकावताना दिसला...

महाराष्ट्र पेटवणारा ‘बंटी’

गेल्या काही वर्षांपासून स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करणाऱ्या मंडळींनी शिव-शंभुचरित्राचे विकृतीकरण करण्याचा सपाटा लावला. ..

पुढे विवेके वर्तावे...

अण्णा हजारेंच्या मते लोकपालचा कायदेशीर बडगा असता, तर म्हणे राफेलचा भ्रष्टाचार झालाच नसता. म्हणूनच लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा ३० जानेवारीला उपोषणाला बसणार आहेत. ..

निवडीची नैसर्गिक अगतिकता

प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन काँग्रेसला वाचवावे, अशी अपेक्षा व्यक्त करणे ही काँग्रेसची गांधीघराणे शरणतेची नैसर्गिक अगतिकताच स्पष्ट करते. सोबतच स्वातंत्र्यपूर्व काळात कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून ओळखली जाणारी काँग्रेससारखी अखिल भारतीय संघटना घराणेशाहीच्या शापाने केविलवाणी झाली, हेही प्रियांका गांधींच्या निवडीवरून दिसते. ..

प्रश्न माणुसकीचा आहे!

केवळ स्वधर्माच्या महती व महानतेचे बाळकडू प्यायल्याने मदरशांतल्या विद्यार्थ्यांच्या मनात धार्मिक कट्टरता, कडवटपणा, स्वमतांधता आणि असुरक्षितता जन्म घेते. अशा गोष्टींच्या आहारी गेल्याने ‘नवे शिकण्याचे कुतूहल’ न शमलेल्या लहान मुलांना हूर अन् जन्नतचे आमिष दाखविणारे दहशतवादी गट आपल्या जाळ्यात ओढण्याची शक्यता कैकपटींनी अधिक असते. ..

‘उरी’च्या निमित्ताने...

हा प्रश्न डाव्या-उजव्याचा नाही. मुळातच आपल्याकडे अस्सल अभिव्यक्ती फार थोड्या आहेत. उरलेले सगळे नकला करीत असतात आणि कंपू तयार करतात. साहित्यिक किंवा कलेच्या क्षेत्रातील बावनकशी सोन्यासारखी नेतृत्वे जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत हा दोन पैशांचा तमाशा पाहातच राहावा लागणार. ..

आकाशी झेप घे रे!

नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था जगात दहाव्या स्थानावर होती. म्हणजेच केवळ साडेचार वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशाला तब्बल पाच अंकांनी वर-पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत नेले. हे मोदी सरकारने घेतलेले निर्णय अन् राबविलेल्या आर्थिक योजनांना आलेले मधुर फळच!..

मोदीद्वेष्ट्यांचा मेळावा

देशाला विकासाकडे घेऊन जावे वा भारताला जगात विश्वगुरूचे स्थान मिळावे म्हणून नव्हे तर मतलब साधण्यासाठीच ही खुळ्यामागे धावणाऱ्या वेड्यांची जत्रा जमली होती. एका राष्ट्रनिष्ठ माणसाच्या द्वेषाने पछाडलेल्या अतृप्त आत्म्यांचा हा कळप होता. ..

एकीच्या बळाचे किडके फळ...

आज कोलकात्यात ममतादीदींच्या नेतृत्वाखाली होणार्‍या ‘युनायटेड इंडिया’ रॅलीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पाठिंबादर्शक पत्र पाठविले. काँग्रेसच्या दिवसेंदिवस सत्तेसाठी वाढत जाणार्‍या अगतिकतेचेच हे आणखीन एक द्योतक म्हणावे लागेल...

...आणि वर्तन मात्र पशुचे!

‘ओठावर नाव येशूचे आणि वर्तन मात्र पशुचे’ अशी गत असलेल्या बिशप फ्रॅन्को मुलक्कलविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या नन्सवर खार खाऊन असलेल्या ‘मिशनरीज ऑफ जिजस’ने चार-पाच महिन्यानंतर कारवाईचा बडगा उगारला व या नन्सना चर्चमधून हाकलून दिले. ..

ओसाडगावचा राजा; एकटा!

चहूबाजूंनी नन्नाचा पाढा ऐकाव्या लागणाऱ्या आणि राजकीय पटलावर केविलवाणी अवस्था झालेल्या या पक्षाला पुढच्या निवडणुका एकट्यालाच लढाव्या लागतील. तेव्हा राज ठाकरेंनी आधी आपल्या भवितव्याचा विचार करावा. ..

शिवसेनेचा ‘बेस्ट’ गोंधळ!

तोंडाने नेहमीच जनतेच्या भल्याची गोष्ट करणार्‍या शिवसेनेला आठ दिवसांपासून बंद असलेल्या परिवहन सेवेबाबत कसलाही तोडगा काढता आला नाही. या अपयशाला सत्ताधारी शिवसेनेशिवाय अन्य कोण कसे जबाबदार असू शकते?..

मोदींची भाषा राष्ट्रनिष्ठेची!

नरेंद्र मोदींच्या राष्ट्रनिष्ठेच्या भाषेने कित्येकांच्या सत्तेचे इमले डळमळू लागले, तोल ढळू लागले. ममता बॅनर्जीही त्यापैकीच एक. “मोदी इंग्रजीत एक ओळही बोलू शकत नाही,” ही ममतांची टीका म्हणजे या सत्तेच्या ढासळत्या डोलाऱ्याचाच परिपाक. अन् स्वतःच्या कर्माने उद्ध्वस्त होता होता त्या शिव्याशापही देणारच!..

नवनवोन्मेषशालिनी

प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता तननुप्राणनिजावद् वर्णनानिपुण: कवि अभिनवगुप्ताचे गुरू म्हणजे संस्कृतमधील अलंकारिक रचनांचे कर्ते भट्टतौत. त्यांच्या या ओळी कविचे वर्णन करतात. याचा स्वैर अर्थ असा की, प्रतिभा म्हणजे काय तर, तेजाच्या नित्यनियमित उन्मेषाने झळाळणारी बुद्धी आणि अशा प्रतिभेच्या तेजाचा संचार झाल्याने ज्याची वर्णनेही जिवंत भासतात तो कवी. मराठीचे भाग्य थोर की सर्व अपशकुनांवर मात करीत या ओळींची प्रचिती येण्याचा सोहळा अरुणा ढेरेंच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवला. ..

छगनराव, तुमची डाळ शिजणार नाही !

मोदी व फडणवीस यांच्या सरकारमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा उधळलेला बैलोबा खाली बसला, झोपला, त्यांची मनमर्जी करण्याची संधी हुकली. तशीच संधी आज पुन्हा मिळावी, म्हणून भुजबळांसारखे नेते भाजपवर तोंडसुख घेताना, सरकार उलथवून लावण्याची भाषा करताना दिसतात. बरोबरच आहे, दलालांचे धंदे बंद पडले की, चौकादाराविरोधात सगळेच एकवटतात!..

आर्थिक समानतेच्या दिशेने

आता आर्थिक निकषावर आरक्षण मिळालेल्यांनी याचा लाभ खरोखरच्या गरजवंताला कसा मिळेल, यादृष्टीने विचार व कृती केली पाहिजे. तरच खर्‍याखुर्‍या दुबळ्यांना सबल होता येईल; अन्यथा आरक्षणाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जाऊन गरीब अधिकच गरीब होत जाईल...

जोशीबुवांचे तर्कट

वस्तुत: श्रीपाद जोशी ही व्यक्ती नसून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात निर्माण झालेली प्रवृत्ती आहे. स्वत: आपल्या कळपाच्या आधारावर झुंडशाही उभी करायची, आपल्या कंपूबाहेरच्या लोकांना जागा द्यायची नाही आणि मग असहिष्णुतेची कोल्हेकुई करीत राहायची, अशी ही एक नवपरंपरा महाराष्ट्रात रुजली आहे. एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा, अशी ही सगळी माणसे आहेत..

कळपाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही घडते आहे ते चांगलेच म्हणावे. प्रत्येक कळपाच्या मर्यादा समोर येत आहेत. असहिष्णूतेच्या नावाने घसे कोरडे पाडणारे लोक आपल्याला न भावणारी गोष्ट घडली की, साहित्य संमेलनासारख्या शारदीय परंपरेलाच कसे नख लावायला सरसावतात ते सध्या महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे...

वेळ गप्प बसण्याची नाही !

आयोजकांच्या कचखाऊपणाची शिक्षा साहित्य संमेलनाला आणि साहित्य रसिकांना देणे सर्वस्वी चुकीचे आहे. यामागे कोण कोण? काय काय राजकारण खेळले, ते साहित्य रसिकांच्या समोर आले पाहिजे. साहित्य संमेलन यशस्वी करणे, हेच आपल्यासमोरचे आव्हान आहे...

नसिरुद्दीनच्या ‘जमीर’ची गोष्ट!

ज्यांनी एकसंध भारतीय समाजात आगी लावून त्या निखाऱ्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याच्या उठाठेवी केल्या, त्यांच्यासाठी नसिरुद्दीन शाह छाती पिटत आहेत. ..

आस्थेशी खेळ कशाला?

शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाचा मुद्दा फक्त विशिष्ट वयातील महिलांपुरताच असून ती १० वर्षांची बालिका किंवा ५० वर्षांपुढची महिला असेल, तर तिला मंदिरात प्रवेश मिळतोच मिळतो. पर्यायाने हा प्रश्न कोणत्याही सामाजिक विषमतेचा नव्हे तर आस्थेचा ठरतो. तर तिहेरी तलाकसारख्या विषमतेला खतपाणी घालणार्‍या प्रथांमुळे संबंधित महिलेच्या आयुष्याचे वाटोळे आणि वाटोळेच होते...

प्रकाशवाटा उजळताना...

प्रधानमंत्री सौभाग्य योजना आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू करण्यात आल्या. या दोन्ही योजनांनी गेल्या ७० वर्षांत ज्या घरांत प्रकाशाचा कणही पोहोचला नव्हता, तिथे प्रकाशाची वाट उजळवली. १८ हजार गावांना उजेडात आणले. या सगळ्याच गोष्टी घडल्या त्या देशासाठी, समाजासाठी, जनतेसाठी काम करण्याच्या इच्छाशक्तीमुळे!..

न घडलेल्या गोष्टींचा खोटा बाऊ

राफेलवरून राळ उडविण्याचा काँग्रेसचा हा उपद्व्याप आणखी एका मुद्द्याच्या संदर्भाने विचारात घेतला पाहिजे. तो म्हणजे सोनिया-राहुल या मायलेकांचा नॅशनल आणि इंटरनॅशनल घोटाळ्यातील सहभागाचा. कदाचित नॅशनल हेराल्ड आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून ‘दे माय धरणी ठाय’ अशी अवस्था झालेल्या राहुल-सोनिया गांधी परिवाराचा आपल्यावरील आरोपांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असावा...

पाठिंब्याचे शरदरावी गौडबंगाल

ख्रिश्चियन मिशेलने सोनियांचे नाव घेताच पवारांच्या पोटात उठलेला गोळा आपल्या या पोषक राजकारणाला चूड लागेल की काय, या भीतीचेच प्रतीक असावा. पण, जे लोक ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात आधीपासूनच जामिनावर आहेत आणि आणखी एका प्रकरणात पुरते अडकलेत, अशा लोकांची तरफदारी करून पवारांना फायदा होण्याची शक्यता नाहीच. ..

चंद्राबाबूंचा विचित्र निर्णय

चंद्राबाबूंनी विवाहित दाम्पत्यांना दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत इन्सेंटीव्ह देण्याची घोषणा केली. सोबतच अशा दाम्पत्यांना निवडणुका लढवता येतील, असेही सांगितले. चंद्राबाबूंच्या या एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णयामुळे मनोबल वाढलेल्या परिजनांनी पाच-पन्नास वर्षांपूर्वीचे ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’चे आशीर्वाद दिल्यास नवल वाटणार नाही!..

ऑगस्टाच उद्ध्वस्त करेल!!!

सत्तेच्या मलिद्यासाठी हपापलेल्यांना हवे ते करण्याची मोकळीक या दोन्ही मायलेकांनी संपुआ सरकारच्या सत्ताकाळात दिल्याचे नेहमीच म्हटले गेले. त्याच्या सुरस कथाही वेळोवेळी समोर आल्या. आता ख्रिश्चियन मिशेलने तर चौकशीदरम्यानच या दोघांचे नाव घेतल्याने ‘देश का चोर-गांधी परिवार’ हेच सत्य असल्याचे स्पष्ट झाले. ..

काँग्रेस-ए-दिक्कत

काँग्रेसच्या मुस्लीम अनुनयवादी धोरणाचा प्रत्यय लोकसभेत परवा पुन्हा एकदा आला. दुसर्‍यांदा लोकसभेच्या पटलावर आलेल्या तिहेरी तलाक बंदी विधेयकाला काँग्रेसने निराधार कारणे पुढे करत विरोध दर्शविला. पण, काँग्रेसचा हा तात्त्विक विरोध नसून आगामी निवडणुकांमध्ये मुस्लीम मतपेढीवर डोळा ठेवूनच केलेली ही नसती उठाठेव म्हणावी लागेल. ..

चाबहारचे महत्त्व

चाबहार हे केवळ बंदर चालविण्याचे काम नाही. सगळ्यानांच लाभ मिळवून देण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. भारताच्या मूळ हेतूविषयी कुठल्याही राष्ट्राला शंका नसल्याने यातून जे काही आकारास येईल ते ‘भारत भाग्यविधाता’ या राष्ट्रगीताल्या शब्दाचा एक वेगळा अर्थ निर्माण करेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही...

पालेकरबुवांचे पाल्हाळ...

भालजींचा स्टुडिओ जाळणे हा अभिव्यक्तीवर हल्ला नव्हता, शीख किंवा काश्मिरी पंडितांवरचे हल्ले ‘मॉब लिंचिंग’ नव्हते. ..

विठोबाराया पावेल कसा?

पंढरीचा विठोबा इतकी वर्षे तिथे उभा आहे तो स्वबळावरच. आता त्याच्याकडे जाऊन स्वबळाची भाषा सोडणाऱ्यांना तो पावेल कसा? ..

आगी लावण्याचे धंदे

नितीन गडकरींचा काँग्रेसला आरसा दाखवणारा आरोपांचा सिलसिला सुरू असताना काँग्रेसी कृपेवर तगून राहिलेल्या विनोद दुआंच्या पत्रकारितेचे पित्त न खवळते तरच नवल! आपली काँग्रेसशी असलेली इमानदारी दाखविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे पाहून मग विनोद दुआंनी गडकरींच्या मुलाखतीतच काटछाट केली व त्यालाच मोदीविरोधातील विद्रोह असे ठरवत नाचवले...

...आणि नसिरुद्दीन जागा झाला

काँग्रेसच्या तीन राज्यातील विजयामुळे आतापर्यंत कुंभकर्णी झोपेत गेलेली मंडळी आपापल्या बिळातून बाहेर पडू लागली आहेत. असहिष्णुतेबद्दलचे नसिरुद्दीन शाह यांचे विधान त्याचीच साक्ष. भिवंडी, गोध्रा इथे जिवंत जाळलेल्या पोलिस व कारसेवकांची नसिरुद्दीन शाह यांनी कधी फिकीर केली नाही...

ढासळता डोलारा सावरण्यासाठी...

मार्च २०१५ मध्ये ०.७ टक्के असलेल्या एनपीएचे प्रमाण यंदाच्या सप्टेंबरमध्ये ०.५९ टक्क्यांवर म्हणजे २३ हजार, ८६० कोटींवर आले. थकीत कर्ज किंवा अनुत्पादक मालमत्तेच्या प्रमाणात झालेली ही सुधारणा हा सरकारी धोरणांचाच परिपाक होय. आताची सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांना दिलेली रक्कम याच धोरणांतील एक टप्पा असल्याचे म्हणता येते. ..

देशविकासाची क्रांतिकारी नीती

आपल्या योजनांच्या मांडणी-आखणी व अंमलबजावणीतून जनतेची नस पकडण्याचे काम नीती आयोगाने केले. ..

लंकेचे महाभारत

श्रीलंकेच्या राजकारणावर पकड कुणाची, याचा निर्णय चीन आणि भारताच्या भूमिकांवर ठरतो. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला हा देश आपल्याला एक पंतप्रधान गमावूनही सोडता येत नाही. ..

अ‍ॅवॉर्डवापसी गँगचे पुनरागमन

‘आर्टिस्ट युनाईट’ नावाने अ‍ॅवॉर्डवापसी गँग पुन्हा सक्रिय होत आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर राहुल गांधींच्या वरातीत नाचायला हे दुटप्पी लोक तयार झाले आहेत. ..

नव्या अनागोंदीची सुरुवात

लोकसभा निवडणुकीआधी जर काँग्रेसने या तिन्ही राज्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केली, तरच मतदार या पक्षावर विश्वास ठेवू शकतील; अन्यथा मतदार काँग्रेसला धूळ चारायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. ..

धमक्यांचा प्रकाश की अंधार?

“तुम्ही खेळ सुरू केला, आम्ही अंत करू,” अशी भाषा नुकतीच प्रकाश आंबेडकरांनी केली. प्रकाशबापू नेमक्या कोणत्या खेळाची गोष्ट करत आहेत? त्यांना नेमक्या कोणत्या खेळाचा अंत करायचा आहे? कोरेगाव-भिमा येथील आगामी जयस्तंभ अभिवादन दिनाआधी अशी चिथावणीखोर वक्तव्ये करुन राज्यातले वातावरण गढूळ करण्याचा तर प्रकाश आंबेडकरांचा मनसुबा नाही ना! ..

नालस्तीला चाप बसेल?

गांधीहत्येच्या आरोपातून संघाला न्यायालयाने निर्दोष सोडलेले असताना काँग्रेसने पद्धतशीरपणे जो काही अपप्रचार करायचा, तो केलाच आहे...

सावध ऐका पुढल्या हाका...

ईशान्य भारतातील इस्लामिक घुसखोरांच्या समस्येचे गांभीर्य ओळखून त्याविरोधात परखड मतप्रदर्शन करणाऱ्या मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांच्या वक्तव्यावरून एकच गदारोळ माजला. पण, मेघालयाच्या या न्यायाधीशाने दिलेला इशारा दुलर्क्षित करुन चालणार नाही...

क्या हार में, क्या जीत में...

वाजपेयी संसदेत म्हणाले होते की, ‘सरकारे आएगी-जाएगी, पार्टीयां बनेगी-बिगडेगी, लेकीन ये देश रहना चाहिए।’ हा विचारच आजवरच्या साऱ्या प्रवासाचा मूळ गाभा आहे. दोन खासदार ते स्पष्ट बहुमत असा प्रवास करणाऱ्या पक्षाला हे तीन राज्यांतील पराभव असं सहजपणे संपवू शकतील काय? ते इतकं सोपं आहे काय? या प्रश्नांचा विचार २०१९ डोळ्यांपुढे ठेऊन आताच अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्यांनी करणं गरजेचं आहे. ..

संरक्षण चतुर्थी

कधीकाळी संरक्षण सामग्री आयात करणाऱ्या भारताने २०१६-१७ या वर्षात वैश्विक बाजारात जोरदार मुसंडी मारली. शस्त्रास्त्र निर्यातीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला...

विषवल्लीची फळे

रामदास आठवलेंच्या राजकारणाचा उजवेपणा हा की, त्यांनी अशाप्रकारे एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध भडकविण्याचे काम कधीही केले नाही. जातीच्या नावाने कपाळी राख फासून आठवले वा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवल्याचेही आढळत नाही. मात्र, रामदास आठवलेंसारखी व्यक्ती सत्तेची वाटेकरी झाल्याने ते काही लोकांना चांगलेच जाचते आहे...

विझत्या दिव्यांची फडफड

पश्चिम बंगालमध्ये दहा वर्षांपूर्वी ६ टक्के मते मिळवतानाही भाजपला संघर्ष करावा लागत असे. पण यंदाच्या इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा पक्ष ठरला आणि ममतांच्या पायाखालची वाळू सरकली. ..

धर्मांधांचा धार्मिक खेळ

पाकिस्तान भारतासोबत जे धार्मिक कार्ड खेळतोय, त्याची जबर किंमत पाकला मोजावी लागेल. कर्तारपूर असो किंवा इमरान खानची मुस्लीमविरोधी असल्याची टीका, वळणाचे पाणी वळणालाच अशी यांची गत आहे...

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ‘सुमार’ कट

केतकरांच्या मते, जो माणूस राजकारणातच २००२ साली उगवला त्याला पंतप्रधान करण्याचा कट शिजला कधी तर १९७५ साली! अर्थात केतकर म्हणजे काही कोणी सामान्य माणूस नव्हे, तर असले अतर्क्य तर्क करण्यासाठी प्रसिद्धी पावलेल्या काँग्रेस चरणलीन पुरोगामी पीठाचे प्रमुख आचार्यच ना! अशा गांधीघराणेकृपाकांक्षी व्यक्तीचा दावा खोटा कसा असेल? म्हणूनच सगळेच ‘सुमार’ केतकरांना अनुमोदन देऊ लागलेत ना! ..

मायलेकांचा ‘नॅशनल’ घोटाळा

‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित या सगळ्याच प्रकरणावरून व सुब्रह्मण्याम स्वामींच्या म्हणण्यावरुन राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोघेही कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असल्याचे सकृतदर्शनी तरी दिसते. त्याचमुळे हा खटला रद्द करण्याची गांधी मायलेकांची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आणि आता तर थेट न्यायालयानेच त्यांच्या प्राप्तीकराची चौकशी करण्यास मंजुरी दिली. ..

परप्रांतीयत्वाचा ‘राज’राग

अन्य राज्यातील मंडळींनी त्यांच्या त्यांच्या राज्यात रोजगाराच्या संधी शोधाव्या, मराठी शिकावे, रोजगाराबाबत त्यांच्या राज्यकर्त्यांना जाब विचारावा वगैरे मुद्द्यांची राज यांनी उजळणी केली. हिंदी भाषिकांसमोरच हिंदीला, हिंदी माध्यमांना राजद्वेषी ठरवत त्यांनाही दूषणे देऊन झाली. पण, प्रश्न हाच की, या सगळ्याचे फलित ते काय? ..

तीन महिन्यांचा अल्पविराम

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही जागतिक मूल्यांची पोपटपंची केली नाही की उदात्ततेच्या गोष्टी केल्या नाही. उलट आपल्या देशातील व्यावसायिकांचे, उद्योजकांचे, उत्पादकांचे, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे हितसंबंध सांभाळण्याचा त्यांनी या माध्यमातून प्रयत्न केला...

शिर्डी संस्थानचा आदर्श

डॉ. हावरेंची चिता पेटवून त्यांचे प्रतिकात्मक प्रेत स्मशानात नेऊन जाळण्याचे प्रकार शिर्डीत झाले आहेत. दुसऱ्या बाजूला मंदिर व्यवस्थापनाच्या अनेक निर्णयांमुळे होत असलेले सामाजिक बदलही समोर आहेत. अन्य धर्मीयांनीही त्याचे पालन केल्यास त्याचे समाजात स्वागतच होईल. ..

मसूदची साद, त्याला छद्मपुरोगाम्यांचा प्रतिसाद

मसूद अझहरच्या, “बाबरी मशीद आम्हाला बोलावतेय,” या वक्तव्यामुळे देशातल्या अजून एका मोठ्या गटाला उकळ्या फुटल्या आहेत. हा गट म्हणजेच छद्मपुरोगाम्यांचा. बाबरी मशीद पाडल्यामुळे भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडली, असा एक विचित्र दावा पेश करणारे विचारवंत ल्युटन्ट दिल्लीत आजही शिल्लक आहेत. पण, सर्वसामान्य माणसाचा बुद्धीभेद करणार्‍या या दाव्याला कुठलाही आधार नाही. ..

आता जबाबदारी मराठा समाजाचीच!

गुणवत्ता मिळवून शैक्षणिक जागा गमावलेले तरुण सामाजिक संवेदनशीलतेपेक्षा आपण गमावलेल्या जागेचे खापर ज्यांना आरक्षण मिळाले त्यांच्या नावे फोडताना दिसतात. उद्या मराठा समाजाच्या बाबतीतही हे घडणार नाही काय? राजकीय आघाडीवर हे आरक्षण आपल्याला कुणामुळे मिळाले? कुणी आपल्याला इतकी वर्षे नुसते झुलत ठेवले ? या प्रश्नांचा विचार मराठा समाजाला करावा लागेल. ..

शिवसेनेला रामराया तारणार!

खिशातल्या राजीनाम्यामुळे थट्टेचा विषय झालेल्या शिवसेनेला रामरायामुळे आज किमान आक्रमकतेचा आव तरी आणता आला आहे. सेनेच्या मतदाराला सुखावणारा हा आक्रमकतेचा आव सेनेला पुढच्या निवडणुकीपर्यंत तारून नेईल, यात काही शंका नाही. ..

तुका म्हणे ऐशा नरा...

सीमेवर आपले सैनिक रक्त सांडत असताना आपण पाकिस्तानी सोहळ्यात जाणे अयोग्यच अशी भूमिका खुद्द पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीच घेतलेली असताना सिद्धूसारखा माणूस तिथे जातो... तुकाराम महाराजांच्या अभंगाचा सडेतोड अनुभव कुणीतरी यांना देणार यात शंका नाही...

तुम्हीच तर त्यांचे आश्रयदाते!

धर्मांध हल्लेखोरांच्या धर्मवेडापायी काश्मिरी पंडितांच्या उष्ण रक्ताच्या चिळकांड्या तिथल्या थंडगार बर्फावर उडाल्या. पण, काश्मीरला इस्लामच्या चांदताऱ्याखाली आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ना कोणाचे रुदन दिसले ना कोणाची वाताहत! सांगा फारुख अब्दुल्ला, या सगळ्याला मोदीच जबाबदार होते काय?..

सारे काही सत्तेसाठी...

मायावती सध्या इतरांवर उच्चवर्णीयांबद्दल द्वेषभावनेला खतपाणी घालण्याचे आरोप करत असल्या तरी त्या स्वतः काही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ अजिबातच नाहीत. एकेकाळी मायावतींच्या सत्तेचा ‘चबुतरा’ अशाच प्रकारच्या आगलाव्या उद्योगांच्या पायावर आधारलेला होता. एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करूनच मायावतींनी उत्तर प्रदेशातील सत्तेची फळे चाखली होती...

अपराधाने माखलेला पंजा तर नाही ना?

न्यायालयानेदेखील अमित शाह यांना पाण्यात पाहणार्‍यांची कारस्थाने उघड केली. आताचा राहुल गांधी यांचा आरोपदेखील याच सोहराबुद्दीन प्रकरणातला असून हाही अमित शाह यांना संपविण्यासाठीचा डावच असल्याचे स्पष्ट होते. पण राहुल गांधी असो वा काँग्रेस वा अन्य कोणी, त्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवावे की, असत्याला सत्याचा अंगरखा घालून जनतेसमोर कितीही वेळा पेश केले तरी त्याचे वस्त्रहरण होतच असते. ..

कोणाला हवाय खलिस्तानचा भस्मासुर?

पंजाबातल्या आताच्या घटनांकडे केवळ दोन संप्रदायातील संघर्षाच्या नजरेने न पाहता अधिक व्यापक परिघातून पाहणे गरजेचे ठरते. ..

तुम्ही तर औरंग्याच्या पिलावळी!

मूठभर प्रसिद्धीपिपासू, अराजकवादी आणि काही काही तर अहिंदू असलेल्या महिलांच्या कथित भाविकगिरीच्या रक्षणापायी अय्यप्पाच्या खऱ्याखुऱ्या महिला भक्तांशी घृणास्पद व्यवहार केला गेला. ज्याची तुलना केवळ क्रूरकर्मा औरंगजेब वा टिपू सुलतानशीच होऊ शकते. ..

जे दिसते आहे ते ‘वरवरा’

वरवरा राव हे प्रकरण जितके वर दिसते तितकेच ते खोलही आहे. हिमनगाचे हे वरचे टोक असूनखरा भाग खालीच दडलेला आहे...

अवनीनंतरचे कवित्व

अवनीच्या दोन्ही पिलांनी शिकारी आणि प्राणीमित्र या दोघांनाही खोटे ठरविले आहे. पशु-मानव संघर्षात विवेक हा सर्वात मोठा सुवर्णमध्य आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे...

मोत्याच्या माळेची पुनर्गुंफण

भारत ज्यावेळी कोणत्याही देशाला मदत, सहकार्य करतो, त्यावेळी दोन्ही देशांचा फायदा व्हावा, हाच हेतू बाळगतो. म्हणूनच जगातील अनेक छोटी छोटी राष्ट्रे चीनला झुगारून भारताकडे आशेने व दृढ विश्वासाने पाहताना दिसतात. इब्राहिम सोली व मालदीवचेही आता तसेच होत आहे. ..

सेक्युलॅरिझमचे नवे ढोंग: मतुआप्रेम

मुस्लीम, बांगलादेशी, रोहिंग्ये यांच्यानंतर ममता बॅनर्जींच्या तुष्टीकरणाचे नवे लक्ष्य आहे मतुआ समुदाय. खरे खोटे सांगून, निरनिराळी आमिषे दाखवून ममता सध्या मतुआंना स्वत:कडे ओढत आहेत...

देणाऱ्यांचा सन्मान

आपण काहीतरी नवीन उपक्रम सुरू केला, ज्यातून कितीतरी हातांना काम मिळाले, बाजारपेठेत पैसा खेळू लागला, त्या आपल्या कामाची दखल सरकारने घेतली आणि आपल्या कामाचा सन्मानही केला, ही भावना नवउद्योजकांत वाढीस लागेल. यातूनच आणखी कित्येकांना उद्योग-व्यवसायाच्या मार्गावर चालण्याची इच्छा होईल. ..

पितळ उघडे पडू लागले!

भीमा-कोरेगाव दंगलीत संभाजीराव भिडेंना गोवण्याचे षड्यंत्र आखणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आयोगासमोर मात्र त्यांचे नावही घेतले नाही. कारण बाहेर खोटे बोलता येते मात्र आयोगासमोर खोटी साक्ष देणे हा गंभीर गुन्हा आहे. ..

राष्ट्रवादाचा जाच का?

राष्ट्रवादावरुन वाद पेटलेला असताना स्वा. सावरकरांचे “आम्ही या राष्ट्राचे नागरिक आहोत आणि या राष्ट्राचे रक्षण करणे आमचे कर्तव्यच आहे,” हे वाक्य महत्त्वाचे ठरते. ज्या त्या देशात राहणाऱ्या नागरिकांना आणि तिथल्या नेतृत्वाला आपल्या देशाचा विचार करण्याचा, त्याचे रक्षण करण्याचा पुरेपूर अधिकार आहे. अमेरिका तेच करत आहे, भारतही तेच करेल, हे नक्की. ..

सूर्यावर किती थुंकाल?

सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली, पण त्यांना त्यामुळे सोडण्यात आले नव्हते. माफीमागची कारणे स्वत: सावरकरांनी सांगितली आहेत. पण, राहुल गांधींसारखे नादान नेतृत्व ते कधीही स्वीकारणार नाही. त्याचे कारण स्पष्ट आहे...

बिन बादल ‘बरखा’

बरखा म्हणजे हिंदीत पाऊस. अशीच एक ‘बरखा’ भारतीय माध्यम क्षेत्रातही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ नुसती बिन बादलच बरसतेय. डाव्या सेक्युलरांच्या कळपात वावरून बोंबाबोंब करण्यात पटाईत असलेली महिला पत्रकार बरखा दत्त... ..

सावधान...'असहिष्णुता' येत आहे!

असहिष्णुतेच्या नाट्यातील प्रवेशाच्या अंकाचे नायक म्हणून सध्या रामचंद्र गुहा यांचं नाव चर्चेतआहे. अर्थात, प्रसिद्ध इतिहासकार, लेखक रामचंद्र गुहा. निमित्त ठरलं, ते गुजरातमधील अहमदाबाद विद्यापीठामध्ये गुहा यांची होणार असलेली आणि ‘अभाविप’च्या कथित ‘दबावामुळे’ रद्द झालेली नियुक्ती...

योगींची ‘दिवाळी भेट’

राममंदिराचा मुद्दा देशाच्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी आलेला असताना अयोध्येला योगी आदित्यनाथांनी घेलेलेले हे निर्णय हिंदू समाजाला सुखावणारे तर आहेतच पण, त्याचबरोबर काही शुभसंकेतांचे प्रतीकही मानले पाहिजेत...

सीमा संरक्षणाय कटिबद्धाय

आताच्या सरकारने सीमासुरक्षेबाबतची उदासीनता झटकून टाकत चीनच्या तोडीसतोड काम करण्याचा चंग बांधल्याचे दिसते. याचाच एक भाग म्हणून ‘भारतमाला योजनें’तर्गत चीनच्या सीमेपर्यंत रस्त्यांचे जाळे तयार करण्याच्या १८ हजार कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे समोर आले...

एका कलाकाराची कुचंबणा

मोदींच्या सत्ताकाळात देशाची अवस्था वाईटातून उत्तमाकडेच होताना दिसते. पण, बारामतीतल्या काकांच्या सांगण्यावरून पोपटपंची करणार्‍यांना हे कसे कळणार? आपल्या व्यंगचित्रांतून खरेतर राज ठाकरे खूप मोठा परिणाम आजही साधू शकतात आणि नको त्या लोकांशी हातमिळवणी केल्याने चांगल्या कलाकाराचीही माती होऊ शकते. राज ठाकरेंच्या मनातल्या कलाकाराची इथेच कुचंबणा झाली आणि होतेय...

ठिकऱ्या करणारी एल्गार परिषद

सदैव रक्तरंजित क्रांतीचा गांजा लावून त्याच धुंदीत वावरणाऱ्या नक्षलवाद्यांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास नसल्याचे नेहमीच समोर येते. गेल्यावर्षीच्या एल्गार परिषदेत सहभागी झालेली जवळपास सर्वच मंडळी नक्षलवाद्यांच्या जवळची आणि त्यांच्याप्रति विशेष प्रेम राखणारीच होती. त्याचाच प्रत्यय एल्गार परिषदेतल्या भाषणांतून आला. ..

वृत्त मूल्याची ऐशीतैशी

काही कथित पुरोगामी, उदारमतवादी पत्रकारांनी आणि त्यांच्या माध्यमसमूहांनी संघाला खलनायक ठरवायचेच आणि ते नाही जमले तर किमान संघाभोवती अकारण संशयाचे धुके निर्माण करून आपला अजेंडा पुढे रेटायचा, हे धोरणच आखले आहे. त्यामुळे नसलेला मुद्दा उकरून काढणे माध्यमांना जमले...

जाळणार्‍यांनाही मनुस्मृतीचाच आधार

जे छगन भुजबळ आज समतेचा नारा देत मनुस्मृती जाळण्याचा तमाशा मांडू इच्छितात, त्यांच्या मनातल्या जातीयवादाचे काय करायचे? आज बहुतेकांच्या विस्मरणात गेलेली वा जाणूनबुजून सांगितली न जाणारी एक घटना मुंबईत घडली होती, ज्यात छगन भुजबळांच्या मनातल्या जातीयवादाचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला आणि अनुसूचित जाती-जमातीतील समाजाला झाले होते...