धुळे

धुळ्यात प्राथमिक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामोर्चात जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शिक्षकांनी सहभाग घेतला. संघटनांनी शासनाशी अनेकवेळा चर्चा करूनही कोणताच निर्णय झालेलानसल्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी आज मोर्चाचे नियोजन केले होते. यात जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना सहभागी झालेल्या होत्या.

पुढे वाचा

जिल्ह्यातील दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे घ्याव्यात- डॉ. दिलीप पांढरपट्टे

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणार्‍या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी गठित दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे घेवून त्याचा अहवाल जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होणार्‍या जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर गठित करण्यात आलेल्या जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या दालनात आज सकाळी झाली.

पुढे वाचा