दिल्लीचे वार्तापत्र

केजरीवाल यांना शहाणपण कधी येणार ?

पुढे पहा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले धरणेआंदोलन मागे घेतल्यामुळे राजधानी दिल्लीत निर्माण झालेली प्रशासकीय कोंडी फुटली आहे.त्यासोबत दिल्लीवासीयांनीही सुटकेचा श्‍वास सोडला आहे. केजरीवाल यांनी धरणे आंदोलनाची हॅटट्रिक पूर्ण केली..

बिहारमधील जागावाटप ही भाजपाची डोकेदुखी!

पुढे पहा

2009 मध्ये भाजपा सोबत होती म्हणूनच जदयुला 20 जागा जिंकता आल्या, ही वस्तुस्थिती आहे. 2014 मध्ये भाजपा सोबत नव्हती म्हणून जदयुला 20 वरून दोन जागांवर समाधान मानावे लागले. 2014 ची लोकसभा निवडणूक राज्यात जदयु आणि भाजपाने स्वतंत्रपणे लढवली. याचा फटका भाजपाला नाही तर जदयुलाच बसला...

विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार

पुढे पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भरधाव निघालेला भाजपचा विजय रथ अडवण्याची ताकद आपल्यात नाही, याची जाणीव काँग्रेसला झाली आहे...

विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?

पुढे पहा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने भाजपाविरोधात विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भरधाव निघालेला भाजपाचा विजय रथ अडवण्याची ताकद आपल्यात नाही, याची जाणीव कॉंग्रेसला झाली आहे. ..

अपेक्षापूर्तीची मोदी सरकारची चार वर्षे

पुढे पहा

जनतेच्या कल्याणाच्या ज्या योजना राबवायच्या, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही, यावर पंतप्रधान मोदी यांचे आणि पंतप्रधान कार्यालयाचे जातीने लक्ष असते. एखाद्या योजनेवर पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष आहे, हे म्हटल्यावर संबंधित मंत्रालयही सतर्क होते. याचा फायदा अनेक योजनांच्या बाबतीत झाला...

कुमारस्वामी सरकार किती काळ टिकणार?

पुढे पहा

आघाडी सरकार पाच वर्षे टिकवणे आणि चालवणे हे माझ्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली कुमारस्वामी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी सहजपणे पार पाडता येईल, असे मला वाटत नाही, मलाच नाही तर राज्यातील जनतेलाही तसे वाटत आहे, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ, कॉंग्रेस कधीही आपल्या सरकारचा पाठिंबा काढून घेईल, याची त्यांच्या मनात धास्ती आहे...

कर्नाटक निवडणूक निकालाचा शोध आणि बोध...

पुढे पहा

राज्यातील तसेच दिल्लीतील पक्षाच्या सर्व नेत्यांना कामाला लावण्यात राहुल गांधी कमी पडले. त्यामुळे कॉंग्रेसच्या 44 जागा कमी झाल्या, 122 वरून कॉंग्रेस 78 जागांवर आली. आपल्याला अजून खूप काही शिकायचे आहे, याचा धडा राहुल गांधींना कर्नाटकच्या निवडणुकीने दिला आहे...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काय होणार?

पुढे पहा

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान तसेच जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांची मुक्तकंठाने प्रशंसा करून राज्यातील मतमोजणीनंतरच्या राजकारणाचे संकेत दिले आहेत. राज्यात भाजपा मिशन 150 साठी काम करत आहे आणि भाजपाला स्पष्ट बहुमताची खात्रीही आहे...

महाभियोग आणि कॉंग्रेसचा दुटप्पीपणा!

पुढे पहा

कोणतेही ठोस व सबळ पुरावे नसताना कॉंग्रेसने, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाची सूचना दिली. आपल्याला अपेक्षित असा निकाल सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाने न दिल्यामुळे कॉंग्रेसने न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न महाभियोग प्रस्तावाच्या माध्यमातून केला. सुदैवाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तो हाणून पाडला...

राहुल गांधी, फक्त माफी नाही प्रायश्चित्त घ्या

पुढे पहा

तिमोथी यांनी भारतातील लष्करच्या कारवायांबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी लष्करचे भारतात काही पाठीराखे असल्याचे मान्य केले होते, मात्र त्याच वेळी लष्करच्या अतिरेक्यांपेक्षा हिंदू अतिरेकी देशासाठी धोकादायक असल्याचे तारे राहुल गांधी यांनी तोडले होते...

कर्नाटकातील शक्तिप्रदर्शन

पुढे पहा

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणाला एक दिशा मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा प्रवास कॉंग्रेस आणि भाजपा यांनी कसा करायचा, याचे दिशादिग्दर्शन या निवडणुकीच्या निकालातून होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.....

तिसर्‍या आघाडीला कॉंग्रेसचे नेतृत्व चालेल?

पुढे पहा

शरद पवारांच्या सल्ल्यानंतर तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेची शक्यता मावळली आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्यापेक्षा भाजपाविरुद्ध एकास एक लढत देण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यात आपली ताकद वाढवावी, असा गुरुमंत्र शरद पवार यांनी या सर्वांना दिला आहे...

मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाचे राजकारण...

पुढे पहा

मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरून सध्या लोकसभेत गदारोळ सुरू आहे. कधीकाळी भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसमने आणि वायएसआर कॉंग्रेस यांनीच या अविश्वास प्रस्तावाची सूचना दिली आहे. मात्र, हा अविश्वास प्रस्ताव सध्या लोकसभेत दाखल होऊ शकला नाही. अविश्वास प्रस्तावाचे सुदैव वा दुर्दैव म्हणजे, ज्यांनी या प्रस्तावाची सूचना दिली वा ज्या राजकीय पक्षांनी या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला, त्यांच्याच गोंधळामुळे हा अविश्वास प्रस्ताव आतापर्यंत लोकसभेत दाखल होऊ शकला नाही. तेलुगू देसम आणि वायएसआर ..

लोकप्रतिनिधी आणि गुन्हेगारी यांची सांगड...

पुढे पहा

देशातील 1765 आमदार आणि खासदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे 3045 खटले प्रलंबित असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. राजकारण्यांच्या गुन्हेगारीत अपेक्षेप्रमाणे उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर, तर बिहारला मागे टाकत तामिळनाडू दुसर्या स्थानावर आहे. बिहारला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारनेच ही आकडेवारी दिल्यामुळे यावर अविश्वास दाखवण्याचे काही कारण नाही. भाजपाचे नेते आणि अॅड. अश्वनीकुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने, राजकारण्या..

त्रिपुरातील विजयाचा अन्वयार्थ

पुढे पहा

ईशान्य भारतात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्डमध्ये सत्तापालट झाला आहे. त्रिपुरामध्ये आतापर्यंत डाव्या पक्षांची म्हणजे माकपाची सत्ता होती, माकपाचा 25 वर्षापासूनचा ‘लाल’किल्ला भाजपाच्या ‘भगव्या’गडाने उद्‌ध्वस्त केला. भाजपाच्या ‘हिर्‍या’ने माकपाच्या ‘माणिक’वर मात केली . त्यामुळे त्रिपुरातील विजय हा ऐतिहासिक आणि नव्या मन्वतंराची सुरुवात करणारा आहे. मेघालयात कॉंग्रेसची सत्ता होती, तेथेही सत्ताबदल होत भाजपाच्या पाठिंब्याने नॅशनल पीपल्स पार्टीची सत्ता आली. नागालॅण्डमध्येही ..

आता लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे...

पुढे पहा

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केल्यामुळे, सर्व राजकीय पक्षांत हालचालींना सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीची भाजपाला दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. कारण, या निवडणुकीने राज्यसभेत भाजपाला बहुमत मिळणार नसले तरी भाजपाचे संख्याबळ वाढणार आहे, पर्यायाने भाजपाचे ‘अच्छे दिन’ सुरू होणार आहेत. ..

मेघालयमध्येही भाजपाचे कमळ फुलणार?

पुढे पहा

त्रिपुरा विधानसभेची निवडणूक आटोपल्यावर आता सगळ्यांचे लक्ष २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मेघालय आणि नागालॅण्ड विधानसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे. ही तीन राज्ये मिळून विधानसभेच्या १८० जागा तर लोकसभेच्या फक्त ५ जागा आहेत. प्रत्येक राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. त्यामुळे या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या राजकारणावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, तरीसुद्धा भाजपा, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या तीन राज्यातील निवडणुका अतिशय गांभीर्याने घेतल्या आहेत. कारण सध्या त्रिपुरात डाव्या ..

त्रिपुरा विधानसभेसाठी भाजपाचा ‘हिरा आणि माकपाच्या ‘माणिकमध्ये लढत!

पुढे पहा

ईशान्य भारतातील त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘हिरा’ आणि माकपचे ‘माणिक’ यांच्यात यावेळी ‘सरकारङ्क स्थापन करण्यासाठी चुरशीचा मुकाबला होत आहे. ईशान्य भारतातील आठपैकी पाच राज्यांत सध्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स’ म्हणजे ‘नेडा’ची सरकारे आहेत. यातील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार आहे; तर सिक्कीम आणि नागालॅण्डमध्ये भाजपाच्या मित्रपक्षांचे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करणाऱ्या भाजपाने ईशान्य भारतातील राज्यांच्या सामूहिक हिताचे रक्षण करण्यासाठी ..

लाभाच्या पदामुळे केजरीवाल यांचे नुकसान!

पुढे पहा

हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये, असे म्हटले जाते; पण या त्रिकालाबाधित सत्याचा दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या २० आमदारांना विसर पडला आणि त्यांना सुखासुखी मिळालेली आमदारकी गमवावी लागली. आमदारकीचे जास्तीत जास्त लाभ उपटण्यासाठी हे सर्व जण संसदीय सचिवपदाच्या मृगजळामागे धावायला लागले, त्यात त्यांचे संसदीय सचिवपदही गेले आणि आमदारकी गमावण्याची नामुष्कीही त्यांच्यावर आली!..

मोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही, तर जगातही!

पुढे पहा

२०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. मोदी यांच्या या लोकप्रियतेचीच देशातील विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी धास्ती घेतली आहे. या नेत्यांची स्थिती सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी झाली आहे..

राज्यसभेत सत्ताधारी भाजपाचे लवकरच बहुमत

पुढे पहा

मोदी सरकारसाठी अतिशय प्रतिष्ठेचे असलेले तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत लटकले. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे बहुमत असल्यामुळे तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत पारित होऊ शकले नाही, तसेच ते प्रवर समितीकडे पाठवण्यातही आले नाही. लोकसभेने पारित केलेल्या या विधेयकावरून सरकारची राज्यसभेत कोंडी झाली. विशेष म्हणजे मोदी सरकारची ही कोंडी २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून सुरू आहे. राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे सत्ताधारी भाजपाची राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक मुद्यांवर गोची होत होती...

थलैवा रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत!

पुढे पहा

राजकारणात उतरण्यासाठी मला कोणी बाध्य करू शकत नाही, त्याचप्रमाणे राजकारणात येण्यापासूनही कोणी मला रोखू शकत नाही,’’ असे ठणकावून सांगणारे, तामीळ चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय असणारे आणि अनेक आख्यायिका ज्यांच्याबद्दल सांगितल्या जातात, असे शिवाजीराव रामोजीराव गायकवाड उपाख्य रजनीकांत यांनी अखेर २०१७ संपायच्या अखेरच्या दिवशी राजकारणात उतरण्याची घोषणा केली...

चारा घोटाळ्यात अडकले लालूप्रसाद

पुढे पहा

चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे...

काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल

पुढे पहा

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याबरोबर काँग्रेसला आपले आणखी एक राज्य गमवावे लागले आहे. गुजरात तर काँग्रेसने २२ वर्षांपूर्वी जे गमावले, ते अद्याप त्यांना मिळवता आले नाही. मुळात हिमाचल प्रदेशमध्ये आपले सरकार येणार नाही, याचा काँग्रेसला एवढा विश्वास होता की, त्या राज्यातील निवडणूक काँग्रेसने गांभीर्याने घेतलीच नाही. निवडणुकीपूर्वीच हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने आपला पराभव मान्य केला होता...

वाचाळवीर मणिशंकर अय्यर यांना धडा शिकवण्याची गरज!

पुढे पहा

अय्यर यांच्या विधानामुळे काँग्रेसचे देऊळ पाण्यात चालले याची, गुजरातमधील अनेक देवळांना भेटी दिलेल्या राहुल गांधी यांना कल्पना आली, त्यामुळे त्यांनी मणिशंकर अय्यर यांना पंतप्रधान मोदी यांची माफी मागण्याचे निर्देश दिले. अय्यर ही व्यक्ती नाही, तर प्रवृत्ती आहे, त्यामुळे ती ठेचून काढली पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना नीच म्हणण्याची अय्यर यांची हिंमत कशी होते? विरोधी पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधानांवर टीका करण्याचा विरोधी पक्षांना आणि अय्यर यांनाही अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर करताना सौम्य आणि सभ्य ..

राहुल गांधी यांना अध्यक्षपदाच्या शुभेच्छा

पुढे पहा

अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची अविरोध निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या अर्जाच्या छाननीत अध्यक्षपदासाठी राहुल गांधी याचा एकमेव अर्ज असल्याचे तसेच त्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्जांचे ८९ संच वैध असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र राहुल गांधी यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याचे अजूनपर्यंत अधिकृत रीत्या घोषित करण्यात आले नाही. कारण अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर आहे. हा हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. ..

हिमाचल प्रदेशात वीरभद्रसिंह यांचे काय होणार?

पुढे पहा

वयाच्या 83 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळण्याची क्षमता वीरभद्र सिंह यांच्यात आहे का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे...

डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे अकलेचे तारे!

पुढे पहा

काही सन्माननीय अपवाद वगळता या देशाचे जेवढे नुकसान आपल्या शत्रूने केले नाही, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त नुकसान या राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी केले आहे...

काँग्रेसमध्ये राहुलयुगाचा प्रारंभ...

पुढे पहा

काँग्रेसमध्ये सोनियायुगाचा अस्त होऊन राहुलयुगाचा प्रारंभ होणार आहे...