चौफेर

सरकारच्‍या हेल्‍थकेअर दृष्टीकोनाला पाठिंबा देण्‍यासाठी भारतातील रक्‍तसंक्रमण सेवा प्रबळ करण्‍याची गरज

जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या (डब्‍ल्‍यूएचओ) मते देशाची रक्‍तासाठी असलेली मुलभूत गरज पूर्ण करण्‍यासाठी किमान १ टक्‍का लोकांनी रक्‍तदान करण्‍याची गरज आहे. भारताच्‍या बाबतीत २०१६-१७च्‍या आकडेवारीनुसार डब्‍ल्‍यूएचओ नियमांच्‍या तुलनेत १.९ दशलक्ष युनिट्सची (किंवा १५ टक्‍के) कमतरता होती...

युवराजची निवृत्ती!

तसा विचार केला, तर मानवी जीवनात निवृत्ती हा काही खूप आश्चर्याचा विषय नाही. साधी सरकारी चाकरी असो, की कार्पोरेट जगतातले दमछाक करणारे विसकळीत जीवन, राजकारण असो की कलाक्षेत्र, निवृत्त व्हावेच लागते माणसाला कधी ना कधी. ज्यांना निवृत्तीची नेमकी वेळ उमगली अन् झगमगाटाच्या वलयातून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य वेळी सहज घेता आला, त्यांचा रतन टाटा, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर होतो. बाकी, त्या मोहात अडकलेल्यांची गणतीही कमी नसते. ===‘‘क्रिकेट...! काही लोकांसाठी फक्त खेळ असेल. काही लोकांसाठी त्यांचा ..

कॉन्व्हेंट संस्कृतीतही शिक्षणाचे तीनतेराच!

इंट्रो : आम्हाला बेळगाव, निपाणी, कारवारसह कर्नाटकातली 800 गावं महाराष्ट्रात हवीत. का, तर ती मराठी भाषक आहेत म्हणून. आणि इकडच्या गावात मात्र मराठी शाळा नकोत! मराठी बेळगावसाठी आम्ही अजूनही लढा लढणार. तो लढा लढताना प्राण गमावणार्या 105 जणांची यादी अभिमानाने िंभतींवर लावणार. अन् इकडे गावागावातल्या सरकारी शाळांमधून मराठी हद्दपार करणार? कसले अजब धोरण राबवत सुटलोत आम्ही?..

कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी....

या पृष्ठभूमीवर, कॉंग्रेसाध्यक्षपद ‘गांधी’ घराण्याच्या बाहेर काढण्याचा दस्तुरखुद्द राहुल यांचा प्रस्ताव म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. तो केवळ विरोधकांनी केलेल्या धारदार टीकेचा परिणाम नाही. पक्षाची धुरा सांभाळणार्यांना एव्हाना लोकभावना ध्यानात आली असल्याचे ते संकेत आहेत. ‘गांधी’ आडनावाशी काडीचा संबंध नसताना, कालपर्यंत त्याचा जेवढा ‘लाभ’ मिळायचा तो मिळाला. मात्र, यापुढे फक्त त्याच्या भरवशावर राजकारण करता यावयाचे नाही, ही बाब खुद्द सोनिया, राहुल यांनाही ध्यानात आली असल्याचे ..

साहेब, लावायचा का व्हिडीओ...?

म्हणजे झालं कसं बघा, लोक आले. त्यांनी तुमचा ‘शो’ पाहिला. त्यांना तो आवडला. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. जमेल तिथे जमेल तसा हशाही पिकला. घरी परतले. अन् विसरून गेले... पाऽऽर ‘एण्टरटेनमेंट शो’ करून टाकला बघा लोकांनी तुमच्या जाहीरसभांचा.....

भिकार्यांच्या विश्वात...

ही पोरं आयुष्यभर ‘अशीच’ जगणार असल्याच्या निराशाजनक निष्कर्षाप्रतही तो आलेला असतो एव्हाना. या लेकरांना पुढे करून स्वत:ची पोटं भरणारे मायबापही त्याला ठाऊक असतात अन् आपल्या ठेल्याभोवती जमलेल्या ग्राहकांपुढे स्वत:च्या लाचारीचे प्रदर्शन मांडून त्यांच्या खिशातून चार पैसे उकळण्याची किमया अनुभवातून साध्य केलेली ही पोरं भविष्यात कधीतरी स्वाभिमानानं जीवन जगतील, जगू शकतील, निदान त्या दिशेनं प्रयत्न करतील, ही आशाही त्यानं सोडून दिलेली असते केव्हाच.....

लाज कशी वाटत नाही?

बरं, जनताही इतकी भोळी की, इंदिराहत्येचा क्षोभ व्यक्त करण्याच्या नादात, राजीव यांची पंतप्रधानपदी झालेली निवडही तिच्या सहज पचनी पडली. राजानंतर त्याच्या मुलाने राज्यकारभार बघायला इथे काही राजेशाही अस्तित्वात नव्हती. पण, एरवी लोकशाहीचा गवगवा करणार्या भल्याभल्यांनी इंदिरानंतर राजीव यांचा ‘राजतिलक’ विनासायास मान्य केला. आक्षेपाचा चकार शब्द काढला नाही कुणीच त्या वेळी.....

मराठी टिकेल कशी?

नेत्यांनी त्यांच्या मुलांंना इंग्रजी शाळेत शिकवण्यावर आक्षेप नाहीच. आक्षेप, तरीही त्यांनी मराठीचा बेगडी दुरभिमान बाळगण्यावर आहे! आक्षेप, तरीही त्यांनी निलाजरेपणाने मराठीचे राजकारण करण्यावर आहे. त्यांच्या राजकारणाच्या या धामधुमीत, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असल्याचा मुद्दा कुणाच्याच दृष्टीने ऐरणीवर नसतो, याचे खरे शल्य आहे... ..

चीनच्या विरोधावर नाही, आक्षेप राहुलच्या बरळण्यावर आहे!

युद्धाच्या प्रसंगात देश एकसंध असल्याचे सिद्ध करण्याचाच ध्यास असला पाहिजे प्रत्येकाचा. पण, इथे तर देशात दुफळी माजली असल्याचे चित्र निर्माण करण्याचीच अहमहमिका लागली आहे. तुम्हाला मोदी पंतप्रधान नको आहेत, भाजपा सत्तेत नकोय्‌, त्यासाठीच सारा जळफळाट चालला आहे, हे तर स्पष्टच आहे. पण म्हणून आपल्या पंतप्रधानांची टर उडवण्यासाठी, त्यांना कमी लेखण्यासाठी चीनची भलावण करत सुटणार का निर्लज्जांनो?..

सोशल मीडियाचे व्यसन...

एकूण, सोशल मीडियाच्या जगात इतरांच्या तुलनेत काहीतरी वेगळेच चालले आहे आपले. वैश्विक पातळीवर लोक त्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग धुंडाळीत असताना, आपण भारतीय लोक मात्र त्यात खोलवर गुरफटत चाललो आहोत दिवसागणिक. यातून लोकांना बाहेर काढण्याची निकड त्यातूनच निर्माण झाली आहे...

का नको युद्ध?

तरी बरं, आश्रय घ्यायला लादेनलाही पाकिस्तानच गवसला होता या भूतलावर... तरीही ते शहाणे, त्यांचा दहशतवादाला पाठिंबा नसल्याचे छातीठोकपणे सांगतात. भारतातले काही दीडशहाणेही विश्वास ठेवतात त्यांच्यावर. पाकिस्तानची ही तर्‍हा कुठवर सहन करायची, याचाच फक्त विचार होण्याची गरज आहे आता...

इथे जीवनाच्या तुलनेत मृत्यू श्रेष्ठ आहे...!

दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करणार्‍या, लष्करातल्या एका जवानाचे हे हाल दुर्दैवी नाहीत? मेट्रो म्हणजे फारच फार, दुरात दूर तासाभराचा प्रवास. तेवढा वेळ उभे राहिल्याने काही कुणी थकून जाणार नाही. पण, गाडीतील एकाही मर्दाने आपल्या जागेवरून उठून उभे राहात त्या सैनिकाला बसण्यासाठी आपली जागा देत ‘आदर’ दर्शविण्याचा प्रयत्न केलेला नाही...

चिनी हुवाईची अमेरिकेला भीती!

भारत हे प्रचंड मोठे मार्केट असणार आहे हुवाईसाठी. जितक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनांची विक्री होईल, धोकेही तेवढेच मोठे अन् गंभीर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात न माघारता देशहिताचा डिप्लोमॅटिक निर्णय, हीच काळाची गरज असणार आहे भारतासाठी. डेली हंट, न्यूज डॉग, युसी न्यूज आदी, भारतात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या अॅप्समधील चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर हुवाईचे आव्हान किरकोळ नाहीच तसे.....

व्हीआयपी संस्कृती अन्‌ प्रोटोकॉलचे स्तोम!

आता तर एक जिल्हाधिकारीही प्रोटोकॉलचे कारण पुढे करून, मोर्चातल्या लोकांना स्वत:च्या दालनात बोलावून ऐटीत निवेदन स्वीकारतो... खरंच जनता मालक आहे इथे? कोण नाही सांगा या व्हीआयपी यादीत? युपीएससीच्या सदस्यांपासून तर राज्याच्या अॅडव्होकेट जनरलपर्यंत झाडून सर्वांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते या देशात. फक्त, जनता तेवढी अडगळीत टाकली गेली आहे, बस्स! ..

बेरोजगारी शिगेला?

स्वयंरोजगाराच्या संधी प्रत्येकाने स्वत:साठी निर्माण करण्याची गरजही महत्त्वाची आहे. सर्वांनी पकोडेच तळले पाहिजे, अशी कुणाचीच अपेक्षा नाही. तसे कुणी म्हटलेलेदेखील नाही. पण, इथे तर तोही एक व्यवसाय होऊ शकतो म्हटल्याबरोबर ‘पप्पू’ जमातीची अख्खी फौज उभी राहिली पंतप्रधानांची खिल्ली उडवायला. तीच फौज आता सांख्यिकी विभागाच्या अहवालावरून राजकारण करायला सरसावली आहे.....

भान प्रजासत्ताकाचे आणि नागरिकांच्या कर्तव्याचेही...

हे आहेत भारतीय नागरिकांकडून अपेक्षित असलेले कर्तव्य. सगळी मिळून अकरा मुद्यांची जंत्री आहे ही. कुठेही दबाव नाही, कायद्याचा धाक नाही. नाहीच बजावलं कुणी आपलं कर्तव्य, तरी कुणी फासावर लटकावणार नाही. पण... जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दुरभिमान बाळगणारी माणसं आम्ही... या जेमतेम अकरा अपेक्षासुद्धा पूर्ण करू शकत नाही आहोत स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांत.....

नागरिकत्व विधेयकाविरुद्धचा पोटशूळ...

अमेरिका असो वा मग भारत, जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या देशांना असा समंजसपणा दाखवावाच लागतो. मनाचा मोठेपणाही दाखवावा लागतो. गरजवंतांच्या मदतीला धावून जावे लागते. सोबतच, आपल्या देशाची धर्मशाळा होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागते. अमेरिका सध्या तेच करते आहे.....

नेमके कुठे चाललो आहोत आपण?

तिकडे सातासमुद्रापल्याडच्या लोकांनी अवकाशाच्या दिशेने घेतलेली झेप, हा आमच्यासाठी चुन्यासोबत चोळलेल्या तंबाखूच्या सोबतीने चघळण्याचा विषय असतो. यात गंमत शोधायची की दुर्दैव, एवढाच शिलकीचा प्रश्न आहे. पण हे मात्र खरंच की, विचारांच्या संदर्भातल्या श्रीमंतीचा जो आब सामान्यत: लोक त्यांच्या बोलण्यातून दाखवतात, वर्तणुकीच्या संदर्भात नेमकी त्याचीच वानवा जाणवते... =..

हताश कॉंग्रेसचा तारणहार ‘कन्हैया!’

मुद्दा सत्ताधार्‍यांनी भांडवलदारांसाठी सत्ता राबविण्याचा असो, की मग लोकशाहीव्यवस्थेने चालविलेल्या गरिबांच्या थट्‌टेचा, या वावटळीतून कॉंग्रेसला बाजूला कसे ठेवता येईल? हे कन्हैया कुमारांनाही कळत नसेल, केवळ भाजपाला विरोध करायचा म्हणून ते याच नाकर्त्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या सभेच्या मंचावरून भाजपावर निशाणा साधत असतील अन्‌ समोर बसलेले शहाणे त्यामुळे आनंदात न्हाऊन निघत असतील, तर आनंदीआनंदच आहे सारा.....

गरिबांची स्थिती सुधारतेय्‌...

सरकारने चाळीस रुपयांचा तांदूळ दोन रुपयांत देऊन लोकप्रियता मिळवायची, की लोकांना चाळीस रुपयांचा तांदूळ विकत घेण्याइतके सक्षम बनवायचे, हा खरा प्रश्न आहे. बहुतांशी यातला सोपा पर्याय प्राधान्याने निवडला जातो. तो राजकारण्यांच्या सोयीचा असतोच, पण दुर्दैवाने लोकांनाही तोच पर्याय भावतो.....

चोराला हवी शाही बडदास्त!

आपण कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे धारक असल्याने, इथली व्यवस्था काय नि कायदे काय, काहीच आपल्याला लागू होत नसल्याच्या निष्कर्षाप्रत विजय मल्ल्याने येणे वेगळे आणि दस्तुरखुद्द समाजाला त्याची ही मुजोरी मान्य असणे त्याहून वेगळे. ज्या वेळी समाजालाही, कायदा लागू करण्याबाबत असा भेद अंमलात येणेे तितकेसे चूक नसल्याचे वाटते, ते अधिक घातक आहे...

व्वा! विजय माल्या, व्वा!

या बँकवाल्यानांही ना अशीच अद्दल घडवायला पाहिजे होती कुणीतरी. ज्यांनी मुळात कर्ज घेऊनच बँकेवर थोर उपकार केले आहेत, त्या तुमच्यासारख्या असामीकडून काय परतफेडीची अपेक्षा ठेवायची? देशात इतके सारे इतर लाचार, गरजवंत, गोरगरीब लोक शेकड्याने पडलेले असताना चक्क तुमच्याकडून कर्जावरचे व्याज घ्यायचे? छे! छे! शोभते काहो बँक अधिकार्‍यांना हे? ..

राहुल गांधींचे मतलबी हिंदुत्व!

हिंदूंचं काय मनावर घ्यायचं, ते तर मतं देतातच, सांभाळलं पाहिजे ते मुस्लिमांना. दखल घेतली पाहिजे ती अन्य अल्पसंख्यकांची. त्यांची मतं महत्त्वाची. ते नकोत नाराज व्हायला... अशा विचारांतून चाललेल्या यांच्या राजकारणाच्या तर्हेची जागृत हिंदू समाजाने मतदानाच्या प्रक्रियेतून वाट लावली, तेव्हा कुठे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मंदिरात जाण्याची गरज भासू लागली आहे. आपण ‘जानवेधारी ब्राह्मण’ असल्याचे जनतेला ठासून सांगण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे.....

तेरा वर्षांत बारा बदल्या झालेला अधिकारी!

हे अधिकारी अतिशय कडक, नियमांवर बोट ठेवून वागणारे, पारदर्शक पद्धतीने काम करणारे असल्याची त्यांची ख्याती आहे. मग अडचण कुठे आहे? असे अधिकारी नकोत प्रशासनात? मग टिकत का नाही तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी एका ठिकाणी? ते एखाद्या ठिकाणी नुसते रुजू झालेत, तरीही सार्या शहराला वर्दी मिळते. त्यांच्या कार्यपद्धतीतून बदल जाणवू लागतात सभोवताल. लोकांनाही त्यांची तर्हा भावलेली असते. आणि नेमकी एवढ्यातच लोकप्रतिनिधी आणि या अधिकार्यात ठिणगी पडते. संगीत मानापमानाचे नाट्यप्रयोग सुरू होतात.....

लिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत!

प्रचलित सर्वमान्य लग्नपद्धती मोडीत काढून लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय स्वबळावर निवडण्याइतक्या स्वयंघोषित पुढारलेल्यांनी, त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. त्यांचे निर्णय घेताना ते समाजाला कवडीची किंमत देणार नाहीत, त्यांच्या आड येत असतील तर ते बिनधास्तपणे सामाजिक बंधनं झुगारून लावतील. त्या वेळी समाजाने दखल देऊ नये, अशी त्यांची अपेक्षा असणार अन्‌ पुढ्यात संकट उभे राहिले, तर त्या वेळी मात्र समाजाने त्यांच्या मदतीला सिद्ध व्हायचं?..

संसद आणि विधिमंडळे कमजोर होताहेत...

लोकशाहीप्रक्रिया मजबूत करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांचीही आहे. पण कुठे राजकीय पक्षांच्या, तर कुठे भांडवलदारांच्या चौकटीत अडकलेली माध्यमं ही जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. उलट, दिवसागणिक ती अधिकच उथळ आणि बेजबाबदारपणे वागत असल्याचे निराशाजनक चित्र आहे. संसदेतल्या एखाद्या लोकाभिमुख निर्णयाची, चर्चेची, एखाद्या भाषणाची बातमी अपवादानेच होते. याउलट, तिथे सदस्यांनी घातलेल्या गोंधळाची, शिवीगाळीची बातमी मात्र हमखास होते. ..

मी टू...

भारतीय समूहाला स्त्रियांवरील अत्याचाराचे तसे अप्रूप नाहीच. अंगवळणी पडलेला आणि सर्वांनीच गृहीत धरलेला तो प्रकार असल्याने इथे त्याचे आश्चर्य नाहीच. खरंतर पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत संस्काराची भाषा आम्ही अधिक बोलतो. पण, एकमेकांच्या भावनांचा सन्मान राखण्यात त्यांचा जास्त पुढाकार आहे. खुले विचार आणि वर्तणुकीसंदर्भात आमच्या तुलनेत ते कितीतरी पुढे गेलेत; पण तरीही समोरच्या व्यक्तीच्या सहमती, अनुमतीला त्यांच्यालेखी अधिक महत्त्व. मुलींची छेड काढण्यात इथे कुणाला काय गैर वाटते? आमबात आहे आमच्यासाठी ती. पण तिकडे, ..

दुसर्‍यांनी का सोडवायचे आपले प्रश्न?

सारंकाही सरकार करेल, याच भूमिकेतून तत्कालीन राज्यकर्त्यांनी लोकांची मानसिकता तयार केली. परिणाम असा की, इथे फक्त ‘मतदार’ तेवढे शिल्लक राहिले, जबाबदार ‘नागरिकांची’ मात्र वानवा झाली. दुर्दैव असे की, त्याचे कुणाला शल्यही नाही. नागरिक सर्वार्थाने जबाबदार झाले, ते जबाबदारीने वागू लागले, तर अर्ध्या समस्या निकाली निघतील इथल्या. पण, नेमके ‘तेच’ घडू नये, यासाठीची तजवीज वर्षानुवर्षे झाली. परिणाम असा की, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरकारदरबारी हात पसरणार्‍या परावलंबी, हतबल, दुर्बळ अशा ‘नागरिक’ नावाच्या घटकाची गर्दी ..

प्रश्न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले!

कलम 377 असो की 497, ते पूर्णत: वा अंशत: खारीज केल्याबरोबर लागलीच दुसर्‍या दिवशीपासून अराजक निर्माण व्हायला, समाजात रुजलेले संस्कार आणि नैतिकतेचा पाया इतकाही तकलादू नाही. पण, तो दिवसागणिक ठिसूळ होतोय्‌ हे मात्र खरं! भारतीयांना असलेले पाश्चिमात्य जीवनशैलीचे प्रचंड आकर्षण, त्यानुरूप जगण्याची, सोयीच्या ठरलेल्या मर्यादित चौकटीत संपूर्ण आयुष्याचे सार शोधण्याची धडपड, हे त्यामागचे कारण असावे कदाचित! पण, त्यातून उद्भवलेले प्रश्न कठोर कायद्याच्या माध्यमातून सुटतील, हा मात्र केवळ भ्रम आहे!..

निमित्त अनुप जलोटांच्या लग्नाचे...

शेवटी जलोटा हे केवळ एक गायक आहेत. ते काही साधुसंत नाहीत, हेही समजून घेतले पाहिजे. संतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अवचित स्फुरलेल्या पंक्तीतून वाहणारी भक्तिधारा सुरांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतरही, ईश्वरचरणी लीन होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली नाही म्हणून त्यांना हिणवताना, तसली पात्रता आपण स्वत: कमावली असल्याचा दावा करण्याचे धारिष्ट्य किती लोकांना दाखवता येईल?..

लव्हरात्री...

चित्रपट यायचाय्‌ अजून बाजारात. पण, लागलीच दुखावल्या कुणाच्यातरी धार्मिक भावना. हो! चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भावना दुखावल्या, तरच त्याला काही अर्थ ना! त्याशिवाय लोकभावनांचा भडका कसा उडेल? त्याशिवाय कुणी कोर्टात कसे जाईल? प्रकरण न्यायालयात दाखल झालं नाही, तर मग आयती प्रसिद्धी कशी मिळेल? प्रसिद्धीशिवाय रसिकांच्या उड्या कशा पडतील? प्रेक्षकांची गर्दी झाली नाही, तर गल्ले कसे भरतील निर्मात्यांचे?..

दीडशहाणी स्वरा!

तसे तर भीमा-कोरेगाव प्रकरणात आतापर्यंत निदान 10 जणांना अटक झाली आहे. पण, कालपर्यंत स्वराला कंठ फुटला नव्हता. सापाची शेपटी वळवळली ती सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोन्सॉल्वीस यांना पोलिसांनी हात लावल्यावर! मग आधीच्या पाच जणांना अटक झाली तेव्हा मूग गिळून गप्प का बसली होतीस बये, असा सवाल विचारायला हवा तिला खरंतर!..

चमच्यांच्या गर्दीत हरवलेले अपात्र नेते!

पण, करता काय? गांधी बरळले. मन मानेल तसं. असले काहीबाही बिनधास्तपणे बरळण्याचा परवाना घेऊनच जन्माला आलेत ते. त्यांना कोण काय म्हणणार? घराण्याचा वारसाच एवढा मोठा लाभलाय्‌ त्यांना की, मी मी म्हणवणारी बडी बडी मंडळी बाजूला ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद पदरी पडलेय्‌ त्यांच्या. त्या माध्यमातून आलेल्या जबाबदारीचे भान राखायचे सोडून, शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास लाभलेल्या एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अभ्यास न करताच तद्दन फालतू, बेताल बडबडत कसे सुटतात, हे जगाला सांगण्यासाठीचा अट्‌टहास चाललाय्‌ त्यांचा ..

बा! सिद्धू...!

आपले पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या भेटीच्या वेळी तिथले जे अधिकारी सलामी द्यायला रांगेत उभे राहतात, त्यांना गळाभेटीसाठी पात्र ठरविण्याची किमया भारतीय संसदेचे सदस्य राहिलेल्या नवज्योत सिद्धू यांच्या हातून लीलया घडावी, ही बाब सार्‍या भारताला आक्षेपार्ह वाटली असेल, तर ती चूक कशी ठरवता येईल? आता दुसर्‍याच कुणालातरी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न अन्‌ आपल्याच चुकीच्या वागणुकीचे सिद्धूंनी चालवलेले लटके समर्थन योग्य कसे ठरवता येईल?..

पंडित नेहरूंचा दलाई लामाकृत उद्धार...!

बरं, कालपर्यंतची परिस्थिती अशी होती की, हिंदुत्ववादी, संघवाले म्हटलं की, रान मोकळे असायचे सर्वांना शिवीगाळ करायला. आता नेहरूंविरूद्ध ब्र काढायचा म्हटलं, तर लोक बिनदिक्कतपणे मोदीभक्त ठरवून टाकतात. त्यामुळे सत्य मांडले गेले तरी हवेत उडवला जायचा मुद्दा. खिल्ली उडविली जायची. खरा असूनही बेदखल राहायचा आरोप! नेहरूंनी घालून ठेवलेल्या घोळाचे गांभीर्य कधी देशाच्या ध्यानातच येऊ दिले नाही कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट विचारांच्या राज्यकर्त्यांनी...

सोनम वांगचूक

जवळपास तीन दशकं होताहेत. वांगचूक यांनी आरंभलेल्या चळवळीला वेगही येतोय्‌ आणि आकारही. सार्‍या जगाने दखल घेतली त्यांच्या कार्यकर्तृत्वाची. सॅनफ्रान्सिस्कोपासून तर युनेस्कोपर्यंतच्या संस्थांनी पुरस्कृत केले. या कालावधीतला एक प्रयोग मात्र सपशेल फसला- राजकारण करून बघण्याचा. पण, परवा मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला अन्‌ सामाजिक कार्यासाठीचा हुरूप नव्याने दुणावला.....

बुडत्या जहाजाचा कॅप्टन ठरणार इम्रान?

अनेकानेक दिग्गजांना आश्चर्याचा धक्का देत, माजी क्रिकेटपटू इम्रान खान सत्तास्थपनेच्या दिशेने मार्गक्रमण करताहेत. हा, पाकिस्तानी जनतेच्या अनाकलनीय राजकीय आकलनाचा आणि त्यानुरूप केलेल्या प्रगल्भ वर्तणुकीचा परिणाम म्हणायचा, की, एकूणच अस्थिर राजकारणाचा कित्ता गिरवीत राहण्याची पाकिस्तानी जनतेने अनुसरलेली ती परिपाठी म्हणायची, हा प्रश्न शिल्लक राहतो तो राहतोच!..

मंदिरांचा कारभार चालवणे हे सरकारचे काम आहे का?

सरकार राज्याचा कारभार चालवण्यासाठी निवडले गेले आहे की मंदिरांचा? मग सरकारवर अशी वेळ का यावी? निर्गुंतवणूक करत उद्योगजगतातून बाहेर पडणारे सरकार धार्मिक संस्थांच्या, त्यातही अपवादाने केवळ मंदिरांच्या कारभारात ढवळाढवळ करायला धजावत असेल, तर त्याचे समर्थन कसे करता येईल?..

सामान्य माणसाची संशयास्पद लढाई...

ही व्यक्ती रिक्षा चालवून जर एवढी गब्बर झाली असेल की, कोर्टातल्या वकिलाची फी तिने सहज अदा करावी... त्याला सवडही झाली असेल एवढी की, त्याने कचेरी आणि कोर्टाच्या चकरा विनासायास माराव्यात, तर मग या देशात आता केवळ धर्माची परिभाषा निश्चित करण्याचीच समस्या तेवढी शिल्लक राहिली असल्याचा निष्कर्ष काढायला हरकत नाही!..

एक धडपड... फुलपाखरांसाठीची...

आपण चुकीच्या माणसाचे अपहरण केल्याची बाब स्पष्ट झाल्यावर त्यांनी बर्डेकरांना सोडून तर दिले, पण या त्यासाठी जवळपास अडीच-पावणेतीन महिन्यांचा कालावधी जावा लागला. तो थरार, ती घालमेल, ती अस्वस्थता, ‘संपलं सारं आता’ असं वाटणारे काही प्रसंग, कुठलेसे सकारात्मक संकेत अन्‌ पुन्हा एकदा जागणारी, पल्लवित होणारी आशा... अपहरणाच्या अनुभवावर आधारलेलं बर्डेकरांचं ‘पोखिला’ हे पुस्तक म्हणजे या सार्‍या भावभावनांची शब्दव्युत्पत्ती आहे...

बाळासाहेबांच्या नावाची शान राखा साहेब...

एकदम मस्तच स्टाईल बरं साहेब ही आपल्या राजकारणाची! भल्या भल्यांना साधले नाही हे राजकीय चातुर्य. पण तुम्ही? कसे सहज आत्मसात केलेत बघा. मानलं साहेब आपल्याला. राजकारण करावं तर हे असं. सरकारमध्येही राहायचं अन्‌ सरकारला ठोकूनही काढायचं. सत्ता मनमुराद उपभोगायचीही, पण आपल्याला त्याचा जरासाही लोभ नसल्याची नौटंकीही बेमालूमपणे करायची. विरोधी पक्षालाही लाज वाटावी, इतक्या बेमुर्वतखोरपणे आपल्याच सरकारवर तोंडसुख घ्यायचं. त्याला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडायची नाही. त्याला पळपुटं ठरवायचं, त्याला हिणकस भाषेत हिणवायचं, ..

फसव्या जाहिरातींविरुद्धची लढाई... सुरू होईल कधी?

खरंतर ही जाहिरात बघणारे, लाखो-करोडो लोक आहेत. त्यांच्या लक्षात नाही येत कधीच, की कुठलासा डिओड्रंट वापरला म्हणून कुणाच्या गळ्यात पडायला मुली एवढ्या मूर्ख नाहीयेत म्हणून? असे घडणे शक्य नाही हे आम्हाला कळते. ज्यानं जाहिरात केली त्यालाही याची जाणीव आहे. मग ही शुद्ध फसवणूक असल्याची आणि तसे करणे हा कायद्यानं गुन्हा असल्याची पूर्ण कल्पना असतानाही तो असले फसवे दावे का करतो? ते दावे करण्याची हिंमत होते कशी त्याला?..

प्रणवदांच्या भाषणाचा मथितार्थ...

पहिले तर लोकांना, त्यांनी संघाच्या कार्यक्रमात आलेलेच नको होते. पण, स्वत:च्या निर्णयावर ठाम राहात त्यांनी या कार्यक्रमातील उपस्थितीसाठी होकार दिला तर यांना लागलीच पोटशूळ उठला. त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा म्हणून यांचा थयथयाट सुरू झाला...

संघ, प्रणवदा, पोटशूळ वगैरे...

डाव्या विचारांच्या राजकीय पक्षांनी तर संघाला बदनाम करण्याचा विडा उचलल्यागत षडयंत्रं रचली. केरळ, बंगालात स्वयंसेवकांना जिवानिशी संपविण्याचे कारस्थान काय उगाच अंमलात येतेय्‌ इतकी वर्षे? आपल्याला न पटणार्‍या विचारांच्या माणसांचं अस्तित्वच नामशेष करण्याची त्यांची रीत कुठे अन्‌ इतकी वर्षे विरोध करणार्‍यांना प्रणवदांना, वैचारिक परिवर्तनाचे सारे प्रयत्न पणाला लावून संघाच्या मंचावर ससन्मान विराजमान करण्यासाठीचे निमंत्रण त्यांनी मनापासून स्वीकारावे इतका वैचारिक बदल त्यांच्यात घडवून येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे ..

निवडणुकीचा बाजार अन्‌ मतांचा लिलाव!

जिच्याजवळ पैसा नाही, अशा व्यक्तीला एकतर उमेदवारीच मिळत नाही अन्‌ मिळालीच चुकून कधी, तर तिची कशी दमछाक होते, तिच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह उभे करत राजकारणातले ‘व्यापारी’ आपसात कडबोळे करून तिच्या मार्गात कसे अडथळे निर्माण करतात, याची साक्षीदार ठरलीय्‌ ही निवडणूक!..

लर्निंग डिस्‌अॅबिलिटीग्रस्तांच्या जगात...

शेवटी व्हायचं तेच घडते. ना प्रमाणपत्र, ना सरकारी योजनांचा लाभ. आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गातील मुलांचे हाल तर आणखीच वेगळे. त्यांना तर आपल्या पाल्याला शाळेतून काढण्याची भाषा कुणी बोललं तर संघर्ष करायचा असतो, हेही ठाऊक नसते. खूपदा तर पालकांच्याही लक्षात येत नाही. पोर बुद्धू निघाल्याच्या गैरसमजुतीतून पाठीवर धपाटे बसत राहतात बिचार्‍यांच्या. अभ्यासात ‘ढ’ असल्याने शाळा अर्ध्यावर सुटते कित्येकांची. अर्थार्जनाच्या इतर कामात जुपंली जातात मग ही मुलं. उच्चभ्रू वर्गात ज्याचे आकर्षण आहे, त्या अभियांत्रिकी, वैद्यकीय ..

नक्षलसमर्थकांच्या सत्यशोधनाची नौटंकी!

पांढरपेशावर्गातील नक्षलसमर्थकांच्या विविधांगी क्लृप्त्यांचे आश्चर्य नाहीच. गेली कित्येक वर्षे हाच धंदा चाललाय् त्यांचा. तो नक्षली चळवळीच्या कार्यपद्धतीचाही एक भाग आहे. ..

आसाराम प्रकरणातील जनतेच्या प्रगल्भतेचा प्रत्यय...

तिकडे न्यायालयाचा निर्णय जाहीर झाला. आसारामला दोन जन्मठेप सुनावल्या गेल्या अन्‌ मध्यप्रदेशात, त्याचे नाव देण्यात आलेल्या रस्त्यावरील नावाचा फलक त्वेरेने काढला गेला. कुणावरही बिनदिक्कतपणे विश्वास ठेवणार्‍या समूहाचे अलौकिकत्व अन्‌ वेगळेपण आहे ते हेच. तो जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्याबद्दलचा अपशब्दही सहन करीत नाही, पण जेव्हा आपला निर्णय चुकल्याची बाब लक्षात येते तेव्हा, ती चूक सुधारण्यात त्याला जराही कमीपणा वाटत नाही, ही बाब भारतीय हिंदू समाजाचे असाधारण असे वेगळेपण सिद्ध करणारी, त्याची ..

आसाराम प्रकरणातील जनतेच्या प्रगल्भतेचा प्रत्यय

तिकडे न्यायालयाचा निर्णय जाहीर झाला. आसारामला दोन जन्मठेप सुनावल्या गेल्या अन् मध्यप्रदेशात, त्याचे नाव देण्यात आलेल्या रस्त्यावरील नावाचा फलक त्वेरेने काढला गेला. कुणावरही बिनदिक्कतपणे विश्वास ठेवणार्या समूहाचे अलौकिकत्व अन् वेगळेपण आहे ते हेच. तो जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्याबद्दलचा अपशब्दही सहन करीत नाही, पण जेव्हा आपला निर्णय चुकल्याची बाब लक्षात येते तेव्हा, ती चूक सुधारण्यात त्याला जराही कमीपणा वाटत नाही, ही बाब भारतीय िंहदू समाजाचे असाधारण असे वेगळेपण सिद्ध करणारी, त्याची ..

नात्यांचं सौंदर्यही जपायला पाहिजे ना ?

परवा चेन्नईच्या राजभवनात जे घडलं त्याचे करायचे त्यांनी जरूर राजकारण करावे. ‘त्या’ मुलीलाही घडल्या प्रकरणाचे निमित्त करून जे साधायचेय् ते तिने जरूर साधावे. पण, म्हणून उर्वरित जनसमुदायानेही स्त्री-पुरुषांमधील इतर सार्या नात्यांची वीण कल्पनातीत ठरवून केवळ एका मार्यादेत ते नाते बंदिस्त करण्याचा प्रयत्न करावा, हे मात्र अयोग्यच! आधीच आधुनिकतेच्या नावाखाली ‘लिव्ह इन रीलेशनशिप’पासून तर समलैंगिक संबंधांपर्यंतच्या कित्येक बाबी सहजपणे स्वीकारून बसलेल्या समाजाची घडी अधिक विसकटू द्यायची नसेल, तर स्त्री-पुरुषांमधील ..

पुरुषी अहंकार ठेचण्यासाठी...

उपरोक्त प्रकरणातील एकूण एक माणसांचं वागणं म्हणजे निर्लज्जतेची हद्द अधोरेखित करणारं अन्‌ माणुसकीला काळिमा फासणारं धगधगतं वास्तव आहे. एकुलता एक मुलगा साता समुद्रापल्याड दूर कुठेतरी इंग्लंड-अमेरिकेत राहतो म्हणून एकटेपण सोबतीला घेऊन जगणार्‍या आई-बापाची करुण कहाणी काय अन्‌ स्वत:ची सारी जिंदगानी मुलांवर उधळूनही आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात घालवण्याची वेळ आलेल्या त्या दाम्पत्याचं ताल-सूर हरवून बसलेलं जीवनकाव्य काय, वेशीवर टांगलेलं दुर्दैवच...!..

मुजोर सलमानचे मूर्ख समर्थक

कीस पाडत, कायद्याचा वाट्‌टेल तसा ‘वापर’ करून घेत स्वत:ची सुटका तर सलमान आताही करून घेईल. पैसा फेकला की कित्येक वकील त्यांचे कायद्याचे ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करायला सिद्ध होतील. त्यातूनच त्याचे नसलेले निर्दोषत्वही तांत्रिकदृष्ट्या मान्य होईल न्यायालयाला. त्यात आश्चर्य ते नाहीच. आश्चर्य, त्याचे हे विकत घेतेले निर्दोषत्व मान्य करीत जनतेने त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचे आहे. आणि तेच दुर्दैवी आहे..

मुजोर सलमानचे मूर्ख समर्थक

कीस पाडत, कायद्याचा वाट्टेल तसा ‘वापर’ करून घेत स्वत:ची सुटका तर सलमान आताही करून घेईल. पैसा फेकला की कित्येक वकील त्यांचे कायद्याचे ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करायला सिद्ध होतील. त्यातूनच त्याचे नसलेले निर्दोषत्वही तांत्रिकदृष्ट्या मान्य होईल न्यायालयाला. त्यात आश्चर्य ते नाहीच. आश्चर्य, त्याचे हे विकत घेतेले निर्दोषत्व मान्य करीत जनतेने त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचे आहे. आणि तेच दुर्दैवी आहे.....

मंत्रालयातली उंदरं!

परवा, एकनाथराव खडसे यांनी एक प्रकरण विधानसभेत उघडकीस आणले. खुद्द सत्ताधारी पक्षातले, खडसे यांच्यासारखे एक दमदार, अनुभवी, ज्येष्ठ नेतृत्व एखादे प्रकरण उघडकीस आणताहे म्हटल्यावर, त्याचे गांभीर्य दखलपात्र ठरणे ओघानेच आले. प्रकरण आहे, ..

मंत्रालयातली उंदरं!

परवा, एकनाथराव खडसे यांनी एक प्रकरण विधानसभेत उघडकीस आणले. खुद्द सत्ताधारी पक्षातले, खडसे यांच्यासारखे एक दमदार, अनुभवी, ज्येष्ठ नेतृत्व एखादे प्रकरण उघडकीस आणताहे म्हटल्यावर, त्याचे गांभीर्य दखलपात्र ठरणे ओघानेच आले. ..

यथा प्रजा तथा राजा...!

एक काळ होता, विधानसभा किंवा लोेकसभेत आपल्याला न पटणारे विचारही ऐकून घेण्याची तयारी असायची. सभात्यागाला किंमत होती. सरकारविरोधात दिल्या जाणार्या घोषणांना महत्त्व होते. ..

स्वतंत्र ध्वजाचा कर‘नाटकी’ थाट!

स्वतंत्र ध्वजाचा कर‘नाटकी’ थाट!..

पवारसाहेब, कशाला उगाच विदर्भाच्या आड येता?

कधीकाळी यशवंतराव चव्हाणांनी विदर्भाचा लढा हा केवळ अभिजनांचा असल्याचे सांगत, त्यातील हवा काढून घेण्याचा कुटिल डाव खेळला होता. आज, स्वत:ला त्यांचे शिष्य म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांना या लढ्यातील मराठी माणसाच्या सहभागाचा अभाव कधी नव्हे एवढ्या प्रकर्षाने जाणवू लागला आहे! सी. पी. अ‍ॅण्ड बेरारच्या विधानसभेत आजपासून नऊ दशकांपूर्वी, सर्वप्रथम बापूजी अणे या मराठी माणसाने विदर्भाचा आवाज बुलंद केल्याचा इतिहास विस्मरणात जाणे, ही खरंतर शरद पवारांची राजकीय गरज आहे. आणि विदर्भाचे वेगळे राज्य नाकारण्यासाठी संयुक्त ..

कर्ज बुडवणं इतकं सोप्पं आहे तर

कर्ज बुडवणं इतकं सोप्पं आहे तर..

चौफेर - छे! छे! अब्दुल्लाजी, भारत तुमच्याच बापाचा!

‘भारत हा काय तुमच्या बापाचा आहे का?” असा सवाल छातीठोकपणे करणाऱ्या अब्दुल्लांना जाब कोण विचारू शकतो? आपल्या बापाचा समजून ज्यांनी काश्मिरात कधी इतर कुणाला हस्तक्षेप करू दिला नाही, तिथे कायम आपली मक्तेदारी असावी यासाठी प्रयत्न केलेत, आपल्या बापजाद्याची मालमत्ता समजून स्वत:च्या राजकारणासाठी काश्मिरातील वातावरण दूषित केले, पाकिस्तानची भलावण करीत भारताला शिव्याशाप देण्याचा उपद्व्याप अव्याहतपणे केला.....

लाज तर यांचीही वाटली पाहिजे ना सुप्रियाताई!

सरकारी कार्यपद्धतीतील प्रचलित लालफीतशाहीला कंटाळून धर्मा पाटील नावाच्या एका शेतकऱ्याने मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केल्याच्या पाश्र्वभूमीवर, सरकारची लाज काढण्याच्या प्रकाराबद्दल सुप्रियाताई सुळे यांचं खरंतर कौतुकच केलं पाहिजे. ..

‘माल’ खरा का खोटा; ठरवते कालबाह्य ‘व्हर्जिनिटी टेस्ट!’

लग्न ठरलं असल्याची बातमी कानावर आली तरी तिच्या मनात धडकी भरते. जिवाची घालमेल सुरू होते. कारण लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या, आयुष्याचाच ‘निकाल’ लावणार्‍या परीक्षेचे प्रचंड दडपण मनावर असते. या परीक्षेत तिचं ‘उत्तीर्ण’ होणं महत्त्वाचं. खूप महत्त्वाचं. केवळ नवर्‍यासाठी नव्हे! संपूर्ण समाजालाच ‘ती’ पास झाली की नापास, यात स्वारस्य असते. या परीक्षेचा निकाल सार्‍या जगाला ‘दाखवला’ जातो. भविष्यात तिला मिळणारी वागणूकही त्या निकालावर ठरत असते. पास झाली तर दारू-मटणाची पार्टी. अन नापास झाली तर... नकोसा वाटणारा ..

स्वत:च्या लढाईचे एकाकी शिलेदार...!

म्हटलं तर त्याचं काम फार मोठं. नच म्हटलं तर एका नजरेत बात खल्लास! म्हटलं तर तोंड भरून कौतुक करावं असं. आणि म्हटलंच तर सर्वांनी अनुकरण करावं असंही... दूरवरच्या ओरिसातल्या आडवळणावरच्या एका दुर्गम गावात राहणारा एक आदिवासी माणूस. शहरात राहणार्‍यांच्या लेखी कवडीचीही किंमत नसलेला. अशिक्षित, अडाणी, मागासलेला, दुर्लक्षित, अदखलपात्र... पण, परवा खुद्द कलेक्टरसाहेबांनी त्याला बोलावलं आपल्या दालनात. चारचौघांत त्याचं कौतुक केलं. सत्कार केला अन गुमसाही नावाच्या एका छोट्याशा गावातल्या जालंधर नायकच्या कार्याची ब्रेकिंग ..

माफ करा, बापू...!

गांधीके सपनोका भारतकातील हैं, हत्यारा हैं फिरभी सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा हैं.....

लालूंची अलिशान कैद!

खरंच हा देश अजब आहे. नुसताच अजब नाही, तर गुलामांचा देश आहे हा. कमालीच्या पराभूत मानसिकतेत जगतात लोक इथले. एकतर एखाद्याला डोक्यावर बसवताना त्याची लायकी लक्षात घेत नाहीत अन् एकदा बसवलंच डोक्यावर की, त्याची पत लक्षात असूनही त्याला जाब विचारण्याची हिंमत कुणी करीत नाही. अशा तर्‍हेने, लोकांनी अकारण डोक्यावर घेतलेली माणसंही मग सुसाट सुटतात. बेताल वागतात...

...मग घोटाळा केला कुणी?

...मग घोटाळा केला कुणी?..

सिच्युएशनशिप...

सिच्युएशनशिप.....

तो वेडा, वाचायला लावतोय् लोकांना!

तो वेडा, वाचायला लावतोय् लोकांना!..

हुमायून, अकबर... राहुल...!

राहुल गांधी यांची कॉंग्रेसाध्यक्षपदी निवड होत असतानाचा मुहूर्त साधला जाताच, त्या पक्षातील एखाद्या बड्या नेत्याला शहाजहाँपासून तर बाबरापर्यंतच्या पिढीचे, राज्याभिषेकाच्या त्यांच्या परंपरेचे स्मरण होणे, हा योगायोग नाहीच मुळी. ..

तो वेडा, वाचायला लावतोय् लोकांना!

जेमतेम पस्तिशीतला तो तरुण, वाचनसंस्कृती लोप पावत चाललेल्या भारतीय तरुणाईला चक्क वाचनाचं वेड लावतोय्. लोकही वेडे होताहेत त्याच्या त्या आगळ्या प्रयोगानं. ..

मुलींचा जन्म नाकारणारी हीन मानसिकता...

कुटुंबातील सर्वांनाच वंशाचा दिवा हवा असताना, कुणालाच नको असलेलं स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायला जगात आलेली चिमुरडी एका वृद्धेनं निर्दयतेनं चिरडून टाकल्याची घटना अगदी परवाची आहे...